एका बहुचर्चित वक्त्याने हातात ५०० रुपयांची नोट
हलवत आपल्या कार्यक्रमाची सुरुवात
केली.
सभागृहात बसलेल्या शेकडो लोकांना त्यानं विचारलं की,
“ही ५०० रुपयांची नोट कोणाला
हवी आहे?”
सर्वांनी हात वर केला. त्यानंतर तो म्हणाला,
“मी ही नोट तुमच्यापैकी
कोणातरी एकालाच देईन. पण त्यापूर्वी मला
हे करू द्या.”
आणि त्याने त्या नोटेला आपल्या मुठीत चुरगळण्यास
सुरुवात केली आणि मग त्यानं विचारलं,
“कोण आहे ज्याला अजूनही ही नोट
हवी आहे?”
अजूनही लोकांचे हात वर येत होते. “बरं!” तो म्हणाला,
“जर मी ही नोट पायाने
चुरगळली तर किती जण ही
नोट घेतील?”
यावेळी मात्र त्या नोटेची अवस्था बिकट
झाली होती. ती खूपच
मळकटली आणि चुरगळली
होती,
तरीही अनेक लोकांनी हात वर
केला.
मित्रांनो,
आज तुम्ही अत्यंत महत्त्वाचा धडा घेतला आहे.
मी या नोटेबरोबर इतका वाईट व्यवहार केला,
तरीही तुम्ही या नोटेला घेऊ
इच्छिता. कारण हे सगळं होऊनदेखील या
नोटेची किंमत कमी झालेली
नाही. तिची किंमंत अजूनही
पाचशे रुपयेच आहे.
आयुष्यात कित्येक वेळा आपण पडतो, आपल्यासाठी
आपण घेतलेले निर्णय आपल्याला जमिनीवर पाडतात.
आपल्याला असं वाटू लागतं की, आपली
काहीच किंमत नाही. पण
भलेही तुमच्याबरोबर काहीही
झालं असेल किंवा भविष्यात होणार असेल तरी
देखील तुमची किंमत कमी होत
नाही. तुमच जीवन
कितीही चुरगळलेल असू दे पण
जीवनाची घडी
नीट घाला.
तुम्ही विशेष आहात हे कधीच विसरू नका.
आपल्या भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींमुळे आपल्या
भविष्यात होणाऱ्या चांगल्या गोष्टींवर परिणाम होऊ देऊ
नका.
स्वत: घेतलेल्या निर्णयाशी स्वत:चीच हार
होऊ देवू नका,
पुर्ण मेहनत करत चला, वेळ लागेल, तुम्ही
नक्कीच जिकंणार,
फक्त करून दाखवा, जग तुम्हाला जिकंताना बघायला तयार आहे.
फक्त संयम ठेवा, लक्षात ठेवा,
तुमच्याकडे सर्वांत मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल
तर ती म्हणजे "तुम्ही स्वतः" आणि
तुमचा तुमच्यावरच असलेला विश्वास
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा