मंगळवार, ६ सप्टेंबर, २०१६

जाहिरातीचा फंडा : पितांबरी ...


घरातील नित्य देवपूजेतील धातूंच्या देव-देवतांपासून, देवांच्या पूजेची भांडी, घरातील भांडीकुंडी इत्यादीसाठी जेव्हा स्वच्छ, चकचकीतपणाची आठवण येते तेव्हा ‘पितांबरी’ची आठवण येतेच.

‘ग्राहक देवो भव’ यावर श्रद्धा असणार्‍या वामनराव प्रभुदेसाई यांनी १९८६ साली ‘पितांबरी’ या नावाने उत्पादन सुरू केले. ‘पितांबरी’मुळे भांड्यांवरील Oxide थर सहज काढून टाकता येतो, भांड्यांवरील गंजलेला भाग काढून त्याची चमक वाढविते. हातांनी भांड्यांना स्वच्छ करताना हातांना सुरक्षित-हातांना इजा होत नाही. दीर्घकाळ चमक ठेवण्याची किमया या उत्पादनात आहे. याशिवाय ‘स्क्रॅच फ्री’ असल्यामुळे भांड्यांना किंवा संबंधित धातूच्या वस्तूला इजा होत नाही. विशेषत: तांबे, पितळ आणि ब्रास या धातूच्या वस्तू दीर्घकाळ चकचकीत राहतात. एवढं सारं या ‘पितांबरी’बद्दलचं महत्त्व.
लाखो गृहिणींशीच नव्हे तर गृहस्थांशी ही या उत्पादनाने मैत्री केलेली आहे… हे सांगण्यासाठी मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी ‘बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी!’ असे सांगून टाकले होते. ही ‘स्लोगन’ अन् जाहिरात आजही पंचवीस-तिशीच्या पुढील ग्राहक विसरलेले नाहीत.
१०० आणि २०० ग्रॅमचे ‘पाऊच’ आणि ‘डब्यां’मध्ये पितांबरी उपलब्ध आहे. आता रवींद्र प्रभुदेसाई ‘पितांबरी’सह सुमारे ४० विविध उत्पादनांच्या निर्मितीचं काम बघतात. इश्ण्उ समूहातील निर्यातदारांच्या यादीत या कंपनीचे नाव असून DNV नेदरलँड यांच्याकडून ISO-९००१-२००८ प्रमाणपत्र मिळविणार्‍या ‘पितांबरी’चं मुख्य कार्यालय ठाणे येथे आहे, तर तळवडे (राजापूर), आनगाव (सुपे-नगर), गणपतीपाडा (सूपे-अ’नगर), वडोदरा (गुजरात), बुड्डी (हिमाचल प्रदेश) या ठिकाणी उर्वरित उत्पादने तयार होतात.
एक हजाराहून अधिक अधिकारी आणि कामगारवर्ग सांभाळणार्‍या ‘पितांबरी’ने हिंदुस्थानातील १९ राज्यांसह यू.एस.ए., सौदी अरेबिया, इराण, मलेशिया, सिंगापूर, यू.ए.इ., ब्राझील, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, न्यूझीलंड, दुबई, हाँगकाँग इ. ठिकाणी भरारी घेतलेली आहे.
श्री. प्रभुदेसाईंच्या या यशाचा मंत्र त्यांच्याच अवतरणात सांगायचे झाल्यास bbPlanout your work & the workout your plan… अशा आशयपूर्ण शब्दांत ते सांगतात. ‘पितांबरी’तील इंग्रजी ‘झ्’ बद्दल त्यांना वेगळेच आकर्षण आहे. Product, Price, Packaging, People, Place, Profit, Planning, Promotion आणि Performance या उत्साह वाढविणार्‍या आशयगर्भ `P`चं महत्त्व ‘पितांबरी’ने जाणलं.
पितांबरी शायनिंग पावडर, रुपेरी, पितांबरी, मेटल पॉलिश, मसाज ऑईल, हेलमेट क्रीम, गो पीयूष, ‘गो मूत्र’ या दोन्ही Capsu ते आहेत तसेच भूशक्ती शेंगदाणा ऑईल, चारू फेशियल किट अशा विविध उत्पादनांद्वारे ‘पितांबरी’ने गृहिणींच्या अन् ग्राहकांच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे. All toilet Cleaners, Dishwash Box, Rice Brain Oil, Mastard Oil इ. उत्पादने त्यांची आहेत.
Food Care फूड केअर, Health Care हेल्थ केअर, Agricare अ‍ॅग्रीकेअर आणि Home Care होम केअर या चार प्रकारांनी मिळून त्यांनी Export Kit बनविले आहे. अशा स्वरूपाची दैनंदिन उपयुक्त उत्पादनांसह काळजी घेणारी ‘Kits’ बनवून निर्यात करणारी, हिंदुस्थानातील एकमेव अशी ‘पितांबरी’ आहे.







प्रा. गजानन शेपाळ

संदर्भ स्रोत :- दैनिक सामना 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल