जिवा महाले (Jiva Mahale History in Marathi)
जिवा महाले हा महाराजांचा अत्यंत विश्वासू, महाराजांचा अंगरक्षक. जिवा महाले तालवार बाजीमध्ये अत्यंत पटाईत होता. महाराजांनी अफजलखानाच्या पोटात बिचवा सारला. खान दगा दगा म्हणून ओरडू लागला. ते ऐकून खानाचा रक्षक सय्यद बंडा धावून आला. तो महाराजांवर वार करणार तोच जिवा महालाने मोठ्या
चपळाईने सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला. बंडाला त्याने ठार केले. आणि महाराज बचावले. होता जिवा
म्हणून वाचला शिवा. असे मोठ्या कौतुकाने महाराज त्याला म्हणाले. मराठेशाहीची भिस्त जिवासारख्या
विश्वासू, निधड्या छातीच्या वीरांवरच अवलंबून होती. शिवरायांनी मराठ्यांच्या मदतीने दक्षिणेत स्वतःचे
राज्य उभे केले. रयतेने त्यांना राजा मानले. आपल्या राजाच्या शब्दासाठी प्राण पणाला लावून लढणारी माणसेही शिवरायांकडे होती. राजांनी आता अनेक गडकिल्लेही काबीज केले होते. किल्ले, मुलुख सर्वत्र भगवा झेंडा फडकतो आहे. या बातम्यांनी विजापूरच्या दरबारातील प्रत्येकाचीच झोप उडाली होती. तमाम आदिलशाहीलाच
आता या शिवरायाला कुठे अन कसे थांबवायचे हा गहण प्रश्न पडला होता. दक्षिणेस जायचं आणि शिवाजीचा
बंदोबस्त करायचा. बोला हे काम कोण करेल. हा पैजेचा विडा कोण उचलणार,दरबारातले सारे वातावरण गंभीर आणि चिंताग्रस्त झालेले असताना विजापूरच्या दरबारातील एक भव्य भव्यदिव्य, तुफानी ताकदीचं, पोलादी मनगटाच व्यक्तिमत्व उठून उभ राहील. तो होता अफजलखान, अफजलखानाने हे धाडस दाखवले.
त्याला आणखी एक कारण होते. त्याच्याकडे प्रचंड ताकद होती, अफाट सैन्य होतं, दारुगोळा आणि शस्त्रास्त्रे होती. बारा वर्षे तो वाईचा सुभेदार होता. त्यामुळेच त्याला सारा मराठी मुलुख, मराठी माणसं, त्यांचं सामर्थ्य
आणि काही मंडळींच्या कमजोऱ्या माहित होत्या. प्रचंड मोठया फौजेनिशी पैजेचा विडा उचलून अफजलखान
जेव्हा महाराष्ट्राच्या मोहिमेवर आला, त्यावेळी शिवराय राजगडावर होते. खान येतोय हि वार्ता मिळताच
राजांनी मासाहेबांच्या परवानगीने राजगड सोडला आणि प्रतापगडावर प्रस्थान केले.
Jiva Mahale History in Marathi जिवा महाले यांची स्वराज्य सेवा
अफजलखानाच्या भेटीला जाताना राजांनी माता जिजाऊ ह्यांना वंदन केले. भवानीमातेचे दर्शन घेतले. अंगात चिलखत, वर जरीचा अंगरखा, डोई जिरेटोप, त्यावर मंदिल बांधला. डाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली.
अस्तिनात बिचवा लपवला. आणि सर्व तयारी करून शामियान्याच्या दाराशी हजर झाले. खान तर आधीच
येऊन शामियान्यात बसला होता. त्याच्या मनात माझ्या शक्तीला घाबरून शिवाजी फक्त शरणार्थीसारखा
मला भेटायला येतोय. हा जणू माझा विजयच आहे. अशा थाटात आणि काहीसा रमलेल्या स्तिथीत तो होता.
त्यावेळी खानाजवळ सय्यद बंडा नावाचा हत्यारबंद गडी उभा होता. महाराजांच्या वकिलाने प्रथम सय्यद बंडासदूर करावे अशी विनंती केली. खानाने आपल्या दाढीवर हात फिरवत सय्यद बंडास दूर केले. आणि दुसऱ्याच
क्षणी शिवरायांनी खानाच्या दिशेने आपली पावले उचलली. या राजे या भेटा आम्हाला .. असे म्हणून आपले
दोन्ही बलदंड बाहू पसरून अफजल खान पुढे आला. खान उंच धिप्पाड होता, तर शिवाजी महाराज वामनमूर्तीच.खानाने भेटीचे नाटक करून महाराजांना आपल्या कवेत घेतले. त्यांची मान आपल्या कवेत दाबली आणि आणिमहाराजांच्या अंगावर कट्यारीचा वार केला. अंगावरचा अंगरखा फाटला पण चिलखताने आपले काम चोख
केले. घाव पडला पण लागला नाही. त्याच वेळी आई भवानिचं स्मरण करून महाराजांनी खानाच्या पोटात
वाघनखे घुसवली. बिचवा काढला आणि तो खानाच्या पोटात घुसवला. खान दगा दगा म्हणून मोठ्याने
ओरडला. खानाचा आवाज ऐकून सय्यद बंडा शामियान्यात घुसला. त्याने महाराजांवर घाव घालण्यासाठी पट्टा
हातात उचलला. पण तेवढ्यात तो घाव महाराजांवर पडण्यापूर्वीच महाराजांचा सच्चा सेवक जिवा महाला हा
धावून पुढे आला. त्याने एका घावातच सय्यद बंडाला यमसदनास पाठवले व राजांच्या जीवचे रक्षण केले. आणिसेवक धर्माचे पालन केले. या पराक्रमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला गेला त्या वेळी सर्वांच्या तोंडून जे शब्द
निघाले ते शब्द होते होता जिवा म्हणून वाचला शिवा.....
BY - INTERNET
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा