माझी पत्नी आतून ओरडली,
"आता किती वेळ तो पेपर वाचत बसणार आहात? आता
ठेवा तो पेपर आणि तुमच्या लाडक्या लेकीला खायला
दिलय ते संपवायला सांगा!"
मामला गंभीर वळण घेणार असे दिसलं! मी
पेपर बाजुला सारला आणि घटनास्थळी दाखल झालो.
सिंधू , माझी एकुलती एक
लाडाची लेक रडवेली झालेली
होती.डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले. तिच्या पुढे एक
दहिभाताने पूर्ण भरलेला बाऊल होता.
सिंधू,तिच्या वयाच्या मानाने शांत व समजुतदार,गोड आणि हुशार
मुलगी होती.
मी बाऊल उचलला आणि म्हणालो, "बाळ, तू चार घास
खाशील का? तुझ्या बाबा साठी?"
सिंधू, माझी बाळी;थोड़ी
नरमली; पालथ्या मुठीने डोळे पुसले. आणि
म्हणाली, "चार घासच नाही,
मी सगळ संपविन." थोड़ी
घुटमळली आणि म्हणाली, "बाबा,
मी हे सगळ संपवल तर....... तुम्ही
मला मी मागीन ते द्याल?"
" नक्की"! तीने पुढे केलेल्या
गुलाबी हातात मी हात दिला आणि वचन
पक्के केले.
पण आता मी थोड़ा गंभीर झालो." बाळ, पण
तू कंप्यूटर किंवा दुसर एखाद महागड खेळण मागशील
तर आता बाबाकडे तेवढे पैसे नाहीयेत बेटा!"
" नाही बाबा! मला तस काही नको आहे!"
तिने मोठ्या मुश्किलीने तो दहीभात संपवला.
मला माझ्या पत्नीचा आणि आईचा खूप राग आला.
एवढ्या छोट्या मुलीला कुणी एवढ खायला
देतात? ते पण तिला न आवडणार.
पण मी गप्प बसलो.
सगळ मोठ्या कष्टाने खाऊन संपविल्यावर हात धुऊन सिंधू
माझ्यापाशी आली. डोळे अपेक्षेने मोठे
करून.
आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या.
" बाबा, मी या रविवारी सगळे केस काढून
टाकणार!" तिची ही मागणी
होती.
"हा काय मुर्खपणा चाललाय? काय वेड बीड लागलय
काय? मुलीचे मुंडण? अशक्य!" सौ चा आवाज वाढत
चालला होता!
"आपल्या सगळ्या खानदानात आसल काही
कुणी केल नाही!" आईने खडसावले.
"ती सारखी टिव्ही पहात
असते! त्या टिव्हीमुळे आपली
संस्कृती आणि संस्कार वाया चालले आहेत!"
"बेटा, तू दुसर काही का मागत नाहीस? या
तुझ्या कृत्यामुळे आम्ही सगळे दु:खी
होऊ! तुला आम्हाला बघवेल का सांग?"
"सिंधू,बेटा आमचाही विचार कर!" मी
विनवणीच्या स्वरात म्हटले.
"बाबा, तुम्ही पाहिलत ना मला तो दहीभात
संपवन किती जड जात होत ते!" आता ती
रडायच्या बेतात होती. " आणि तुम्ही मला
त्याबदल्यात मी मागीन ते द्यायचं कबूल
केल होतत! आता तुम्ही मागे हटता आहात.मला
कोणत्याही परिस्थितीत दिलेल वचन
पाळणाऱ्या राजा हरिश्चंद्राची गोष्ट तुम्हीच
सांगितली होती ना?
आपण दिलेली वचने आपण पाळलीच
पाहिजेत!"
मला आता ठाम पणा दाखवणे भाग होते.
"काय डोके-बिके फिरलेय काय?" आई आणि सौ. एकसुरात.
आता जर मी दिलेला शब्द पाळला नाही.तर
सिंधू पण दिलेला शब्द तिच्या पुढल्या आयुष्यात पाळणार
नाही.मी ठरविले, तिची
मागणी पूरी केली जाईल.
गुळगुळीत टक्कल केलेल्या सिंधूचा चेहरा गोल
असल्याने आता तिचे डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसत होते.
सोमवारी सकाळी मी
तीला शाळेत सोडायला गेलो. मुंडण केलेली
सिंधू शाळेत जाताना बघणे एक विलक्षण दृष्य होत. ती
मागे वळली आणि टाटा केला मी
ही हसून टाटा केला.
तेंव्हाच एक मुलगा कार मधून उतरला आणि त्याने तिला हाक
मारली," सिंधू माझ्यासाठी थांब. "
गंमत म्हणजे त्याचे ही टक्कल केलेले होते.अच्छा,
हे अस आहे तर मी मनात म्हणालो.
त्या कार मधून एक बाई उतरल्या आणि माझ्या पाशी
आल्या! " तुमची सिंधू किती गोड
मुलगी आहे.तिच्यासोबत जातोय तो माझा मुलगा,
हरीष नाव त्याचे.त्याला ल्यूकेमिया (Blood
cancer)झालाय. येणारा हुंदका त्यानी आवंढा गिळून
दाबला आणि पुढे म्हणाल्या, "गेला पूर्ण महीना तो
शाळेत आला नाही. केमोथेरपि चालु होती.
त्यामुळे त्याचे सगळे केस गळाले. तो नंतर शाळेत यायला तयारच
नव्हता.कारण मुद्दाम नाही तरी सहाजिकच
मुले चिडवणार.
सिंधू मागच्याच आठवड्यात त्याला भेटायला आली
होती. तिने त्याला तयार केले की
चिडवणार्यांचे मी पाहून घेइन पण तू शाळा नकोस बुडवू.
मी कल्पनाही केली
नव्हती की ती माझ्या
मुलासाठी आपले इतके सुंदर केस गमवायला तयार
होईल. तुम्ही तिचे आईवडील
किती भाग्यवान आहात. अशी
निस्वार्थी आणि निरागस मुलगी तुम्हाला
लाभली आहे."
ऐकून मी स्तब्ध झालो.माझ्या डोळ्यातून अश्रू
ओघळले. मी मनाशी म्हणत होतो.
माझी छोटीशी परी
मलाच शिकवते आहे. खर निस्वार्थ प्रेम म्हणजे काय ते.
या पृथ्वी वर ते सुखी नव्हेत जे
स्वत:ची मनमानी
करतात.सुखी तेच की जे दुसऱ्यावर जिवापाड
प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी स्वत:ला
बदलायलाही तयार होतात.
आपल्यालाही आपल आयुष्य सिंधू सारख बदलता
यायला पाहिजे....
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा