मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

पैसा वापरण्याचे शिक्षण मिळण्याची गरज - अनिल बोकील



'पैसा विनिमयाच्या माध्यमाऐवजी साठवणुकीची वस्तू झाल्याने सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. माध्यमाचा वापर करायचा असतो, तर वस्तूंची साठवणूक केली जाते. माध्यम स्वत:जवळ ठेवून घेता येत नाही. पैसा वापरण्याचे शिक्षण मिळण्याऐवजी पैसा मिळविण्याचे शिक्षण दिले जाते. हे आजच्या शिक्षण व्यवस्थेचे दुर्दैव आहे" - अर्थतज्ज्ञ अनिल बोकील .

ज्या देशाची अर्थव्यवस्था नैसर्गिक स्रोतावर अवलंबून असते, तो देश कधीही आर्थिक मंदीने ग्रस्त होत नाही,  ५० रुपयांपुढील सर्व नोटा बंद झाल्यास खोटय़ा नोटा बाजारात येणार नाहीत. कारण कोणत्याही नोटेला बनविण्याचा खर्च ३५ ते ४० रुपये येत असतो. रोखीचे व्यवहार बंद करून बँकेमार्फत सर्व व्यवहार झाल्यास काळा पैसा आपोआप बाहेर पडू शकतो...





- by - मराठा विद्या प्रसारक समाजाच्या येथील समाजकार्य महाविद्यालयात ‘अर्थक्रांती’ या विषयावर बोकील यांचे व्याख्यान 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल