दिव्य मराठी वेब टीम|May 30, 2016, 19:40 PM IST
गेल्या काही दिवसात राज्यभरात सर्वाधिक चर्चा सुरू आहे ती सैराटचीच. आर्ची, परशा आणि नागराज मंजुळे हीच नावे आपल्याला सगळीकडे ऐकायला, पाहायला आणि वाचायला मिळत आहेत. या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वी ज्या प्रमाणे सर्वांना याड लावलं होतं त्याच प्रमाणे प्रदर्शनानंतरही लोक सैराट होत आहेत.
सध्या सैराटच्या निमित्ताने सर्वाधिक चर्चा सैराटची हिरोईन किंवा खरा हिरो आर्ची म्हणजे रिंकू राजगुरूची होत असली तरी या संपूर्ण चित्रपटाचे श्रेय नागराज मंजुळेचे आहे, असे म्हणायला हरकत नाही. अजय-अतुलचे संगीत खरंच वेड लावणारं आहे. पण एकूण चित्रपट असा असेल ही कल्पना नागराजची असल्यामुळे नागराजचे अधिक कौतुक करायला हरकत नाही.
पण केवळ याच चित्रपटासाठी नव्हे तर यापूर्वीच्याही पिस्तुल्या आणि फँड्रीद्वारेही त्याने सर्वांनाच धक्का दिला होता. नागराज मंजुळेंच्या तिन्ही कलाकृतींना कोणत्या ना कोणत्या प्रकारे राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यावरूनच त्यांच्या यशाचा अंदाज येऊ शकतो. नागराजच्या या यशामागचे रहस्य काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मनोरंजन क्षेत्रातील काही अभ्यासक आणि पत्रकारांशी चर्चा करून नागराज मंजुळे यांच्या चित्रपटंचा नेमका Success Mantra काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून समोर आलेले मुद्दे आज तुमच्यासमोर मांडत आहोत. श्रीपाद ब्रह्मे, महेश बर्दापूरवर या समीक्षकांनीही यात त्यांची मते मांडलेली आहेत.
·

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे नागराज मंजुळेचा Success Mantra...
·
जे
जगलं, तेच मांडतो
नागराज मंजुळेने त्याच्या चित्रपटातून नेहमी त्याचे जगणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजेच त्याने लहानपणापासून जे पाहिले तेच तो कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आणत आहे. त्यामुळे लोकांनाही ते त्यांच्या जीवनाच्या फार जवळचे वाटते.
मातीशी नाळ
नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातील पात्रांशी मातीशी नाळ जुळलेली पाहायला मिळते. जे आपल्याला शक्य वाटत नाही, ते दाखवायचे नाही असे मंजुळेंचे मत आहे. त्यामुळे हे अधिक प्रखरतेने जाणवते.
परफेक्ट कास्टींग
नागराज मंजुळेंच्या चित्रपटातील कास्टींग अगदी परफेक्ट असते. फँड्रीतील जब्या असो किंवा आर्ची आणि परशा ही पात्रे अगदी खरी असल्याचे वारंवार वाटत राहते. त्याचे कारण म्हणजे त्या वर्गातूनच मंजुळे या कलाकारांची निवड करत असतात.
संवेदनशील, कवीमन
नागराज मंजुळे हे स्वतः कवी आहेत, त्यामुळे त्यांच्या संवेदनशील मनाचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रपटांमधून दिसते. समाजातील अत्यंत गंभीर विषयावर सहज भाष्य करण्याची कला त्यांना गवसली आहे.
प्रामाणिकपणा
फँड्री चित्रपट मुळातच सामाजिक होता. पण सैराटमध्ये मंजुळेंना शेवट चांगला दाखवून सगळ्यांची आणखी वाहवा मिळवता आली असती. पण तसे न करता जे दाखवायचे आहे ते दाखवायचे हा प्रामाणिकपणा बरेच काही सांगून जातो.
माध्यमाचा योग्य वापर
दिग्दर्शकाला माध्यम गवसणं फार महत्त्वाचे असते. मंजुळेंना कॅमेऱ्याद्वारे ते गवसलं आहे. त्यामुळे आपल्याला जो विषय मांडायचा आहे, या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे तो मांडण्यात मंजुळे यशस्वी होती.
फिल्मीपणा नसतो
फार स्वप्नरंजन करून किंवा विनाकारणचा फिल्मिपणा दाखवण्याचा नागराज मंजुळेंचा प्रयत्न नसतो. सैराटमध्ये नागराजला शेवटी त्यांचे घर काहीसे बरे दाखवता आले असते. पण तसे न करता त्याने झोपडपट्टी दाखवण्याचा निर्णय घेतला. त्याचाही फायदा होतो.
सुन्न करण्याची परंपरा
फँड्रीत जब्याने शेवटी मारलेला दगड सुन्न करतो, तशीच सैराटमधील चिमुकल्याची रक्ताने माखलेली पावले. त्यामुळे चित्रपटगृहातून बाहेर पडताना व्यक्ती मनात एक अस्वस्थचा घेऊन बाहेर पडतो. ती अस्वस्थता नागराजची वारंवार आठवण करून देते.
लोकांना काहीही म्हणू द्या..
लोक काय म्हणतील याचा विचार चित्रपट बनवताना करत नाही हे स्पष्टपणे जाणवते. लोकांना कसा चित्रपट पाहायचा आहे, याऐवजी मला समाजातील कोणती स्थिती त्यांच्यासमोर मांडायची आहे, हे नागराजच्या मनात असते.
तडजोड नाही
चित्रपटातून काय मांडायचे आहे, याच्या विचाराशी नागराज मंजुळे तडजोड करत नाही. त्यामुळेच सैराटचा पूर्वार्ध एखाद्या व्यावसायिक चित्रपटासारखा आणि उत्तरार्ध आर्ट फिल्मसारखा जाणवत राहतो.