शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

उद्योगाची दुनिया : रेडिमेड कपड्यांची दुनिया


फॅशन, कपडे, गरज म्हणून फॅशन म्हणून; पण रोज वेगळे कपडे, स्वत:चा वार्डरोब, तिन्हीत्रिकाळचे वेगळे कपडे यामुळे कपड्यांचा उद्योग संपूर्ण जगाला भुरळ घालतो. सध्या चालू असलेल्या फॅशन वीक देशात आणि परदेशात आपल्या रेडिमेड कपड्यांना किती वाव आहे हे दर्शवतो. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांमधील एक गरज असल्याने हा व्यवसाय कधीही न संपणारा आहे.

तुमच्यातली कल्पकता नाविन्याची आवड आणि दूरदर्शीपणा याचा उपयोग या व्यवसायात होतो. या मार्केटमध्ये शिरताना तुम्हाला मार्केटचा अंदाज घेणे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कार्यकुशल कामगार कसे मिळतील? किती लोकांची तुम्हाला आवश्यकता पडेल? तुम्ही कच्चा माल कुठून खरेदी करू शकाल? तुम्हाला किती मशिन लागू शकतात. यातून तुम्ही किती उत्पादन करू शकता आणि यातून होणारा फायदा यांचा सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. होलसेल आणि रिटेलमधल्या चेनचा अभ्यास करा. कारण या इंडस्ट्रीमध्ये क्वॉलिटी आणि नाविन्य यांचा मिलाप खूप आवश्यक आहे. यामध्ये तुम्ही स्वत:ची फॅक्टरी, सब कॉन्ट्रक्टिंग बिझनेस म्हणजे फॅक्टरी सुरू करून दुसर्‍याचे जॉब वर्क पूर्ण करून देणे. तुम्ही स्वत: होलसेलचा बिझनेस किंवा रिटेल आऊटलेट किंवा शॉप सुरू करू शकता. तुम्ही फक्त प्रिटींग आणि एम्ब्रॉयडरी करून देण्याचे, पण स्वत:चे युनिट सुरू करू शकता. यामधलाच एक प्रकार वॉशिंग प्लान्ट तुम्ही सुरू करू शकता. फॅब्रिक वॉश हा जो प्रकार आहे हा तुम्ही करू शकता. छोट्या कपड्यांच्या निर्यातदारांना याची खूप आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला सरकारी परवान्याची गरज भासते. यासाठी प्रशिक्षण तुम्हाला फॅशन डिझायनींगच्या कॉलेजमध्ये मिळू शकते. प्रायव्हेट कॉलेज देशात आणि परदेशात असलेल्या अभ्यासकेंद्रात तुम्हाला याचं प्रशिक्षण मिळू शकते. आयएनआयएफडीसारखी संस्था संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात अग्रगणी आहे. टेक्टाईल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही डिप्लोमा आणि डिग्री कोर्स तुम्ही करू शकता. एमआयटीआयडीसारखी संस्था मोठ्या प्रकारचे प्रशिक्षण देते. टीयूएफएसही टेक्सस्टाईल इंडस्ट्रीसाठीची योजना सीइबीकडून चालवली जाते. आयडीबीआय एसआयडीबीआय आणि आयएफसीआय याअंतर्गत बर्‍याच योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. www.technicaltextile.gov.in या वेबसाईटवर हवी ती माहिती या इंडस्ट्रीमधील मिळू शकते. makeinindia.com यामध्ये तुम्हाला उत्पादन तुम्ही कसे कराल आणि वाढवाल याविषयीची माहिती उपलब्ध आहे.



नेहा खरे
neha18.mirror@gmail.co
by - SAAMANA

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

विचार, सुविचार आणि अंतिम सत्य हे अनेकांना माहिती नसते.


विचार, सुविचार आणि अंतिम सत्य

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही. त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.



                                    जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात.पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. असे म्हणणे अति धाडसाचं म्हणावं लागेल. पण असं धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं. आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची संकटं येतात. संकटं टाळता येणं शक्य नाही, पण संकट हीच संधी समजून प्रयत्न केले तर यशाचा आनंद घेता येणे सहज शक्य आहे. 
                                            

  पण..दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते. कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूसच असतो. म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे आयुष्याचे सार समजून घ्यायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायलाही हवं !
                                            

    कितीही कठीण प्रसंग असू द्या. पण खरा मार्ग हा सुविचारतून आलेल्या दृष्टीतूनच येतो. विचार आणि सुविचार यातील अंतर एकदा कमी झाले की सुखाचा सागर आपोआपच खुला होतो....
कारण कोणतीही अडचण, समस्या हि सोडविण्यासाठी फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते त्या म्हणजे
'माणूस आणि पैसा'बसं
यापलीकडे दुसरे काहीच असूच शकत नाही...








.

*ज़िन्दगी के लिए इस कहानी से सबक:*


एक कार कंपनी में ऑटोमोबाइल इंजिनियर ने एक वर्ल्ड क्लास कार डिज़ाइन की।कंपनी के मालिक ने कार की डिजाईन बेहद पसंद की और इंजिनियर की खूब तारीफ की।


जब पहली कार की टेस्टिंग होनी थी तो कार को फैक्ट्री से निकालते समय उसे अहसास हुआ कि कार शटर से बाहर निकल ही नहीं सकती थी,क्योंकि कार की ऊंचाई गेट से कुछ इंच ज़्यादा थी,इंजिनियर को निराशा हुई कि उसने इस बात का ख्याल क्यों नहीं किया।


इसके दो उपाय सूझे:
पहला,कार को बाहर निकालते समय गेट की छतसे टकराने के कारण जो कुछ बम्प,स्क्रैच आदि आएं,उन्हें बाहर निकलने के बाद रिपेयर किया जाये। पेंटिंग सेक्शन इंजिनियर ने भी सहमति दे दी,हालाँकि उसे शक था कि कार की खूबसूरती वैसी ही बरक़रार रहेगी।


कंपनी के जनरल मैनेजर ने सलाह दी कि गेट का शटर हटाकर गेट के ऊपरी हिस्से को तोड़ दिया जाय। कार निकलने के पश्चात गेट को रिपेयर करा लेंगे।


यह बात कंपनी का गार्ड सुन रहा था,उसने झिझकते हुए कहा कि अगर आप मुंझे मौका दें तो शायद मैं कुछ हल निकाल सकूँ।मालिक ने बेमन से उसे स्वीकृति दी।
गार्ड ने चारों पहियों की हवा निकाल दी,जिससे कार की ऊंचाई 3-4 इंच कम हो गयी और कार बड़े आराम से बाहर निकल गयी।



*Bottomline:*
किसी भी समस्या को हमेशा एक्सपर्ट की तरह ही न देखें,एक आम आदमी की तरह भी समस्या का बढ़िया हल निकल सकता है।


*ज़िन्दगी के लिए इस कहानी से सबक:*
"कभी कभी किसी दोस्त के घर का दरवाजा हमें छोटा लगने लगता है,क्योंकि हम अपने आपको ऊँचा समझते हैं। अगर हम अपने दिमाग से थोड़ी सी हवा (ईगो) निकाल देवें,तो आसानी से हम अंदर जा सकते हैं,ज़िन्दगी सरलता का ही दूसरा नाम है



































by - Internet

बुधवार, १४ सप्टेंबर, २०१६

You tube (यु ट्यूब) च्या माध्यमातून करोडपती व्हा ...


You tube (यु ट्यूब) च्या माध्यमातून करोडपती व्हा

You tube (यु ट्यूब) च्या माध्यमातून करोडपती व्हा -
पुणे - "  You tube (यु ट्यूब) द्वारे प्रतिमहिना रुपयांचा नाही तर डॉलरचा पाऊस पाडून तुम्ही प्रतिमहिना 5 ते 35 लाख कमवविण्याची सुवर्ण संधी आहे.
" होय हे खरे आहे,
पण विश्वास बसत नाही ना ! 
हो ना सुरुवातीला असेच होते.
    आजचे युग हे स्पर्धेचे आणि इंटरनेटचे युग आहे. ही स्पर्धा पैसा, धन-संपत्ती व सुखसाधने मिळविण्यासाठीच चालली आहे. इंटरनेटमुळे माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक व इंटरनेट हे अत्यंत प्रभावी साधन ठरले आहे. सोशल मीडिया हा त्याचाच एक भाग आहे. कारण माणसे पैसे तर निर्माण करतात पण आभासी जगात ते कळूनही येत नाही. यालाच बदल असे म्हणतात, तेही काळानुरूप. सामान्य माणसापासून ते सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसा कमावण्याचा नवीन मार्ग निर्माण झाला आहे.
तुम्हाला माहिती आहे का? 
Youtubeच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवता येतात. मी आपल्याला अशाच काही लोकांची माहिती देत आहे. Youtube मधून त्यांनी कोट्यवधी रुपये कमवले आहेत. बिझनेस, कॉमेडी, कला, संगीत, न्यूज, फॅशन, योग्य, धार्मिक आणि फूडसारख्या क्षेत्रातून या मंडळींनी पैसा कमवला आहे.अगदी तेही डॉलर मध्येच.
तुम्ही देखील या मंडळींची माहिती घेऊन त्यांच्या  टीप्स फॉलो केल्या तर अल्पावधीत कोट्यधीश होऊ शकता. फक्त ओरिजिनल कंटेंट बनवा आणि तुमचा व्हीडिओ, ऑडिओ हा तुम्ही तयार केलेला हवा. शिवाय copyright चा भंग होता कामा नये ही काळजी घेतली तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. यामध्ये तीळमात्र शंखा नाही. तर चला त्या तीन you tube स्टारची माहिती घेऊया.
-------------------------------------------------------------------------
1) श्रुती आनंद...
(https://www.facebook.com/shrutiarjunanand)
        या 30 वर्षीय श्रुती आनंदला Youtube वर 'मेकअप क्वीन' नावाने ओळखले जाते. हे नाव मेकअप जगतात आणि मेकअप साहित्य विश्वात खूपच प्रसिद्ध आहे. Youtube चॅनेलवर श्रुती आनंदचे 6 कोटी व्ह्यूअर्स आहे.मेकअप टिप्सचे 3 लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत.Youtube च्या माध्यमातून महिन्याला कमीत कमी ती 10 ते 35 लाख रुपये कमवत आहे.श्रृतीला पैसे  कमवण्याची कल्पना अशी सुचली.
श्रृतीला तिच्या ऑफिसातून घरी पोहोचायला 1 तास 30 मिनिटे लागायचे. प्रवासादरम्यान ती Youtube वर नेहमी 'How to' चे व्हिडिओ सर्च करून पाहात असे. मग श्रृतीने असे करता करता ब्यूटी व मेकअपशी संबंधीत व्हिडिओ बनवून Youtube वर अपलोड करायला सुरुवात केली
2011ला तिने पहिला प्रोफेशनल व्हिडिओ शूट करून तो Youtube वर अपलोड केला. हळू हळू ती प्रत्येक आठवड्याला एक व्हिडिओ अपलोड करू लागली. परिणामी तिचे व्हिडिओ लोकप्रिय झाले. पतीच्या मदतीने श्रृतीने Youtube वर चॅनल तयार केले. तिने या मार्फत पाच लोकांना रोजगार उपलब्द करून दिला आहे. याच पाच लोकांची टीम आज हे चॅनल हँडल करते. या मार्फत श्रृती सोमवार व शुक्रवारी एक नवा व्हिडिओ Youtube वर अपलोड करत असते.
-----------------------------------------------------------------------------------
2 ) तन्मय भट्ट (https://www.facebook.com/tanmaycomedy)
मुंबईचा कॉमेडियन तन्मयचा
कोट्यधीश होण्याचा प्रवास.......
हा सुरुवातीला श्री. वीरदास यांच्या कॉमेडी टीममध्ये स्टॅंड-अप कॉमेडियन म्हणून काम करत होता.त्याला सनी लियोनीच्या 'रागिनी एमएमएस-2'मध्ये एक  छोटाशी भूमिका केली होती. 2014 मध्ये गुरसिमरन खांबासोबत त्याने Youtube वर AIB (https://www.youtube.com/user/allindiabakchod) ची सुरुवात केली. रोहन जोशी व आशीष साख्या या दोघांचीही त्याला साध लाभली. तन्मय AIB वर आलियासह स्पूफ, कल्किसोबत मेकिंग हेडलाइन असलेले व्हिडिओ जबरदस्त हिट झाले.Youtube वर अल्पवधीत तन्मय भट्टची कॉमेडी ट्रेन वेगात धावली.तन्मयचा AIB शोचे Youtube वर 14 कोटी पेक्षा अधिक जास्त व्ह्यूज आहेत. दुसरीकडे, Youtube वर त्याचे 15 लाखांहून जास्त सब्सक्रायबर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तन्मयने Youtube वरुन आतापर्यंत 14 कोटी रुपयांची कमाई केली आहे.2015 मध्ये 'फोर्ब्स'ने सर्वात श्रीमंत सेलेब्रिटीजच्या यादीमध्ये तन्मयला स्थान दिले होते.
-------------------------------------------------------------------------
3 ) कनन गिल
(https://www.facebook.com/GillKanan)
तुम्ही Youtube वर कनन गिल (https://www.youtube.com/user/knngill) नाव टाइप कराल तर तुमच्यासमोर त्याचे अनेक प्रकारचे व्हिडिओ उघडतील. त्यामध्ये कॉमेडीपासून फिल्म रिव्ह्यूचा समावेश आहे. कनन हा मात्र इं‍जिनिअर असून त्याला कॉमेडीचा छंद आहे. 2014 मध्ये त्याला कॉमेडी सेंट्ल चॅनलवरील कॉमेडी शो 'द लिव्हिंग रूम' मध्ये काम करण्‍याची संधी मिळाली होती. यानंतर त्याने Youtube वर फिल्म रिव्ह्यूचे काम सुरु केले. अवघ्या 26 वर्षाच्या वयात कननचे Youtube वर जवळपास तीन कोटी व्यूअर्स आहेत. प्रत्येक महिन्याला तो 4 ते 20 लाख रुपये कमवते.
* Youtube मधून कोट्यवधी रुपये कमवायची अशी सुरुवात करा
- तुमचे गूगल अकाउंट अर्थात Gmail असेलच.
- Gmail अकाउंट असलेल्या यूजर्सला स्वतंत्र Youtube अकाउंट बनवण्याची आवश्यकता नसते.
- तुम्ही Gmail अकाउंटवरूनच Youtube एक्सेस करू शकतात.
- व्हिडिओ अपलोड करण्‍यासाठी Youtube चॅनल क्रिएट करावे लागते.
- चॅनल अर्थात Youtube वरचे तुमचे अकाउंट असते. यात व्हिडिओ अपलोड, व्हयूज आदी माहिती असते.
- Youtube वरील माय चॅनल फीचरवरून तुम्ही स्वत:चे चॅनल क्रिएट करू शकतात.
- यात व्हिडिओ, स्लाइड शोच्या रुपात व्हिडिओ अपलोड करू शकतात.
- इतकेच नव्हे तर तुम्ही Youtube चॅनल सजवू शकतात. सेटिंग्जमध्ये या संदर्भात अनेक ऑप्शन असतात.
---------------------------------------------------------------------------
* Youtube चॅनल बनवल्यानंतर पैसा कसा मिळतो, हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.
- यासाठी तुम्हाला गूगल अॅडसेंस अकाउंट बनवावे लागते.
- अॅडसेंस गूगल हे जाहिरात डाटा व ऑफिशियल टूल आहे.
- येथे तुमच्या Youtube चॅनलला किती लोकांनी भेट दिली. तसेच जाहिरातीवर किती क्लिक मिळाल्या याबाबत माहिती मिळते.
- प्रत्येक जाहिरातीच्या क्लिकवर किती रुपये मिळाले, याची देखील माहिती मिळते.
- अॅडसेंस अकाउंट क्रिएट करण्यासोबत तुम्हाला Youtube च्या मोनेटाइजेशन फीचरला इनेबल करावे लागते.
- हे फीचर Youtubeच्या चॅनल सेटिंग्जमध्ये असते.
- हे फीचर सक्रिय केल्यानंतर तुम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओजवर जाहिराती दिसू लागतात. यूजर्स या जाहिरातींवर क्लिक करतात. त्याचा पैसा तुम्हाला अॅडसेंसच्या माध्यमातून मिळतो.
- दरम्यान, मोनेटाइज फीचर इनेबल केल्यानंतर Youtube तुमच्या चॅनलची संपूर्ण चौकशी करू शकते. - सर्व माहिती पडताळून पाहिल्यानंतर तुमच्या व्हिडिओजवर जाहिराती दिसायला लागतात.
---------------------------------------------------------------------------
* 10 डॉलर जमा होताच तुम्हाला पैसे मिळणे सुरु होतात...
तुमच्या यूट्यूब चॅनलवर जाहिराती येण्यास सुरुवात होते. व्हिडिओ दिसू लागतात. तेव्हापासून तुम्हाला मोबदला मिळू लागतो. तुम्ही 10 डॉलर जमा झाल्यानंतर मोबदला मिळण्याचा पर्याय निवडू शकतात. जास्तीत जास्त मोबदला मिळवण्यासाठी तुम्हाला नेहमी चॅनल अपटेट करावे लागते.
नवे युजर्स यावे यासाठी Youtube चॅनलवर नेहमी व्हिडिओ अपलोड करावे लागतात. चॅनलची लोकप्रियता कशी वाढवता येईल. याचे नियोजन करावे लागते. प्रत्येक व्हिडिओमध्ये यूनिकनेस असायला हवा. यूजर्सला जास्त वेळ कसे इंगेज ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करावे लागतात. यूजर्सनी तुमचा व्हिडिओ जितका जास्त पाहिला तितकी तुमची कमाई जास्त होईल.




लेखक : श्री. अर्जुन सैद

पैसा कसा मिळवावा?


पैसा म्हणजे काय?

* पैसा ही वस्तू व्यवहाराचे सर्वात सक्षम साधन आहे. वस्तूंच्या अदलाबदलीने होणाऱ्या व्यवहारांमधील प्रचंड गैरसोय पैशाच्या वापराने दूर झाली.
* वस्तू आणि सेवा या दोन्हींचे मूल्य पैशात करता येत असल्यामुळे पैसा हे माध्यम सर्वच व्यवहारांना उपयुक्त आहे.
* पैसा हे संपत्तीचे अर्थात श्रीमंतीचे मोजमाप आहे.
पैसा कसा मिळवावा?
* "जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी', ही तुकोबांची उक्ती डोळ्यासमोर ठेवून पैसा मिळवावा आणि खर्च करावा. धन मिळवण्याच्या मार्गाच्या भलेपणाविषयी थोडी जरी शंका असेल, तरी तो मार्ग त्याज्य समजावा.
* प्रामाणिकपणे कोणाचीही फसवणूक न करता आणि उचित व्यवहारांचा अवलंब करून पैसा मिळवावा.
* "पैसा म्हणजेच सर्व काही आहे,' हे मानणारे पैशासाठी वाट्टेल ते करायला तयार असतात. मिळविलेल्या पैशाचा आनंद घेता येईल इतकाच पैसा मिळवावा.
अधिक पैसा म्हणजे अधिक चांगले जगणे, हे बरोबर आहे का? ते कसे साध्य करावे?
* पैसा सुज्ञ माणसाच्या फक्त मनात असावा; हृदयात नसावा.
* चांगले जगणे म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होऊन शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांचा लाभ मिळणे. यासाठी किती पैसा हवा, हे त्या व्यक्तीच्या मनोभूमिकेवर अवलंबून असते.
* सुखी आयुष्य जगायला एका मर्यादेपर्यंतच पैसा आवश्‍यक असतो. त्यापेक्षा अधिक मिळालेला पैसा, ते परतफेड करू शकणार नाही, अशांसाठी खर्च केला तर त्याचे समाधान शब्दातीत आहे.
* "चंगळवाद वाईट' असे म्हणताना चंगळवादाची व्याख्या कालमानानुसार बदलत जाते, हे लक्षात ठेवले पाहिजे. कालची चैनीची वस्तू आज गरजेची बनते. पूर्वी घरातील सर्वांसाठी एकच फोन असे. आता लहान मुलासह प्रत्येकाकरिता तो आवश्‍यक बनला आहे. पण नवीन मॉडेलच आपल्याकडे हवे, हा अट्टहास चुकीचा आहे.
* वाजवी अपेक्षा बाळगून आणि अनावश्‍यक स्पर्धा टाळून आयुष्य सुखी व्हायला मदत होईल.
कौटुंबिक अर्थसंकल्प कसा करावा?
* आर्थिक नियोजन सर्वांसाठी आवश्‍यक आहे आणि अर्थसंकल्प हे त्याचे फलित. असे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी घरातील सर्वांनी एकत्र बसून विचारविनिमय करून समान भूमिका निश्‍चित करणे आवश्‍यक.
* "आपल्याला कोठे जायचे आहे' ते आधी ठरवावे. म्हणजेच साधारणपणे पुढच्या 10-15 वर्षांची योजना तयार करावी- ज्यात ठळक बाबींचा समावेश असेल. तसे केले तर म्युच्युअल फंडातील "एसआयपी'सारखी नियमित गुंतवणूक आजच चालू करता येते.
* अर्थसंकल्पात घरातील सर्वांच्या इच्छा-आकांक्षाचे प्रतिबिंब दिसणे अपेक्षित आहे आणि त्या पूर्ण करण्याकरता कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग आवश्‍यक आहे. त्यामुळे प्रत्येक सदस्याची बांधिलकी राहते.
* परिस्थितीनुसार अर्थसंकल्प बदलावा लागेल, याचेही भान ठेवले पाहिजे. जमा आणि खर्च या दोन्हींचा विचार करताना, जमा रक्कम अपेक्षेपेक्षा कमी धरावी आणि खर्च मात्र जास्त होईल, असे समजावे.
* आवश्‍यक त्याकरिता व आवश्‍यक तेवढेच कर्ज घ्यावे, जे व्यवस्थितरीत्या नंतर फेडता येईल.
पंधरा हजार रुपयांत घर कसे चालवावे?
* तुम्ही ज्यावर खर्च करता, यावरून तुमच्या आयुष्यात महत्त्व कशाला आहे, ते कळते.
* आपला जमा आणि खर्च किती होतो, याचा अनेक जणांना पत्ताच नसतो. 80ः20 तत्त्वाचा उपयोग करून महत्त्वाचे खर्च लिहून ठेवावेत. सर्वात जास्त रकमेपासून खर्च कमी करायला सुरवात करावी.
* रु. 13 हजार एवढ्याच रकमेचा खर्च करता येईल, हे आधीच पक्के ठरवावे. महिना किमान दोन हजार रुपयांची बचत किंवा गुंतवणूक करता आली पाहिजे. प्राधान्यानुसार खर्च करावा.
महागाईवर मात कशी करावी?
* आर्थिक नियोजनात दोन वर्षांनंतरच्या खर्चाच्या बाबी निश्‍चित करताना त्यामध्ये वाढत्या महागाईचा विचार केला पाहिजे.
* जमा-खर्चाची मिळवणी करताना काटकसर करण्यावरच भर दिला जातो. पण उत्पन्न कसे वाढेल, याकडेही लक्ष द्यायला पाहिजे. नोकरी करणाऱ्याला आपली क्षमता वाढवून बढती किंवा अधिक पगाराची दुसरी नोकरी मिळवता येते, तर व्यावसायिकाला जास्त कार्यक्षमता दाखवून अधिक फायदा मिळवता येईल. चांगली गुंतवणूक करूनही पैसा वाढवून महागाईवर मात करता येते.
* खर्च कमी करण्याची किंवा उत्पन्न वाढवण्याची जबाबदारी घरातील सर्वांची आहे, फक्त गृहिणीची नाही. आवश्‍यकतेनुसार प्रत्येकानेच खर्चाला मुरड घातली पाहिजे किंवा अधिक पैसे मिळविण्याचा मार्ग शोधला पाहिजे. उदा.- सुटीच्या दिवशी काम करणे, शिकवण्या करणे किंवा छोटा व्यवसाय करणे, आदी.
बचतीचे महत्त्व आणि तिचे नियोजन कसे करावे?
* वयाच्या पंचविशीतच बऱ्यापैकी पैसा हाती खेळू लागल्यानंतर मौजमजेवर अधिक पैसे खर्च होण्याची शक्‍यता जास्त. त्यामुळे याच वयापासून बचतीची सवय लागणे आवश्‍यक. 
* दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम कटाक्षाने बाजूला ठेवण्याची सवय लावून घ्यावी. कारण अडीअडचणीच्या वेळी हीच रक्कम उपयोगी पडते.
* निव्वळ काही पैसे बाजूला ठेवणे किंवा बचत करणे किंवा बॅंकेत अथवा पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे आर्थिक नियोजन नाही.
* आधी बचतीची सवय लागल्यास पुढे गुंतवणुकीची कास धरणे सोपे जाते. कारण बचतीनंतर येते ती गुंतवणूक. 
* बचतीतून उभे राहणारे पैसे तुमची तात्कालिक गरज भागवू शकतात, तर गुंतवणुकीच्या माध्यमातून दीर्घ पल्ल्याची उद्दिष्टे साध्य करता येतात.
* वाढत जाणारी महागाई, त्यायोगे वाढणारा वैद्यकीय खर्च, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न, कालांतराने गरजेची वाटू लागणारी निवृत्तीनंतरची तरतूद या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून कमावत्या वयातच आर्थिक नियोजन करावे.
* आर्थिक नियोजनातील पहिली पायरी म्हणजे आपली आर्थिक उद्दिष्ट निश्‍चित करणे.
* बचतीची सवय, गुंतवणुकीचा मनोनिग्रह, जोखीम घेण्याची मानसिकता आणि तयारी यावरच उद्दिष्टपूर्ती अवलंबून.
* गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या गरजेप्रमाणे गुंतवणूक प्रकारांचा आराखडा तयार केला पाहिजे. 
* बाजारातील विविध गुंतवणूक प्रकारांचा विचार करून आपल्या उद्दिष्टाला साजेशा गुंतवणूक प्रकारांची निवड करणे आणि त्यांचे प्रमाण निश्‍चित करणे महत्त्वाचे.
* गुंतवणुकीच्या विविध प्रकारांमध्ये 1) बॅंकेतील मुदतठेव योजना (एफ.डी.), 2) पोस्टाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या अल्पबचत योजना (नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट अर्थात एन.एस.सी., किसान विकास पत्र, मंथली इन्कम स्कीम अर्थात एम.आय.एस., रिकरिंग ठेव योजना (आर.डी.) वगैरे), 3) निवडक राष्ट्रीयीकृत बॅंका तसेच पोस्टात राबविली जाणारी पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पी.पी.एफ.) योजना, 4) सरकारी रोखे किंवा बॉंड्‌स, 5) आयुर्विमा आणि युलिप, 6) पेन्शन प्लॅन्स, 7) म्युच्युअल फंड, 8) शेअर बाजार, 9) स्थावर मालमत्ता (घर, जमीन वगैरे), 10) सोने-चांदी यांचा प्रामुख्याने समावेश.
* आपले वय आणि त्याच्या प्रमाणात जोखीम स्वीकारण्याची क्षमता यावर गुंतवणुकीचे प्रमाण ठरवावे. जर तुम्ही 40 वर्षांचे असाल तर 40 टक्के गुंतवणूक सुरक्षित व निश्‍चित उत्पन्न देणाऱ्या ठेव योजनांत व 60 टक्के शेअर बाजार किंवा त्याच्याशी जोडलेल्या गुंतवणूक साधनांत करणे योग्य. 
* जसे वय वाढत जाते तसे जोखीमपूर्ण गुंतवणुकीचे प्रमाण कमी करत जाणे श्रेयस्कर.
आर्थिक हिशेबाच्या, गुंतवणुकीच्या नोंदी कशा ठेवाव्यात?
* "टु ब्रेक रेकॉर्ड, कीप रेकॉर्ड' ही उक्ती आर्थिक नियोजनातही लक्षात ठेवावी.
* आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य होत आहे किंवा झाले आहे, हे लक्षात येण्यासाठी आर्थिक गुंतवणुकीच्या नोंदी ठेवणे आवश्‍यक आहे.
* विमा, मुदतठेवी, पोस्टातील गुंतवणूक, शेअर्स, म्युच्युअल फंड, बॉंड्‌स आदी प्रकारांतील गुंतवणुकीचे तपशील एका वहीत टिपून ठेवावेत. शक्‍य असेल तर संगणकात "एक्‍सेल शीट'मध्ये मांडणी करून "सेव्ह' करून ठेवावे. 
* पॉलिसी क्रमांक, खाते क्रमांक, ठेव पावती क्रमांक, फोलिओ नंबर, डिमॅट नंबर या महत्त्वाच्या नोंदीबरोबरच मुदतपूर्तीची तारीख, परतीची रक्कम आदींसाठी रकाने करून ते वेळच्या वेळी भरावेत. 
* यादी करताना मुदतपूर्ती म्हणजेच पैसे परत कधी मिळणार आहेत, त्या तारखेला प्राधान्य द्यावे. म्हणजे एक-एक गुंतवणूक प्रकार संपला आणि त्या बदल्यात पुन्हा नव्याने गुंतवणूक केल्यास त्याचा अग्रक्रम बदलावा. अशा यादीमुळे तुमची "आर्थिक तब्येत' एका दृष्टिक्षेपात कळू शकेल.
अपुरी मिळकत असेल तर जोड काय देता येईल? कशी? अधिक पैसा मिळविण्याच्या स्वतःच्या क्षमतांचा शोध कसा घ्यावा?
* नोकरी किंवा व्यवसायातून मिळणारी रक्कम आपला घरसंसार चालवायला पुरेशी ठरत नसेल, तर त्याला आपल्या क्षमतेनुसार जोड देता येऊ शकते.
* अशी जोड देण्यापूर्वी आपल्या हाताशी असणारा वेळ, पात्रता, मिळणारे उत्पन्न यांचा प्रामुख्याने विचार करावा.
* एखाद्या किराणा दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीला पहाटे किंवा सकाळच्या वेळेत घरोघरी वृत्तपत्रे वितरित करणे, दुधाच्या पिशव्या नेऊन देणे आदी कामे करून आपल्या मिळकतीला जोड देता येऊ शकते. 
* आजच्या काळात प्रत्येकाला नोकरी मिळणे सहजशक्‍य नाही. मात्र आपल्यातील कलागुणांना वाव देऊनदेखील चार पैसे मिळविता येऊ शकतात. उदा.- विद्यार्थ्यांच्या शिकवण्या घेणे, वाद्य वाजवायला शिकवणे, क्रीडा प्रशिक्षण देणे.
जोडधंद्याचे धाडस कोणी करावे? ते कसे पेलावे?
* धाडस हा श्रेष्ठ गुण आहे; पण आपल्याला काय करायचे आहे, काय हवे आहे, याचा निर्णय आधी करायला हवा. 
* धाडसाच्या शेवटी यश हवे असेल, तर नीट तयारी करून जोखीम घेणे जरुरीचे आहे. 
* धाडस करताना प्रसंगी जायबंदी होण्याची किंवा इतरांची सहानुभूती न मिळता जखमी होण्याची तयारी हवी.






इंटरनेटवरून साभार ....


शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०१६

बिल गेट्स बद्दल हे वाचा झोप लागणार नाही...!! .


) बिल गेट्स हा प्रत्येक सेकंदाला यु.एस.$ २५० कमावतो, म्हणजेच दिवसाला यु.एस.$ २० मिलियन, आणी यु.एस.$ 7.8 बिलीयन दर वर्षी…!
) बरं जर समजा याच्या हातुन जर हजार डॉलर हरवले तर हा माहाभाग तेशोधण्याचाही प्रयत्न करणार नाही,कारण येत्या चार सेकंदांनी हा ते कमाउन बसलेला असेल…!
) याने जर १५ डॉलर जगातल्या प्रत्येक व्यक्तीस देउन दिले, तरीही याच्या खिशात यु.एस.$ मिलियन इतकी रक्कम उरलेली असेल.
) अमेरिकेत मायकाल जॉर्डन हा सर्वात जास्त पैसे कमावणारा खेळाडु आहे. जर याने आयुष्यभर काही खाता-पीता आपले वार्षीक उत्पन्न वाचवले जे की ३० मिलीयन डॉलर इतके आहे, तरिही त्याला बिल गेट्स इतके श्रीमंत होण्यासाठी, २७७ वर्षे वाट पाहवी लागेल.
) समजा बिल गेट्स हा जर एखादा देशअसता, तर जगातला ३७ वा श्रीमंत देश होण्याचा मान याने पटकावला असता.
) विचार करा जर बिल गेट्स ने आपलापैसा डॉलर च्या नोटांमधे रुपांतरीत केला, तर तो चंद्रापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनउ शकतो. तेही एक रस्ता नाही, असे २८ रस्ते तो बनउ शकतो. पण हा रस्ताबनवायला १४०० वर्ष लागतील, आणी तेही जवळपास ८००, बोइंग ७४७ विमानांचा वापर करावा लागेल पैसा पोहचवण्यासाठी.

) बिल गेट्स आता जवळपास ५४ वर्षांचा झाला आहे, ग्रुहीत धरा तो आणखी ३५ आणखी जग़ेल, जर पुर्ण संपत्ती खर्च करायची असल्यास, वेळात त्याला दर दीवशी जवळपास मिलियन डॉलर खर्च करवे लागतील.
आता शेवट:
) मायक्रोसॉफ्ट ही प्रणाली वापरणार्या जगातल्या प्रत्येक माणसाने, जेव्हाही त्यांचा संगणककाम करायचा थांबल्यास(म्हणज ेच हॅंग झाल्यास) जर फक्त डॉलर इतका दावा मायक्रोसॉफ्ट या कंपनिवर केला, तर फक्त दिवसांच्या कालावधीत बिल गेट्स चे दिवाळे नीघेल.



Ref : कुठेतरी छानसे वाचलेले

माझ्याबद्दल