विचार, सुविचार आणि अंतिम सत्य
सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही. त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.
जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. असे म्हणणे अति धाडसाचं म्हणावं लागेल. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं. आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण संकट हीच संधी समजून प्रयत्न केले तर यशाचा आनंद घेता येणे सहज शक्य आहे.
पण... दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते. कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूसच असतो. म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे आयुष्याचे सार समजून घ्यायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायलाही हवं !
कितीही कठीण प्रसंग असू द्या. पण खरा मार्ग हा सुविचारतून आलेल्या दृष्टीतूनच येतो. विचार आणि सुविचार यातील अंतर एकदा कमी झाले की सुखाचा सागर आपोआपच खुला होतो....
कारण कोणतीही अडचण, समस्या हि सोडविण्यासाठी फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते त्या म्हणजे
'माणूस आणि पैसा'बसं
यापलीकडे दुसरे काहीच असूच शकत नाही...
कारण कोणतीही अडचण, समस्या हि सोडविण्यासाठी फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते त्या म्हणजे
'माणूस आणि पैसा'बसं
यापलीकडे दुसरे काहीच असूच शकत नाही...
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा