शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

कसे तयार होतात परफ्युम्स...

बदलत्या जीवनशैलीने आपल्याला एक आग्रहीपण बहाल केलेलं आहे. हे आग्रहीपण आहे, मुळात प्रेझेंटेशनचं! आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पाडण्यासाठी आपण सदैव ‘अपटुडेट’ असतो.
बदलत्या जीवनशैलीने आपल्याला एक आग्रहीपण बहाल केलेलं आहे. हे आग्रहीपण आहे, मुळात प्रेझेंटेशनचं! आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पाडण्यासाठी आपण सदैव ‘अपटुडेट’ असतो. या अपटुडेट असण्यामध्ये केवळ पोशाख हीच संकल्पना राहिलेली नाही, तर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी सुगंधी द्रव्ये वापरणं हीदेखील आहे. ही सुगंधी द्रव्ये वापरण्याचं प्रमाण अलीकडे भलतंच वाढलं आहे.
अंघोळीनंतर परफ्युम किंवा डिओडरण्ट वापरणं हे अंघोळी इतकंच ‘मस्ट’ झालंय. मनाला आनंद देणारी ही सुगंधी द्रव्ये नेमकी तयार कशी केली जातात. तर याची पहिली पायरी म्हणजे कच्चा माल मिळवणं. परफ्युम बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सुवासिक पाने, फुले, झाडांच्या साली, झाडाची सुवासिक खोडे, सुवासिक वनस्पती (हर्बस्) आणि प्राण्यांचे सुवासिक अवयव (कस्तुरी मृग) आदी. हा कच्चा माल गोळा करून त्याचा साठा केला जातो. या मालापासून सुवास वेगळा करण्याच्या विविध पद्धती आहेत. कच्च्या मालाच्या
प्रकारानुसार ती ती पद्धत वापरली जाते.
डिस्टिलेशन अर्थात उर्ध्वपातनाने अर्क काढणे
यात कच्चा माल एका भट्टीमध्ये (कंटेनर) टाकून त्याला उकळवलं जातं. उकळवण्यासाठी गरम वाफेचा उपयोग होतो. त्या उष्णतेने त्या कच्च्या मालातील सुगंधी द्रव्याचे बाष्प (तेल) तयार होते. मग एका नळीवाटे हे बाष्प एका बंद भांडय़ात साठवून त्याला थंड करून त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर केले जाते. हा द्रव म्हणजेच सुगंधी तेल अर्थात (कॉन्सन्ट्रेटेड ऑइल)
द्रावकात विरघळणे
पेट्रोलियमजन्य द्रावक किंवा बेंझिन असलेल्या मोठया फिरत्या भांडयात कच्चा माल टाकून तो घुसळला जातो. तो कच्चा माल त्या द्रावकात विरघळला की, एक मेणासारखा पदार्थ मागे उरतो. त्यात इथिल अल्कोहोल मिसळवले जाते व पुन्हा हे मिश्रण गरम केले जाते. त्या उष्णतेने मिश्रणातील अल्कोहोल उडून जाऊन मागे उरते सुगंधी तेल.
दाब देणं
या प्रकारात कच्च्या मालावर दाब देऊन त्यातून सुगंधी तेल काढलं जातं.  अशा विविध पद्धतीने मिळालेली सुगंधी तेलं ठरावीक मापात घेऊन, त्यांच्या सुगंधाची जातकुळी ओळखून, ती एकत्रित केली जातात. मग ही एकत्रित केलेली सुगंधी तेलं मुरवण्याची प्रक्रिया असते. त्यासाठी काही महिने वा वर्षे इतका कालावधी लागू शकतो. या सुगंधी तेलांमध्ये पुढे अल्कोहोल मिश्रित केला जातो. त्यामुळे त्याची घनता कमी होते. अल्कोहोल मिश्रित या परफ्युममधल्या सुगंधी तेलाच्या प्रमाणानुसार त्याचे खालील वेगवेगळे प्रकार पडतात. वापरासाठी तयार होणारं ‘फिनिश्ड गुड’ परफ्युम हे तीन थरांचं असतं.
त्या प्रत्येक थराला ‘नोट’ असं म्हणतात. टॉप नोट- परफ्युम फवारताच जो गंध दरवळतो, तो. सेंट्रल वा हार्ट नोट- परफ्युम फवारल्यानंतर काही काळाने जो गंध दरवळतो, तो.. बेस नोट- परफ्युम फवारल्यानंतर बराच काळ दरवळणारा गंध असतो, तो.. परफ्युम आणि डिओडरण्टमधला नेमका फरक परफ्युम हा फक्त सुगंध देणारा आहे. परफ्युममध्ये घामाचा स्त्राव रोखण्यासाठी आवश्यक असलेले काही गुणधर्म नसतात. शरीराला सुवास देणं इतकंच त्याचं कार्य. तर शरीरातील घामाचा स्त्राव रोखण्यासाठी डिओडरण्ट काम करते. घामामध्ये असलेल्या जीवाणूंमुळे घामाला एक दुर्गंधी येते. त्या घामाचा स्त्राव रोखून त्या दरुगधापासून मुक्ती मिळवून देण्याचं काम डिओडरण्ट करतात. त्यामुळे जिथे घाम येतो तिथे शरीरावर डिओडरण्ट फवारले जातात. बरेच डिओ हे सुगंधरहितसुद्धा असतात. त्यांचं काम घर्मस्रव रोखणं इतकंच असतं.
प्रकार सुगंधी तेलाचे प्रमाण कालावधी
परफ्युम ५ ते ३० टक्के ६-७ तास
इवॉ दि परफ्युम(एऊढ) ८ ते १५ टक्के ५-७ तास
इवॉ दि टॉयलेट(एऊळ) ४ ते ८ टक्के ४-६ तास
इवॉ दि कोलोग्न(एऊउ) ३ ते ५ टक्के ३ ते ५ टक्के २-३ तास


 सौजन्य- December 4, 2012 04:55:22 AM | दै - प्रहार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल