'सांगा मी काय कमवले, काय गमवले..?'
मुंबईतील एका चाळीपासून ते चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध चेहरा होण्यापर्यंतचा प्रवास अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी स्वत:च्या शब्दांत उलगडला.
‘मी चित्रपटांत येण्यापूर्वी वाळकेश्वर येथील एका चाळीत राहात होतो. तेव्हा मी, माझा भाऊ आणि माझे आई-वडिल सगळे एकाच खेलीत रहायचो. रात्री झोपेत कधी मला खोकला आला तर आई उठून बसे. आईला खोकला आला तर मी उठून बसायचो. चित्रपटात काम मिळाल्यानंतर पैसा आला, श्रीमंती आली, एका खोलीचा फ्लॅट झाला, खोल्या वाढल्या आणि भिंती मध्ये आल्या. एकाच फ्लॅटमध्ये त्या पलिकडच्या भिंतीआड झोपलेली ‘आई’ हृदयविकाराने गेली. पण, या भिंतीआड असणाऱ्या मला हे कळलेही नाही’, अशी आठवण सांगत ‘सांगा मी काय कमवले, काय गमवले…?’ असे जॅकी श्रॉफ म्हणाले
by - loksatta
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा