बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

त्यांचा संघर्ष कित्येक दशकं सुरूच राहिला. तैब मेहता दोन वेळच्या जेवणाचीही जेव्हा भ्रांत होते, तेव्हा कुठलाही माणूस अगतिक होतो. त्याचीही अवस्था तशीच झाली होति. एक दिवस तो आपल्याया पत्नीला म्हणाला देखील कि, " आपण उपाशी मरणार आहोत " पतीच्या त्या शब्दांनी व्यथित झालेल्या त्या देवीसमान पत्नीने तशाही परिस्थितीत चेहऱ्वर स्मित आणून त्याला धीर देत म्हटलं - " ठीक आहे, आपण एकत्र उपाशी मरू " तैब मेहता महान कलाकार होते. त्यांच्या चित्रकारीमद्धे एक अनोखी जादू होती.पण आयुष्यभर ती कुणाला कळलीच नाहि. आणि जेव्हा ती कळली तेव्हा तैब मेहता 75 वर्षाचे झाले होते. संपूर्ण जगातील कलाकारांनी त्यांच्या कर्तुत्वाला सलाम केला होता आणि रसिकांनी त्यांच्यावर करोडो रुपयांचा वर्षाव केला होता. आयुष्यभर पैशासाठी वणवण भटकणाऱ्या तैब मेहतांनी खूप पैसे कमवायचं स्वप्नं कधीच पाहिलं नव्हतं, पण आपल्या कलेची कदर इतक्या प्रदीर्घ काळानंतर घेतली जावी याचं शल्य मात्र त्यांना जरूर होतं. तरीही दशकानुदशके आपली कला सातत्याने जोपासून एक दिवस तरी आपल्या कलेची कदर दुनियेला घ्यावीच लागेल हा दृढ विश्वास उरी बाळगून शेवटपर्यंत चित्रकारी करणाऱ्या तैब मेहताना माझा त्रिवार सलाम ! चित्रकलेकडे पैसा मिळवण्याचं एक साधन म्हणून त्यांनी कधीच पाहिलं नाहि. कलाकारातल्या खऱ्या उर्मीने चित्र रेखाटणाऱ्या कलावंताच्या जातकुळीतले ते चित्रकार होते. सुरुवातीला ते मुंबईच्या फ़ेमस स्टुडियोमद्धे फिल्म एडिटर होते. पण नंतर त्यांनी जेजे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट मधून पदवी घेतली आणि स्वतःला चित्रकारीमद्धे झोकून दिलं. कोणीही रसिक त्यांच्या कलेची दखल घेत नसतानाही त्यांनी एकामागून एक चित्र कॅनवासवर रेखाटली. पण त्यातून त्यांची मिळकत शून्य होति. पत्नी काम करून घर चालवत होती. आणि त्यांच्या पाठीशी हिमालयासारखी उभी होती. अखेर बारा वर्षांनी त्यांची चार चित्र अवघ्या तीस अमेरिकी डॉलर्सना विकली गेली. नंतर त्यांचा संघर्ष कित्येक दशकं सुरूच राहिला. वयाच्या 75 व्या वर्षी " सेलिब्रेशन " नावाचे खोलीच्या आकाराचे भव्य चित्र तब्बल तीन लाख अमेरिकी डॉलर्सना विकलं गेलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच एका भारतीय चित्रकाराची दखल घेतली गेल्यामुळे सर्वांनाच ती कौतुकास्पद गोष्ट वाटली होती. त्यानंतर त्यांच्या " महिषासुर " ची विक्रमी विक्री झालि. हे चित्र न्युयोर्कमद्धे तब्बल सोळा लाख डॉलर्सना म्हणजे आजच्या पावणे नऊ कोटी रुपयाना विकले गेले. कुठल्याही भारतीय चित्रकाराने तोपर्यंत आपल्या चित्राला इतकी प्रचंड रक्कम मिळवली नव्हती. तोपर्यंत तैब मेहता ऐशी वर्षाचे झाले होते. आयुष्यभर मुंबईकर म्हणून वावरलेल्या तैब मेहता यांचे वयाच्या 85 व्या वर्षी मुंबईतच 2009 साली निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल