रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

शिवाजी महाराजांची अर्थनीती...

शिवरायांची अर्थनीती


शिवकालीन आर्थिक जिवणं हे मुख्यतः शेतीव्यवसायाशी निगडित होते. त्यामुळे शेतीचे रक्षण व सवंर्धन हि धोरणे शिवरायांनी प्रामुख्याने राबवली. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा होता. तो काळ सुलतानी जुलूम जबरदस्तीचा होता. अशा वेळी शिवरायांचे स्वराज्य हे लोकांना वरदानच होते. मुख्य म्हणजे शिवरायांचा स्वराज्याचा मुख्य दृष्टिकोन हा शोषणावर आधारीत नव्हता. स्वतःची तुंबडी भरून घेण्यासाठी राजांनी स्वराज्य निर्माण केले नव्हते. स्वराज्याला धर्माची जोड होती. पीक लावणीच्या काळात शेतकऱ्यांना विशेष संरक्षण दिले जाई. शेतकऱ्याचे नुकसान ते स्वराज्याचे नुकसान हे राजांना पक्के ठाऊक होते. शेतकरी गाव सोडून जाऊ नये याची काळजी राजना घ्यावी लागे. एका चोराला शेतकऱ्याने पकडून बेदम मारले. तेव्हा तो चोर मारला गेला. राजांनी शेतकऱ्याची प्रशंसा केली व चोरांचे प्रेत वेशीवर टांगून ठेवण्यात आले. रायतेवाचून स्वराज्य म्हणजे आत्म्यावाचून शरीर. शेतकरी हा स्वराज्याचा आत्मा होता. सुलतानी बरोबरच रयतेला आस्मानालाही तोंड द्यावे लागे. असाच एक भयंकर दुष्काळ १६३० साली पडला होता. महाराष्ट्राची निम्मी लोकसंख्या ह्या दुष्काळाने मरण पावली. तुकाराम महाराजांची प्रथम पत्नी व दोन मुले या दुष्काळाने खाल्ली. त्यावर तुकाराम महाराज म्हणतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे | बरी या दुष्काळे पीडा केली || माणसांनी माणसाला खाल्ले असे दुष्काळाचे भयंकर वर्णन आहे. शिवरायांनी प्रजेसाठी बंधारे बांधले. कालवे व विहिरी यांची सोय केली. 






व पाणीनियोजनासाठी जनतेला उत्तेजन दिले. पाण्यावर मालकी सरकारची आहे. पुणे जवळ येसाजी पाटील यांनी राजांच्या हुकुमावरून पाणवठ्यांमधील एक मोठा धोंडा फोडला. त्याला बक्षीस म्हणून राजांनी जमीन दिली. शिवकालामध्ये जमिनीच्या प्रतीवर शेतसारा ठरत असे. शिवाय पिकांच्या पद्धतीवर देखील ठरत असे. ऊस,हळद,भाजीपाला व फळफळावळे या उत्पादनांवरती नकादि कर आकारला जाई . रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. असा सैन्याला पक्का आदेश होता. कल्याण भिवंडी प्रांतात उत्कृष्ट प्रतीचे जहाज बांधणीचे व इमारतीचे लाकूड मिळत असे म्हणून राजांनी कल्ल्यांला आपला जहाजबांधणीचा कारखाना काढला. आंबा,फणस,साग,वड पिंपळ इत्यादी उपयुक्त झाडे परवानगीशिवाय तोडू नये असा आदेश होता. परमुलुखातून साग व इतर कच्चा माल आयात केला जात असे. शिवाय स्वराज्याच्या रक्षणासाठी गनिमी काव्याची जंगलाचा वापर नायसर्गिक तटबंदी म्हणून केला जाई. महाराजांनी उदयोगधंद्यांना प्रोत्साहन दिले. बारा बलुतेदारी त्या काळी विशेष प्रचलित होती. खेडे हा आर्थिक जीवनाचा पाया होता. त्या काळी खेडी हि स्वावलंबी होती. प्रत्येक खेडे हे एक कुटुंबरचना होती. ग्रामीण उत्पादन गावातील लोकांसाठी गावातच केले जाई.सोनार,लोहार,तांबट,सुतार,चांभार,कुंभार,कोष्टी,बॅँकारी,मांग,तेली,धनगर,कोपटी,शिंपी,न्हावी,परीट,गवंडी,माळी,कोळी,रंगारी,पखवाजी,पावेकरी,टाळकरी,विणेकरी,कीर्तनकार,गायक,नर्तिका,गारुडी,तांबोळी इत्यादी अठरा पगड जातीचे लोक आपापला व्यवसाय गुण्यागोविंदाने करत असत. राजे नेहमीच कर्माला जास्त प्राधान्य देत असत. 


त्यांना एकाच जात ठाऊक होती. माणुसकी गावामध्ये आठवड्याला बाजार भारत असे. त्या बाजारामध्ये गावातील व शेजारील गावातील विक्रते आपला माल विकू शकत. राजांनी रायगडावर अशीच एक बाजारपेठ बांधली होती. कोकण व घाट यांच्या दरम्यान विशाल सह्याद्रीची रांग आहे. फार प्राचीन काळापासून या दोहोंना जोडणारे घाट अस्तित्वात होते. पायवाटा होत्या. नाणेघाट,थळघाट,बोरघाट,आंबाघाट इत्यादी घाटांमधून मालाची ने आन होई. या घाटांमध्ये शिवरायांनी जकातीची चौक्या बसवल्या होत्या. घाटांचे रक्षण व नियंत्रण डोंगरी किल्ल्यामार्फत केले जाई. मालाची वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने बैलगाडी,घोडागाडी व गाढव यांचा उपयोग केला जाई. पालखीचा उपयोग श्रीमंत लोक करीत असत. राजांनी स्वदेशी कारागिरांना नेहमीच चालना दिली. घाटमाथ्यावर पोर्तुगीजांनी केलेले मीठ सर्रास विकले जात होते. राजांनी पोर्तुगीज मिठावर जबरदस्त जकात बसवली. व कोकणच्या मिठाला देशाची बाजारपेठ मिलवून दिली. स्वराज्यात शोषणाचे प्रमाण जवळपास बंदच झाले होते.चौल,कल्याण,भिवंडी,दाभोळ, राजापूर,वेंगुर्ले,हि उद्योगधंद्याची केंद्रे म्हणून भरभराटीस आलेली होती. येथे अन्नधान्य मसाल्याचे जिन्नस कापड कापड फळे प्राणी विक्रीसाठी ठेवलेले असत. महाराजांनी गुलामच व्यापार बंद करून टाकला. शिवरायांनी मस्तक,एडन येथे व्यापार कारण्यासाठी गलबते बांधली होती. महाराजांचे एक गल बत एडनहून मुंबई बंदरात इ.स. १६६९ साली दाखल झाल्याची बातमी सुरतेच्या इंग्रजी दफ्तारात होती. 


राजांनी क्चच्या मालाची आयात व पक्क्या मालाची निर्यात हे धोरण ठेवले होते. घोडदळास उत्तम अरबी घोडे हवे असत. ठाण्याजवळील घोडबंदर हे घोड्यांच्या आयात=निर्यातीचे बंदर म्हणून नावाजलेले होत. राजांनी डच,फ्रेंच यांच्यापासून स्वराज्याला कसा फायदा होईल ते पाहिले. इंग्रज हे फार धूर्त होते. इंग्रजांनी आपले चलन स्वराज्यात चालू द्यावे हि महाराजांना विनंती केली. राजांनी ती धुडकावून लावली. इंग्रज व्यापाऱ्याबद्दल राजे सावध असत. त्यांना ठाऊक होते कि यांच्या व्यापारी टोपीखाली राजकारण शिजत आहे. इंग्रज १६५० सालमध्ये राजांच्या चळवळीला गुंडगिरी,गुंडगिरी म्हणून चिडवत होते. इ.स. १६६० ते १६७० मध्ये ते राजांना मोठा बंडखोर म्हणून संबोधू लागले. आणि १६७४ साली राज्याभिषेख झल्यावर इंग्रजाना साक्षात्कार झाला. शिवाजी राजा हा मोठा धोरणी आहे. असे इंग्रजांना वाटू लागले होते. इंग्रज हे अव्वल दर्जाचे व्यापारी होते. जिथे फायदा तिकडे धाव घेत असत. पण हे सर्व खटाटोप ते कंपनीसाठी करत होते. इंग्लंडच्या तळागाळातील जनतेसाठी नव्हे. राजांसारखी रयतेची काळजी घेण्याइतपत ते अजून प्रगल्भ झाले नव्हते. महाराजांसारखे अस्सल राजकारण त्यांना अजून साधले नव्हते. सुरत व इतर सुलतानी शहरांवर महाराजांनी धाडी घातल्या कारण स्वज्याचे रोपटे अजून लहान होते. त्याला फळे येण्यास अद्यापि बराच कालावधी होता. शिवाय स्वराज्याचे परकीय सुल्तानापासून संरक्षण करायचे होते. रयतेची मने हि स्वराज्याला लोकशाहीला अनुकूल घडवायची होती. 


रायतेमध्ये स्वावलंबन उदयमता राबवायची होती. स्वराज्याची शेती व्यवस्था टिकवणे उद्योगधंद्याच्या शिवकालातील वाढीस प्रोत्साहन देणे हि कामे अग्रक्रमावर होती. आणि हे सर्व लोकांची मने सांभाळून करायचे होते. सुल्तानांसारखे बेजबाबदार राहून चालणार नव्हते. अचानक सुलतानांची टोळधाड कधी होईल याचा भरवसा नसायचा. शेतीव्यवस्था सुलतानी व आस्मानी या दोघांमुळे भरडून निघत असे. स्वराज्याची बरीच कामे पैशावाचून अडली होती. अशाकाळी सुलतानी शहरे हि पैशाने ओसंडून वाहत होती. श्रीमंत शहरांमधील बाजारपेठा ह्या रयतेच्या हातात नव्हत्या. सुलतान लोकांच्या हातात होत्या. बादशहा व त्याचे हितचिंतक यांनी रयतेची पिळवणूक करूनच आपली तुंबडी भरली होती. शिवाय हे जुलमी सुलतान स्वराज्याची नासाडी करत,लोकांवर जुलूम करत त्यांच्यावरही अंकुश बसने आवश्यक होते. स्वराज्याला विपुल धनप्राप्ती व सुल्तानांवर वचक हा दुहेरी हेतू या धाडीमधून साध्य होत असे. म्हणून राजांनी ह्या श्रेमांत शहरातील श्रीमंत लोकांकडूनच खंडणी वसूल केली. गरीब रयत स्त्रिया मुले यांच्या केसालाही धक्का लावला नव्हता. शिवाजीराजांचा पोर्तुगीज चित्रकार म्हणतो कि शिवाजीराजा आपल्या सैनिकांना चांगला पगार आणि तो सुद्धा नियमित देत असे. यात हेतू असा होता कि युद्धात मिळवलेली लुट लपवण्याचा मोह त्यांना होऊ नये. शिवरायांचा राज्याभिषेक झाला. 


त्यानंतर शिवरायांनी स्वराज्याचे चलन म्हणून शिवराई होणं हे सुवर्ण नाणे प्रचालात आणले होते. त्यावर श्री राजा शिवछत्रपती असे कोरले होते. शिवरायांचे शेतकऱ्यांबद्दल धोरण असे होते,नवी रयत येईल त्यास गुरे ढोरे द्यावी. बिजास दानापैका द्यावा. तो ऐवज दोहो चोहो वर्षांनी आयुर्दाव पाहून उगवून घ्यावा. ये जातीचे रयतेचे पाल ग्रहण करावे. सरकारी कर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सर्वानाच दफ्तारात जमा करावा लागे. धर्मादाय संस्थांना मात्र कारातून सूट होती. त्यांच्यासाठी राजांनी वर्षासने इनामे,जमिनी लावून दिली होती. धर्माशिवाय जनता कर्माला प्रवृत्त होत नाही. हे राजांच्या सूक्ष्मनिरीक्षणशक्तीला केव्हाच ठाऊक झाले होते. शिवकालामध्ये माणसाच्या गरजा कमी होत्या. त्या गरजा सर्वसाधारणपणे पूर्ण होत असत. लोक गरजांच्या रगाड्यात अडकत नसत. रयतेची भरभराट झाली तर राज्यकारभार सुसह्य होईल ह्या विचाराने शिवरायांनी शेती व उद्योगधंदे यांच्याच पाठपुरावा केला. शिवरायांनी स्वराज्याचा महान अर्थ जाणला होता. व तो अर्थ आपल्या अर्थनीतीमध्ये प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला होता. शिवराय हे येक थोर अर्थतज्ञ् होते आई महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होती. महाराजांनी हा वारसा आपल्या आईकडून घेतला होता. जिजाआऊसाहेब कैलासवासी झाल्या तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या शिवबाची एक कोटी साठवून ठेंवले होते. राजांची अर्थनीती हि त्याग,कष्ट,परिश्रम,बचत यावर उभारलेली होती. सुलतानी भंपकपणा,दिखाऊपणा,खर्चपनाचा त्यात लवलेशही नव्हता.
























by - Internet



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल