मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

'त्या' आर्चीसाठी नागराज यांनी सोडली व्यसने, वाचा त्यांच्या 'सैराट' आयुष्याची कहाणी...

दैनिक - दिव्य मराठी वेब टीम|May 20, 2016, 18:13 PM IST

Prev


·        
सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून नागराज मंजुळे या नावाबाबत सर्वांनाच एक प्रचंड असे आकर्षण निर्माण झाले आहे. प्रत्येत जण कोणत्या ना कोणत्या मार्गाने मंजुळे यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याबाबत अनेक प्रकारची माहिती समोरही आली आहे. पण ती अगदीच वरवरची किंवा त्रोटक स्वरुपाची अशी आहे

नागराज मंजुळे यांचे आयुष्य मात्र प्रचंड विलक्षण असे राहिलेले आहे. काही दिवसांपूर्वी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये नागराज मंजुळे यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्याविषयी वर्णन केले होते. विशेषतः त्यांचे बालपण हे प्रचंड चढउतारांचे राहिलेले आहे. प्रचंड व्यसनाधीनता आणि सातवीत असताना अचानक या सर्वातून बाहेर पडणे हे वाचायला वाटते तेवढे प्रत्यक्षात सोपे नाही. या मुलाखतीच त्यांच्या जीवनातील अनेक पैलू समोर आले आहेत, तेच या माध्यमातून वाचकांसाठी देत आहोत. या पैलूंच्या आधारे नागराज मंजुळे आणि त्यांच्या चित्रपटांबाबत जास्तीत जास्त समजून घेता येईल

 वडिलांनी कसे दिले नागराज यांना दत्तक.. कसे सुटले व्यसनाच्या जाळ्यातून.. यासह मंजुळ यांची संपूर्ण कथा..

(नागराज मंजुळे यांनी टिव्ही वाहिनीच्या मुलाखतीत दिलेली माहिती याठिकाणी आधार म्हणून वापरली आहे.) 

·        
असे दिले दत्तक...
नागराज यांचे वडील पोपटराव मंजुळे यांच्या मोठ्या भावाला म्हणजे बाबुराव मंजुळे यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे पोपटराव यांनी पहिला मुलगा झाला तर त्यांना दत्तके द्यायचे ठरवलेले होते. त्यांनी एकट्यांनीच तसे ठरवले होते. अगदी नागराज मंजुळे यांच्या आईलाही याबाबत माहिती नव्हते. नागराज यांच्या जन्मानंतर सगळे तुळजापूरला गेले तेव्हा त्यांनी नागराज यांना आईच्या ओटितून त्यांच्या चुलतीच्या ओटित टाकले. हे ओटीत टाकणे म्हणजेच दत्तक देणे होते. त्यावेळी नागराज दोन तीन महिन्यांचे असतील.

पुढे वाचा, दत्तक दिल्यानंतर काय होती मंजुळेंची भावना...
·          
दोन्ही वडिलांची नावे वापरतात..
नागराज दोन्ही वडिलांची नावेही वापरतात. चित्रपटांमध्ये ते नागराज पोपटराव मंजुळे असे नाव लिहितात. तर कवितांमध्ये त्यांचे नाव नागराज बाबुराव मंजुळे आहेत. आपल्यावर आई वडिलांचे प्रेम नाही म्हणूनच त्यांनी आपल्याला काकांना दत्तक दिले असे नागराज यांना लहानपणी वाटायचे. त्यांना एखाद्या गोष्टीचा राग आला तर थेट घरातून बाहेर जाऊन ते तिकडेच झोपायचे. या गोष्टीचा त्यांच्या मनावर परिणाम झाला होता.

पुढील स्लाइड्सवर वाचा, आई मुलाचं नातंच विकसित झालं नाही..
·          
आई ही आईच राहिली नव्हती..
नागराज मंजुळेंना आई मुलाचे रिलेशन पाहून नेहमी वाटते की हे आपल्याला कधीही जगता आले नाही. कारण दत्तक दिल्यामुळे त्यांची आई ही आई राहिलेली नव्हती. तर जिला दत्तक दिले ती चुलती होती, ती आई बनूच शकली नाही असे मंजुळे सांगतात. दत्तक आई वडिलांकडून मंजुळे पुन्हा त्यांच्या आई वडिलांकडे आले. पण तरीही आई-मुलाचं ते नातं विकसित झालंच नाही असे ते सांगतात.

जे येतं त्याची परीक्षाच होत नाही, वाचा, पुढील स्लाइड्सवर..
·          
गुणाकार, भागाकर जमलाच नाही
दहावीपर्यंत गणितात वजाबाकी, गुणाकार, भागाकार कळालाच नाही. मराठीच्या कविता वाचल्या नाही. इंग्रजी कसा पास झालो तेही कळत नाही असे मंजुळे म्हणतात. पण मंजुळे कॅरम खेळण्यात एक्सपर्ट होते, चित्रे छान काढायचे त्यांना रांगोळ्या काढायला फार आवडायचे, पण त्याची कुणी परीक्षाच घेतली नाही, अशी खंत नागराज मंजुळे म्हणतात.

पुढे वाचा, लहानपणीच जडली व्यसने..
·          
पैशासाठी करू लागले होते चोऱ्या..
लहानपणीच नागराज मंजुळेंना व्यसने जडली होती. चित्रपट पाहणे, ब्लू फिल्म पाहणे, दारु पिणे, क्लबमध्ये पत्ते खेळणे, भांगाच्या गोळ्या खाणे अशा अनेक प्रकारच्या वाईट गोष्टींत ते गुंतले होते. त्यामुळे त्यांना खिशात नेहमी पैसा हवा असायचा त्यासाठी ते चोऱ्या करायचे. घरातून, शेजाऱ्याच्या घरातून पैसे चोरायचे. मार्केट यार्डातून गुळाच्या ढेपी चोरून त्याची विक्री करायचे. सायकलचे टायर चोरायचे.

आवडणाऱ्या मुलीच्या धाकाने सोडली व्यसने..पुढे वाचा..
·          
जेऊरच्या शाळेने बदलले बरेच काही..
नागराज मंजुळेंची व्यसने सुटण्याची गोष्टही रंजक आहे. करमाळ्यात नागराज बिघडला म्हणून त्यांच्या वडिलांना त्यांना जेऊरच्या शाळेत टाकले. त्याठिकाणी सगळी चांगली मुले होते. कोणीही व्यसन करत नव्हते. नागराज यांच्यासाठी हे विश्व वेगळे होते. तरीही त्यांना जेऊरला करमत नव्हते. त्यामुळे शाळा बुडवून ते करमाळ्याला जायचे. पण सातवीत असताना नागराज यांना सहावीतील एक मुलगी आवडू लागली होती. मग तिला कळेल म्हणून नागराज यांनी तंबाखू खाणे, गुटखा खाणे, दारु पिणे यासह व्यसने हळू हळू कमी केली आणि यातून अगदी सहज ते बाहेर पडले. या शाळेतील चांगले मित्र सुटतील आणि आवडणाऱ्या मुलीच्या धाकाने नागराज या व्यसनांतून बाहेर पडले.

पुढे वाचा, नागराज स्वतःला समजायचे कृष्ण..
·          
रामायण, महाभारत आवडायचे
नागराज मंजुळे यांना रामायण, महाभारत खूप आवडायचे. ते स्वतःला श्रीकृष्ण समजायचे. लहानपणी मायाबाजर नावाच्या एका चित्रपटातील कृष्णाचे कॅरेक्टर मंजुळे यांना भावले होते. तो कृष्ण सर्वांना आवडायचा, हवाहवासा वाटायच.

पुढे वाचा, संघाच्या शाखेत जाण्याबाबत..
·          
खेळांच्या आकर्षणाने गाठली संघाची शाखा..
संघाच्या शाखेत चालणाऱ्या खेळांच्या आकर्षणाने नागराज मंजुळे शाखेत जायला लागले होते. नियम लावून खेळ खेळणे याचे आकर्षण त्यांना होते. कारण इतरवेळी खेळणाता गोट्या किंवा इतर खेळांमध्ये भांडणे, मारामाऱ्या होत असायच्या. त्यामुळे या खेळांसाठी ते शाखेत जाऊ लागले होते.

पुढे वाचा, वाचनातून भेटले आंबेडकर..
·          
आंबेडकरांच्या फोटोवरून वडिलांशी भांडण
दहावीनंतर नागराज मंजुळे बाबासाहेब आंबेडकरांबाबत वाचू लागले होते. बारावीत असताना त्यांनी घरातील एका देवाच्या फोटो फ्रेममधील फोटो काढला आणि त्यात बाबासाहेबांचा फोटो लावला. त्यावरून सुमारे महिनाभर नागराज आणि त्यांच्या वडिलांमध्ये वाद सुरू होते. त्यांच्या वडिलांनी तो फोटो लावायला विरोध केला कारण ते स्वतःला दलित समजतच नव्हते. एकूणच महारेतर लोक स्वतःला दलित समजत नाहीत असे मंजुळे म्हणतात. मंजुळेही फोटो लावण्यावर अडून बसले होते. मग हळू हळू पुस्तकातून नागराज मंजुळे वडिलांना समजावू लागले होते. त्यानंतर त्यांचा राग कमी झाला. पण तरीही ते पूर्णपणे मनाने तयार झाले नव्हते कारण, जात एवढी खोलवर रुजलेली होती.

पुढे वाचा, पोलिस भरतीबाबत..
·          
नकोशी होती पोलिसांची पेटी परेड
11 वीत असताना नागराज मंजुळे पोलिसांत भरती झाले. त्याठिकाणी प्रचंड व्यायाम करून घेत. पोलिसांत पेटी परेड नावाचा प्रकार असायचा. त्यात संबंधित व्यक्तीला त्याची पेटी दिलेली असायची. त्या पेटीत ब्रश, बूट, जंगल बूट, सॉक्स असे सर्व साहित्य ठेवायचे. त्या पेटीतले सामान खाली व्यवस्थित काढून सावधान मध्ये उभे राहायचे. त्यानंतर वरिष्ठ अधिकारी येतात. ते एक एक गोष्ट कुठे आहे विचारणार. भरती झालेल्या पोलिसाने ती उचलायची आणि दाखवायची. या प्रकाराने मंजुळे उदास झाले. याचा पोलिस व्हायला काय फायदा असे त्यांच्या मनात आले.

13
दिवसांत सोडली पोलिसांची नोकरी, वाचा पुढे..
·          
पोलिसांची नोकरी सोडल्याने लोक हिणवत होते..
नागराज यांचे दोन भाऊही पोलिसांत होते. त्यापैकी एक अजूनही पोलिस दलात आहे. नागराज मंजुळेंनी मात्र 13 दिवसच पोलिसात नोकरी केली. त्याठिकाणचा दिनक्रम आणि इतर गोष्टी मंजुळे यांना पटत नव्हत्या. कारण यामुळे त्यांचे वाचणे बंद झाले होते, त्यांना हवे ते करता येत नव्हते. त्यामुळे ते नोकरी सोडून पळून आले. सगळे पोलिसाची नोकरी सोडून आल्यामुळे नागराज यांना हिणवायला लागले होते.
शाळेतील मुलगी म्हणाली होती, फँड्री.. वाचा पुढे
·          
.. हा आहे फँड्रीचा अर्थ..
शाळेत बास्केटबॉल खेळत असताना एका मुलीने मंजुळे यांना फँड्री म्हटले होते. फँड्री या शब्दाचा अर्थ डुक्कर असा होतो. वडारी भाषेत डुकराला फंदी म्हणतात, तर कैकाडी भाषेत फँड्री म्हणतात. पण हाच शब्द पुढे रुळला. पण नंतर अनेकदा अनेकजण मंजुळे यांना फँड्री म्हणत. पण आज तो शब्द आपल्यासाठी मानाने उच्चारला जातो, याचा मंजुळे यांना अभिमान वाटतो.
·          
2005 मध्ये नागराज मंजुळे यांचे जन्मदाते वडील मृत पावले. त्यानंतर नागराज यांच्या जीवनात मोठ्या प्रमाणावर वैफल्य आले. शहरात (पुण्यात) आल्यावर लोक हसत त्यामुळे नागराज यांच्यात न्यूनगंड होता.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल