बुधवार, १० ऑगस्ट, २०१६

कशाप्रकारे एक महिला झाली ‘बिजनेस वूमन’? मीरा गुजर यांच्या यशाची दुर्मिळ कथा !




वेळ आणि परिस्थिती कधी बदलेल हे कुणालाच माहित नाही. मात्र एका सीमेपर्यंत आमच्या जीवनाची दशा आणि दिशा यावर निर्भर करते की, आम्ही खराब परिस्थितीचा सामना कसे करतो. महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात राहणा-या मीरा गुजर यांची कहाणी देखील थोडीफार अशीच आहे. वेळ आणि परिस्थितीशी लढून मीरा यांनी केवळ आपल्या कुटुंबालाच विखुरण्यापासून वाचविले, असे नाही तर पुरुषांच्या व्यवसायात स्वतःची देखील ओळख बनविली. आज मीरा एक यशस्वी उद्योजक आहेत, आणि त्यांच्या संघर्षाची कहाणी ऐकून कुणीही प्रेरित झाल्याशिवाय राहू शकत नाही.
मीरा केवळ १९वर्षांच्या होत्या, जेव्हा १९८५मध्ये त्यांचा विवाह मिलिंद सोबत झाला. कमी वयातच विवाह झाल्याने त्या आपले शिक्षण पूर्ण करू शकल्या नाही. त्यांचे सासर संपन्न होते आणि त्यांचे पती त्यांच्याकडे खूप लक्ष द्यायचे. मीरा आपल्या आयुष्यात खूप आनंदी होत्या. लग्नाच्या एका वर्षानंतरच १९८६ मध्ये त्यांना एक मुलगी झाली आणि त्याच्या दोन वर्षांनंतर १९८८ मध्ये त्यांना मुलगा झाला. मीरा यांचे कुटुंब पूर्ण झाले आणि जीवनाची गाडी हसत हसत हसत पुढे जाऊ लागली. मात्र मीराचा हा आनंद काही क्षणापुरता होता. वेळ बदलला आणि एक दिवस असे झाले की, ज्यानंतर त्यांचे आयुष्य नेहमीसाठी बदलले. ऑगस्ट १९९१ मध्ये त्यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नेहमी कुटुंबाच्या सावलीत राहणा-या मीरा यांच्यावर अचानक जबाबदारीचे ओझे आले. त्यांचे पती सिमेंटचे व्यावसायिक होते, मात्र त्याबाबत त्यांनी मीरासोबत कधी जास्त संवाद साधला नव्हता. या कामात महिलांची जास्त आवड नसते आणि असे काम नव्हते की, ज्याबाबत मीरा यांना जाणून घेण्याची गरज होती. मात्र पतींच्या निधनानंतर घरातील संपूर्ण जबाबदारी मीरा यांच्या खांद्यावर आली. मीरा केवळ २५वर्षांच्या होत्या, जेव्हा मिलिंद त्यांना सोडून गेले. दोन लहान मुलांचे पालन पोषण आणि सासु सास-यांची काळजी घेण्यासाठी पैशांची गरज होती. त्यांच्या नातेवाईकांनी दुस-या लग्नाचा प्रस्ताव ठेवला, मात्र मीरा त्यासाठी तयार नव्हते. युवर स्टोरीला मीरा यांनी सांगितले की,
“मी पतीच्या आठवणींसोबत आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करण्यासाठी तयार होते. मला केवळ या गोष्टीची चिंता होती की, मी मुलांचे पालन पोषण कसे करावे. घरची जबाबदारी कशी सांभाळावी. लवकरच लग्न झाल्यामुळे मी पदवीचा अभ्यास देखील करू शकली नाही. मी जेव्हा वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाला होती, तेव्हा माझे लग्न झाले. पतीचा देखील असा व्यवसाय होता, ज्याबाबत मला काही माहित नव्हते. सिमेंट कॉन्ट्रॅक्टर्स, डीलर्स आणि वर्कर्ससोबत काम करणे खूपच आव्हानात्मक आणि कठीण होते. मात्र घर चालविण्यासाठी काहीतरी करायचे होते. त्यासाठी मी दुस-या व्यवसायाबाबत विचार केला.” 



मीरा यांनी जेव्हा काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कमी वय आणि कुठल्याही व्यवसायाचा अनुभव नव्हता. या दोन मोठ्या समस्या होत्या, ज्यातून त्यांना बाहेर पडायचे होते. सुरुवातीस त्यांनी कम्प्युटर स्टेशनरीचे काम केले, मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यांनतर त्यांनी कँडल प्रोडक्शनचे काम केले. काही दिवसांपर्यंत सर्व सुरळीत सुरु होते, मात्र त्यामुळे जास्त फायदा होत नव्हता, ज्याने घर चालविले जाऊ शकेल. कँडल बनविण्यासाठी आवश्यक मेणा बाबत देखील बाजारात अनेक प्रकारच्या समस्या होत्या. आता त्यांच्यासमोर आपल्या पतीचा व्यवसाय सांभाळण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नव्हता. मात्र दोन लहान मुले आणि घरची जबाबदारी आणि सोबतच सिमेंटचा व्यवसाय करणे मोठी समस्या होती. या काळात मीराला तिच्या सासू सास-यांचा पाठींबा होता आणि पुन्हा एकदा मीरा यांनी या कामाला वाढविण्याचा निर्णय घेतला.मीरा सांगतात की, “मी घरातल्या एका खोलीत कार्यालय सुरु केले. मी सोबतच थोडे फार कँडल बनविण्याचे काम देखील करत होती. मात्र घर आणि कार्यालयाचे काम त्यासोबतच दोन मुलांची जबाबदारी सांभाळणे खूप कठीण होते. कधी वाटायचे की, कामात मदत करण्यासाठी कुणाला ठेवू, मात्र इतके पैसे नव्हते की मी हे करू शकते. या कठीण वेळेत माझ्या सासू सास-यांचा खूप पाठींबा मिळाला आणि मी देवाची आभारी आहे की, मला असे सासर मिळाले.” 



काही जुन्या ओळखी आणि आपल्या मनौधैर्याच्या बळावर मीरा यांनी या कामात हळू हळू पुढे सुरुवात केली. मात्र टेम्पो चालक, वर्कर्स आणि डीलर्स सोबत काम करणे, त्यांच्याशी ताळमेळ बसविणे, सिमेंट व्यवसायात सर्वात मोठ्या समस्या आहेत. मीरा यांना अशा समस्यांचा सामना करावा लागला होता. डीलर्स मिट किंवा एखाद्या कॉन्फरन्समध्ये जाण्यासाठी त्यांना खूप भीती वाटत होती, कारण तेथे एकही महिला नव्हती. मात्र त्यानंतर हळू हळू त्यांनी आपल्या भीतीवर विजय मिळविला. मीरा सांगतात की, “मी जेव्हा मी डीलर्स मिट किंवा कॉन्फरन्समध्ये जाते तेव्हा, पुरुषांच्या गर्दीत मी एकटी महिला होते. सुरुवातीस मला हे सर्व करण्यासाठी खूप भीती वाटायची. मात्र व्यवसायाला वाढविण्यासाठी त्यात सामील होणे गरजेचे होते. जवळपासच्या लोकांना खूप आश्चर्य वाटत होते. सर्वाना हेच वाटायचे की, अखेर या व्यवसायात मी काय करत आहे. मात्र माझ्या सास-यांनी सांगितले की, लोकांना काय माहित आम्हाला काय त्रास आहेत. त्यामुळे कोण काय विचार करतो आणि कोण काय म्हणत, त्यावर लक्ष देण्याची गरज नाही. ते माझे मनौधैर्य वाढविण्यासाठी माझ्यासोबत जात होते.”
हळू हळू वेळ व्यतीत होत होता आणि मीरा यांची परिस्थिती देखील बदलू लागली. लोक काय म्हणतील,समाज काय म्हणेल... या सर्व प्रश्नांना मागे सोडत मीरा यांनी आपली मेहनत व्यवसाय वाढविण्यासाठी लावला. अखेर वेळ देखील कधीपर्यंत साथ देणार नाही. वेळ जाता जाता मीरा यांचा अनुभव देखील वाढत गेला आणि त्यांना यश मिळायला लागले. मीरा एक यशस्वी उद्योजिका बनल्या. 



मीरा यांना त्यांच्या कामासाठी २००६ मध्ये महिला आणि बाल कल्याण समिती कडून आदर्श महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये त्यांना स्वयंसिद्ध पुरस्कार आणि २०१५मध्ये रोटरी क्लब कडून व्यवसाय सेवा पुरस्काराने गौरविण्यात आले. मीरा यांनी यशस्वी उद्योजिका बनण्यासाठी आपल्या कुटुंबाची जबाबदारी देखील सांभाळली. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आणि त्यांचा मुलगा व्यवसायात आज त्यांची साथ देत आहे. आज मीरा, सिमेंटचा होलसेल आणि रिटेल असे दोन्ही व्यवसाय सांभाळतात. वेळ पुन्हा एकदा बदलली. मात्र त्याला बदलले मीरा यांच्या संघर्ष आणि हार न मानण्याच्या जिद्दीने.






























by -  https://marathi.yourstory.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल