रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

शहाजीराजे भोसले (Shahaji Raje Bhosale)


शहाजीराजे भोसले (Shahaji Raje Bhosale)


शहाजीराजे मालोजी भोसले
शहाजीराजे हे मालोजीराजे यांचे पुत्र व शिवाजीराजे यांचे वडील होते. निजामशहाने मालोजीराजांची जाहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुगल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला,तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भटवाडी येथे हि प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले,. पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी कि खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली, आणि ते विजापूच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. 
शहाजी महाराज 



आदिलशाहाने त्यांना 'सरलष्कर'हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मरण पावला. त्याचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले,तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. 
शहाजीराजेचा मुघल आणि आदिलशहा यांच्या बरोबर संघर्ष 
अहमदनगरजवळ मोगलांवरती त्यांनी लढाई जिंकली. त्या वेळी लखुजी जाधव सासरे मोगलांच्या बाजूने लढत होते. नंतर निजामशहाच्या पदरी त्यांना अपमान सहन करावा लागला. कारण निजामाचा वजीर मलिक अंबरला शहाजीराजे यांचा दरारा वाढलेला आवडत नसे. शहाजीराजे हे निजामशाही सोडून विजापूरच्या आदिलशहाकडे नोकरीसाठी गेले. शहाजीराजे सरलष्कर झाले. शहाजीराजांना वाटत असे कि आपले राज्य असावे. त्यांना सुलतानी सत्तेची चीड येई. पण त्यांना ती गिळावी लागे. आपल्या मराठीपणाचा त्यांना फार अभिमान वाटे. मराठ्यांबद्दल त्यांना कळकळ वाटे. प्रेम वाटे. पण सुल्तानपुढे काही चालत नसे. शेवटी त्यांनी आदिलशहाविरुद्ध बंड केले. जिजाऊ गरोदर होत्या. त्यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. हे शहाजीराजे यांचे मोठे धाडस होते. बादशहाने त्यामुळे पुण्याची राखरांगोळी केली. राजे मोगलांना मिळाले. शहाजहान याने निजामशाही बुडवण्याचा चंग बांधला. राजे मोगलांना सोडून पुन्हा निजामशाहीत आले. पण तेथे निजामशहाचा पराभव झाला. 
राजे मोगलशाही,निजामशाही व आदिलसाही यांच्याकडे नोकऱ्या आदळलून बदलून करत. सुलतान याबद्दल त्यांना काही बोलत नसे. कारण त्यावेळी राजांची जरुरी भासत असे. नाहीतर तोफेच्याच तोंडी दिले असते. राजांनी निजामशहाचा मुर्तिजा म्हणून लहानसा वंशज घेऊन शहाजीराजांनी त्याला निजाम केले. व स्वतः वजीर झाले. राज्यकारभार पाहू लागले. परंतु आदिलशहा व शहाजहानने एकत्र येऊन निजामशाही बुडवली. शहाजीराजे नाईलाजाने शेवटी आदिलशहाकडे नोकरीला गेले. 
शहाजी राजांची कर्नाटकात रवानगी 
शहाजान बादशहाने आदिलशाहला सांगितले कि शहाजीला पुण्यात ठेऊ नका. त्याने शहाजीराजांना बंगलोरात पाठवले. शहाजीराजांचे मराठेशाहीचे राज्य बनवण्याचे स्वप्न वाया गेले नाही. त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी ते पूर्ण केले. स्वराज्यासाठी शहाजीराजे यांनी मोठा त्याग केला होता. जिजाऊंवर पुणे जहागीर व लहानग्या शिवबाची जबाबदारी सोपवुन ते बंगळूरची जहागिरी सांभाळत असत. दि. २३ जा. १६६४ ला ते मरण पावले. त्यांची समाधी कर्नाटकमध्ये आहे.








































by - Internet

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल