रडगाणं का गाता?
वयाच्या १३ व्या वर्षी एरिकला अंधत्व आलं होतं.
आयुष्य जसं भरकटत नेईल तसं भरकटत जाण भाग होतं. पण
एरिकने आहे ते स्विकारलं होतं. आपल्या मर्यादांच्या परिघात राहून
आपण काय करू शकतो हे त्याने शोधायला सुरुवात केली.
परिस्थितीने त्याला इतकं कणखर बनवलं कि एक दिवस
त्याने हिमालयातील सर्वोच्य शिखर एवरेस्टलाच
गवसणी घालायचा निर्धार केला.
आपल्त्या प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावर एरिकने
आपलं स्वप्नं खरं करून दाखवलंच. २५ मे २००१
रोजी वयाच्या ३३ व्या वर्षी त्याने
एवरेस्टवर आपल्या देशाचा झेंडा फडकवला आणि एवरेस्ट शिखर
सर करणारा तो जगातील पहिला दृष्टिहीन
माणूस ठरला. त्या दिवशी जगातील करोडो
अंधांना त्याने जगण्याची एक नवीन उमेद
दिली. एरिक विहेनमेयरच्या त्या अफाट
जिद्दीला आणि त्याच्या त्या महान कर्तुत्वाला माझा
त्रिवार सलाम !
लहानपणी फूटबॉल, बास्केटबॉल खेळायची
त्याला आवड होती. अंधत्वामुळे तो
कुस्तीकडे वळला. त्यात त्याने इतकं नैपुण्य मिळवलं
कि तो पुढे कुस्तीचा कोच झाला. एका शिबिरात त्याचा रॉक
क्लायम्बिंगशी परिचय झाला. या क्रीडा
प्रकारात त्याचं अंधत्व आड येत नव्हतं. त्याचं पुढचं पाउल होतं
गिर्यारोहणाच. त्यामुळे लवकरच एरिक आफ्रिकेपासून
अर्जेन्टिनापर्यंत पर्वत शिखर सर करू लागला. एवरेस्ट
त्याच्यासाठी तरीही खूप लांबचं
स्वप्नं होतं. मात्र आपण अजिबातच प्रयत्न न करण्यापेक्षा
अपयश आलेलं परवडलं असा विचार करून तो प्रयत्नाला लागला.
जेव्हा प्रत्यक्ष ती वेळ जवळ आली
तेव्हा एरिककडे प्रचंड आत्मविश्वास होता.
अपेक्षेप्रमाणे मार्ग खूप खडतर आणि धोकादायक होता. त्याच्या
टीममधले सर्व सहकारी त्याला ओरडून
दिशा सांगायचे. पण जितक्या अधिक उंचीवर ते पोहोचायचे
तेव्हा प्रत्येकालाच आपल्या जीवाची
काळजी असायची. खराब हवामानामुळे
अनेक गिर्यारोहक माघारीही परतले.
तरीही एक दृष्टिहीन माणूस
चिकाटीने मार्गक्रमण करीतच राहिला. सतत
दोन महिने अथक चढाई केल्यावर शेवटची ४५ मिनिटं
म्हणजे केवळ खडी चढणच होती.
जेव्हा ती चढण त्याने पार केली तेव्हा
त्याने एक नवा इतिहास घडवला होता.
आज एरिक दीर्घ पल्याच्या मोटार बाईक स्पर्धा,
मेरोथान, स्काय डायविंग अशा विविध क्रीडा प्रकारात
पारंगत आहे. मित्रानो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते
नाही असं रडगाणं का गाता ? एरिककडे डोळे नव्हते
पण त्याच्याकडे हात आणि पाय तर होते. एखादी गोष्ट
आपण साध्य करू शकतो हा दृढ विश्वास तर होता. अमुक एक
गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही
कुणी खास हिरो असण्याची आवश्यकता
नसते. त्यासाठी तुम्ही फक्त
प्रेरणेनी भरलेली एक सामान्य
व्यक्ती असावं लागतं.
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा