शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

यश म्हणजे नक्की काय असतं?

काल मला एक ईमेल आला तो पाठवणाऱ्याचे नाव व पत्ता काढुन खाली देत आहे.   त्यात त्यांनी जे प्रश्न मला विचारले   आहेत  तसे प्रश्न मला आधी बऱ्याच लोकांनी विचारलेले होते, म्हणु त्यांना उत्तर त्यांच्याच ईमेल मधे द्यायचा प्रयत्न केला आहे.  बघा पटतं का?

"श्री. नितीन पोतदार यांस,

तुमची http://www.myniti.com/ आणि माझं Tweet नेमाने वाचते, लोकसत्ता अर्थवृतान्तची नियमीत वाचक आहे मी. 

पण सगळी पुस्तके आणि न्युजपेपर्स फक्त successful businessmen वर लिहितात.  माझ्या डोळ्यासमोर एकट्या ******** मधे उध्योजक होण्यासाठी प्रयत्न करणारे ४० ते ५० वयोगटातील कमीत कमी १२ तरूण आहेत जे गेली १५ ते २० वर्ष उद्दोजक होण्यासाठी झटत आहेत.  पण तरीही म्हणावे तसे यश नाही.  अशा उद्दोजकांवर पुस्तक कोणी लिहील का?  त्यातुनही काही धडे घेता येणार असतील तर?

उत्तर:   जसे यशस्वी उद्दोजकांकडुन उद्दोजकतेचे धडे मिळू शकतात तसेच धडे किंबहुना जरा जास्त धडे अपयशी उद्दोजकांकडून मिळू शकतात.  काय करावं या पेक्षा काय करू नये ची यादी नेहमी मोठी असते.   उदा.  आपल्या मुलांना परिक्षेत चांगल यश मिळवण्यासाठी अभ्यास कर इतक सांगितल तरी पुरे होऊ शकतं.  आणि चांगला हुशार मुलगा इतक सांगितल्यावर पहिल्या नंबर काढतो;  चांगला अभ्यास कर अस सांगताना आपण मुलांना सांगतो की, (१) सर्व प्रथम उत्तर पत्रिकेत आपला नंबर बरोबर लिहुनच उत्तरं लिहायला सुरुवात कर, (२) प्रश्न नीट वाचुन मगच उत्तर लिहायला सुरुवात कर, (३) अक्षर नीट काढ, (४) वेळेच भान ठेव, जास्त खाडा खोडी करू नको, (५) उत्तर मुद्देसुद लिहायचं. (६)  पेपर संपायला थोडा वेळ ठेवुन सगळ्या प्रश्नांची उत्तर लिहीली आहेत की नाही हे तपासुन घे, (७) मुख्य म्हणजे कुणाचीही कॉपी करु नकोस, नापास झाला तरी चालेल.   अपयशातुन शिकण्यासारखं खरचं खुप असतं म्हणुन कुणी नुसतं अपयशावर पुस्तक लिहिणार नाही, कारण शेवटी प्रत्येकाला यश मिळवायच असतं.   आपण नेहमी उगवत्या सुर्यालाच नमस्कार करतो, कारण सुर्योदयापासुन आपल्याला उर्जा मिळते;   सुर्यास्त बघताना आपला जीव व्याकूळ होतो!  मन उदास होत,  कारण सुर्यास्त आपल्याला उर्जा देत नाही.     
India मधे Income Tax घ्यायला सरकार बसले आहे, पण छोट्या उद्दोजकांचे क्रेडिटचे बिल sure shot मिळवुन देण्यासाठी कोणतीही system  अस्तितवात आहे का?  अगदी ७ स्टार _____हॉटेल सारखे Clients पैसे बुडवतात, आणि छोटे ब्रॅण्डेड कपडे विकणारे सुद्दा ४/ ५लाख बुडवतात. यावर काही उपाय आहे का?  

उत्तर:   छोट्या उद्दोजकाचे बिल वसुल करण्यासाठी माझ्या माहितीत अशी कुठली ही system अस्तितवात नाही.   एक नियम म्हणुन कुठलाही व्यवहार करताना किती क्रेडिट द्यायच हे सर्वप्रथम ठरवणं गरजेच आहे, मग तो कस्टमर कितीही मोठा का असेना.  एक गोष्ट मला मान्य आहे की सुरुवातीला सगळेच लहान उद्दोजकांना अक्षरश: वेठीस धरतात.  पण ही फेज प्रत्येकालाच भोगावी लागते.  अशा वेळी आपल्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, (१) उत्पादनाचा दर्जा, आणि (२) Clients/ Customers हाताळण्याची कला.   उत्पादनाचा दर्जा इतका चांगला असला पाहिजे की मार्केट मधे त्याला पर्यायच नसावा.   आणि तो दर्जा सतत वाढवत नेला पाहिजे, आणि हे करताना आपल्या Clients/ Customersना सुद्दा हे कळलं पाहिजे.  गुणवत्तेच्या जोरा बरोबर Clients/ Customers हाताळणाची कला!  होय Clients/ Customers ला संभाळता आलं पाहिजे आणि ती एक कला आहे.  गुजराती माणस अशा कलेत तरबेज असतात.   कुणाशीही बोलताना त्यांच्या तोंडातुन साखरच पडते, संयमाचे ते महामेरु असतात.   मराठी उद्दोजक आता कुठेतरी ही कला शिकायला लागले आहेत अस दिसतं....  मी नेहमी म्हणतो की फोन वरुन गोड बोलायला जास्त पैसे लागत नाहीत...


माझे मिस्टर ________ प्रत्येक वेळी नविन वेंचर नविन इन्वेस्टमेंट, नविन लोन, आणि पुर्वी पेक्षा मोठ्या लॉसची liability..........प्रामाणिकपणाने, Intellect, कष्ट करण्याची तयारी, रात्रंदिवस मेहनत, कोणतेही व्यसन नाही असे असुनही बिझिनेसमधे उभे राहता येत नाही काय करावे?
उत्तर:   प्रामाणिकपणाने, Intellect, कष्ट करण्याची तयारी, रात्रंदिवस मेहनत, कोणतेही व्यसन नाही - हे सगळे गुण चांगल्या सुसंकृत माणसाची लक्षणं आहेत, चांगली माणस चांगला समाज नक्कीच घडवतील, पण नुसत्या अशा गुणांच्या जोरावर आपण एक चांगला उद्दोग उभा करु शकु का? 

एक चांगला उद्दोग उभा करायला पाहिजे एक चांगला प्रोजेक्ट!  त्याची अभ्यासपुर्ण तयारी आणि मग काटेकोरपणे अंमलबजावणी.   कुणी कुठला बिझिनेस करावा हे मी सांगु शकणार नाही कारण प्रत्येकाची आवड, काम करण्याची पद्दत मला कशी माहित असणार.  पण इतरांनी सांगण्यापेक्षा आपला कल आणि आपली झेप ओळखायला पाहिजे.   .......मागे उद्दोगाचा शुभारंभ या माझ्या लेखात मी वरील प्रश्नाचे उत्तर दिले होते, त्यातला काही भाग मी खाली देत आहे. 
"उद्दोगाचा शुभारंभ..........ज्यांना आज स्वत: काय करायचं आहे हे चांगलं ठाऊक असेल, तयारी झालेली असेल त्यांनी तर निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीने जगाशी बोलावं! इतर तरुण ज्यांना काही तरी उद्योग करून स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे ते दोन प्रकारांत मोडतात, १) असे तरुण ज्यांनी कोणता उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे मनाशी ठरवलेलं आहे, पण त्यांना नेमकी सुरुवात कुठून करायची हे ठाऊक नसतं आणि २) ज्यांना कुठला उद्योग किंवा व्यवसाय करायचा आहे हेच माहीत नाही, तरी त्यांनासुद्धा नोकरी न करता स्वत:च काही तरी करायची अशी एक जबरदस्त इच्छा असते. अशा तरुणांनी सुरुवात कशी करावी याचा थोडा विचार करूया.
मला वाटतं ज्यांनी स्वत:चा कल ओळखून कुठला उद्योग व्यवसाय करायचा आहे किंवा कोणत्या सव्‍‌र्हिस सेक्टरमध्ये काम करायचं आहे हे ठरवलं असेल आणि सुरुवातीला लागणारं ज्ञान आणि अनुभव त्यांच्याकडे असेल त्यांनी खुशाल स्वत: उद्योग सुरू करावा. आज बहुतेक तरुणांचा कल हा ज्ञानाधारित उद्योगाकडे किंवा सव्‍‌र्हिस सेक्टरकडे जास्त असतो. त्यात इंटिरिअर्स, फाइन आर्ट, प्रिंटिंग, फॅशनस इव्हेंट मॅनेजमेंट, कॅटरिंग, कोचिंग क्लासेस, मॅनेजमेंट कोर्सेस, अ‍ॅनिमशन, मीडिया अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट, कॉम्प्युटर क्लासेस, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, वेब डिझायनिंग, ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम, रेस्टॉरंट्स, ब्रॅण्ड मेकिंग, मार्केटिंग असे अनेक पर्याय आज उपलब्ध आहेत. अगदी छोटा तर छोटा, पण उद्योगाची सुरुवात करणं गरजेचं आहे.  सुरुवातीला एक चांगला अभ्यासपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट, नियोजन म्हणजे प्राथमिक तयारी करणं गरजेचं आहे.
‘प्रोजेक्ट रिपोर्ट’ म्हणजे उद्योगाचा ब्लूप्रिंट! प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये सुरुवातीचं भांडवल, उत्पादनाचा खर्च, कच्चा माल कुठे आणि कसा मिळणार, प्रोडक्ट ब्रॅण्ड, मार्केटिंग प्लान, प्रॉफिट-मार्जिन, तुमचे स्पर्धक, त्यांचे उत्पादन अशा सगळ्या गोष्टींचा समावेश असला पाहिजे. आज इन्टरनेटवर कुठल्याही उद्योगात भारतात आणि भारताबाहेर कोण आहे, त्यांचे उत्पादन, त्यांचे ब्रॅण्डस् व त्यांची जवळपास संपूर्ण माहिती उपलब्ध असते. असा प्रोजेक्ट रिपोर्ट एखाद्या चार्टर्ड अकाऊंटंटला दाखवा म्हणजे तो तुम्ही केलेले कष्ट आणि लावलेल्या पैशावर योग्य रिटर्न काय असू शकतं हे सांगू शकतो.   उद्योग सुरू केल्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्टमधील तुमचा अंदाज चुकला तरी फारसं बिघडत नाही.   त्यातूनही आपल्याला खूप काही शिकता येतं. त्याचबरोबर संपूर्ण उद्योगाच्या सुरुवातीचं नियोजन करणं महत्त्वाचं आहे. चांगलं तपशीलवार नियोजन म्हणजे अर्ध यश हे लक्षात घ्या.

आता तुम्ही कुठला उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे ठरवलं नसेल आणि तरी तुम्हाला नोकरी न करता एखादा स्वतंत्र व्यवसायच करायचा असेल तर तुम्हाला जरा जास्त मेहनत करायला पाहिजे, हे नक्की. प्रथम तुमची आवड आणि क्षमता याची तुम्हालाच नीट ओळख होणं गरजेचं आहे. त्यात येणारी प्रत्येक संधी ओळखता येणं महत्त्वाचं आहे. जास्त गोंधळ असेल तर एखाद्या करिअर काऊन्सेलरशी बोलणं केव्हाही चांगलं. कारण जोपर्यंत तुमचे गुण, दोष, मानसिक ताकद तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत नेमका कुठला उद्योग किंवा व्यवसाय करायचा हे तुम्ही ठरवू शकणार नाही. मित्रांशी आणि घरच्यांशी चर्चा जरूर करा पण त्याचबरोबर विविध उद्योगातील अनुभवी लोकांचा आपण सल्ला घेतला पाहिजे, त्यांच्याशी मोकळेपणाने चर्चा करा.   मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत कुठल्याही निर्णयापर्यंत येऊ नका.   झटपट उत्तरांच्या मागे न पडता प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार झाला पाहिजे.   उद्योगाचे चांगले आणि वाईट सगळे मुद्दे लिहून काढलेले केव्हाही चांगलं. थोडं थांबून, अनुभव घेऊन मग पुढचा विचार करा. अनुभव मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे जो उद्योग करायचं मनाशी ठरवलं असेल, त्या उद्योगात नोकरी करून प्रत्यक्ष माहिती मिळवणं केव्हाही चांगलं. कारण स्वत:चा अनुभव हाच आपला सगळ्यात मोठा शिक्षक असतो! पण सावधान, नोकरीतील त्या सुरक्षित व नियमित पगाराच्या जाळ्यात अडकण्याचा मोह होऊ देऊ नका. एकदा विचार पक्का झाला की, हर हर महादेव म्हणत पुढेच व्हा! मग मागे हटणे नाही! जीव तोडून कामाला लागा, यश हमखास तुमचं असेल. एखाद्या विशिष्ट उद्योगाची माहिती मिळवण्याचा एक मार्ग आपण बघितला.   उद्योग कसा करावा याच व्यवस्थापन शास्त्राचं शिक्षण घेता आलं तर फारच उत्तम. मुख्य म्हणजे सकारात्मक विचार आणि स्वत:वरचा सकारात्मक विश्वास केव्हाही डगमगता कामा नये. यश हे अपघाताने मिळत नसतं, की आकाशातून पडून, ते मिळतं आपल्या कर्तत्वाने!

शेवटी एकच सांगेन नुसती चर्चा किंवा विचार करून कुणी उद्योजक होणार नाही. संधी येताना फार छोटी वाटते पण गेल्यावर ती फारच मोठी दिसते! जग काय म्हणेल याचा विचार करण्याची आजच्या जगात तरी कोणी चूक करू नये. जे प्रोत्साहित करतील त्यांना धन्यवाद देऊन व जे नाउमेद करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. शंका काढणारे १०० लोक भेटतील, तर नाउमेद करणारे २००! टीका कोण करतो या पेक्षा काय टीका आहे हे मह्त्त्वाचं असतं हे लक्षात घ्या. त्याचबरोबर कुणाविषयी कडवटपणा किंवा तिरस्कार धरून न ठेवता शांतपणे पुढे जाण्यातच आपलं यश आहे.  अडचणी आणि अडथळे हे येणारच म्हणून आपण प्रयत्नच करणार नाही का?

मित्रांनो जास्त काय लिहु........ यश म्हणजे नक्की काय असतं हे जर मला कुणी विचारल तर मी म्हणेन १००% यशस्वी प्रयत्न म्हणजेच १००% यश........बघा प्रयत्न करुन.  मना पासुन शुभेच्छा..............Never Never Never Give up..........












Thanks for myniti

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल