रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

स्वराज्यातील महत्वपूर्ण घडामोडी







स्वराज्याची शपथ






शिवाजीराजे सोळा वर्षांचे झाले. छोट्या मित्रमंडळींचे रूपांतर आता मोठ्या मावळी सेनेमध्ये झाले होते. पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवराय व मावळे मंडळी तिथे जमली होती. शिवरायांच्यामावळी सेनेमध्येतानाजी,सूर्याजी,बाजीजेधे,बाजीपासलकर,येसाजी,सूर्यराव,चिमणाजी,गोदाजी शूर होते.शिवरायांच्या सेनेमध्ये अठरापगड जातीजमातीचे लोक होते पण राजे मनुष्याची गुणवत्ता पाहत असत. त्यांना जात शिकवली होती माणुसकी. रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर ते मावळे श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते. शिवराय वयाने लहान होते. पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्याना ते कळकळीने म्हणाले,गड्यानो सुलतानाच्या वतनदारीवर आपन संतुष्ट राहावे का दुसऱ्यांच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. 



आपली माणसे या युद्धात मारली जातात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते आणि इतके सोसून काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे.वतणांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचे का. शिवरायांचा चेहेरा रागाने लाल झाला होता. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी व त्यांच्या सवंगड्यानी शंकराच्या पिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक केला व प्रतिज्ञा घेतली हे सर्वसाक्षी परमेश्वरा आजपासून आम्ही आमचे तण,मन,धन देशाच्या सेवेत वाहिले आहे. जुलमी आक्रमकांच्या अगर आमच्या रक्ताचा मळवट भरून आम्ही मातृभूमीचे सौभाग्य प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी ठेऊ. आम्हाला तुझा आशीर्वाद असू दे. हर हर महादेव.












तोरणगड आणि राजगड


पुण्यापासून ७० कि.मी. आणि भोरपासून ३५ कि.मी. उत्तरेला प्रचंडगड किल्ला आहे. पूर्वी याचे नाव तोरणा होते. शिवाजी महाराजांनी अनेक जुन्या किल्ल्यांची नवीन नावे ठेवली.या किल्ल्यात विजापूरच्या आदिलशाही सैनिकांची तुकडी राहत असे. पावसाळ्यात जोरदार पावसामुळे हि तुकडी काढून घेतली जात असे. याच वेळी शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये किल्ला काबीज केला. तोरणा गडावर सोन्याच्या मोहोरांनी भरलेले बावीस हंडे सापडले. ते धन स्वराज्यस्थापनेसाठी शुभशकुन होत. ते वापरून त्याच जागी अष्टभुजा,महिषासुरमर्दिनी,श्री तोरणजाईच मंदिर बांधण्यात आलं.




राजगड हि शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला किल्ला होता. या किल्ल्यात जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. त्यांना पाणी,गुजड,आणि चोरवारे म्हणतात. या तिन्ही रस्त्यावर बुरुज आहेत. चोरवाटेच्या दरवाजाने जाणे सोपे आहे. पण याची चढण उभी आणि कठीण आहे. किल्ल्याच्या प्रेक्षणीय स्थानात राजमहाल, वाडा,अंबारखाना,दिवाणघर,चबुतरे, महादेव,रामेश्वरी,पद्मावती आणि भगीरथ मंदिरे,अनेक तलाव आहेत. हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराच्या योजना या किल्ल्यात आखण्यात आल्या. हा किल्ला अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटनांशी संबंधित आहे. शाहिस्तेखानाचा पराभव,राजा जयसिहशी करार,अफजलखानाला प्रतापगडात मारल्यानंतर त्याचे डोके माता जिजाबाईंना दाखविण्यासाठी आणून बालेकिल्ल्याजवळ नगारखान्याच्या भिंतीत पुरण्यात आले. येथूनच बादशाहा औरंगजेबास भेटावयास शिवाजी राजे आगऱ्यास गेले. तिथे त्यांना कैद झाली. 








अफजलखानाचा वध










शिवाजी महाराज केवळ एकोणीस वर्षांचे होते. पण त्यांची मुत्सद्देदिरी भल्याभल्यांना गुंग करून टाकणारी होती. महाराजांनी काही काळ निवांत काधला. कर्नाटकात कनकगिरीच्या वेढ्यामध्ये राजांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे हे अफजलखानाने केलेल्या दग्यामुळे मारले गेले. त्या वेळी जिजाऊंना तीव्र दुःख झाले. राजे दिवसेंदिवस प्रबळ झालेले शत्रूला ते पाहावेना. म्हणून आदिलशाहाने आपला मोठा सरदार अफजलखानास मोठी फौज देऊन स्वराज्यावर सोडले. स्वराज्यावर पुन्हा संकट आले. कारण अफजलखानाने शिवरायांना मारण्याचा विडा उचलला होता. खानाने हिंदूंची धर्मक्षेत्रे भ्रष्ट केली. शिवरायांना सपाट मैदानात खेचण्याचा खानाचा डाव होता. पण महाराजांनी सय्यम ठेवला त्यांनी अफजलखानास सांगितले. तुम्ही आमच्या पिताश्रींचे खास दोस्त,आम्ही तुमचा आदर करतो. मी तुम्हाला शरण आहे. मला अभय द्या. खानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावले. भेटीची वेळ ठरली. शिवाजी महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय लहान होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. 

त्यावेळी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली. आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत काट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. बिचवा काढून तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली आणि खान कोसळला. राजांनी अफजलखानाला संपवले. एवढ्यात कृष्णाजी भास्करने शिवरायांवर तलवारीचा वार केला. महाराजांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. सय्यद बंडा शामियान्याय घुसला. तो शिवरायांवर वार करणार,तोच जिवा महाला धावून आला. सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन त्याने त्याला एका घावात जागीच ठार केले. नंतर इशारतीच्या तोफा झाल्या. जंगलात दडून बसलेल्या मराठी सैन्याने एका दिवसात खानाच्या फौजेचा खुर्दा उडवला. भयंकर युद्ध झाले. 








पावनखिंड संग्राम












अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड़ लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला. फाजलखानाही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला. सिद्दी जौहरने पन्हाळ्याला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळा सुरु झाला कि सिद्दी जौहर वेढा उठविल असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरु होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता शक्तीचे काम नाही,तर युक्तीने सुटका करून घ्यायचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्दीला पाठवला. त्याने काबुल केले. वेढ्याच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते. 


शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. ते खाणे पिणे गाणे बाजावणे व हुक्कापाणी यात दंग होऊन गेले. शिवरायांनी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर जाणार, दुसरी पालखी शत्रूला सहज दिसल्याने ती पकडली जाणार. आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार,एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार,अशी योजना होती. असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरे जायचे. पण एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेली शीवाजीची पालखी बाहेर पडली. शत्रूने हि पालखी पकडली. आणि त्यांनी ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरु झाला. पण थोड्या वेळाने शिवाजीचे सोंग उघडकीस आले. 


तेव्हा सिद्दीने संतापून त्याला ठार केले. शिवरायांसाठी या शिवाजीने बलिदान केले.
शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे कळताच सिद्दी चवताळून गेला. त्याने मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग केला. शिवरायांनी घोडखिंड ओलांडली. चौताळलेल्या सिद्दीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवराय बाजीप्रभूंना म्हणाले बाजी वेळ आणीबाणीची आहे. आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला तोंड देऊया. खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता. स्वराज्य आणि शिवरायांचे जीवित धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. गनिमांची संख्या अफाट आहे. आम्ही खिंड रोखून धरतो. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही शत्रूला येथेच थोपवून धरू. 


बाजीप्रभूंची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले. पण त्यांना स्वराज्याचे धेय्य गाठायचे होते. शिवराय बाजींना प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील. मग ताबडतोब तुंही निघून या. बाजी खिंडीच्या तोंडापाशी उभा राहिला. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला जीव गेला तरी गनिमांना खिंड चढू देऊ नका. खिंडीतली वाट नागमोडी होती. एकाच वेळी तीन चार माणसे चढू शकत होती. खिंडीत शर्थीची झुंज सुरु झाली. सिद्दी जौहर चिडला होता. शत्रूने बाजिप्रभूवर हल्ला केला. बाजीला घेरले. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. 


त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला. पण तो मागे हटला नाही. बाजीप्रभू घायाळ झाला होता,तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. एवढ्यात तोफांचा आवाज कडाडला. बाजींच्या कानी तोफांचे आवाज पडले. महाराज गडावर पोहोचले. आता मी सुखाने मरतो. असे म्हणून त्या स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. हे महाराजांना कळल्यावर त्यांना खूप मोठे दुःख झाले. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते,म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिड पावन झाली.







शायिस्तेखान फजिती










मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीचा औरंगजेब हा मुघल बादशाहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या होत्या. त्यामुळे बादशाहा चिडला. त्याने त्याने आपला मामा शायिस्ताखान याला पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढे येत होता. पण एकदा डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाईस्ताखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. मग शाइस्तेखान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकनचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिंरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुनकीने शाईस्ताखानाशी मुकाबला केला. दोन महिने फिरंगोजींने किल्ला लढवला. पण शाईस्ताखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. शायिस्ताखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. एक वर्ष गेले दुसरे वर्ष गेले पण खान काही लाल महालातून हालेना. 


त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलुख उध्वस्त केला. शायिस्तेखानाची खोड मोडायचीच,असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने चांगले होते. कारण त्या वाड्यातील खोल्या,दालने,खिडक्या,दारे,वाटा,चोरवाटा यांची शिवरायांना सगळी माहिती होती. खुद्द शायिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. शेकडो स्त्री-पुरुष नटून थटून चालले होते. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. शिवराय आणि मावळे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. या वेळी शायिस्ताखान गाढ झोपलेला होता. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. 


शिवरायांच्या मावळ्यांनी खानाच्या पहारेकऱ्यांना बांधून टाकले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धाऊन आला. शिवरायांनी त्याला ठार केले. तो शायिस्ताखानाचा मुलगा होता. गडबड झाली लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. समशेर उपसली. शायिस्ताखान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागे धावले. शायिस्ताखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार,तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची तीन बोटे कापली गेली. प्राणांवर आले पण बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शायिस्ताखान ने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली,उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल. अशी भीती त्याला वाटू लागली. 





मिर्झाराजे आक्रमण आणि आग्ऱ्याहून सुटका












शिवाजी राजे बादशाहाच्या भेटीस आगऱ्याला जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवून त्यांचा आशीर्वाद घेतला. ठरल्याप्रमाणे राजे बादशाहाच्या दरबारात गेले. त्यांच्या समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशाहा ने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. शिवरायांना वाटले,आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा,पण बादशाहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने महाराज महालाबाहेर पडले. ते तडक आपल्या मुक्कामावर गेले. भेटीचा बेत असा बिनसला. औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणी शिपायांचा पहारा बसवला. 


शिवराय आणि संभाजीराजे बादशाहाच्या कैदेत पडले. शिवरायांनी बादशाहाकडे अर्ज केला मला महाराष्ट्रात जाऊ द्या. त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने ऐकले नाही. शिवरायांनी मनाशी निर्धार केला कि काहीही करून बादशाहाच्या कैदेतून सुटून जायचेच. शिवरायांच्या बरोबर संभाजी राजे आणि हिरोजी फर्जद व मदारी मेहतर हे सेवक होते. शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. पोटात भयंकर कळा येऊ लागल्या आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू मौलवी याना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत,पण नंतर ते कंटाळले व पेटारे उघडून पाहीनासे झाले. रोज रोज काय पाहायचे. असे त्यांना वाटले. एके दिवशी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले, मदारीस त्याचे पाय चेपत बसवले. 


शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. पेटारे घेऊन पुढे ते ठरलेल्या ठिकाणी सुखरूप पोहोचले. तेथे शिवरायांचे सेवक घोडे घेऊन तयार होते. हिरोजी आणि मदारी औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी हि बातमी बादशाहाला कळली. शिवाजी आपल्या तावडीतून निसटला बादशाहा रागाने भडकला. त्याचे सरदार हादरले. बादशाहाच्या कैदेतून शिवाजी निसटला तो हि कायमचा. वेषांतर करून शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. त्यांनी संभाजीला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली.








सुरतेची लूट




औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. महाराजांचे स्वराज्य वाढत होते. स्वराज्याच्या गरजा हि वाढत होत्या. स्वराज्याला पैसा हवा होता. सुलतान लोकांनी महाराष्ट्राची तीनशे वर्षांपासून लूट चालवली होती. त्यांच्या तिजोऱ्या भरलेल्या होत्या. स्वराज्याचा पैसा स्वराज्यात आला पाहिजे. ह्या उद्देशाने महाराजांनी सुरतेवर धाडी टाकल्या. महाराज प्रचंड संपत्ती महाराष्ट्रात घेऊन आले.


सुरत म्हणजे त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्च अथवा मशिदी ह्यांना हात लावला नाही. स्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाहा भयंकर चिडला. याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झाराजे जयसिंग या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. अलोट खजिना आणि अफाट दारूगोळाही दिला. स्वराज्यावर फार मोठे संकट आले.








कोकण मोहीम आणि आरमार निर्मिती







आरमार म्हणजे युद्धनौकांचे तांडे. मुघल व विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू. समुद्रावर सिद्दी,पोर्तूगिरीज,व इंग्रज हे शत्रू होते. शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठीच दूरदृष्टीने आरमारदल उभारले. मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होते. या अर्थाने शिवाजी राजे हे भारतीय आरमाराचे पहिले जनक मानले जातात. शिवरायांनी युद्धनौकाही बांधल्या. युद्धनौका घेऊन शिवरायांनी अनेक मोहिमा काढल्या. शिवरायांच्या सागरी आरमाराचा शत्रूवर जबर वचक बसला होता. म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग,विजयदुर्ग असे भक्कम सागरी किल्ले बांधले. ते पाहिले कि आज हि आपले मन थक्क होते. स्वराज्यावर किती संकटे आली पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले. 








राज्याभिषेक सोहळा




शिवाजी महाराजांनी या स्वराज्याला सर्व राजेरजवाडयांनी मान्यता दयावी, म्हणून राज्यभिषेकाची योजना आखली. ६ जून इ.स. १६७४ रोजीशिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेककरण्यात आला. शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समतेने वागवणारा,प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किव्वा वैभवासाठी केले नाही, त्यांनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी केले. रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. 
स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण न डगमगता शिवराय मोठ्या शौर्याने व चातुर्याने पार पडले. तानाजी बाजीप्रभू मुरारबाजी यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले. 


स्वराज्य उभे राहिले व शत्रूवर वचक बसला. शिवरायांनी प्रतापगडाच्या भवानीमातेचे दर्शन घेतले तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिहासन तयार करुवून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. विद्वान ब्राह्मण सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. ते थोर पंडित होते. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी याथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणले. रायगडावर पन्नास हजार माणसे जमली. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्ये वाजू लागली. गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रचामरे धरण्यात आली. दही, तूप, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. 


गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा,यमुना,गोदावरी,सिंधू,कृष्णा,नर्मदा,कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभटांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली. व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या शंभर छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. नंतर शिवराय जिजामातेच्या पाया पडले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या तीस वर्षाचे चीज झाले. मासाहेबांच्या भेटीनंतर शिवराय सिहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्यामोत्याच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले. व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधीशवर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी जयजयकार केला गडावर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्राभर शिवरायांचा जयजयकार झाला. अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक झाला.








दक्षिण दिग्विजय 







राज्याभिषेक सोहळा पार पडला. पण राज्याभिषेकानंतर अल्पावधीत मासाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. त्यांना अतिशय दुःख झाले. परंतु दुःख करत बसने त्यांना शक्य नव्हते. त्यांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आता आदिलशाहाची भीती नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती. परंतु उत्तरेचा मुघल बादशाहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करन्यासाठी टपून बसला होता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे,असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले. गोवळकोंड्याचा अबुलहसन कुतुबशाहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. 


प्रथम कुतुबशाहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी त्यांनी योजना आखली. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्तोरस्ती लोक उभे होते. त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या सगळ्या देशात चहूकडे पसरल्या होत्या. अफजलखानाचा वध, शायिस्तेखानाची फजिती, आग्ऱ्याहून सुटका या रोमहर्षक प्रसंगाची हकीकात देशभर पसरली होती. त्यामुळे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. महाराज कुतुबशाहाच्या दरबारात आले. त्याने महाराजांच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारल्यावर महाराज कर्नाटकच्या मोहिमेवर निघाले. 


शिवराय पूर्वकिनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जंजिरा किल्ला आहे. हा किल्ला रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला.कित्येक महिना वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला. त्यांनी कर्नाटकात एकूण विस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले. 






















by - Internet


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल