शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

उद्योगाची दुनिया : रेडिमेड कपड्यांची दुनिया


फॅशन, कपडे, गरज म्हणून फॅशन म्हणून; पण रोज वेगळे कपडे, स्वत:चा वार्डरोब, तिन्हीत्रिकाळचे वेगळे कपडे यामुळे कपड्यांचा उद्योग संपूर्ण जगाला भुरळ घालतो. सध्या चालू असलेल्या फॅशन वीक देशात आणि परदेशात आपल्या रेडिमेड कपड्यांना किती वाव आहे हे दर्शवतो. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांमधील एक गरज असल्याने हा व्यवसाय कधीही न संपणारा आहे.

तुमच्यातली कल्पकता नाविन्याची आवड आणि दूरदर्शीपणा याचा उपयोग या व्यवसायात होतो. या मार्केटमध्ये शिरताना तुम्हाला मार्केटचा अंदाज घेणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कार्यकुशल कामगार कसे मिळतील? किती लोकांची तुम्हाला आवश्यकता पडेल? तुम्ही कच्चा माल कुठून खरेदी करू शकाल? तुम्हाला किती मशिन लागू शकतात. यातून तुम्ही किती उत्पादन करू शकता आणि यातून होणारा फायदा यांचा सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. होलसेल आणि रिटेलमधल्या चेनचा अभ्यास करा. कारण या इंडस्ट्रीमध्ये क्वॉलिटी आणि नाविन्य यांचा मिलाप खूप आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही स्वत:ची फॅक्टरी, सब कॉन्ट्रक्टिंग बिझनेस म्हणजे फॅक्टरी सुरू करून दुसर्‍याचे जॉब वर्क पूर्ण करून देणे. तुम्ही स्वत: होलसेलचा बिझनेस किंवा रिटेल आऊटलेट किंवा शॉप सुरू करू शकता. तुम्ही फक्त प्रिटींग आणि एम्ब्रॉयडरी करून देण्याचे, पण स्वत:चे युनिट सुरू करू शकता. यामधलाच एक प्रकार वॉशिंग प्लान्ट तुम्ही सुरू करू शकता. फॅब्रिक वॉश हा जो प्रकार आहे हा तुम्ही करू शकता. छोट्या कपड्यांच्या निर्यातदारांना याची खूप आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला सरकारी परवान्याची गरज भासते. यासाठी प्रशिक्षण तुम्हाला फॅशन डिझायनींगच्या कॉलेजमध्ये मिळू शकते. प्रायव्हेट कॉलेज देशात आणि परदेशात असलेल्या अभ्यासकेंद्रात तुम्हाला याचं प्रशिक्षण मिळू शकते. आयएनआयएफडीसारखी संस्था संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अग्रगणी आहे. टेक्टाईल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही डिप्लोमा आणि डिग्री कोर्स तुम्ही करू शकता. एमआयटीआयडीसारखी संस्था मोठ्या प्रकारचे प्रशिक्षण देते. टीयूएफएसही टेक्सस्टाईल इंडस्ट्रीसाठीची योजना सीइबीकडून चालवली जाते. आयडीबीआय एसआयडीबीआय आणि आयएफसीआय याअंतर्गत बर्‍याच योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. www.technicaltextile.gov.in या वेबसाईटवर हवी ती माहिती या इंडस्ट्रीमधील मिळू शकते. makeinindia.com यामध्ये तुम्हाला उत्पादन तुम्ही कसे कराल आणि वाढवाल याविषयीची माहिती उपलब्ध आहे.



नेहा खरे
neha18.mirror@gmail.co
by - SAAMANA

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल