बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

रचंड इच्छा शक्तीच्या बळावर प्रेम गणपती वयाच्या १७ व्या वर्षी रिकाम्या खिशाने प्रेम गणपती तमिळनाडूतून मुंबईत आला तेव्हा त्याला हिंदी, इंग्लिश धड बोलता येत नव्हतं आणि डोसाही बनवता येत नव्हता. तरीही आपल्या प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावर गेल्या २० वर्षात त्याने ३० कोटींचे डोसा साम्राज्य उभे केले. १०० वेग वेगळ्या प्रकारचे डोसे उपलब्ध असलेल्या प्रेमकडे आज " डॉक्टर डी. "नावाने त्याच्या डोशाची फ्रान्चैसी घ्यायला देश विदेशातही मागणी आहे. मुंबईत पहिली दोन वर्षे त्याला खूप धक्के खावे लागले. छोटी मोठी कामे केल्या नंतर हजार रुपयांची भांडी कुंडी घेवून दीडशे रुपये भाड्याच्या हात गाडीवर वाशी स्टेशन समोर इडली-डोशाचा व्यवसाय सुरु केला. मदतीसाठी धाकट्या दोन भावनाही गावाकडून बोलावून घेतलं. दर्जा, स्वच्छता, आणि टाप टीप कपडे यामुळे रस्त्या वरच्या या स्टोलला लोकांची पसंती मिळू लागली. हळू हळू महिना २० हजार पर्यंत कमाई होऊ लागली. अखेर १९९७ मध्ये वाशी मधेच ५० हजारांचे डिपोझीट भरून ५ हजार भाड्याने जागा घेऊन " प्रेम सागर डोसा प्लाझा " हे स्वतःचे रेस्तारो सुरु केले. ग्राहका मधल्या कॉलेज विद्यार्थ्या सोबतच्या मैत्रीतून इंटरनेटची ओळख करून घेत जग भरातील नव नवीन रेसिपीज शिकून घेत डोशांचे शंभराहून अधिक प्रकार त्यांनी ठेवायला सुरुवात केली आणि सेंटर वन मोल मधेही रेस्तारो सुरु केलं. डोसा प्लाझा च्या लोकप्रीयते मुळे ठीक ठिकाणाहून फ्रान्चैसी साठी विचारणा सुरु झाली, आणि बघता बघता ११ राज्यात आणि न्युझीलंड व दुबई मध्ये मिळून २६ आउटलेट उभी राहिली आहेत. "डॉक्टर डी." ची ब्रांडवाल्यु येत्या काळात १०० कोटी हूनही अधिक झाली तर आश्चर्य वाटायला नको. मित्रानो, तुम्हालाही आयुष्यात काही तरी नेत्रदीपक कामगिरी करता यावी म्हणून मी अशा कर्तबगार लोकांची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा अन त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल