शेतकरी अडचणीत - सोने तारणावर शेतीसाठी 2300 कोटींचे कर्ज
नाशिक - सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील बहुतांश भागातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही. या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही. शेतीही सोडता येत नाही अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी स्वतःच खंबीर होत त्यातून मार्ग काढण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी तीन लाख शेतकऱ्यांनी आपल्या कारभारणींच्या मंगळसूत्रांसह किडूकमिडूक गहाण ठेवून 2300 कोटींचे सोने तारण कर्ज घेतले आहे. ही फक्त एका बॅंकेची स्थिती असून अन्य बॅंका, सावकार व सहकारी पतसंस्थांचा विचार केल्यास सहा लाखांच्या वर शेतकऱ्यांच्या घरातली मंगळसूत्रे गहाण पडली आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या व्याजसवलतीची योजना स्टेट बॅंक ऑफ इंडियाने देशभर राबविली आहे. त्यात शेती सुधारणेसाठी शेतकऱ्यांना सोने तारणावर चार टक्के दराने कर्ज दिले जाते. त्यामुळे ज्या ज्या शाखांत ही सुविधा आहे तिथे शेतकऱ्यांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या दिसतात. नाशिक जिल्ह्यात ही स्थिती अतिशय भयावह असून बाराशे क्विंटल सोने गहाण ठेवण्यात येऊन 216 कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले आहे. राज्यात या बॅंकेचे तीस प्रादेशिक विभाग असून या सर्व विभागांत सोने तारण घेऊन दोन हजार तीनशे कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. सोन्याच्या सध्याच्या दर सव्वीस हजार तोळा असला, तरी कर्ज देताना सुवर्णकार "व्हॅल्युअर‘ त्याचा भाव सतरा हजार नऊशे रुपये प्रतितोळा ग्राह्य धरतो. एका वर्षात त्याची परतफेड बंधनकारक असून तसे केल्यावरच चार टक्के व्याज आकारले जाते. प्रत्येक शेतकरी किमान आयुष्यभराच्या बचतीतून जमा झालेले दहा ते बारा तोळे सोने गहाण ठेवून सरासरी एक लाखाचे कर्ज घेतो. त्यात दिवसभर शेतात राबून शेती व संसाराचा गाडा हाकणाऱ्या कारभारणीचे मंगळसूत्र हमखास असते. दागिने गहाण ठेवल्यावर बेन्टेक्सचे नकली मंगळसूत्र घालून संकट विसरून हसतमुखाने त्या पुन्हा शेतात घाम गाळायला बांधावर उभ्या असतात. हे सार्वत्रिक चित्र असून नाशिक, मराठवाडा, विदर्भात घरोघर ही स्थिती आहे.
पीककर्ज वाटप
2954 कोटी नाशिक
2355 कोटी जळगाव
2774 कोटी नगर
2537 कोटी पुणे
1807 कोटी सातारा
1014 कोटी औरंगाबाद
1849 कोल्हापूर
पतपुरवठा व वाढते कर्ज
39, 429 कोटी शेतकऱ्यांना केलेला 35 जिल्ह्यांतील पतपुरवठा
1.54 लाख शेती क्षेत्रातील दरडोई कर्ज

* बातमी - दै . सकाळ : -
मंगळवार, 24 मार्च 2015 - 03:00 AM IST
* लिंक - http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5109856091156083744&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&fb_comment_id=665021010293792_665147670281126#f159160da1d57

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा