रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

स्वराज्याचे तोरण..


स्वराज्याचे तोरण




स्वराज्याचे तोरण तोरणा गड 


रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली,पण केवढे अवघड कार्य होते ते, दिल्लीचा मुगल बादशाह,विजापूरचा आदिलशाही सुलतान,गोव्याचे पोर्तुगीझ आणि जंजिऱ्याचा सिद्दी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता. त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिम्मत नव्हती. अशा बिकट परीस्तीथत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्याफौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ पण शिवरायांचानिश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले.शिवरायांकडे पुणे,सुपे,चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीरहोती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधीकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहेस्वराज्य, ज्याचे किल्ले त्याचे राज्य, किल्ला ताब्यात असला,कि आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरीकिल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे,असेशिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ठकिलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. 








त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची. माची म्हणजेकिल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी. झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजारआहे, लढाऊ आहे. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकाच वाट आहे. ती आहे झुंजारमाचीवरून. हि वाट अतिशय अवघड आहे.वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार ! महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरनजाई देवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा 'हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला ! पण आदिलशाहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते,कि दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे,असे त्यांनी ठरवले. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शीवराय कानद खोऱ्यात उतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनी भराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारले. येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावाण सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यात आला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. 


हिंदवी स्वराज्याची नौबत झडली.नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड' असे नाव दिले.तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरु झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठा किल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या. शिबंदीत मावळे,कोळी,रामोशी,महार इत्यादी जातीजमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद,वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती सुरु झाली आणि काय आश्चर्य मोहरांनी गच्च भरलेल्या चार घागरीकाम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला.'शिवरायांना देवी भवानी प्रसन्नआहे,तिनेच धन दिले 'असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदाने धनांच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहोरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होते ते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणून शिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आईभवानीचा आशीर्वाद आहे, असे त्यांना वाटले.हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली. दारुगोळा जमा केला.उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्यास ठरवले. तो बेत असा. तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवरपूर्वेला मुरुंबदेवाचा डोंगर आहे. 


शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खुप उंच,अवघड आणि मोक्याचा होता. आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा ढिलाच होता, तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शीवरायांनी ठरवले.एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला. तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले 'राजगड' गडावर पाथरवटांनी दगड घडवले. लोहाराने भाता फुंकला. सुतार ,गवंडी ,मजूर, भिस्ती अशी सारी माणसे कामाला लागली. राजवाडा,बारा महाल,अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड हि स्वराज्याची पहिली राजधानी सजली. शिवरायांची घोडदौड सुरु झाली. बारा मावळांतील किल्ल्यामागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतलेबारा मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील,देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले ;परंतु तांदळात जसे काही खडे असतात,तसे मावळातही काही दुष्ट लोक होते. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या. ठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली.
























by - Internet

स्वराज्याची शपथ







रायरेश्वराच्या देवालयात शपथ 


पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते,पण यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सगळ्यांना ते कळकळीने म्हणाले, 









''गड्यानो,मी आज तुमहाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे. पण गड्यानो,मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का. दुसऱ्याच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का. आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मारतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते. आणि इतके सोसुनही आपल्या पदरी काय. तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचे. दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे. सांगा, तुमीच सांगा वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचे का. शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहेरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. 


त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला,"बोला बाळराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत."हो राजे,तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ.मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले,''गड्यानो आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे,सर्वांनी खपायचे,सर्वांनी प्राण अर्पन करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे 'हिंदवी स्वराज्य' तुमचे ,माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे.परक्यांची गुलामी आता नको. उठा,या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले.


''हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे,असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.''शिवराय शेवटी निश्चयाने बोलले.रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले,ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच. शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्यधन्य वाटले. आपण मणी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा,असा विस्वास त्यांना वाटू लागला. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी,डोंगरातील आडमार्ग शोधावे,खिंडी,घाट,चोरवाटा निरखाव्या,आसा त्यांचा नित्यक्रम सुरु झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरने जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे, असे ते मानू लागले. आता शिवरायांच्या हालचालींना उधाण आले,समुद्राला भरती यावी तसे.शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट,किल्ले आपल्या सवंगड्यांसह बारी नजरेने न्याहाळले.चोरवाटा,भुयारे,तळघरे,दारुगोळा,हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली. 



























by - Internet

शिवरायांचे व्यवस्थापन...


शिवरायांचे व्यवस्थापन

जाणत्या राजाचे व्यवस्थापन



व्यवस्थापनशास्त्राचे अवास्तव रान सर्वत्र माजलेले दिसते. आणि खरे रान कमी होत चालले आहे. अद्यापिएखाद्या कंपनी पलीकडे जाऊन सामान्य रयतेला, राष्ट्राला जगाला सुखी करण्यात त्याला यश आलेले नाही.शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभे केले ते उत्कृष्ट नियोजन व सुक्ष्म व्यवस्थापन शास्त्राशिवाय शक्यचनव्हते. रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ म्हणजे राजांचा व्यवस्थापनेचा अभ्यास. चाणक्याचामहाराजांनी अभ्यास केला होता कि नाही ते इतिहासाला ठाऊक नाही. परंतु समर्थाच्या दासबोधाचा त्यांनीनिश्चित परामर्श घेतला. खरे व्यवस्थापन हे मनाचे असते. म्हणून व्यवस्थापनशास्त्र हे मनाचे शास्त्रम्हटल्यास वाउगे ठरू नये. लोकांचे,जनतेचे कल्याण करणे हा त्यांचा व्यवस्थापनाचा पाया होता. 





औरंगजबाप्रमाणे ते स्वार्थपणा,रानटीपणा,दुसऱ्याच्या शोषणावर आधारलेले नव्हते. वापरा आणि फेका हेकचरा निर्माण करणारे व्यवस्थापन त्यांनी राबवले नव्हते. अफाट लोकसंग्रह,त्यांच्याशी संपर्क साधने,रयतेचेजनमत चाचपणे,त्यांचे लोकशिक्षण व त्यांच्या मूलभूत गरजा पाहणे ह्या सर्वांना राजे प्राधान्य देत असत.स्वराज्याचे आर्थिक नियोजन,न्यायव्यवस्था,सॊरक्षणसिद्धता,परराष्ट्रखाते,धर्मकारण, समाजकारण आणिराजकारण यांचा अचुक समन्वय महाराजांनी साधला होता. महाराजांची इतिहासात डोकावून पाहण्याची शक्तीविलक्षण होती. इतिहास म्हणजे अनुभव,महाराजांनी स्वतःच्या व दुसाऱ्यांच्या अनुभवातून शिकण्याची क्षमतादांडगी होती. कोणत्या वेळी नेमके काय करावे आणि काय करू नये याचा महाराज अगदी अचूक निर्णय घेतअसत. इतिहासाचे अवलोकन करूनच महाराजांनी नवा इतिहास घडवला होता. इतिहासाचा अभ्यास करूनचमहाराजांनी आपल्या स्वराज्याचा भूगोल वाढवला होता. महाराज संकटांकडे संधी म्हणून पाहत होते. 


जमले तर राजकारण नाहीतर शिक्षण हे त्यांचे प्रमुख सूत्र होते. राजे सतत विचारशील व क्रियाशील असत. आपापले स्वराज्य कसे वाढवावे,रयतेला सुखी कसे करावे. दुर्जनांचा निप्पात कसा करावा. आपल्या राष्ट्राचीउन्नती कशी होईल ह्याचेच ते सर्वत्र चिंतन करत असत. राजे पुरंदरच्या ताहासाठी मिर्झाराजेंच्या छावणीतगेले होते. तेव्हा तेथे मनुची नावाचा एक गृहस्थ होता. राजांनी ह्या माणूची बरॊबर बातचीत केली. अर्थातच हावाडा महाल बांधायला किती वर्षे लागली त्या महालात किती हिरे जड्वले. त्याचे दगड कुठून आणले अशींवरपांगी चर्चा केली तर नसणारच,राजांनी मनुचीकडून युरोपचे धर्मकारण,समाजकारण,व राजकारण याचीचांगली माहिती मिळवली होती. या माहितीचा वापर महाराजांनी आपल्या पुढील समाजकारण राजकारणातकेला.


महाराज मुळातच कुशाग्र बुद्धिमत्तेचे,संकटकाळी ती अधीकच सूक्ष्म होत असे. माहाराज क्षणाक्षणाला शिकतहोते. ज्ञान वेचत होते. महाराजांची वृत्ती जिज्ञासू व अभ्यासू होती. आपल्या कर्मचारी वर्गामध्ये व रायतेमध्येहे गन रुजवण्याचा ते प्रयत्न करत असत. सुरतेवर हल्ला करण्याआधी शिवाजी महाराजांनी सुरतेचीवत्तमबातमी बहर्जी नाईकांकडून मिळवली होती . येण्या-जाण्याचा मार्ग,त्यांच्या वेळा,मोहिमेचीगुप्तता,अखंड सावधानता व चपळपणा ह्या सर्वांचा राजांनी येथे सुरेख संगम केला होता. राजे आपल्या आठहजार फौजेसह शत्रूच्या मुलखात तब्बल तीनशे किलोमीटर आत घुसले होते. ते सुरतेला जात असतानाकोंढाण्याच्या बाजूने सहा किमी नटरावरून जात होते. त्याचवेळी मुघलांचा जयवंतसिह नावाचा सरदारकोंढाण्याला वेढा देऊन होता. परंतु त्यालाही हि गोष्ट कळली नव्हती,महाराज असे चालाख होते. राजांची नजरगरुडासारखी होती. महाराज छोट्या छोट्या गोष्टीही बारकाइने पाहत असत. हेच महाराजांचे सूक्ष्मव्यवस्थापन होते.























by - Internet

शिवरायांचे जन्मस्थान - किल्ले शिवनेरी दुर्गपुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज..


Birth Place of Shivaji Maharaj 
शिवरायांचे जन्मस्थान - किल्ले शिवनेरी

दुर्गपुत्र छत्रपती श्री शिवाजी महाराज



छत्रपती शिवाजी महाराज दुर्गपुत्र होते. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यात झाला. त्यांचे बहुतांश जीवन याकिल्ल्यात गेले. आणि त्यांनी शेवटचा श्वासहि किल्ल्यात घेतला. शिवनेरी जरी प्राचीन गिरिदुर्ग आहे,पणत्याची प्रसिद्धी छत्रपतींचे जन्मस्थळ असल्यामुळे आहे. याचमुळे ती महाराष्ट्राची पुण्यभूमी झाली आहे याकिल्ल्यात १९ फेब्रुवारी १६३० ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवरायांनी माता जिजाबाईसोबत१६३५ पर्यंत या किल्ल्यावर बालपण घालवले. नंतर त्यांनी हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले. ते ५३ वर्षाच्याअल्पायुतच दिवंगत झाले. ते जर आपल्या समकालीन शत्रूप्रमाणे दीर्घजीवी असते तर इतिहासाचे रूप काहीवेगळे झाले असते. शिवनेरी किल्ल्याचा इतिहास बराच जुना आहे. सध्याची किल्लेबंदी भलेही मध्ययुगीनअसो,पण किल्ल्याचे बांदकाम प्राचीन काळात झाले होते. किल्ल्याच्या आसपास ५० पेक्षा जास्त बौद्ध गुफाआहेत. नानाघाटाजवळ राजा शातकर्णीचा जो शिलालेख मिळाला आहे,तो सातवाहन युगाचा इ.स. १०२-इसवीसन २५० आहे. सिमुक सातवाहन युगाचा प्रवर्तक होता. तो मोठा प्रतापी राजा होता. त्याने उत्तर भारतातमागधापर्यंत स्वाऱ्या केल्या होत्या. दक्षिण पथ व पच्छिम भागात सुमारे ४०० वर्षे सातवाहनाचे अधिपत्य होते. 



सातवाहन राजा दुर्गनिर्माता म्हणून प्रसिद्ध आहेत. इतिहासकारांनुसार शिवनेरी किल्ल्याची स्थापनासातवाहनांनी केली. तरीपण मेहराब,मिनार व मशिदीवरून स्पष्ट होते कि, मुस्लिम काळातही तेथे बरेचबांधकाम झाले व किल्लेबंदी मजबूत करण्यात आली. सातवाहनानंतर या क्षेत्रात चालुक्य व राष्ट्रकूटाचे राज्यराहिले. ११७० ते १३१८ पर्यंत शिवनेरीवर देवगिरींच्या यादवांचे राज्य होते. त्यानंतर मुस्लिमांचे राज्य सुरुझाले. नंतर या किल्ल्यावर निजामशाही,आदिलशाही,मोगल,मराठे व इंग्रजांचे राज्य राहिले. शिवनेरीपुण्यापासून ९४ कि.मी. व मुंबईहून १६० दूर जुन्नरजवळ सह्याद्री पर्वतरांगेच्या एका उंच शिखरावर आहे.चारही बाजूला १० मीटर उंच किल्ल्यासाठी अमेध्य ढाल झाली आहे. दुरून भीमकाय हत्तीसारखा पहाड मोठामनोहर दिसतो. मध्यभागी बौद्ध गुफा आणि शिखरावर किल्ला असलेले देशातील बहुदा एकमेव स्थान आहे. सौरक्षणाच्या दृष्टीने शिवनेरी एक विशेष किल्ला आहे. किल्ल्यात प्रवेशासाठी सात दरवाजांची साखळी आहे. एक कि.मी. चढाई केल्यानंतर पहिला दरवाजा आहे. मुख्य दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दरवाजेओलांडावे लागतात. मुख्य दरवाजा लाकडाचा आहे. आणि मूळ स्वरूपात कायम आहे. किल्ल्यात मोटारीनेहीजाता येते. आता पक्का रस्ता झाला आहे. किल्ल्याच्या चारही बाजूला दुसरेहि किल्ले आहेत. 


पूर्वेला नारायणगढ,उत्तरेला हरिश्चंद्रगढ,तारामतीगढ,पच्छिमेस चावंड,हडसर व दक्षिणेला रानमाची आहे. हेक्षेत्र प्राचीन काळात विशेषतः सातवाहनकातळात बरेच समृद्ध होते. त्यामुळे अनेक प्राचीन किल्ल्यांचे अवशेषया क्षेत्रात आहेत. शिवनेरी किल्ल्यात महादरवाजा,बाटवण पीर,शिवबाई हे दरवाजे आहेत. या सर्वांचीकिल्लेबांदी मजबूत आहे. पाचव्या दरवाजाच्या कपाटास हत्तीपासून बचाव करण्यासाठी लोखंडाचे टोकदारखिळे ठोकले आहेत. किल्ल्याची तटबंदी बरीच उंच व निसरडी आहे. ती शिला कापून बनविली आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूला मजबूत बुरुज,खंदक व लाकडाच्या पुलाच्या खुणा आहेत. किल्ल्यापर्यंतपोहोचण्यासाठी रस्ता आहे. पण तो फार वळणाचा आणि नागमोडी आहे. किल्याचे पहिले द्वार १७० मी. उंचीवर आहे. त्याच्या पुढे लाकडाचा उचलण्याचा पूल आहे. फाटकास घुगुस आणि बुरुज आहे. शत्रूलारोखण्यासाठी असलेली तटबंदी आता उध्वस्त झाली आहे. यानंतर ६६ मी. उंचीवर दुसरे द्वार आहे. यालापारवन दरवाजा म्हणतात. हि तटबंदी बरीच उंच आहे,व द्वारावर शार्दुलाची आकृती उत्कीर्ण आहे. तिसऱ्याफाटकास हत्तीदरवाजा म्हणतात या फाटकावरही शार्दुलाची आकृती कोरलेली आहे. कपाटास लोखंडाचे खिळेलावले आहेत. १७ मी. दूर पीर दरवाजा आहे. हा दरवाजा दगड कापून बनविला आहे. हा बराच मोठा आहे. यानंतर रस्त्याला दोन फाटे आहेत. एक रास्ता घोड्यासाठी आणि एक रास्ता माणसांसाठी आहे. 


नंतर शिवाई नावाचा पाचवा दरवाजा आहे. येथून तटबंदीची तिसरी किल्लेबंदी सुरु होते. डाव्या बाजूला काहीअंतरावर शिवाजीचे प्राचीन मंदिर आहे. ज्या पठारावर मंदिर आहे त्याच्या खाली बौद्ध गुफांच्या रांगा आहेत. शिवाई द्वारापासून ८४ मीटर उंचीवर सहावा दरवाजा आहे. आणि त्याच्या थेट समोर २५ मीटर वेड्यावाकड्यारस्त्यानंतर कुलपकड हा सातवा दरवाजा येतो. पश्चिमेकडे तीन ओळी व सातखोल्यांच्या रांगेजवळआंबेरखाना आहे. हि किल्ल्याची पहिली इमारत आहे. याशीवाय मुस्लिम युगाच्या राज्यकर्त्यांच्या महालाचेअवशेष आहेत. आई जिजामातेने शिवाई देवीची पूजा करून शिवाजीराजांसारखा पुत्र मिळविला. व शिवाईदेवीच्या नावाने आपल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवले. शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती जागा येथे पाहतायेते. हि इमारत ढासळली होती,तिचा जीर्णोद्धार झाला आहे. येथे शिवाजी महाराज व जिजामाता यांचे पुतळेआहेत. काही अंतरावर काला चौथरा आहे. येथे १६५० मध्ये मोगल सैन्याशी युद्ध झाले. शिवनेरीवरील डोंगरावरसात मीटर उंच एकमेकांपासून ९ मीटर अंतरावर मेहेरबाची मशीद आहे. या मशिदीचे दोन मिनार सात मीटरउंच आहेत. सुमारे ३५ मीटर उंच चढल्यावर मजार व दरगाह आहे. नेमके याच्या खाली यादव राजांनी खोद्लेलेतलाव आहे ते दगड कापून बनविले आहे. किल्ल्यावर सुमारे ३० तलाव आहेत. त्यात गंगा - यमुना नावाचेतलाव उल्लेखनीय आहेत. सर्व तलाव दगड कापून बनविले आहेत. बहुधा बौद्ध गुफासोबत या तलावांचे कामझाले असावे. वाळवंटात मरुद्यान पाहून सुखद अनुभूती होते. तसे पर्यटकांना येथील तलाव पाहून आश्चर्यवाटते. 


उंच पहाडावरून तलावांना पाहून आनंद होतो. बौद्ध गुफा सुद्धा महत्वाच्या आहेत. या चैत्य गुफा अनेक वर्गातविभागल्या आहेत. बौद्ध धर्माच्या हीनयान संप्रदायाचे वर्चस्व असताना या गुफा कोरण्यात आल्या. या गुफातत्कालीन केलेल्या प्रगतीच्या खुनाच आहेत. जेथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला व जो किल्लाजिंकण्यासाठी त्यांनी १६५७,१६७० आणि १६७६ असे तीन वेळा प्रयत्न केले. पण किल्ला त्यांच्या मृत्यू नंतरचमराठ्यांच्या हाती आला. याचे कारण कि,औरंगजेबाने सर्वात अधिक सैनिक या किल्यात नेमले होते. निजाम- उल - मुल्कयाने १६१४ मध्ये या किल्ल्याची पहाणी केली होती. लष्करीदृष्ट्या शिवनेरी एक केंद्र असून इतरकिल्ल्यांनि त्याच्याभोवती फेरा धरला आहे. त्यात शिवनेरी,बहिरवगड,चावंड,हडसर,हरिश्चंद्रगड,जीवधनजुन्नर,कुंजलगड,नारायणगड,पाबर, व पेमगिरी असे ११ किल्ले आहेत. नाना घाटाच्या पश्चिमेस बहिरवगड आहे. हा अत्यंत कठीण किल्ल्यांपैकी एक आहे. किल्ल्याचा रस्ता अत्यंत खडकाळ असून काहीठिकाणी दोरीच्या साहाय्याने तर काही ठिकाणी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांवरून एक ट्रॅप डोअर ने प्रवेश करतायेत होता. महाराष्टीय लोकांचे या किल्ल्यावर इतके प्रेम आहे कि,सध्याच्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचीघोषणा येथे २७ एप्रिल १९६० मध्ये झाली. किल्ला पाहावयास अर्धा दिवस पुरेसा आहे. ऐतिहासिक अवशेषांसहसुरक्षितपणे किल्ल्याचे सौंदर्य वाढले आहे. किल्ला पाहायला एक दिवस पुरेसा आहे. जुन्नर आणि नाना घाटमध्ये पूर्व बाजूला चावडचा किल्ला असून तो इ.स. १४५७ च्या पूर्वी बांधण्यात आला. याची मुख्य ताकतत्याच्या नैसर्गिक सौरक्षण शक्तीत आहे. इंग्रजानी किल्ला जमीनदोस्त केल्यामुळे आता काहीच शिल्लकनाही. 


या किल्ल्यात मलिक अंबरने बऱ्याच सुधारणा केल्या. निजामशाहीच्या नावे मोगलांशी लढताना शहाजीभोसल्यांनी या किल्ल्याचा वापर केला. काही काळ या किल्ल्याचा तुरुंग म्हणूनही वापर झाला. हडसर हाकिल्ला दोन शिखरांच्या टेकडीवर टेकडीवर असून त्यांना एका भिंतीने जोडले आहे. हा किल्ला उध्वस्त झालातरी त्यावरील मंदिर,काही तलाव आणि भूमिगत कक्ष पाहता येतात. हा हि किल्ला शहाजी राजांनी मोगलांनादिला. जुन्नरहून २५ कि. मी. अंतरावर प्राचीन दुर्ग हरिश्चंद्रगड हा पाच कि.मी. व्यासाचा प्रचंड किल्ला पुणे - अहमदनगर आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर आहे. त्याची मुख्य परकोट शिखराच्या किंचित खाली आहे.किल्ल्याचे मुख्य वैशिष्ठ्य त्यातील असंख्य गुहा,सुंदर मंदिर आणि दगड कापून काढलेले सुंदर कक्ष आहेत. ४०० मीटर उंचीचा सरळसोट अर्धवर्तुळाकार कड्याचे नाव कोकणकडा आहे. किल्ल्याचा इतिहास फारसामहत्वाचा नाही. निरनिराळ्या घराण्याच्या हाती हा किल्ला होता. मालशेज घाट हा पूर्वी नाणेघाटाएवढामहत्वाचा नव्हता. पण अलीकडे मालसेज घाट मोटारीच्या रस्त्याने महत्वाचा झाला आहे. तर नाणेघाटपायदळमाणसे आनी पशुंच्या उपयोगाचा राहिला आहे. जुन्नरपासून २५ कि.मी वरील जीवधनचा किल्लाइ.स. १६०० पूर्वीचा आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही तर्हेपेक्षा दुर्गम्य किल्ल्याचा चढाव सरळसोटआणि लांब आहे. याच्या काही पायऱ्या विटांनी बांधलेल्या तर काही दगडातून कापून काढलेल्या आहेत. 


एक द्वाराकडे जडत्व तेथून एका गुहेसारख्या मार्गाने आतल्या द्वारापर्यंत जातात. बाराच काळ निजामशाहीचेया किल्ल्यावर आदिपत्य होते. मुगल, मराठ्यानंतर इंग्रजांनी किल्ल्याचा परकोट आणि पायऱ्या उडवूनलावल्या. १०० मीटर उंचीची परकोटाची भिंत भयप्रद आहे. पुण्याहून ७५ कि.मी. अंतरावरील जुन्नरचे गावआणि किल्ला प्राचीन आहे. किल्ला शहराजवळ असून बराच मोठा आहे. परकोट व बुरुज पडले असून आतल्याइमारती हि उध्वस्त झाल्या आहेत. इंग्रज काळात तेथे काही कार्यालये उघडण्यात आली. जुन्नर हे व्यापारीकेंद्र असून त्याच्या रक्षणासाठीच हा किल्ला असावा. आसपासच्या किल्ल्यात सरद देण्याचे कामही हा किल्लाकरत असावा. गुजालाड हा नाममात्र नकाशावरच आहे. नारायणगड हा किल्ला पुणे जिल्ह्यातील अठराव्याशतकातील आहे. बालाजी विश्वनाथ ने तो बांधून सयाजी पवारास सरजामात दिला. पण या वेळी किल्यांचेमहत्व घसरणीत लागले होते. या किल्ल्याच्या दोन बाजूला कडे असून एका बाजूला परकोट आणि बुरुज आहे. किल्ला उध्वस्त झाला असला तरी हत्साबाईचे मंदिर सुरक्षित आहे. हा किल्ला इंग्रजांनी जमीनदोस्त केला. पाबरचा किल्ला हि नाममात्रच आहे. पेमालेरो उर्फ शहागड हा बालेश्वर पर्वत रांगावरचा किल्ला असूनमोगलांशी लढताना शहाजी राजांनी त्याचा वापर केला. मोगलांनी हा किल्ला घेतला पण तो अखेर पेशव्यांनीजिंकून घेतला.




















by - Internet

शिवरायांचे आरमार दल...


शिवरायांचे आरमार दल


शिवरायांचे आरमार 


शिवरायांचे आरमारदल 



महाराष्ट्र, मध्यप्रदेश व राजस्थानात देशातील सर्वाधिक किल्ले आहेत. महाराष्ट्रात ६५६ किल्ले आहेत. बहुतांश किल्ले सह्याद्री पर्वताच्या शिखरावर आजहि उभे आहेत. महाराष्ट्राच्या ६५६ किल्ल्यांपैकी १८० किल्लेशिवाजी महाराजांनी उभारले. त्यापैकी १३ किल्ले सागरी होते. सागर दुर्गाची स्थापना व त्याच्या रक्षणाचीनौसेनेची उभारणी करण्याचे श्रेय छत्रपती शिवाजी महाराजांना आहे. महाराषट्रातील किल्ल्यात सर्वोच्च किल्लासालेरगड आहे. तो नाशिकजवळ असून त्याची उंची १६१२.३ मीटर आहे. सातवाहन राजाने उभारलेला घोडपहा दुसरा उंच किल्ला आहे. महाराष्ट्राचे किल्ले एकाहून एक मोठे आहेत. गोंड आदिवासींचा किल्ला 
नरनाळा आहे. सहगड,रायगड,वज्रगड,प्रतापगड,सिधुदुर्ग,मुरुड,जंजिरा,हरिश्चन्द्रगड,वसई,अहमदनगर,तोरणा,लिंगना इ. किल्यांची प्रदीर्घ साखळी आहे. सागरात बसलेल्या मुरुड जंजिरा किल्ल्यास साऱ्या जगात तोडनाही. राजस्थानात एकूण २५० किल्ले व गढ्या आहेत. सर्वाधिक किल्ले मेवाडात आहेत.




मेवाडात एकट्या राजाने३२ किल्ले. व गढ्याउभारल्या. राजस्थानच्या ढुंढाढप्रदेशात ५२किल्ले,मारवाडचेनवकोट,राजस्थानच्याकिल्ल्यांचे स्थापत्यफारच प्रगत आणिसमृद्ध होते. मध्यप्रदेशात ३३० किल्लेआहेत. त्यापैकी बहुतांशजर्जर आहेत. छत्तीसगड नावाप्रमाणेच छत्तीस किल्ल्यांचा प्रदेश आहे. बुंदेलखं आणि बघेलखंड व नेमाडक्षेत्र उध्वस्तकिल्ल्यांनि गजबजलेले आहे. गढामंडला राज्यात रायसेन किल्ल्यासह ५२ किल्ले होते. बुंदेलखंड आणिबाघेलखंडात कालिंजर,अजयगड आणि गुरंगीचे किल्ले अभेद्य होते. यातील काळलिंजर तर देशातील सर्वातजुना किल्ला आहे. येथे जाण्यात आजही लोकांना अडचण येते. कर्नाटक, आंध्रप्रदेश, आणि तालिनाडूच्याकिल्ल्यांचे स्थापत्य शिल्पदृष्टीने महत्वाचे आहे. बादामीचा किल्ला चालुक्य काळातीला आहे. त्याची उभारणीकिल्ल्याच्या आदर्शानुसार झाली. हंपीच्या अवशेषात विजयनगरच्या साम्राज्याचे वैभव प्रतिबिंबातहोते. विजयनगरचा किल्ला बराच मजबूत होता. पण तालिकोटच्या लढाईत या किल्ल्याच्या भीतीनेदक्षणेतील सर्व सुलतानांनी हा किल्ला काबीज करण्यासाठी सर्व सक्ती एकवटून हल्ला केला.


आपल्या देशात किल्ले,कोट,गढ,गढ्या शेकडोंच्या संख्येने आहेत. यांच्या सावलीतील रानमहालांची ये- जानुपूरांचा झणकार,किल्ल्यावरील शहनाई,हत्तीच्या गर्जना,नगाऱ्याचा युद्धकोष,राजसत्तेची कारस्थानेबलिदानाची गौरवशाली परंपरा आणि जौहरच्या ज्वालेच्या अनेक लोककथा लोकजीवनावाच्या अभंग अंगझाल्या आहेत. या किल्ल्यांनी अनेक लढाया आणि अनेक कत्लेआम पाहिले आहेत. त्याच्याबलिदानाचावारसा आजही गौरवपूर्ण भूतकाळास जिवंत करतो. प्रत्येक कथा नव्या पिढला प्रेरणा देते. या कथांच्या आधारेप्रत्येक पिढी आपल्या पूर्वाजांच्या गौरवपूर्ण इतिहासाला समजण्याचा प्रयत्न करते. या किल्यांच्या जय-पराजयांच्या लपलेल्या कथा संघर्षशील इतिहासाला वर्तमानाशी जोडतात. असा कोण माणूस आहे कि जोचित्तोडला जाऊन तेथील मातीस वंदन करीत नसेल. रणथंबोर दुर्गापेक्षा राष्ट्रीय भावनेच्या ऐक्याचे उदाहरणकोण दाखवेल. तेथे आजही मंदिर,मस्जिद,व गिरिजाघर एकत्र उभे आहेत. रायगड,प्रतापगड,विजापूर,गोलकुंडा आणि बेदारच्या किल्यांस पाहून तत्कालीन राज्यकर्त्यांची दूरदृष्टी दिसून येते.






















by - Internet 

शिवरायांची युद्धनीती...



शिवरायांची युद्धनीती


शिवरायांनी वयाच्या पंदराव्या वर्षी रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयाच्यापन्नासाव्या वर्षी रायगडावर त्यांनी आपला देह ठेवला. अवघ्यां पस्तीस वर्षाचा हा काळ या काळातशिवरायांनी आपल्या पराक्रमाच्या व मुत्सद्देगिरीच्या जोरावर हिंदवी स्वराज्य स्थापन केले. स्वराज्यासाठी तेहयातभर लढत राहिले. अत्यंत कठीण प्रसंगी समशेर हाती घेऊन स्वतः लढाईत उतरले. आणि त्यांनी विजयमिळवले. त्यांचे आयुष्य युद्धप्रसंगी भरलेले आहे. स्वराज्यावर अनेक संकटे आली,पण शिवरायांनी प्रसंगपाहून आणि दूरवरचा विचार करून त्यांनी तोंड दिले. शिवराय पराक्रमी होते,तसेच थोर मुत्सद्दीही होते.



शक्ती कमी पडली,तेव्हा शिवरायांनी युक्ती चालवली. अफजलखान म्हणजे तुफान ताकदीचा वीर, पणशिवरायांनी त्याची बेधडक भेट घेतली. आणि त्याचा निकाल लावला. धोधो पावसात व दाट काळोखातशिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यातून बाहेर पडले. रात्रीच्या अंधारात शास्ताखानावर छापा घालून त्यांनी त्याचीखोड मोडली. आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतुन शिवराय किती युक्तीने निसटले. त्यांच्यासारखा धाडसीआणि मुत्सद्दी सेनानायक सापडणे कठीण. शिवराय स्वतः शूर योद्धे होते. त्यांनी आपल्या सरदारांनाही शूरबनवले. सरदारांची शिवरायांवर केवढी निष्ठा होती. वीर बाजी पासलकर पुरंदर किल्ल्याच्या जवळील खळदबेलसरच्या लढाईत धारातीर्थी पडले. शहाजीराजांनी कान्होजी जेधेंना मावळातील देशमुखांना सोबत घेऊनशिवरायांच्या पाठीशी राहण्यास सांगितले. त्यांनी स्वराज्यस्थापनेच्या कामी आयुष्यभर शिवरायांना साथदिली. फिरंगोजी नरसाळा याने चाकनचा किल्ला उदार होऊन लढवला. सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढाघातला. तेव्हा सिद्दी हिलाल आणि त्याचा पुत्र शिवरायांच्या बाजूने लढले. शिवरायांना वाचवण्यासाठीबाजीप्रभूने आनंदाने मरणाला मिठी मारली. तानाजीने मुलाचे लग्न टाकून कोंढाणा घेण्यासाठी प्राणार्पण केले.




सेनापती प्रतापराव गुजर याने आदिलशाही सरदार बहलोलखानाशी लढताना हौतात्म्य पत्करले. प्रतापरावगुजर यांच्यानंतर शिवरायांनी हंबीरराव मोहिते याची सरसेनापती म्हणून नेमणूक केली. त्याने अनेकलढायांमध्ये पराक्रम केला. तसेच जालना स्वरीच्या वेळी शत्रूशी लढताना सेनानायक सिंधोजी निंबाळकर यानेप्राणार्पण केले. महाराजांच्या सेवकाने दाखवलेल्या स्वामीनिष्ठेची अशी कितीतरी उदाहरणे आहेत. शिवरायांचेसारे शत्रू बलाढ्य होते. शत्रूंजवळ अफाट फौजा होत्या,भरपूर दारुगोळा होता,शेकडो तोफा होत्या,पणशिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूच्या बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार. उघड्या मेदानावरशत्रूशी कसा सामना देणार. तेव्हा शिवरायांनी विचार केला कि महाराष्ट्र हा डोंगराळ मुलुख आहे. इथेडोंगर,घाट व खिंडी पुष्कळ आहेत. त्यांचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हे सारे लक्षात घेऊनशत्रूशी सामना कसा द्यावा हे शिवरायांनी ठरवले. शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान असे. ते आवरूनलढाईला निघायला त्यांना वेळ लागे. उलट मराठे घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीलाढाल,कमरेला तलवार,हातात भाला एवढेच त्यांचे सामान. पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत. 


शिवरायांचे मावळे चपळ व काटक होते. या साऱ्या गोष्टींचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्यामैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले. यात त्यांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येते. शत्रूच्या गोटात गुपचूपआपली माणसे पाठवून शिवराय शत्रुपक्षाची खडानखडा माहिती मिळवत. मग शत्रूवर अचानक हल्ला करत.बेसावध शत्रूची दाणादाण उडवत. शत्रू लढाईला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे होत. डोंगराळभागात अशा लपून छपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच गनिमी कावा म्हणतात.शिवरायांनी गनिमी काव्यानेच बादशाहाच्या प्रचंड फौजेचा धुव्वा उडवला. शिवरायांची डोंगरी किल्ल्यांवरअधिक भिस्त होती. किल्ला तांब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जातअसे. किल्ल्यावर अन्नधान्य व दारुगोळा याचा भरपूर साठा ठेवला कि मग शिवरायांची किल्ल्यावरीललहानशी फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन-दोन वर्षे दाद देत नसे. शत्रू ताकदवान असला,तरी किल्ल्याचाआश्रय घेतला जात असे. 


शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही. ती त्यांनी प्रथमराजगडावर ठेवली. आणि नंतर राजधानीसाठी रायगडाची निवड केली,याचे इंगित हेच होत. किल्ल्याच्यारक्षणासाठी शिवरायांनी गडावर भिन्न भिन्न जाती जमातीची माणसे नेमली. त्यामुळे कामे सुरळीत पारपडत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी होती. स्वराज्याचाकारभार चालवण्यासाठी पैसा उभारणे आवश्यक होते. शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसाउभारत. शत्रुच्या मुलखातून वसुलीचा जो चौथा हिस्सा शिवराय घेत,त्यास चौथाई म्हणत. चौथाई देणाऱ्यांनाशिवरायांच्या फौजा त्रास देत नसत. चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. सिद्दी,पोर्तुगीज,इंग्रज यांच्यापासून स्वराज्याला धोका होण्याचा संभव आहे,हे शिवरायांनी ओळखलेहोते,म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग,विजयदुर्ग,यासारखे भक्कम किल्लेबांधले. ते पाहिले कि आजही आपले मन थक्क होते. स्वराज्यावर केवढी संकटे आली,पण शिवरायांनी मोठ्याशौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले,म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले.


































by - Internet

शिवाजी महाराजांची अर्थनीती...

शिवरायांची अर्थनीती


शिवकालीन आर्थिक जिवणं हे मुख्यतः शेतीव्यवसायाशी निगडित होते. त्यामुळे शेतीचे रक्षण व सवंर्धन हि धोरणे शिवरायांनी प्रामुख्याने राबवली. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा होता. तो काळ सुलतानी जुलूम जबरदस्तीचा होता. अशा वेळी शिवरायांचे स्वराज्य हे लोकांना वरदानच होते. मुख्य म्हणजे शिवरायांचा स्वराज्याचा मुख्य दृष्टिकोन हा शोषणावर आधारीत नव्हता. स्वतःची तुंबडी भरून घेण्यासाठी राजांनी स्वराज्य निर्माण केले नव्हते. स्वराज्याला धर्माची जोड होती. पीक लावणीच्या काळात शेतकऱ्यांना विशेष संरक्षण दिले जाई. शेतकऱ्याचे नुकसान ते स्वराज्याचे नुकसान हे राजांना पक्के ठाऊक होते. शेतकरी गाव सोडून जाऊ नये याची काळजी राजना घ्यावी लागे. एका चोराला शेतकऱ्याने पकडून बेदम मारले. तेव्हा तो चोर मारला गेला. राजांनी शेतकऱ्याची प्रशंसा केली व चोरांचे प्रेत वेशीवर टांगून ठेवण्यात आले. रायतेवाचून स्वराज्य म्हणजे आत्म्यावाचून शरीर. शेतकरी हा स्वराज्याचा आत्मा होता. सुलतानी बरोबरच रयतेला आस्मानालाही तोंड द्यावे लागे. असाच एक भयंकर दुष्काळ १६३० साली पडला होता. महाराष्ट्राची निम्मी लोकसंख्या ह्या दुष्काळाने मरण पावली. तुकाराम महाराजांची प्रथम पत्नी व दोन मुले या दुष्काळाने खाल्ली. त्यावर तुकाराम महाराज म्हणतात. बरे झाले देवा निघाले दिवाळे | बरी या दुष्काळे पीडा केली || माणसांनी माणसाला खाल्ले असे दुष्काळाचे भयंकर वर्णन आहे. शिवरायांनी प्रजेसाठी बंधारे बांधले. कालवे व विहिरी यांची सोय केली. 






व पाणीनियोजनासाठी जनतेला उत्तेजन दिले. पाण्यावर मालकी सरकारची आहे. पुणे जवळ येसाजी पाटील यांनी राजांच्या हुकुमावरून पाणवठ्यांमधील एक मोठा धोंडा फोडला. त्याला बक्षीस म्हणून राजांनी जमीन दिली. शिवकालामध्ये जमिनीच्या प्रतीवर शेतसारा ठरत असे. शिवाय पिकांच्या पद्धतीवर देखील ठरत असे. ऊस,हळद,भाजीपाला व फळफळावळे या उत्पादनांवरती नकादि कर आकारला जाई . रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. असा सैन्याला पक्का आदेश होता. कल्याण भिवंडी प्रांतात उत्कृष्ट प्रतीचे जहाज बांधणीचे व इमारतीचे लाकूड मिळत असे म्हणून राजांनी कल्ल्यांला आपला जहाजबांधणीचा कारखाना काढला. आंबा,फणस,साग,वड पिंपळ इत्यादी उपयुक्त झाडे परवानगीशिवाय तोडू नये असा आदेश होता. परमुलुखातून साग व इतर कच्चा माल आयात केला जात असे. शिवाय स्वराज्याच्या रक्षणासाठी गनिमी काव्याची जंगलाचा वापर नायसर्गिक तटबंदी म्हणून केला जाई. महाराजांनी उदयोगधंद्यांना प्रोत्साहन दिले. बारा बलुतेदारी त्या काळी विशेष प्रचलित होती. खेडे हा आर्थिक जीवनाचा पाया होता. त्या काळी खेडी हि स्वावलंबी होती. प्रत्येक खेडे हे एक कुटुंबरचना होती. ग्रामीण उत्पादन गावातील लोकांसाठी गावातच केले जाई.सोनार,लोहार,तांबट,सुतार,चांभार,कुंभार,कोष्टी,बॅँकारी,मांग,तेली,धनगर,कोपटी,शिंपी,न्हावी,परीट,गवंडी,माळी,कोळी,रंगारी,पखवाजी,पावेकरी,टाळकरी,विणेकरी,कीर्तनकार,गायक,नर्तिका,गारुडी,तांबोळी इत्यादी अठरा पगड जातीचे लोक आपापला व्यवसाय गुण्यागोविंदाने करत असत. राजे नेहमीच कर्माला जास्त प्राधान्य देत असत. 


त्यांना एकाच जात ठाऊक होती. माणुसकी गावामध्ये आठवड्याला बाजार भारत असे. त्या बाजारामध्ये गावातील व शेजारील गावातील विक्रते आपला माल विकू शकत. राजांनी रायगडावर अशीच एक बाजारपेठ बांधली होती. कोकण व घाट यांच्या दरम्यान विशाल सह्याद्रीची रांग आहे. फार प्राचीन काळापासून या दोहोंना जोडणारे घाट अस्तित्वात होते. पायवाटा होत्या. नाणेघाट,थळघाट,बोरघाट,आंबाघाट इत्यादी घाटांमधून मालाची ने आन होई. या घाटांमध्ये शिवरायांनी जकातीची चौक्या बसवल्या होत्या. घाटांचे रक्षण व नियंत्रण डोंगरी किल्ल्यामार्फत केले जाई. मालाची वाहतूक करण्यासाठी प्रामुख्याने बैलगाडी,घोडागाडी व गाढव यांचा उपयोग केला जाई. पालखीचा उपयोग श्रीमंत लोक करीत असत. राजांनी स्वदेशी कारागिरांना नेहमीच चालना दिली. घाटमाथ्यावर पोर्तुगीजांनी केलेले मीठ सर्रास विकले जात होते. राजांनी पोर्तुगीज मिठावर जबरदस्त जकात बसवली. व कोकणच्या मिठाला देशाची बाजारपेठ मिलवून दिली. स्वराज्यात शोषणाचे प्रमाण जवळपास बंदच झाले होते.चौल,कल्याण,भिवंडी,दाभोळ, राजापूर,वेंगुर्ले,हि उद्योगधंद्याची केंद्रे म्हणून भरभराटीस आलेली होती. येथे अन्नधान्य मसाल्याचे जिन्नस कापड कापड फळे प्राणी विक्रीसाठी ठेवलेले असत. महाराजांनी गुलामच व्यापार बंद करून टाकला. शिवरायांनी मस्तक,एडन येथे व्यापार कारण्यासाठी गलबते बांधली होती. महाराजांचे एक गल बत एडनहून मुंबई बंदरात इ.स. १६६९ साली दाखल झाल्याची बातमी सुरतेच्या इंग्रजी दफ्तारात होती. 


राजांनी क्चच्या मालाची आयात व पक्क्या मालाची निर्यात हे धोरण ठेवले होते. घोडदळास उत्तम अरबी घोडे हवे असत. ठाण्याजवळील घोडबंदर हे घोड्यांच्या आयात=निर्यातीचे बंदर म्हणून नावाजलेले होत. राजांनी डच,फ्रेंच यांच्यापासून स्वराज्याला कसा फायदा होईल ते पाहिले. इंग्रज हे फार धूर्त होते. इंग्रजांनी आपले चलन स्वराज्यात चालू द्यावे हि महाराजांना विनंती केली. राजांनी ती धुडकावून लावली. इंग्रज व्यापाऱ्याबद्दल राजे सावध असत. त्यांना ठाऊक होते कि यांच्या व्यापारी टोपीखाली राजकारण शिजत आहे. इंग्रज १६५० सालमध्ये राजांच्या चळवळीला गुंडगिरी,गुंडगिरी म्हणून चिडवत होते. इ.स. १६६० ते १६७० मध्ये ते राजांना मोठा बंडखोर म्हणून संबोधू लागले. आणि १६७४ साली राज्याभिषेख झल्यावर इंग्रजाना साक्षात्कार झाला. शिवाजी राजा हा मोठा धोरणी आहे. असे इंग्रजांना वाटू लागले होते. इंग्रज हे अव्वल दर्जाचे व्यापारी होते. जिथे फायदा तिकडे धाव घेत असत. पण हे सर्व खटाटोप ते कंपनीसाठी करत होते. इंग्लंडच्या तळागाळातील जनतेसाठी नव्हे. राजांसारखी रयतेची काळजी घेण्याइतपत ते अजून प्रगल्भ झाले नव्हते. महाराजांसारखे अस्सल राजकारण त्यांना अजून साधले नव्हते. सुरत व इतर सुलतानी शहरांवर महाराजांनी धाडी घातल्या कारण स्वज्याचे रोपटे अजून लहान होते. त्याला फळे येण्यास अद्यापि बराच कालावधी होता. शिवाय स्वराज्याचे परकीय सुल्तानापासून संरक्षण करायचे होते. रयतेची मने हि स्वराज्याला लोकशाहीला अनुकूल घडवायची होती. 


रायतेमध्ये स्वावलंबन उदयमता राबवायची होती. स्वराज्याची शेती व्यवस्था टिकवणे उद्योगधंद्याच्या शिवकालातील वाढीस प्रोत्साहन देणे हि कामे अग्रक्रमावर होती. आणि हे सर्व लोकांची मने सांभाळून करायचे होते. सुल्तानांसारखे बेजबाबदार राहून चालणार नव्हते. अचानक सुलतानांची टोळधाड कधी होईल याचा भरवसा नसायचा. शेतीव्यवस्था सुलतानी व आस्मानी या दोघांमुळे भरडून निघत असे. स्वराज्याची बरीच कामे पैशावाचून अडली होती. अशाकाळी सुलतानी शहरे हि पैशाने ओसंडून वाहत होती. श्रीमंत शहरांमधील बाजारपेठा ह्या रयतेच्या हातात नव्हत्या. सुलतान लोकांच्या हातात होत्या. बादशहा व त्याचे हितचिंतक यांनी रयतेची पिळवणूक करूनच आपली तुंबडी भरली होती. शिवाय हे जुलमी सुलतान स्वराज्याची नासाडी करत,लोकांवर जुलूम करत त्यांच्यावरही अंकुश बसने आवश्यक होते. स्वराज्याला विपुल धनप्राप्ती व सुल्तानांवर वचक हा दुहेरी हेतू या धाडीमधून साध्य होत असे. म्हणून राजांनी ह्या श्रेमांत शहरातील श्रीमंत लोकांकडूनच खंडणी वसूल केली. गरीब रयत स्त्रिया मुले यांच्या केसालाही धक्का लावला नव्हता. शिवाजीराजांचा पोर्तुगीज चित्रकार म्हणतो कि शिवाजीराजा आपल्या सैनिकांना चांगला पगार आणि तो सुद्धा नियमित देत असे. यात हेतू असा होता कि युद्धात मिळवलेली लुट लपवण्याचा मोह त्यांना होऊ नये. शिवरायांचा राज्याभिषेक झाला. 


त्यानंतर शिवरायांनी स्वराज्याचे चलन म्हणून शिवराई होणं हे सुवर्ण नाणे प्रचालात आणले होते. त्यावर श्री राजा शिवछत्रपती असे कोरले होते. शिवरायांचे शेतकऱ्यांबद्दल धोरण असे होते,नवी रयत येईल त्यास गुरे ढोरे द्यावी. बिजास दानापैका द्यावा. तो ऐवज दोहो चोहो वर्षांनी आयुर्दाव पाहून उगवून घ्यावा. ये जातीचे रयतेचे पाल ग्रहण करावे. सरकारी कर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सर्वानाच दफ्तारात जमा करावा लागे. धर्मादाय संस्थांना मात्र कारातून सूट होती. त्यांच्यासाठी राजांनी वर्षासने इनामे,जमिनी लावून दिली होती. धर्माशिवाय जनता कर्माला प्रवृत्त होत नाही. हे राजांच्या सूक्ष्मनिरीक्षणशक्तीला केव्हाच ठाऊक झाले होते. शिवकालामध्ये माणसाच्या गरजा कमी होत्या. त्या गरजा सर्वसाधारणपणे पूर्ण होत असत. लोक गरजांच्या रगाड्यात अडकत नसत. रयतेची भरभराट झाली तर राज्यकारभार सुसह्य होईल ह्या विचाराने शिवरायांनी शेती व उद्योगधंदे यांच्याच पाठपुरावा केला. शिवरायांनी स्वराज्याचा महान अर्थ जाणला होता. व तो अर्थ आपल्या अर्थनीतीमध्ये प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला होता. शिवराय हे येक थोर अर्थतज्ञ् होते आई महालक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न होती. महाराजांनी हा वारसा आपल्या आईकडून घेतला होता. जिजाआऊसाहेब कैलासवासी झाल्या तेव्हा त्यांनी आपल्या लाडक्या शिवबाची एक कोटी साठवून ठेंवले होते. राजांची अर्थनीती हि त्याग,कष्ट,परिश्रम,बचत यावर उभारलेली होती. सुलतानी भंपकपणा,दिखाऊपणा,खर्चपनाचा त्यात लवलेशही नव्हता.
























by - Internet



शिवरायांचा गनिमी कावा...





गनिमी कावा


शिवरायांचे सारे शत्रू बलाढ्य होते. शत्रूजवळ अफाट फौजा होत्या,भरपूर दारुगोळा होता,शेकडो तोफा होत्या, 
पण शिवरायांचे सैन्य मात्र थोडे होते. हे थोडे सैन्य शत्रूच्या बलाढ्य सैन्याबरोबर कसे लढणार. उघड्या मैदानावर शत्रूशी कसा सामना देणार तेव्हा शिवरायांनी विचार केला,की महाराष्ट्र हा डोंगराळ मुलुख. इथे डोंगर,घाट व खिंडी पुष्कळ आहेत. त्यांचा आपण भरपूर उपयोग करून घेतला पाहिजे. हे सारे लक्षात घेऊन शत्रूशी सामना कसा द्यावा हे शिवरायांनी ठरवले . शत्रूच्या घोडेस्वारांजवळ भरपूर सामान असे. 




ते आवरून लढाईला निघायला त्यांना वेळ लागे. उलट मराठे घोडेस्वारांजवळ जड सामान काहीच नसे. पाठीला ढाल, कमरेला तलवार, हातात भाला एवढेच त्यांचे सामान. पाहता पाहता ते डोंगर चढत व उतरत. शिवरायांचे मावळे चपळ व काटक होते . या साऱ्या गोष्टीचा विचार करून शिवरायांनी शत्रूबरोबर उघड्या मैदानावर लढाई करण्याचे शक्यतो टाळले,यात त्यांची केवढी मुत्सद्देगिरी दिसून येते. शत्रूच्या गोटात गुपचुप आपली माणसे पाठवून शिवराय शत्रुपक्षाची खडानखडा माहिती मिळवत. मग शत्रूवर अचानक हल्ला करत. बेसावध शत्रूची दाणादाण उडवत. शत्रू लढायला तयार होण्यापूर्वीच ते वाऱ्याच्या वेगाने दिसेनासे होत. डोंगराळ भागात अशा लपून छपून लढाया करायला शिवरायांनी सुरुवात केली. यालाच 'गनिमी कावा 'म्हणतात. शिवरायांनी गनिमी काव्यानेच बादशाहाच्या प्रचंड फौजांचा धुव्वा उडवला. शिवरायांची डोंगरी किल्ल्यांवर अधिक भिस्त होती. किल्ला ताब्यात आला म्हणजे आसपासच्या प्रदेशावर सत्ता निर्माण करणे सोपे जात असे. किल्ल्यावर अन्नधान्यं व दारुगोळा यांचा भरपूर साठा ठेवला म्हणजे झाले . मग शिवरायांची किल्ल्यावरील लहान फौज शत्रूच्या प्रचंड फौजेला दोन दोन वर्षे दाद देत नसे. शत्रू ताकदवान असला,तरी किल्ल्याचा आश्रय घेता येत असे. 


शिवरायांनी स्वराज्याची राजधानी उघड्या मैदानावर एखाद्या शहरात ठेवली नाही. ती त्यांनी प्रथम राजगडावर ठेवली. किल्ल्यांच्या रक्षणासाठी शिवरायांनी गडावर भिन्न भिन्न जातीजमातीची माणसे नेमली. त्यामुळे कामे सुरळीत पार पडत. शत्रूला किल्ल्यावर फितुरी माजवता येत नसे. यात शिवरायांची केवढी दूरदृष्टी होती. स्वराज्याचा कारभार चालवण्यासाठो पैसा उभारणे अश्यक होते. शत्रूच्या मुलखावर स्वाऱ्या करून शिवराय हा पैसा उभारत. शत्रूच्या मुलखातून वसुलीचा चौथा हिस्सा शिवराय घेत,त्यास चौथाई म्हणत. चौथाई देणाऱ्यांना शिवरायांच्या फौजा त्रास देत नसत . चौथाईचा हक्क हा शिवरायांच्या मुत्सद्देगिरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे.आरमारदल उभारले : सिद्दी ,पोर्तुगीज, इंग्रज यांच्यापासून स्वराज्याला धोका निर्माण होण्याचा संभव आहे,हे शिवरायांनी ओळखले होते, म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग,विजयदुर्ग यासारखे भक्कम सागरी किल्ले बांधले. ते पाहिले,कि आजही आपले मन थक्क होते. स्वराज्यावर केवढी संकटे आली, पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले,म्हणूनच स्वराज्य निर्माण झाले.
























by - internet

शिवराज्याभिषेक सोहळा...


शिवराज्याभिषेक सोहळा

राज्याभिषेक सोहळा



शिवाजी महाराजांनी या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यानी मान्यता दयावी ,म्हणून राज्यभिषेकाची योजना आखली. ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. शेकडो वर्षांनंतर सर्व धर्माना समतेच्या वागवणारा,प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे,म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किव्वा वैभवासाठी केले नाही,त्यांनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी केले. रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली.
स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली,पण न डगमगता शिवराय मोठ्या शौर्याने व चातुर्याने पार पडले. तानाजी बाजीप्रभू मुरारबाजी यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले.


स्वराज्य उभे राहिले व शत्रूवर वाचक बसला. शिवरायांनी प्रतापगडाच्या भवानीमातेचे दर्शन घेतले तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिहासन तयार करुवून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. विद्वान ब्राह्मण सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. ते थोर पंडित होते. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी याथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणले. रायगडावर पन्नास हजार माणसे जमली. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो वाद्ये वाजू लागली. गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रचामरे धरण्यात आली. दही, तूप, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. 


गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा,यमुना,गोदावरी,सिंधू,कृष्णा,नर्मदा,कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभटांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली. व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या शंभर छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. नंतर शिवराय जिजामातेच्या पाया पडले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या तीस वर्षाचे चीज झाले. मासाहेबांचा भेटीनंतर शिवराय सिहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्यामोत्याच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले. व ते मोठ्याने म्हणाले,क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधीशवर श्रीशिवछत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी जयजयकार केला गडावर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्राभर शिवरायांचा जयजयकार झाला. अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक झाला.

























by - Internet


रामशेज किल्ल्याचा इतिहास 

रामशेज किल्ला हा समुद्रसपाटीपासून ३२७० मीटर उंचीवर आहे. परंतु पायथ्यापासून किल्ल्याची उंची जास्तनाही. गावातून गडावर पोहोचण्यासाठी पंचेचाळीस ते साठ मिनिटे लागतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्यामुख्य कड्याचे दर्शन होते. किल्ल्यावर जाणारी वाट किल्ला डावीकडे ठेवत जाते. या वाटेने पुढे गेल्यावरपायऱ्या लागतात. गडावर शिरताना गुहा दिसते. त्या गुहेत रामाचे मंदिर आहे. गुहेच्या एका बाजूला शीलालेखकोरलेला आहे. गुहेच्या खालच्या बाजूला गार पाण्याचे एक टाके आहे. गुहेसमोरच्या तुटलेल्या पायऱ्या थेटगडावर जातात. त्यावरून पुढे गेल्यानंतर आपण गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात पोहोचतो. हा भागबराचसा अरुंद आहे. गडमाथ्यावर बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोरदेहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसऱ्या टोकाकडे जाते. वडावीककडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात,मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यासकाही पायऱ्या दिसतात. एका कड्यांवर या पायऱ्यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्यदरवाजा दिसतो. 




दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला धवजस्तंभ दिसतो. याठिकाणाहून सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर असलेला चामर लोणीचा डोंगर दृष्टीस दिसतो. त्याही पलीकडेदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल,तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्राम्हागिरीचेपर्वत न्याहाळता येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठ्यांचा सहज पाडाव करता येईल याअपेक्षेने ओरंगजेबाने शहाबुद्दीन खान फिरोजजंग या सरदाराला महाराष्ट्राच्या स्वारीवर पाठवले. त्यानेरामशेज किल्ल्यावर चांदसितारा फडकवावा आणि त्यानंतर त्रंबक,अहिवंत,मार्कडा साल्हेर असे किल्ले जिंकूनघ्यावेत असा ओरांगजेबाचा मनसुबा होता. औरंगजेबाच्या या कारवाईची कुणकुण लागताच छत्रपती संभाजीराजांनी रामशेज किल्ल्याच्या सौरक्षणासाठी साल्हेर किल्ल्याचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रात रामशेजच्या किल्लेदाराचे नाव स्पष्ट सापडत नाही. ओरांगजेबाच्या आज्ञेनुसारशहाबुद्दीन रामशेज किल्ल्यावर चालून आला. आणि त्याच्यासोबत दहा हजाराची फौज होती. आणि अफाटदारुगोळा शस्त्रास्त्रे व तोफा होत्या . आणि त्या वेळी रामशेज किल्ल्यावर फक्त सहाशे मावळे होते. 


ते मूळचे मावळातील धाडसी हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते. शहाबुद्दीन खानाने चार-पाच तासात किल्ला ताब्यातघेऊ या विचाराने किल्ल्यावर नाना तर्हेने हल्ला केला. किल्ल्याभोवतीचा वेढा कडक होता. सुरुंग लावले,मोर्चेबांधले,तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. पण किल्ला त्याच्या ताब्यात येईना. रामशेज किल्ल्यावर तोफा नव्हत्या. पण संभाजी राजांनी प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळाउपलब्ध करून ठेवला होता. मग किल्लेदाराने आणि मावळ्यांनी तोफा बनवल्या. मराठ्यांनी किल्ल्यावरूनतोफांचा मारा सुरु केला. त्यामुळे शहाबुद्दीन खान गांगरून गेला. पाच महिने झाले त्याला ,किल्ला काहीजिंकता येईना. मोगलांचे तोफगोळे किल्ल्यांवर पोहोचत नव्हते. तेव्हा मोगलांनी जंगलातील झाडे तोडूनकिल्याच्या उंचीचा बुरुज बनवला. आणि त्यावर तोफा नेऊन किल्ल्यावर डागण्याचा बेत आखला. त्यावरून तेकिल्ल्यावर मारा करू लागले. मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही. घनघोर युद्ध चालू होते. दोन वर्षेझाली,मात्र रामशेज किल्ला अजिंक्य राहिला. त्यानंतर औरंगजेबाने शहाबुद्दीनला माघारी बोलावून ती मोहीमफत्तेखानकडे सोपवली. फत्तेखानने रामशेज किल्ल्यावर आक्रमण चढवले. तरीही मराठ्यांनी माघार घेतलीनाही. 


मोगल किल्ल्याजवळ आले. कि किल्ल्यावरून मराठ्यांच्या गोफणीतून दगड सुटायचे. दगड इतके जोरातसुटायचे,कि काही मोगल जागेवरच ठार व्हायचे. फत्तेखानचा मावळे तसूभरही पुढे सरकू देत नव्हते. आणिइतका खटाटोप करूनही किल्ला हाती येईना. फत्तेखानचा एखादा तोफगोळा किल्ल्यावर पोचायचा आणित्यामुळे किल्ल्याची तटबंदी किव्वा बुरुज ढासळायचा. ते पाहून तो खुश व्हायचा. पण सकाळ झाली कि तोबुरुज परत बांधून झालेला असायचा. ते पाहून फत्तेखान आश्चर्यचकित व्हायचा. अनेक महिने सरले,हजारोमोगल मारले गेले,दारुगोळा वाया गेला. फत्तेखानने किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर तोफांचा मारा चालू केला.त्याने मुख्य दरवाजाशी मावळे गुंतून ठेवले. मग फत्तेखानने निवडक सैन्य घेऊन किल्ल्याच्या मागून लढाईसुरु केली. वाट अवघड होती तरी त्याचे सैनिक वर चढत होते. आपले मावळे हि अशा परिस्तिथीत गाफीलराहिले नव्हते. किल्लेदाराने दोनशे मावळे आपल्या सोबत घेऊन चहुबाजूनी पहारा चालू केला. त्यांनाफत्तेखानचा अंधारात चाललेला डाव समजला,मावळे बुरुजावर दबा धरून बसले. जसे मोगल सैनिक वरपोहोचले तसे मावळ्यांनी गोफणी फिरवल्या. किल्ल्यावरच्या मोठमोठ्या शीळा ढकलून दिल्या. अचानकझालेल्या हल्ल्यामुळे मोगल जीव मुठीत धरून उड्या मारू लागले. 


शत्रू पळून जाताना बघून मावळे आनंदित झाले. हे पाहून औरंगजेबाने फत्तेखानला परत बोलावले आणिकासमखानला स्वारीवर पाठवले. कासमखानने कडेकोट पहारा ठेवला. त्याने किल्ल्त्यावर दारुगोळा आणिअन्नधान्य पोहोचण्यासाठी वाट ठेवली नाही. किल्ल्यापासून काही कोसावर रुपजी भोसले,मानाजी मोरे रसदघेऊन तयार होते. पण त्यांना रसद पोहोचवता येत नव्हती. गडावरील मावळ्यांवर वाईट दिवसआले,अन्नावाचून हाल होऊ लागले. पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला आला,जोराचा पाऊस पडला,तो सलगदोन दिवस पडत होता. किल्ल्याच्या बाजूला मेलेल्या जनावरांची दुर्गंधी सुटली. मोगल सैनिकांना पहारा देणेअशक्य झाले. मग कासमखानने पहारा सैल केला. तो दिवस सरला रात्र झाली. रात्रही सरली पहारे पूर्ववतझाले. कासमखानच्या लक्षात आले,कि मावळे ताजेतवाने दिसत आहेत. कासमखानला त्याची चूक लक्षातआली, त्या दोन दिवसाच्या सैल पहाऱ्यात मावळे गडावर पोहोचले होते. रुपाजी आणि मानाजी यांनीअन्नधान्य,आणि दारुगोळा गडावर पोहोचवला होता. कासमखानला कळून चुकले,कि रामशेज किल्ला काबीजकरणे हे स्वप्नच राहणार आहे. कासमखानाही किल्ला जिंकू शकला नाही. केला साडेपाच वर्षे झुंजत होता


















by - Internet

स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त...


शत्रूंचा बंदोबस्त


स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त


शिवरायांच्या अवती भोवती बारा मावळातील मावळे गोळा झाले. महाराज सांगलीतील महत्वाची कामगिरीबजावत होते. स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे,असे ते मावळे मानत होते. आपली माणसे साधी भोळी मराठमोळी माणसे ती होती. त्यांना शिवाजी महाराज म्हणजे त्यांचा जीव कि प्राण वाटत असे,पण काहि लोकांना शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटे. अशा लोकांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भागपडले. खंडोजी आणि बाजी घोरपडे हे सरदार आदिलशहाच्या चाकरीत होते. आदिलशहाने त्यांना शिवरायांच्याविरुद्ध चिथवले. कोंढाणा भागात त्यांनी धुमाकूळ माजवला;पण महाराजांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही. महाराजांनी त्यांना पिटाळून लावले. तसेच फलटणचे बाजाजी नाईक निंबाळकर,हे शिवरायांचे मेहुणे. शिवरायांना त्यांच्या विरोधात जाऊन लढाया कराव्या लागल्या;तथापि या घराण्यातील व्यक्ती शिवरायांच्याबरोबर राहिल्या. शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते. हा त्यांचा सुपे परागण्या होता. आणि त्यानेहीमहाराजांविरुद्ध कारवाया सुरु केल्या. 




शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले. आणि त्याला कर्नाटक प्रांतात पाठवले. कर्तव्यापुढे महाराजनातेगोते मानत नव्हते. शिवरायांच्या कार्याची थोरवी साऱ्या मावळ्यांना पटली. आणि त्यांचे नाव सगळीकडेदुमदुमले. शिवराय लोकांचे राजे झाले, पण ते काही लोकांच्या डोळ्यात खुपले. जावळीचे मोरे असेच होते. मोरेहे जावळीचे जहागीरदार होते. त्यांची जहागीर रायगडापासून कोयना खोऱ्यापर्यंत होती. ते विजापूरच्याआदिलशहाचे जहागीरदार होते. आदिलशहाने त्यांना 'चंद्रराव' हा किताब दिला होता. जावळीचे जंगल खूपघनदाट होते. भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शरकाव नव्हता. त्या घनदाट जंगलामध्ये वाघ,लांडगे,अस्वल,इ. प्राण्यांचा संचार होता. मोऱ्यांची जावळी जणू वाघाची जावळीच होती. त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कुणीही जातनसे,पण ती हिम्मत केली शिवरायांनी. त्याला कारण असे होते कि दौलतराव मोरे १६४५ साली मरण पावला. आणि नंतर त्याच्या वारसांमध्ये भांडण तंटे सुरु झाले. शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली. महाराजांच्या हदतीनेच यशवंतराव मोरे जावळीच्या गादीवर चंद्रराव म्हणून बसला. 


आणि त्या वेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडणी देण्याचे कबुल केले. त्यांच्या सर्व कार्यात त्यांना मदतकरण्याचे हि कबुल केले,पण गादीवर बसल्यानंतर तो सर्व काही विसरला. कुठला शिवाजी आणि कुठला करार. आणि तो बेपर्वाईने वागू लागला. स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या करणे,प्रजेला त्रास देणे,अशी दांडगाईयशवंतराव करू लागला. शिवरायांनी ओळखले कि वेळीच याला थांबवले नाही तर स्वराज्याला धोका आहे. म्हणून महाराजांनी यशवंतराव मोरे याला एक खरमरीत पत्र पाठवले. 'तुम्ही स्वतःला राजे म्हणविता. राजेआम्ही. आम्हांस श्रीशंभूने राज्य दिधले आहे,तर तुम्ही राजे न म्हणावे. यशवंराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तरलिहिले, 'तुम्ही काल राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणी दिधले. येता जावळी,जाता गोवली... आम्हांस श्रींचेकृपेने आदिलशहाने राजे हा किताब,छत्रचामर,सिंहासन मेहेरबान होऊन दिधले. येथे उपाय कराल तर अपायहोईल. शिवरायांनी त्यांना उलट उत्तर दिले,'जावळी खाली करून,राजे न म्हणोन, छत्रचामर दूर करून,हातरुमाले बांधून,भेटीस येऊन,हुजुराची चाकरी करणे. ईतकीयावर बंडखोरी केलिया, मारले जाल. 


जावळी भोवती घनदाट जंगल होते. आणि मोरे मंडळीही पुष्कळ होती. रायरीचा किल्ला अजिंक्य होता. जावळी जिंकणे एवढे सोपे नव्हते. म्हणून भरपूर तयारी करून शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली. एक महिनाभर यशवंतरावाने झुंज दिली,पण त्याचे खूप सैन्य मारले गेले. आणि शेवटी यशवंतराव आपल्यामुलांना घेऊन रायरीवर पळाला. महाराजांनी जावळी घेतली. आणि नंतर राजे रायरीवर चालून गेले. महाराजांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला. यशवंराव तीन महिने लढला,पण शेवटी त्याला माघारघ्यावी लागली. जाणवळीचा विजय फार महत्वाचा होता. आणि त्या विजयामुळे शिवाजी महाराजांचे स्वराज्यपूर्वीपेक्षा दुप्पट झाले. आणि शेवटी यशवंरावांचे सैन्यही शिवाजी महाराजांना येऊन मिळाले. रायरीचा प्रचंडकिल्ला स्वराज्यात आला. हा किल्ला पाहून महाराजांना धंन्य वाटले. त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले. त्यानंतर त्यांनी जवळच असलेल्या भोरप्या डोंगरावर एक नवीन किल्ला बांधला त्याचे प्रतापगड हे नावठेवले. 















by - Internet

शूरवीर बाजी पासलकर...


शूरवीर बाजी पासलकर


शिवबांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेकांची मदत मिळाली. त्यात तरुण सळसळत्या रक्ताची जशी झुंजार तरुण मंडळी होती त्याप्रमाणेच वय,अनुभव आणि तरुणांनाही लाजवतील अशी पराक्रमी वयस्कर जी माणसे होती त्यातील एक भव्य दिव्य व्यक्तिमत्व म्हणजे बाजी पासलकर. इतिहासात बाजी पासलकर ह्यांना स्वराज्याचे पहिले सरसेनापती होण्याचे भाग्य लाभले. बाजी पासलकर हे मोझे खोऱ्यातील वतनदारत्यांचे घराणे हे देशमुखी. मावळ प्रांतात त्याचा मोठा दरारा होता.शिवरायांना हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांना अनेकांची मदत मिळाली. त्यात तरुण सळसळत्या रक्ताची जशी तरुण मंडळी होती त्याप्रमाणेच वय,अनुभव आणि तरुणांनाही लाजवतील अशी पराक्रमी वयस्कर जी माणसे होती त्यातील एक भव्य डाव्य व्यक्तिमत्व म्हणजे बाजी पासलकर बलदंड शरीर,अक्कडबाज मिशा. फौलादी रुंद छाती,तरुणांना लाजवेल आसा पराक्रम करून दाखवण्याची बळकट मनगटाची ताकद. त्यामुळे या साठीच्या माणसाला स्वराज्याच्या कामी वळून घ्यावे,त्यांच्याबरोबर मावळ प्रांतातली आणखीही अनेक मंडळी या स्वराज्यकार्यात मदत करतील असा शिवरायांना जो जेष्ठांकडून सल्ला मिळाला,त्यानुसार राजांनी एक पत्र लिहून ते बाजी पासलकर ह्यांना पाठवले.
पत्र वाचून बाजींच्या मनातील शिवबांबद्दल आदर दुणावला. वयाच्या अवघ्यां सोळा सतरावा वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न शिवबा पाहत होते. या देव,देश आणि धर्म कार्याला मदत करावीशिवबाच्या विनम्र आमंत्रणाचा स्वीकार करावा,आपण जर त्यांच्या मागे उभे राहिलो तर इतर मंडळी हि या कामी पुढे येतील,असा विचार करूनत्या पत्राचा शिवबाचा मान राखत स्वतः बाजी पासलकरांनी येऊन पुणे मुक्कामी त्यांची भेट घेतली.




इतकच नव्हे तर पंतांच्या इच्छेचा,शिवबाच्या विनंतीचा,मासाहेबांचा आज्ञेचा मान राखत बाजी पासलकर ह्यांनी या स्वराज्यस्थापनेच्या कामी शिवरायांना मदत करण्याचा शब्द दिला. बाजी नुसता शब्द देऊनच थांबले नाहीत तर त्यांनी अनेक मोठे सरदार,देशमुख जे गेली अनेक वर्षे दुसऱ्यांची चाकरी करत होते, त्यांना या पवित्र कार्यासाठी प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांना पत्रे पाठवली. प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि एक मोठी फौज शिवबांच्या पाठी उभी केली. स्वराज्य रक्षण आणि धर्म स्थापनेच्या कामी मदत करायला जी मंडळी शिवरायांच्या मागे उभी राहिली. त्यात कानद खोऱ्यातले झुंजार मरळ,शिवगंगाचे कोंडे,मावळातले हैबती शिळमकर,रोहड्याचे जेधे,अशी विविध खोऱ्यातली मंडळी जमा झाली ती बाजी पासलकरांचा मुळेच. तसेच पायगुडे,तानाजी मालुसरे,येसाजी कंक,बाजी जेधे,चिमणाजी देशपांडे अशी नव्या रक्ताची,नव्या दमाची तरुण मंडळी या कार्यासाठी पुढे आली. त्यालाही हस्ते परहस्ते जबाबदार ठरले ते वयोवृद्ध पासलकरच. स्वराज्याची शपथ घेतल्यावर शिवरायांना जो पहिला किल्ला जो रक्ताचा एक थेंबही ना सांडता मिळाला तो बाजी पासलंकारांमुळेच. बाजी पासलकरांना नंग्या समशेरीनिशी गडाच्या दारी उभे राहिलेले पाहून किल्लेदाराने आपल्या हातातले शास्त्र खाली ठेवले. आणि गडाचा ताबा दिला. गड ताब्यात आला आणि स्वराज्याच पहिल तोरण बांधलं गेलं. आणि शिवराजांची सत्ता हळूहळू वाढू लागली. अनेक देशमुख,सरदार,वतनदार हे आदिलशहाच्या विरोधात जाऊन शिवरायांना सामील होऊ लागले.


या बंडाचा वेळीच बिमोड केला नाही तर हा शिवाजी डोईजड होईल अशा आशयाच्या वार्ता बाद्शहा पर्यंत पोहोचवल्या. प्रथम बादशहाने या गोष्टीची दखल घेतली नाही. पण जेव्हा शिवाजींच्या विरुद्ध असणाऱ्या,बाजी पासलकरांना पाण्यात पाहणाऱ्या काही विघ्नसंतोषी लोकांनी बादशहाचे कांन भरले. बादशहाने शिवाजींचा बिमोड करण्यासाठी प्रचंड मोठ्या फौजेसह या कामी फत्तेखान याला दक्षिणेत रवाणा केले. पुरंदर किल्ल्यावर त्यावेळी राजांची स्वारी होती. राजे बाजी पासलकर,कावजी मल्हार खासनीस,बाजी जेधे,जगताप ह्यांच्या सोबत काही सल्ला मसलत करत असताना एका गुप्तहेराने फत्तेखान एका मोठ्या फौजेसह पुरंदर किल्ल्याच्या दिशेने येत आहे अशी वार्ता दिली. ती वार्ता ऐकली आणि बाजी पासलकर ह्याही समशेरीवर हाताची मूठ घट्ट झाली.नाहीतरी स्वातंत्र्याच्या या पहिल्या रणसंग्रामासाठी कुणीतरी अनुभवी व्यक्तीची गरज होती. महाराजांनी पंत आणि मासाहेब यांचेकडून पासलकरांनी आजवर गाजवलेला पराक्रम ऐकला होता. बाजींच्या अनुभवी नेतृत्वगुणाचा पुरेपूर उपयोग करून घेण्यासाठी शिवबांनी त्या पाहिल्या लढाईच सेनापतिपद हे बाजी पासलकर ह्यांनाच बहाल करून त्यांच्या अंगावर सेनापतीपदाची मोठी जबाबदारी देऊन त्यांचा गौरव केला. तिकडे फत्तेखानचा अंगरक्षक मुसेखान याने आपण पुरंदर गडावरच हल्ला करावा,असा सल्ला दिला. त्या सल्ल्यानुसार फत्तेखान आपली फौजघेऊन पुरंदरच्या पायथ्याशी आला. अनुभवी बाजी पासलकर यांनी गडाची सुरक्षा पक्की केली. 


कारण त्यांना खात्री होती कि फत्तेखान इकडेच धडक मोर्चा मारणार. बाजींनी गडाच्याबुरुजावर दगड गोटे गोळा केले. अंतरा अंतरावर तरबेज तिरंदाज सज्ज ठेवले. संपूर्ण गडाभोवती समशेरबहाद्दरांचा पहारा उभा केला आणि कधी एकदा फत्तेखानाची सेना आपल्या नजरेच्या टप्प्यात येतेय याची वाट बाजी पाहू लागले. हिरवी निशाणे दिसली,घोषणांचे आवाज ऐकू येऊ लागले. फत्तेहखानाचे सैन्य गडाच्या रोखाने वर येऊ लागले. त्याचवेळी ठरल्याप्रमाणे त्यांच्यावर बाणांचा आणि दगडगोट्यांचा मारा चालू केला. असं होत असतानाही मुसेखान आणि त्याचे कडवे सैन्य वर वर येऊ लागले. तसे बाजी पासलकर सज्ज झाले. त्यांनी आपल्यासैन्याच्या चार तुकड्या करून स्वतः राजे,बाजी जेधे,कावजी मल्हार आणि एका तुकडीचे नेतृत्व आपल्याकडे घेऊन सारेजण एकाच वेळी शत्रूवर तुटून पडले. युद्धाच्या ला रणधुमाळीत अनेकजण कामी आले. कुणी प्राणाला मुकले तर कुणी जबर जखमी झाले. मुसेखान आणि बाजी जेधे समोरासमोर आले. खान बाजीवर वार करणार तोच गडावरून एक बाण मुसेखानाच्या गर्दणीत घुसला. त्याच क्षणी मुसेखान पडला.मुसेखान पडताच त्याची सेनापळू लागली. एकीकडे पासलकरांनी कावजी मल्हारला सुभानमंगल किल्ला जिंकण्यासाठी शिरवलकडे पाठवले. मुसेखानाच्या,फत्तेखानाच्या सैन्याला बाजी पासलकरांनी मागे मागे रेटत नेले.आणि तेथेच घाट झाला. फत्तेखानला नव्या दमाची कुमक येऊन मिळाली. सर्वांनी एकट्या बाजी पासलकरांना घेरले. तरीही बाजींच्या हातातली समशेर सटासट शत्रूची गर्दन आसमानातं उडवत होती. तोच नव्या दमाच्या फौजेने बाजींवर प्राणघातक हल्ला केला. आणि त्यात बाजी पासलकर धारातीर्थी पडले. साठी उलटलेल अनुभवानं पिकलेलं,स्वामीनिष्ठेनं प्राणांची बाजी लावणारं पहिल्या लाढीतलं सेनापतिपद परत एकदा मोकळ झालं. 













by - Internet

लाल महालातील शिवतांडव...


लाल महालातील शिवतांडव




मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीचा औरंगजेब हा मुघल बादशाहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या होत्या. त्यामुळे बादशाहा चिडला. त्याने त्याने आपला मामा शायिस्ताखान याला पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढे येत होता. पण एकदा डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला घाटले. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाईस्ताखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. मग शाइस्तेखान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकांचा किल्ला घेतला.चाकणच्या किल्ल्यात फिंरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुनकीने शाईस्ताखानाशी मुकाबला केला. दोन महिने फिरंगोजींने किल्ला लढवला. पण शाईस्ताखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. 


शाईस्ताखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला.त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. एक वर्ष गेले दुसरे वर्ष गेले पण खान काही लाल महालातून हालेना. त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलुख उध्वस्त केला. शायिस्तेखानाची खोड मोडायचीच,असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने चांगले होते. कारण त्या वाड्यातील खोल्या,दालने,खिडक्या,दारे,वाटा,चोरवाटा यांची शिवरायांना सगळी माहिती होती. खुद्द शायिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. शेकडो स्त्री-पुरुष नटून थटून चालले होते. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली.


शिवराय आणि मावळे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. या वेळी शायिस्ताखान गाढ झोपलेला होता. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. शिवरायांच्या मावळ्यांनी खानाच्या पहारेकऱ्यांना बांधून टाकले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धाऊन आला. शिवरायांनी त्याला ठार केले. तो शायिस्ताखानाचा मुलगा होता. गडबड झाली लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. समशेर उपसली. शायिस्ताखान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागे धावले. शायिस्ताखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार,तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची तीन बोटे कापली गेली. प्राणांवर आले पण बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शायिस्ताखान ने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली,उद्या आपले शीर शिवली कापून नेईल. अशी भीती त्याला वाटू लागली. 























by - Internet


प्रतापगडचा रणसंग्राम -- अफजल खानाचा वध ..



प्रतापगडचा रणसंग्राम

अफजल खानाचा वध


विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एकेक गाजलेले समशेरबहाद्दर दरबारात हजर होतेआदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता 'शिवाजीचा बिमोड कसा करायचा ? बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला.''सांगा,कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला ?''दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार ? जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजलखान. खानाने विडा उचलला तबकाडीतील विडा उचलत अफजल खान म्हणाला,''शिवाजी ? कुठला शिवाजी ? त्याला मी जिवंत कैद करून येथे पकडून घेऊन येतो आणि तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापूरला आणतो. अफजलखान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार. तुफान ताकदीचा पोलादी पहार हातांनी वाकवणारा. भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा दरबार खुश झाला. 










दरबारात हजार असलेल्या प्रत्येकाला वाटले 'आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो थोड्याच दिवसात विजापूर दरबारात सखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार,नाहीतर त्याचे मुंडके दरबारात सादर होणार.अफजलखान मोठ्या ऐटीने,थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले. यापूर्वी अफजलखान बारा वर्षे वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. शिवराय त्या वेळी राजगडावर होते. त्यांना अफजलखान चालून येत आहे हि बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले,हे त्यांनी ओळखले,पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला खान कपटी, त्याची फौज मोठी. आपले राज्य लहान,आपले सैन्य लहान.उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही. त्याच्याशी युक्तीनेच सामना केला पाहिजे, असे शिवरायांनी ठरवले. ते जिजामातेशी सल्लामसलत करून,तसेच त्यांचा आशिर्वाद घेऊन गडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले.शिवराय प्रतापगडावर गेले,हि बातमी खानाला कळताच तो चिडला. त्याला माहित होते, प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही,कारण तो किल्ला डोंगरात. भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंच उंच डोंगर होते. फौजेला जायला चंगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट होता. 




शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे,म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर,पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला. ररयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील,असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही,तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला,'तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत परत द्या. तुम्हाला मी आदिशाहाकडून सरदारकी देववितो. खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे,हे शिवरायांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला.शिवरायांनी खानाला निरोप पाठवला,'खानसाहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे. मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांचा निरोप ऐकून अफजलखान हसला. वा बहोत खुशी. आपली दाढी कुरुवाळात तो म्हणाला. त्याला वाटले,या अफजलखानापुढे शिवाजीची काय बिशाद हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे बस्स खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला.भेट ठरली प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली. दिवस ठरला, वेळ ठरली. भेटीच्यावेळी दोघांनी आपल्याबरोबर एक एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे, 




असे ठरले. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करवून घेतली. भेटीसाठी छानसा शामियाना उभारला . शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी कोठे लपून राहायचे,काय करायचे,याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये,असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले,पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले.भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानीदेवीचे देर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायांत सुरवर चढवली. अंगात चिलखत घातले. त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला. डोक्यास जिरेटोप घातला. त्यावर मंदिल बांधला. डाव्या हाताच्या बोटांत वाघनखे चढवली. त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला. सोबत पटटा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले ''गड्यानो,आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे,पण समजा आमचे काही बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा, आम्ही निघालो '' शिवराय निघाले. 




बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला,संभाजी कावजी,येसाजी कंक,कृष्णाजी गायकवाड,सिद्दी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते.खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता. मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता.शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले,''शिवाजीराजे आत का येत नाहीत ''वकील म्हणाला,''ते बडा सय्यदला भितात. त्याला तेवढा दूर करा ''बडा सय्यद दूर झाला. शिवराय आत गेले.खान उठून म्हणाला,''या राजे,भेटा आम्हाला.महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्रकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला.
























by - Internet

माझ्याबद्दल