अनेक वेळा एखादा नवीन उद्योग सुरु करायचा असल्यास उद्योजक कर्ज मागणी साठी बँकेमध्ये चौकशी करतात…बँक व्यवस्थापक सर्व प्रथम प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल )घेवून या मग कर्ज देता येईल कि नाही ते बघू असे सांगतो. बऱ्याच नव उद्योजक ,शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आता हा प्रकार कुठे मिळणार? त्यात काय असते ?तो कशासाठी लागतो ई…
त्यामुळे खास आज चावडी च्या सर्व नवउद्योजक मित्रांसाठी हि माहिती देत आहे..
प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे खरतर तुमच्या उद्योगाचा खराखुरा चेहरा म्हणायला हवा…
पहिला टप्पा :
तुमच्या उद्योगासाठी येणारा जो संपूर्ण खर्च आहे त्याचा एक प्रकारे ताळेबंद म्हणायला हवा …यामध्ये तुमच्या विषयी वयक्तिक माहिती, तुमचे शिक्षण ,त्या उद्योगाबाबत घेतलेले एखादे प्रशिक्षण तसेच तुमच्या कडील जागेची माहिती हि पहिल्या टप्प्यात असते .
दुसरा टप्पा :
तुम्ही जो उद्योग निवडला आहे त्या बद्दल सविस्तर माहिती जसेकी कच्चा माल किती लागणार ? तो कुठून येणार ? त्याला खरेदी साठी किती पैसे लागतील ? मग त्या साठी लागणारी मशीनरी ,त्यास लागणारी जागा ,त्याची उत्पादन प्रक्रिया , तयार झालेल्या मालाचे पाकेजिंग आणि महत्वाचे म्हणजे मार्केटिंग कसे होणार या सर्व बाबींची सविस्तर माहिती असेल.
तिसरा टप्पा :
या सर्व प्रोजेक्ट साठी तुम्हाला लागणाऱ्या भांडवल बाबत माहिती असेल ; ज्या मध्ये तुम्हाला जागेसाठी येणारा खर्च , बांधकाम करायचे असल्यास त्याचा खर्च , मशिनरी चा खर्च ,इलेक्ट्रिसिटी चा खर्च तसेच उद्योग सुरु करण्यापूर्वी लागणारे पूर्वीचे खर्च या कॅपिटल खर्चाच्या बाबी अंतर्भूत असतील तसेच मग खेळते भांडवल ज्या मध्ये कच्चा माल ,उत्पादन प्रक्रिया ,लेबर ,इतर खर्च लाईट ,पाणी,पेकेजिंग ,मार्केटिंग तसेच तुमचे प्रशासकीय खर्च असा सर्व खर्चाचा आरखडा एकत्रित केलेला असेल.
चौथा टप्पा
यामध्ये सर्व आर्थिक गणिते असतील जसेकी तुम्हाला मिळणारे उत्पन्न ,होणारा खर्च ,त्यातून राहणारा निव्वळ नफा ,बँक कर्ज ची परतफेड ई…
प्रोजेक्ट रिपोर्ट मधील गनितांनुसार जर हा प्रोजेक्ट योग्य रीतीने चालणार असेल असे दिसत असेल आणि तुम्ही बँक कर्ज घेवून हप्ते व्यवस्थित फेडून तुम्हाला सुद्धा पैसे शिल्लक राहत असतील असे चित्र असेल तरच बँक कर्ज देण्याबाबत सकारत्मक विचार करू शकते…जर प्रोजेक्ट चुकीचा बनविला गेला तर थेट कर्ज सुद्धा नाकारले जावू शकते.त्या मुळे जाणकार व्यक्ती किंवा अनुभवी संस्था कडूनच प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून घ्यायला हवा…बाजारात अनेक ठिकाणी याबाबत नवोदितांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते.त्या मुळे सर्वांची गरज आणि मागणी लक्षात घेता गेल्या ७ वर्षापासून चावडी मध्ये ५०० पेक्षा अधिक उद्योगांचे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून दिले जातात..
जर आपल्याला एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापुर्वीच सर्व नियम आणि अटी यांचे पालन करून बँक आणि शासकीय विभाग यांचा संगम करून मगच हा रिपोर्ट बनविला जाने आवश्यक आहे.
आभार :- चावडी न्युज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा