बुधवार, ३० डिसेंबर, २०१५

"आमच्या देशाची काळजी आम्ही नाहि घेणार तर कोण घेणार?"

अlशिष (बाबा आमटेंचा नातू) जपानच्या एका ट्रेन मधे चढला. ट्रेन तशी मोकळी होती. तो ज्या डब्या मधे होता त्यात जेमतेम २-३ माणसे होती. सिट मोकळे असल्यामुळे तो सरळ जाऊन समोरच्या एका सिट वर बसला. थोडा वेळ झाला तसा एक मध्यम वर्ग जपानी व्यक्ति त्याच्या शेजारीच पण एक सिट सोडुन बसला. दोन-तीन मिनटाने सहज त्याचे लक्ष त्या व्यक्तिकडे गेले तर तो त्याच्या सिटमधे काहितरी छोटी वस्तु घुसवत होता. अशिष ला जरा विचित्र वाटले म्हणुन त्याने त्याची नजर वळवुन दुसरीकडे पाहायला लागला. बराच वेळ झाला तरी ती त्या व्यक्तिचं ते काम चालुच होतं. न राहुन अशिष ने निरखुन पाहिलं तर त्याच्या हातात एक सुई दोरा होता आणि तो त्याच्या खाली फ़ाटलेली सिट शिवत होता. अlशिष ला थोडं आश्चर्य वाटलं. जेंव्हा त्याची सिट शिवुन झाली तेंव्हा अशिष ने न राहुन त्या व्यक्तिला जपानी भाषेत विचारलं. (भाषांतरीत) अlशिष : माफ़ करा पण मला प्रश्न होता ? व्यक्ति : हो विचारा कि. अशिष : तुम्ही ट्रेन चे कर्मचारी आहात का? तुम्ही सिट शिवताय म्हणुन म्हटलं. व्यक्ति : नाही. मी कुणी कर्मचारी नाही. साधा शिक्षक आहे. लहान मुलांच्या शाळेतील. दररोज ह्याच ट्रेन ने प्रवास करतो. दररोज ही सिट फ़ाटलेली पाहत असतो. आज आठवनीने सुई-दोरा आनुन शिवुन टाकली. कशी जमलीये छान ना ? (हसत हसत ) अlशिष : हो. पण तुम्ही का शिवताय ? व्यक्ति : कारण हि फ़ाटलेली सिट खुप विचित्र दिसत होती. जर उद्या कुणी बाहेरुन आलेल्या व्यक्तिने हे पाहिलं असतं तर आमच्या देशाचं नाव त्याच्या साठी खराब झालं असतं. माझा देशाचं नाव कुठे मलिन झालेलं मला आवडनार नाही शेवटी हि आमचीच संपत्ती आहे आणि आम्हालाच संभाळायची आहे. "आमच्या देशाची काळजी आम्ही नाहि घेणार तर कोण घेणार?" ट्रेन थांबली आणि "अच्छा! जातो." म्हणुन ती व्यक्ति गेली देखील. अlशिष त्या वेळी फ़क्त ’निशब्द’ होता. स्वत:च्या देशावर भरभरुन प्रेम करणाऱ्या त्या साध्या जपानी माणसाला मनातुन एक कडक सलाम ठोकला. माणुसकिचे, राष्ट्रप्रेमाचे, संस्कृतीचे धडे जगाला देणाऱ्या त्या जपानचं मुळ कशात आहे ह्याचं उत्तर अषिश ला मिळालं होतं. "संस्कार आणि संस्कृती". फुटबॉल च्या सामन्यात पराभव झाल्यानंतर, सामना बघायला आलेल्या जपानी प्रेक्षकांनी सामना संपल्यावर थांबून त्यांच्या भागातील कचरा प्लास्टिक च्या पिशव्यांत भरून साफसफाई केली. या पिशव्या बरोबर नेऊन शहरातील कचरा टाकण्या साठी केलेल्या जागांवर नेऊन टाकल्या. देश मोठे होतात ते अशा नागरिकान मुळे... ट्रक च्या मागे 'मेरा देश महान' असे लिहून नाही ....

विश्व विकलांग दिवस 3 दिसंबर .

एक पोस्टमैन ने एक घर के दरवाजे पर दस्तक देते हुए कहा,"चिट्ठी ले लीजिये।" अंदर से एक बालिका की आवाज आई,"आ रही हूँ।" लेकिन तीन-चार मिनट तक कोई न आया तो पोस्टमैन ने फिर कहा,"अरे भाई!मकान में कोई है क्या,अपनी चिट्ठी ले लो।" लड़की की फिर आवाज आई,"पोस्टमैन साहब,दरवाजे के नीचे से चिट्ठी अंदर डाल दीजिए,मैं आ रही हूँ।" पोस्टमैन ने कहा,"नहीं,मैं खड़ा हूँ,रजिस्टर्ड चिट्ठी है,पावती पर तुम्हारे साइन चाहिये।"करीबन छह-सात मिनट बाद दरवाजा खुला। पोस्टमैन इस देरी के लिए झल्लाया हुआ तो था ही और उस पर चिल्लाने वाला था ही,लेकिन दरवाजा खुलते ही वह चौंक गया,सामने एक अपाहिज कन्या जिसके पांव नहीं थे,सामने खड़ी थी। पोस्टमैन चुपचाप पत्र देकर और उसके साइन लेकर चला गया। हफ़्ते,दो हफ़्ते में जब कभी उस लड़की के लिए डाक आती,पोस्टमैन एक आवाज देता और जब तक वह कन्या न आती तब तक खड़ा रहता। एक दिन उसने पोस्टमैन को नंगे पाँव देखा। दीपावली नजदीक आ रही थी।उसने सोचा पोस्टमैन को क्या ईनाम दूँ। एक दिन जब पोस्टमैन डाक देकर चला गया,तब उस लड़की ने,जहां मिट्टी में पोस्टमैन के पाँव के निशान बने थे,उन पर काग़ज़ रख कर उन पाँवों का चित्र उतार लिया।अगले दिन उसने अपने यहाँ काम करने वाली बाई से उस नाप के जूते मंगवा लिये। दीपावली आई और उसके अगले दिन पोस्टमैन ने गली के सब लोगों से तो ईनाम माँगा और सोचा कि अब इस बिटिया से क्या इनाम लेना? पर गली में आया हूँ तो उससे मिल ही लूँ। उसने दरवाजा खटखटाया।अंदर से आवाज आई,"कौन?"पोस्टम ैन,उत्तर मिला। बालिका हाथ में एक गिफ्ट पैक लेकर आई और कहा,"अंकल,मेरी तरफ से दीपावली पर आपको यह भेंट है।" पोस्टमैन ने कहा,"तुम तो मेरे लिए बेटी के समान हो,तुमसे मैं गिफ्ट कैसे लूँ? "कन्या ने आग्रह किया कि मेरी इस गिफ्ट के लिए मना नहीं करें।" ठीक है कहते हुए पोस्टमैन ने पैकेट ले लिया।बालिका ने कहा,"अंकल इस पैकेट को घर ले जाकर खोलना। घर जाकर जब उसने पैकेट खोला तो विस्मित रह गया,क्योंकि उसमें एक जोड़ी जूते थे।उसकी आँखें भर आई। अगले दिन वह ऑफिस पहुंचा और पोस्टमास्टर से फरियाद की कि उसका तबादला फ़ौरन कर दिया जाए। पोस्टमास्टर ने कारण पूछा,तो पोस्टमैन ने वे जूते टेबल पर रखते हुए सारी कहानी सुनाई और भीगी आँखों और रुंधे कंठ से कहा,"आज के बाद मैं उस गली में नहीं जा सकूँगा। उस अपाहिज बच्ची ने तो मेरे नंगे पाँवों को तो जूते दे दिये पर मैं उसे पाँव कैसे दे पाऊँगा?" संवेदनशीलता के बिना इंसान अधूरा है। ईश्वर से प्रार्थना है कि वह सभी को संवेदनशीलता प्रदान करे ताकि संकट की घड़ी में कोई अपने को अकेला न समझे, अपितु उसे महसूस हो कि संपूर्ण मानवता उसके साथ है। विश्व विकलांग दिवस 3 दिसंबर .

अपेक्षांचे न संपणारे शेपूट

 - निमीत्त -
 एक दुकानदार रात्री दुकान बंदच करत असतो, तेवढ्यात तोंडात पाकीट धरलेला एक कुत्रा येतो. पाकिटात सामानाची यादी आणि पैसे असतात. कुत्र्याच्या पाठीवर लावलेल्या पिशवीत दुकानदार त्या वस्तू भरतो आणि 'एवढा हुशार कुत्रा कुणाचा'? या कुतुहलाने त्याच्या मागेमागे जातो. कुत्रा बस स्टॉपवर जाऊन थांबतो. हवी ती बस आल्यावर शिस्तीत बसमध्ये चढतो. त्याच्या पट्ट्यात स्टॉपच्या नावाची चिट्ठी आणि पैसे असतात. आश्चर्यचकित कंडक्टर त्याला तिकीट देतो. स्टॉप आल्यावर कुत्रा शेपूट हलवून कंडक्टरला खुणावतो, बस थांबल्यानंतर उतरतो. दुकानदारही त्याच्या मागोमाग उतरतो. कुत्रा एका बंगल्याच्या दारावर पायांनी टकटक करतो. दोन-तीनदा वाजवल्यावर दार खाडकन उघडलं जातं आणि बाहेर आलेला मालक कुत्र्याला सटकन एक फटका ठेवून देतो. कुत्रा बिचारा कुंऽकुंऽ करत शेपूट घालतो. न राहवून दुकानदार मालकाला विचारतोच. मालक संतापानं सांगतो, गधड्यानं मला उठायला लावलंच. दाराची किल्ली विसरला. अपेक्षांचं असं असतं. त्यांना अंतच नसतो. कितीही केलं तरी 'वरिष्ठ' चिडचिडलेला राहतो आणि प्रशंसेची अपेक्षा असताना टीका झाल्याने काम करणाऱ्या कनिष्ठाचा वारंवार विरस होतो. कुठल्याही जवळचा आणि रोजचा संबंध असलेल्या व्यक्ती, उदा. बॉस-सहकारी, पती-पत्नी, सासू-सून, मित्र- मैत्रिणी यांच्या आनंदामध्ये अपेक्षा हा 'पर्मनन्ट बॅरिअर'असतो. त्यातही अपेक्षांच्या दुष्टचक्राची सुरवात करणारं नातं म्हणजे पालक- मुलांचं, खूप लहानपणापासूनचं. एका ग्रुप पिकनिकमध्ये धमाल चालू असताना शलाकाताईं मात्र नाराज असतात. त्यांच्या कुठल्याच अपेक्षा पूर्ण होत नसतात. हॉटेलची खोली लहान, खिडकी पश्चिमेला नसते, जेवण घरच्यासारखं नसतं, वेळापत्रक चुकत असतं. नवरा त्यांना एकदा हाक मारून कधीचा मित्रांमध्ये मिसळलेला असतो. त्यात भर म्हणून आपली पाच वर्षांची कन्या बरबटलेल्या तोंडानं तल्लीनपणे बोटं बुडवून चॉकलेट-केक खाताना पाहून त्यांचं डोकं इतकं सटकतं की त्या जोराने किंचाळतातच. छोटी भेदरून जाते; पण आपल्या मुलीनं चारचौघांत एवढं वेड्यासारखं गचाळ वागणं त्यांच्या अपेक्षेच्या पलीकडचं असतं (आणि तिच्यावर राग काढणं शक्यही असतं.). शहाण्यासारखं वागायचं, मोठ्यांनी सांगितलेलं लगेच ऐकायचं येथपासून एवढे मार्क पडलेच पाहिजेत, स्पर्धा जिंकलीच पाहिजेपर्यंत पालकांच्या मुलांकडून असंख्य अपेक्षा असतात. चौथीतल्या रीनाची आई सांगते, अर्ध्या तासात तिचा अभ्यास संपतो. समजलेलं असतं, मार्कही चांगले पडतात. पण इतक्या कमी अभ्यासावर एवढे पडतात तर रोज तीन तास करायला काय हरकत आहे? दुसरीतल्या रोहनला ड्रॉइंगचा क्लास लावल्याच्या तिसऱ्या दिवशी वडील सांगतात, क्लास लावलाय खरा, पण तिथे काढतो तेवढंच. घरी काही करत नाही, सातत्य म्हणून नाही. अपेक्षांचा बॅरिअरमध्ये आला की असं घडतं. किती वयाच्या मुलांकडून आपण अवास्तव अपेक्षा करतोय का? लहान मुलांचं आपल्याच नादात असणं नैसर्गिकच नाही का? याचं तारतम्य सुटून जातं. मुलांच्या जागी जाता येत नाही. परिणाम काय होतात? आज स्वत:हून आवडीनं अर्धा तास अभ्यास करणाऱ्या रीनाला पुढे कदाचित पुस्तकाचीच ऍलर्जी येते. तर रोहनला 'सातत्या'चा अर्थ कळत नसतो तेव्हापासून 'आपल्यात सातत्य नाही' याचा कॉम्प्लेक्स येतो. त्या वयात पालक आदर्श असल्याने दुसऱ्याकडून अनेक अपेक्षा करायच्या आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत की टीका करायची असते, असाही संदेश (संस्कार) नकळतपणे घेतला जातो. आपल्या मुलाला काय हवंय? आवडतंय? जमतंय? याचा विचार न करता मुलांवर अपेक्षा, स्वप्नं लादली जातात किंवा दुसऱ्यांची मुलं अमुक करतात, यावर पालकांच्या अपेक्षा ठरतात तेव्हा गोंधळलेपण, न्यूनगंड आणि अपयशाशिवाय काही हातात पडत नाही. माझ्यात काहीतरी कमी आहे, अशी लहानपणी रुजलेली भावना आयुष्यभर वेगवेगळ्या रूपांत बहुतेकांना छळत राहते. आइनस्टाईन म्हणतो, 'मासा झाडावर कसा चढतो, यावरून त्याच्या हुशारीची परीक्षा होणार असेल, तर आयुष्यभर तो स्वत:ला मूर्ख समजूनच जगणार.' अशा विधानांना आपण दादही देतो; पण स्वत:च्या साचेबद्ध, अवाजवी अपेक्षा तपासल्या पाहिजेत असा बोध मात्र त्यातून घेत नाही. ही परिस्थिती बदलायची असेल तर काय करायला हवं? कुठल्याही अपेक्षांच्या- बॅरिअरशिवाय, मोकळ्या मनानं, आपल्या मुलांचं आधी निरीक्षण करायला हवं. विविध विषयांतली मजा कळण्यापर्यंत सोबत द्यायला हवी. वेगवेगळे अनुभव (एक्सपोजर) देऊन त्यांची आवड शोधायला मदत करायला हवी. मजा समजणं ही 'शिकायला' शिकण्याची 'किल्ली' असते. ती सापडल्यावर पुढे टप्प्याटप्प्याने जसं कौशल्य वाढतं, तसाच आत्मविश्वासही वाढतो. आपालक, शिक्षक किंवा सुजाण व्यक्ती म्हणून आपण नेमकं काय करायचं? नेहरूंच्या मुलांवरच्या प्रेमाच्या गोष्टी (मुलांनाच?) सांगायच्या? की नेहरूंसारखं निखळ प्रेम करायचं? व्हॉट्सऍपवर मुलांबाबतच्या सुविचारांचे मेसेजेस फॉरवर्ड करायचे? की आपल्या साकळलेल्या अपेक्षांचे बॅरिअर ओलांडून मुलांपर्यंत पोचण्यासाठी फॉरवर्ड व्हायचं? निर्णय आपणच घ्यायचा आहे.

नारायण मुर्ती यांनी लिहिलेल्या कथेचे भाषांतर. कथा खूप ह्रुदयस्पर्शी आहे जरुर वाचा!

माझी पत्नी आतून ओरडली, "आता किती वेळ तो पेपर वाचत बसणार आहात? आता ठेवा तो पेपर आणि तुमच्या लाडक्या लेकीला खायला दिलय ते संपवायला सांगा!" मामला गंभीर वळण घेणार असे दिसलं! मी पेपर बाजुला सारला आणि घटनास्थळी दाखल झालो. सिंधू , माझी एकुलती एक लाडाची लेक रडवेली झालेली होती.डोळे पाण्याने काठोकाठ भरलेले. तिच्या पुढे एक दहिभाताने पूर्ण भरलेला बाऊल होता. सिंधू,तिच्या वयाच्या मानाने शांत व समजुतदार,गोड आणि हुशार मुलगी होती. मी बाऊल उचलला आणि म्हणालो, "बाळ, तू चार घास खाशील का? तुझ्या बाबा साठी?" सिंधू, माझी बाळी;थोड़ी नरमली; पालथ्या मुठीने डोळे पुसले. आणि म्हणाली, "चार घासच नाही, मी सगळ संपविन." थोड़ी घुटमळली आणि म्हणाली, "बाबा, मी हे सगळ संपवल तर....... तुम्ही मला मी मागीन ते द्याल?" " नक्की"! तीने पुढे केलेल्या गुलाबी हातात मी हात दिला आणि वचन पक्के केले. पण आता मी थोड़ा गंभीर झालो." बाळ, पण तू कंप्यूटर किंवा दुसर एखाद महागड खेळण मागशील तर आता बाबाकडे तेवढे पैसे नाहीयेत बेटा!" " नाही बाबा! मला तस काही नको आहे!" तिने मोठ्या मुश्किलीने तो दहीभात संपवला. मला माझ्या पत्नीचा आणि आईचा खूप राग आला. एवढ्या छोट्या मुलीला कुणी एवढ खायला देतात? ते पण तिला न आवडणार. पण मी गप्प बसलो. सगळ मोठ्या कष्टाने खाऊन संपविल्यावर हात धुऊन सिंधू माझ्यापाशी आली. डोळे अपेक्षेने मोठे करून. आमच्या सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे होत्या. " बाबा, मी या रविवारी सगळे केस काढून टाकणार!" तिची ही मागणी होती. "हा काय मुर्खपणा चाललाय? काय वेड बीड लागलय काय? मुलीचे मुंडण? अशक्य!" सौ चा आवाज वाढत चालला होता! "आपल्या सगळ्या खानदानात आसल काही कुणी केल नाही!" आईने खडसावले. "ती सारखी टिव्ही पहात असते! त्या टिव्हीमुळे आपली संस्कृती आणि संस्कार वाया चालले आहेत!" "बेटा, तू दुसर काही का मागत नाहीस? या तुझ्या कृत्यामुळे आम्ही सगळे दु:खी होऊ! तुला आम्हाला बघवेल का सांग?" "सिंधू,बेटा आमचाही विचार कर!" मी विनवणीच्या स्वरात म्हटले. "बाबा, तुम्ही पाहिलत ना मला तो दहीभात संपवन किती जड जात होत ते!" आता ती रडायच्या बेतात होती. " आणि तुम्ही मला त्याबदल्यात मी मागीन ते द्यायचं कबूल केल होतत! आता तुम्ही मागे हटता आहात.मला कोणत्याही परिस्थितीत दिलेल वचन पाळणाऱ्या राजा हरिश्चंद्राची गोष्ट तुम्हीच सांगितली होती ना? आपण दिलेली वचने आपण पाळलीच पाहिजेत!" मला आता ठाम पणा दाखवणे भाग होते. "काय डोके-बिके फिरलेय काय?" आई आणि सौ. एकसुरात. आता जर मी दिलेला शब्द पाळला नाही.तर सिंधू पण दिलेला शब्द तिच्या पुढल्या आयुष्यात पाळणार नाही.मी ठरविले, तिची मागणी पूरी केली जाईल. गुळगुळीत टक्कल केलेल्या सिंधूचा चेहरा गोल असल्याने आता तिचे डोळे खूप मोठे आणि सुंदर दिसत होते. सोमवारी सकाळी मी तीला शाळेत सोडायला गेलो. मुंडण केलेली सिंधू शाळेत जाताना बघणे एक विलक्षण दृष्य होत. ती मागे वळली आणि टाटा केला मी ही हसून टाटा केला. तेंव्हाच एक मुलगा कार मधून उतरला आणि त्याने तिला हाक मारली," सिंधू माझ्यासाठी थांब. " गंमत म्हणजे त्याचे ही टक्कल केलेले होते.अच्छा, हे अस आहे तर मी मनात म्हणालो. त्या कार मधून एक बाई उतरल्या आणि माझ्या पाशी आल्या! " तुमची सिंधू किती गोड मुलगी आहे.तिच्यासोबत जातोय तो माझा मुलगा, हरीष नाव त्याचे.त्याला ल्यूकेमिया (Blood cancer)झालाय. येणारा हुंदका त्यानी आवंढा गिळून दाबला आणि पुढे म्हणाल्या, "गेला पूर्ण महीना तो शाळेत आला नाही. केमोथेरपि चालु होती. त्यामुळे त्याचे सगळे केस गळाले. तो नंतर शाळेत यायला तयारच नव्हता.कारण मुद्दाम नाही तरी सहाजिकच मुले चिडवणार. सिंधू मागच्याच आठवड्यात त्याला भेटायला आली होती. तिने त्याला तयार केले की चिडवणार्यांचे मी पाहून घेइन पण तू शाळा नकोस बुडवू. मी कल्पनाही केली नव्हती की ती माझ्या मुलासाठी आपले इतके सुंदर केस गमवायला तयार होईल. तुम्ही तिचे आईवडील किती भाग्यवान आहात. अशी निस्वार्थी आणि निरागस मुलगी तुम्हाला लाभली आहे." ऐकून मी स्तब्ध झालो.माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी मनाशी म्हणत होतो. माझी छोटीशी परी मलाच शिकवते आहे. खर निस्वार्थ प्रेम म्हणजे काय ते. या पृथ्वी वर ते सुखी नव्हेत जे स्वत:ची मनमानी करतात.सुखी तेच की जे दुसऱ्यावर जिवापाड प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी स्वत:ला बदलायलाही तयार होतात. आपल्यालाही आपल आयुष्य सिंधू सारख बदलता यायला पाहिजे....

तुमच्याकडे सर्वांत मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे "तुम्ही स्वतः" आणि तुमचा तुमच्यावरच असलेला विश्वास

एका बहुचर्चित वक्त्याने हातात ५०० रुपयांची नोट हलवत आपल्या कार्यक्रमाची सुरुवात केली. सभागृहात बसलेल्या शेकडो लोकांना त्यानं विचारलं की, “ही ५०० रुपयांची नोट कोणाला हवी आहे?” सर्वांनी हात वर केला. त्यानंतर तो म्हणाला, “मी ही नोट तुमच्यापैकी कोणातरी एकालाच देईन. पण त्यापूर्वी मला हे करू द्या.” आणि त्याने त्या नोटेला आपल्या मुठीत चुरगळण्यास सुरुवात केली आणि मग त्यानं विचारलं, “कोण आहे ज्याला अजूनही ही नोट हवी आहे?” अजूनही लोकांचे हात वर येत होते. “बरं!” तो म्हणाला, “जर मी ही नोट पायाने चुरगळली तर किती जण ही नोट घेतील?” यावेळी मात्र त्या नोटेची अवस्था बिकट झाली होती. ती खूपच मळकटली आणि चुरगळली होती, तरीही अनेक लोकांनी हात वर केला. मित्रांनो, आज तुम्ही अत्यंत महत्त्वाचा धडा घेतला आहे. मी या नोटेबरोबर इतका वाईट व्यवहार केला, तरीही तुम्ही या नोटेला घेऊ इच्छिता. कारण हे सगळं होऊनदेखील या नोटेची किंमत कमी झालेली नाही. तिची किंमंत अजूनही पाचशे रुपयेच आहे. आयुष्यात कित्येक वेळा आपण पडतो, आपल्यासाठी आपण घेतलेले निर्णय आपल्याला जमिनीवर पाडतात. आपल्याला असं वाटू लागतं की, आपली काहीच किंमत नाही. पण भलेही तुमच्याबरोबर काहीही झालं असेल किंवा भविष्यात होणार असेल तरी देखील तुमची किंमत कमी होत नाही. तुमच जीवन कितीही चुरगळलेल असू दे पण जीवनाची घडी नीट घाला. तुम्ही विशेष आहात हे कधीच विसरू नका. आपल्या भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींमुळे आपल्या भविष्यात होणाऱ्या चांगल्या गोष्टींवर परिणाम होऊ देऊ नका. स्वत: घेतलेल्या निर्णयाशी स्वत:चीच हार होऊ देवू नका, पुर्ण मेहनत करत चला, वेळ लागेल, तुम्ही नक्कीच जिकंणार, फक्त करून दाखवा, जग तुम्हाला जिकंताना बघायला तयार आहे. फक्त संयम ठेवा, लक्षात ठेवा, तुमच्याकडे सर्वांत मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे "तुम्ही स्वतः" आणि तुमचा तुमच्यावरच असलेला विश्वास
" दिवसात तुम्हाला एकही समस्या आली नसेल , तर तुम्ही चूकीच्या रस्त्यावरून जात आहात , असे समजावे ..." -- स्वामी विवेकानंद 

" जेव्हा एखाद्याला वाटत असेल , की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही ,तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही , असे समजावे ..." -- आईन्स्टाईन 

" प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे , हे खूपच धोकादायक होय ..." -- अब्राहम लिंकन 

 " प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो. मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही..." -- लिओ टॉलस्टॉय 

" इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळख , ईतरांपेक्षा जास्त काम करा. आणि ईतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत ..." विल्यम सेक्स्पिअर 

" हरल्यावर आपण का हरलो ? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते ; मात्र जिंकल्यावर स्पष्टीकरणाचा एक शब्दही द्यावा लागत नाही..." -- अँडॉल हिटलर 

" जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे , असे नसते . एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय ..." -- बोनी ब्लेअर

ये है सियासत...

बाप: मै तुम्हारी शादी अपनी मर्जी से करूँगा.

 बेटा:नही. 

बाप: लड़की अम्बानी की बेटी है. 

बेटा: फिर ठीक है. 
बाप अम्बानी के पास गया 

बाप:मै तुम्हारी बेटी को बहू बनना चाहता हु. 

अम्बानी: नही.

बाप:मेरा बेटा वल्ड बैक का C.E.O है. 

अम्बानी: फिर ठीक है. 
बाप वल्ड बैक के President के पास जाता है. 

बाप: मेरे बेटे को वल्ड बैक का C.E.O बना दो. 

प्रेसीडेंट: नही. 

बाप:मेरा बेटा अम्बानी का दामाद है. प्

रेसीडेंट:फिर ठीक है. 

ये है सियासत नौकरी भी मिली और छोकरीभी-

पुणेकर™ !

एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात.
खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की, "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत". नवरा म्हणतो साबण संपला असेल. दुसऱ्या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की, "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत" कदाचित तिला कपडे चांगले धुतायेत नसतील. नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते. 

एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्याला म्हणते "अहो ऐकलंत का? समोरच्या वहिनी सुधारल्या. त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते. आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत" तेवढयात नवरा बोलतो "राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या. काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते. परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती. समोरचे नाही आपणच सुधारलोय. आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्यांकडे पाहिले पाहिजे. 

नेहमी नजरिया चांगला ठेवा,

जग खुप सुंदर आहे.
एक आदमी ने भगवान बुद्ध से पुछा : जीवन का मूल्य क्या है? बुद्ध ने उसे एक Stone दिया और कहा : जा और इस stone का मूल्य पता करके आ , लेकिन ध्यान रखना stone को बेचना नही है I वह आदमी stone को बाजार मे एक संतरे वाले के पास लेकर गया और बोला : इसकी कीमत क्या है? संतरे वाला चमकीले stone को देख कर बोला, "12 संतरे लेजा और इसे मुझे दे जा" आगे एक सब्जी वाले ने उस चमकीले stone को देखा और कहा "एक बोरी आलू ले जा और इस stone को मेरे पास छोड़ जा" आगे एक सोना बेचने वाले के पास गया उसे stone दिखाया सुनार उस चमकीले stone को देखकर बोला, "50 लाख मे बेच दे" l उसने मना कर दिया तो सुनार बोला "2 करोड़ मे दे दे या बता इसकी कीमत जो माँगेगा वह दूँगा तुझे.. उस आदमी ने सुनार से कहा मेरे गुरू ने इसे बेचने से मना किया है l आगे हीरे बेचने वाले एक जौहरी के पास गया उसे stone दिखाया l जौहरी ने जब उस बेसकीमती रुबी को देखा , तो पहले उसने रुबी के पास एक लाल कपडा बिछाया फिर उस बेसकीमती रुबी की परिक्रमा लगाई माथा टेका l फिर जौहरी बोला , "कहा से लाया है ये बेसकीमती रुबी? सारी कायनात , सारी दुनिया को बेचकर भी इसकी कीमत नही लगाई जा सकती ये तो बेसकीमती है l" वह आदमी हैरान परेशान होकर सीधे बुद्ध के पास आया l अपनी आप बिती बताई और बोला "अब बताओ भगवान , मानवीय जीवन का मूल्य क्या है? बुद्ध बोले : संतरे वाले को दिखाया उसने इसकी कीमत "12 संतरे" की बताई l सब्जी वाले के पास गया उसने इसकी कीमत "1 बोरी आलू" बताई l आगे सुनार ने "2 करोड़" बताई l और जौहरी ने इसे "बेसकीमती" बताया l अब ऐसा ही मानवीय मूल्य का भी है l तू बेशक हीरा है..!! लेकिन, सामनेवाला तेरी कीमत, अपनी औकात - अपनी जानकारी - अपनी हैसियत से लगाएगा। घबराओ मत दुनिया में.. तुझे पहचानने वाले भी मिल जायेगे।
फेब्रुवारी 2006 मधली घटना आहे ही; सहा वर्षांपूर्वीची. घटना खूपच बोलकी, प्रेरणादायी आहे. त्यावेळी भारताचा संघ – क्रिकेटचा – पाकिस्तानच्या दौर्याधवर होता. या दौर्याीत भारत पाच एकदिवसीय सामने खेळणार होता; त्यातला तिसरा सामना चालू होता. पाकिस्तानने प्रथम फलंजाजी करत धावांचा डोंगर उभा केला होता; पण भारतानेही मोठय़ा दणक्यात सुरुवात करून या डोंगराएवढय़ा धावांचा पाठलाग सुरू केला होता. त्यात सिंहाचा वाटा उचलला होता सचिनने. त्या दिवशी त्यानं अक्षरशः पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढली होती. शोएब अख्तर नावाच्या रावळपिंडी एक्सप्रेसच्या तर त्यानं चिंधडय़ा उडवल्या होत्या. खरोखरीच त्यादिवशी सचिनची बॅटिंग पाहणं हा एक नेत्रोत्सव होता. बघता बघता तो शतकाच्या उंबरठय़ावर पोहोचला होता; पण… पण दुर्दैवानं तो 95 धावांवर बाद झाला! त्याचं शतक हुकलं होतं खरं, पण विजयासाठी एक भक्कम लाँचिंग पॅड त्यानं उभं केलं होतं, आणि त्या समाधानातच तंबूत परतल्यावर त्यानं पॅडस् उतरवून थेट स्नानगृह गाठलं होतं. तिकडं मैदानावर सामना रंगला होता आणि इकडं सचिन शॉवरखाली उभा होता. अचानक त्याला प्रचंड आरडाओरडा आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट ऐकू आला. त्यानं आतूनच ओरडून विचारलं; “काय झालं?” बाहेर हरभजनसिंगला हे ऐकू गेलं. त्यानंही तिथूनच ओरडून सांगितलं; “अपने माहीने चौका लगाया है यार!” “माही” म्हणजे महेंद्रसिंग धोनी. सचिन खूश. मध्ये काही सेकंद गेले. पुन्हा बाहेर गलबला. पुन्हा सचिनची विचारणा; “क्या हुआ?” आता हरभजन कॉमेंट्रेटर झाला होता. तो ओरडला; “एक और चौका.” मग मात्र सचिननं ठरवलं; “आता इथून हलायचं नाही. शॉवर बंद करायचा नाही. शॉवरखालीच उभं राहायचं!” मग काय, बाहेर मैदानावर मॅच सुरू, धोनी आणि युवराज पाकिस्तानी बोलर्सवर तुटून पडलेले, प्रेक्षकांनी मैदान डोक्यावर घेतलेले आणि तिकडे आतमध्ये सचिनने शॉवर डोक्यावर घेतलेला. किती वेळ? 15 मिनिटे? अर्धा तास? छे! मॅच जिंकेपर्यंत, तब्बल 45 मिनिटे सचिन शॉवरखाली उभा होता! याला कुणी अंधश्रद्धाही म्हणतील! पण मला तरी यात एकच गोष्ट दिसतीये, आणि ती म्हणजे सचिनचं अफाट क्रिकेट प्रेम! त्याचं टीम स्पिरीट. त्याचं देश प्रेम! अवघ्या 5 धावांनी शतक हुकलं म्हणून रडत न बसता संघ जिंकावा म्हणून 45 मिनिटं शॉवरखाली उभे राहणारा, संवेदनशील, भावुक मनाचा सचिन.
रडगाणं का गाता? वयाच्या १३ व्या वर्षी एरिकला अंधत्व आलं होतं. आयुष्य जसं भरकटत नेईल तसं भरकटत जाण भाग होतं. पण एरिकने आहे ते स्विकारलं होतं. आपल्या मर्यादांच्या परिघात राहून आपण काय करू शकतो हे त्याने शोधायला सुरुवात केली. परिस्थितीने त्याला इतकं कणखर बनवलं कि एक दिवस त्याने हिमालयातील सर्वोच्य शिखर एवरेस्टलाच गवसणी घालायचा निर्धार केला. आपल्त्या प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावर एरिकने आपलं स्वप्नं खरं करून दाखवलंच. २५ मे २००१ रोजी वयाच्या ३३ व्या वर्षी त्याने एवरेस्टवर आपल्या देशाचा झेंडा फडकवला आणि एवरेस्ट शिखर सर करणारा तो जगातील पहिला दृष्टिहीन माणूस ठरला. त्या दिवशी जगातील करोडो अंधांना त्याने जगण्याची एक नवीन उमेद दिली. एरिक विहेनमेयरच्या त्या अफाट जिद्दीला आणि त्याच्या त्या महान कर्तुत्वाला माझा त्रिवार सलाम ! लहानपणी फूटबॉल, बास्केटबॉल खेळायची त्याला आवड होती. अंधत्वामुळे तो कुस्तीकडे वळला. त्यात त्याने इतकं नैपुण्य मिळवलं कि तो पुढे कुस्तीचा कोच झाला. एका शिबिरात त्याचा रॉक क्लायम्बिंगशी परिचय झाला. या क्रीडा प्रकारात त्याचं अंधत्व आड येत नव्हतं. त्याचं पुढचं पाउल होतं गिर्यारोहणाच. त्यामुळे लवकरच एरिक आफ्रिकेपासून अर्जेन्टिनापर्यंत पर्वत शिखर सर करू लागला. एवरेस्ट त्याच्यासाठी तरीही खूप लांबचं स्वप्नं होतं. मात्र आपण अजिबातच प्रयत्न न करण्यापेक्षा अपयश आलेलं परवडलं असा विचार करून तो प्रयत्नाला लागला. जेव्हा प्रत्यक्ष ती वेळ जवळ आली तेव्हा एरिककडे प्रचंड आत्मविश्वास होता. अपेक्षेप्रमाणे मार्ग खूप खडतर आणि धोकादायक होता. त्याच्या टीममधले सर्व सहकारी त्याला ओरडून दिशा सांगायचे. पण जितक्या अधिक उंचीवर ते पोहोचायचे तेव्हा प्रत्येकालाच आपल्या जीवाची काळजी असायची. खराब हवामानामुळे अनेक गिर्यारोहक माघारीही परतले. तरीही एक दृष्टिहीन माणूस चिकाटीने मार्गक्रमण करीतच राहिला. सतत दोन महिने अथक चढाई केल्यावर शेवटची ४५ मिनिटं म्हणजे केवळ खडी चढणच होती. जेव्हा ती चढण त्याने पार केली तेव्हा त्याने एक नवा इतिहास घडवला होता. आज एरिक दीर्घ पल्याच्या मोटार बाईक स्पर्धा, मेरोथान, स्काय डायविंग अशा विविध क्रीडा प्रकारात पारंगत आहे. मित्रानो, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं रडगाणं का गाता ? एरिककडे डोळे नव्हते पण त्याच्याकडे हात आणि पाय तर होते. एखादी गोष्ट आपण साध्य करू शकतो हा दृढ विश्वास तर होता. अमुक एक गोष्ट साध्य करण्यासाठी तुम्ही कुणी खास हिरो असण्याची आवश्यकता नसते. त्यासाठी तुम्ही फक्त प्रेरणेनी भरलेली एक सामान्य व्यक्ती असावं लागतं.
खरा जॉनी लिव्हर.... जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून गाजलेल्या धारावीमद्धे १०-१२ वर्षाचा, काळा सावळा आणि दिसायलाही ओबड धोबड असा जॉन प्रकाश लहानाचा मोठा झाला. घरात पाच भावंड होती. तीन बहिणी आणि दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा आणि घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली. २-३ वर्ष तो मुंबईला रस्त्यावर पेन विकायचा. तेव्हा तो वेगवेगळ्या सिने कलाकारांचे आवाज काढायचा. त्यामुळे पेन खरेदी करण्यासाठी नव्हे तर ते आवाज ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची. त्याचे वडील हिंदुस्तान लिवर मध्ये मजुरी करायचे. त्यांनी त्यालाही वयाच्या १२ व्या वर्षी मजूर म्हणून तिथे चिकटवला. लंच टाईममद्धे तो मिमीक्री करून कामगारांची खूप करमणूक करायचा. त्यामुळे तो सर्वांचाच आवडता झाला होता. धारावीमद्धे सगळ्याच गणेशोत्सवात त्याला मिमीक्रीसाठी बोलावलं जाई. पोट धरून हसायला लावणारी त्याची कॉमेडी ऐकून श्रोते त्याच्यावर अक्षरशः फिदा होत. अनेकांनी त्याला शोसाठी आमंत्रण दिल. कंपनीमद्धेही विशेष समारंभ असला कि आपली कला सादर करायचा. कामगारांनी तर आपल्या हिंदुस्तान लिवर कंपनीमधील लिवर त्याच्या नावाला जोडून त्याला " जॉनी लिवर " हे टोपण नाव दिलं. तेव्हा जॉनी लिवर हे नाव देशातील लाखो करोडो लोकांना पोट धरून हसायला लावणार आहे आणि तो शेकडो चित्रपटात अभिनय करणार आहे असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसणार. अनेक ठिकाणी मिमीक्रीचे शो केल्यामुळे एक दिवस जॉनी लिवर संगीतकार कल्याणजी आनंदजीच्या नजरेस पडला. त्याच्या मिमीक्रीवर ते इतके फिदा झाले कि त्यांनी त्याला आपल्या " कल्याणजी आनंदजी शो " साठी परदेश दौर्यावर नेलं आणि जॉनी लिवर नाव देश विदेशातही गाजू लागलं. आजही जॉनी लिवर त्यांना आपला " गोडफादर " मानतो. त्यांच्यामुळेच त्याला १९८० मध्ये चित्रपटात भूमिका मिळाली. पण मिमीक्री कलाकार चांगला कलाकार असू शकत नाही असा ठाम समज असलेल्या बॉलीवूडने त्याला नंतर भूमिका दिल्या नाहीत. तब्बल बारा वर्षे त्याला त्यासाठी अथक संघर्ष करावा लागला. १९९२ मध्ये आलेल्या बाजीगर मधील त्याच्या भूमिकेमुळे अनेक निर्माते त्याचे उंबरठे झिजऊ लागले होते. तब्बल १३ वेळा त्याला फिल्म फ़ेअरसाठी नामांकित करण्यात आलं. दोन वेळा त्याला ते मिळालही. तोपर्यंत जॉनी एका चित्रपटासाठी मोजून तीस लाख घेऊ लागला होता. दर वर्षी तो ५-६ चित्रपटात तरी असायचाच. यशाच्या शिखरावर असतानाही तो आपल्या धारावीतील गरीब मित्रांना खूप मदत करायचा. कोणाच्याही अडी अडचणीला सढळ हाताने मदत करायचा. तब्बल ३०० चित्रपट त्याने विनोदी भूमिका केल्या. जॉनीचं विमान गगनात भरारी घेतच होतं. पण अकस्मात त्याच्यावर आभाळच कोसळलं. त्याच्या १० वर्षाच्या मुलाला २००० मध्ये कॅन्सर झाला आणि जॉनी कोसळून पडला. मुलाच्या मानेवरील ट्युमर दिवसे दिवस वाढू लागला. आणि जॉनीने काम करणच बंद केलं. नानावटी हॉस्पिटल मधील डॉक्टरनी ट्युमर काढला तर मुलाला परालीसीस किंवा त्याची वाचा जाऊ शकते हे सांगितलं त्या दिवशी देशातील करोडो लोकांना पोट धरून हसवणारा जॉनी ढसा ढसा रडला. मानेवरचा ट्युमर मुलगा शाळेत जाताना कॉलरमागे लपवायचा तेव्हा जॉनी शोकाकुल व्हायचा. एक दिवस त्याला कोणीतरी अमेरिकेतील डॉक्टर जतिन शाहचं नाव सांगितलं आणि जॉनी आपल्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला. त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पण देवाची प्रार्थना करायला सांगितली. त्या दिवशी जॉनी देवाला अक्षरशः शरण गेला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने देवाकडे मुलासाठी प्रार्थना केली. आणि खरोखरच जॉनीला देव पावला. ऑपरेशन यशस्वी झालं. त्यानंतर मुलगा बरा झाला. त्या दिवसापासून जॉनीने कधी दारूला स्पर्श केला नाही. सिगारेट कधी हातात धरली नाही. डोक्यात कधी वाईट विचाराना थारा दिला नाही. मित्रानो, तुम्ही कुठल्या परिस्थितीत जन्मला यामुळे खरं तर काही फरक पडत नाही. तुमच्यातील अंगभूत गुणच तुम्हाला यशाकडे घेऊन जात असतात. फक्त त्या गुणांना चांगलं खत पाणी घालून प्रचंड मेहनत घ्यायची एवढच लक्षात ठेवायचं. कठीण परिस्थितीत जॉनी लिवरने जे यश मिळवलं ते तुम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील. आणि संकटाचा सामना करताना देवावर विश्वास ठेऊन हिम्मत न हारता लढत राहण्याचं बळ देईल.
आयुष्य म्हटलं कि संघर्ष आलाच. मिल्खा सिंग हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी देशाची फाळणी झाली, अन अक्षरशः हजारो लोकांची कत्तल झाली. लाखो निर्वासितांचे संसार उध्वस्त झाले. बारा वर्षाच्या त्या पोराने आपल्या डोळ्यादेखत आपल्या आई वडिलांची, आपल्या भावाची, बहिणींची आणि आप्तांची कत्तल होताना पाहिली. आभाळच फाटल्यावर ढिगळ तरी कुठे कुठे म्हणून लावणार ? दुःखाचा डोंगर खांद्यावर घेऊन मोठ्या हिमतीने, मोठ्या जिद्दीने तॊ उभा राहिला, तेव्हा ह्या अफाट जगात मिल्खा सिंघच्या सभोवताली गडद अंधार होता. त्याच्या जीवनाला न कुठली दिशा होती, न कुठलं भविष्य. पण ईश्वरावर त्याची प्रचंड श्रद्धा होती. त्या श्रद्धेच्या बळावरच त्याने एक स्वप्नं पाहिलं- केवळ देशातीलच नव्हे तर जगातील एक उत्कृष्ट धावपटू होण्याचं. त्याने आपलं स्वप्नं तर साकार केलंच, पण देशातील लाखो निर्वासितांना त्याने जगण्याची एक नवीन उमेद दिली. मिल्खा सिंघच्या त्या अफाट जिद्दीला, त्याच्या त्या भव्य स्वप्नाला माझा त्रिवार सलाम ! बारा वर्षाचा मिल्खा निर्वासितांच्या छावणीत दाखल झाला, अन तिथे त्याला वाईट मुलांची सागत लाभली. त्या संगतीने तो चोरऱ्यामाऱ्या करू लागला. आयुष्य भरकटत चाललं होतं. दहा बारा वर्षाच्या त्या कालखंडाने त्याला अट्टल गुन्हेगारीकडे वळवलं होतं. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच घडवायचं होतं. गावातल्याच एका तरुणीच्या प्रेमात तो पडला, अन त्याने गुन्हेगारीकडे कायमची पाठ फ़िरवली. मिलिटरी मद्धे प्रवेश घेण्यासाठी त्याला अक्षरशहा कसरतच करावी लागली. सतत तीन वेळा तो अपयशी ठरला. चौथ्या प्रयत्नात मात्र तो यशस्वी ठरला. मिलिटरीत दाखल होणं त्याच्या आयुष्याचा टर्निंग पोईंट ठरला. तिथेच त्याचा परिचय काही नामांकित धावपटूशी झाला. आणि आपणही एक उत्कृष्ट धावपटू व्हायचं स्वप्नं त्याने उराशी बाळगलं. तेव्हा त्याच्या समोर अनंत अडचणी उभ्या ठाकल्या होत्या. तो त्या सर्वाना पुरून उरला. बघता बघता त्याने २०० मीटर्स आणि ४०० मीटर्समद्धे राष्ट्रीय उच्चांक प्रस्थापित केले. कधी आशियाई स्पर्धा, तर कधी राष्ट्रकुल स्पर्धा, तर कधी ऑलिम्पिक स्पर्धा मद्धे भाग घेऊन त्याने भारताचा झेंडा अटकेपार फडकत ठेवला. संपूर्ण जगातल्या प्रत्येक स्पर्धेमद्धे भाग घेऊन मिल्खा एक ते तीन क्रमांक मिळवत राहिला. कुठल्या सोयी, सुविधा नसतानाही मिल्खा जीव तोडून मेहनत करत राहिला. ४०० मीटर मधील विश्व विक्रमही त्याने मोडला. कधी कधी तर तोंडातून रक्त सांडेपर्यंत तो प्रचंड मेहनत घ्यायचा. पैसा कमावणं त्याचं ध्येय नव्हतं. तर देशाचं नाव साऱ्या जगात गाजावं हि त्याची मनीषा होती. रोम ऑलिम्पिकमद्धे जबरदस्त स्पर्धा झाली. तिसर्या क्रमांकासाठी मिल्खाने ४५.६ अशी वेळ दिली तर प्रतिस्पर्ध्याने ४५.५ सेकन्द. त्या एका क्षणाला मिल्खाने मान वळवून त्याच्याकडे पाहिलं नसतं तर त्याच्या पदरी कांस्य पदक पडलं असतं. मिल्खाला ती हळहळ मग कायम टोचत राहिली. तरीही त्याने केलेल्या भीम पराक्रमाने प्रेरित होऊन पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्याला भेटायला बोलावलं. त्याचा पद्मश्री किताबाने सन्मान केला. अन त्याला भारत पाकिस्तान संबंधामधील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानमद्धे जाउन पाकिस्तानच्या गाजलेल्या खेळाडूशी स्पर्धा करण्याची विनंती केली. ज्या पाकिस्तान ने त्याच उभं आयुष्य उध्वस्त केलं होतं, त्या पाकिस्तानात जायला मिल्खा तयार नव्हता. पण पान्दिताजीना नकार देणं त्याला जड गेलं. त्याने स्पर्धेत भाग घेतला तेव्हा पुरा देश रेडियोवर त्या स्पर्धेचे समालोचन कान देऊन ऐकत होता. मिल्खाने ती स्पर्धा मोठ्या रुबाबात जिंकली , तेव्हा पंडितजींनी पुर्या देशाला त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करून आपला आनंद व्यक्त केला. आजही 84 वर्षाचे मिल्खा सिंग फाळणीच्या आठवणींनी व्यथित होतात. त्यांचा मुलगा जीव मिल्खा सिंग आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ खेळाडू आहे. मित्रानो, आयुष्य म्हटलं कि संघर्ष आलाच. कधी दुःखाचा डोंगर कोसळून होत्याचं नव्हतं होईल याचा नेम नाहि. अशावेळी मिल्खा सिंग यांची कहाणी तुम्हाला नक्कीच एक नवीन सामर्थ्य देणारी ठरेल यात तिळमात्र शंका नाहि. त्यांच्या जीवनावर आधारित " भाग मिल्खा भाग " हा चित्रपट " रंग दे बसंती " हा नितांत सुंदर चित्रपट देणाऱ्या राकेश मेहराने सादर केला आहे. तो अवश्य पाहा
रचंड इच्छा शक्तीच्या बळावर प्रेम गणपती वयाच्या १७ व्या वर्षी रिकाम्या खिशाने प्रेम गणपती तमिळनाडूतून मुंबईत आला तेव्हा त्याला हिंदी, इंग्लिश धड बोलता येत नव्हतं आणि डोसाही बनवता येत नव्हता. तरीही आपल्या प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावर गेल्या २० वर्षात त्याने ३० कोटींचे डोसा साम्राज्य उभे केले. १०० वेग वेगळ्या प्रकारचे डोसे उपलब्ध असलेल्या प्रेमकडे आज " डॉक्टर डी. "नावाने त्याच्या डोशाची फ्रान्चैसी घ्यायला देश विदेशातही मागणी आहे. मुंबईत पहिली दोन वर्षे त्याला खूप धक्के खावे लागले. छोटी मोठी कामे केल्या नंतर हजार रुपयांची भांडी कुंडी घेवून दीडशे रुपये भाड्याच्या हात गाडीवर वाशी स्टेशन समोर इडली-डोशाचा व्यवसाय सुरु केला. मदतीसाठी धाकट्या दोन भावनाही गावाकडून बोलावून घेतलं. दर्जा, स्वच्छता, आणि टाप टीप कपडे यामुळे रस्त्या वरच्या या स्टोलला लोकांची पसंती मिळू लागली. हळू हळू महिना २० हजार पर्यंत कमाई होऊ लागली. अखेर १९९७ मध्ये वाशी मधेच ५० हजारांचे डिपोझीट भरून ५ हजार भाड्याने जागा घेऊन " प्रेम सागर डोसा प्लाझा " हे स्वतःचे रेस्तारो सुरु केले. ग्राहका मधल्या कॉलेज विद्यार्थ्या सोबतच्या मैत्रीतून इंटरनेटची ओळख करून घेत जग भरातील नव नवीन रेसिपीज शिकून घेत डोशांचे शंभराहून अधिक प्रकार त्यांनी ठेवायला सुरुवात केली आणि सेंटर वन मोल मधेही रेस्तारो सुरु केलं. डोसा प्लाझा च्या लोकप्रीयते मुळे ठीक ठिकाणाहून फ्रान्चैसी साठी विचारणा सुरु झाली, आणि बघता बघता ११ राज्यात आणि न्युझीलंड व दुबई मध्ये मिळून २६ आउटलेट उभी राहिली आहेत. "डॉक्टर डी." ची ब्रांडवाल्यु येत्या काळात १०० कोटी हूनही अधिक झाली तर आश्चर्य वाटायला नको. मित्रानो, तुम्हालाही आयुष्यात काही तरी नेत्रदीपक कामगिरी करता यावी म्हणून मी अशा कर्तबगार लोकांची माहिती आपल्या पर्यंत पोहोचविण्याचा अन त्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळावी म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे.
त्यांचा संघर्ष कित्येक दशकं सुरूच राहिला. तैब मेहता दोन वेळच्या जेवणाचीही जेव्हा भ्रांत होते, तेव्हा कुठलाही माणूस अगतिक होतो. त्याचीही अवस्था तशीच झाली होति. एक दिवस तो आपल्याया पत्नीला म्हणाला देखील कि, " आपण उपाशी मरणार आहोत " पतीच्या त्या शब्दांनी व्यथित झालेल्या त्या देवीसमान पत्नीने तशाही परिस्थितीत चेहऱ्वर स्मित आणून त्याला धीर देत म्हटलं - " ठीक आहे, आपण एकत्र उपाशी मरू " तैब मेहता महान कलाकार होते. त्यांच्या चित्रकारीमद्धे एक अनोखी जादू होती.पण आयुष्यभर ती कुणाला कळलीच नाहि. आणि जेव्हा ती कळली तेव्हा तैब मेहता 75 वर्षाचे झाले होते. संपूर्ण जगातील कलाकारांनी त्यांच्या कर्तुत्वाला सलाम केला होता आणि रसिकांनी त्यांच्यावर करोडो रुपयांचा वर्षाव केला होता. आयुष्यभर पैशासाठी वणवण भटकणाऱ्या तैब मेहतांनी खूप पैसे कमवायचं स्वप्नं कधीच पाहिलं नव्हतं, पण आपल्या कलेची कदर इतक्या प्रदीर्घ काळानंतर घेतली जावी याचं शल्य मात्र त्यांना जरूर होतं. तरीही दशकानुदशके आपली कला सातत्याने जोपासून एक दिवस तरी आपल्या कलेची कदर दुनियेला घ्यावीच लागेल हा दृढ विश्वास उरी बाळगून शेवटपर्यंत चित्रकारी करणाऱ्या तैब मेहताना माझा त्रिवार सलाम ! चित्रकलेकडे पैसा मिळवण्याचं एक साधन म्हणून त्यांनी कधीच पाहिलं नाहि. कलाकारातल्या खऱ्या उर्मीने चित्र रेखाटणाऱ्या कलावंताच्या जातकुळीतले ते चित्रकार होते. सुरुवातीला ते मुंबईच्या फ़ेमस स्टुडियोमद्धे फिल्म एडिटर होते. पण नंतर त्यांनी जेजे स्कूल ऑफ अप्लाइड आर्ट मधून पदवी घेतली आणि स्वतःला चित्रकारीमद्धे झोकून दिलं. कोणीही रसिक त्यांच्या कलेची दखल घेत नसतानाही त्यांनी एकामागून एक चित्र कॅनवासवर रेखाटली. पण त्यातून त्यांची मिळकत शून्य होति. पत्नी काम करून घर चालवत होती. आणि त्यांच्या पाठीशी हिमालयासारखी उभी होती. अखेर बारा वर्षांनी त्यांची चार चित्र अवघ्या तीस अमेरिकी डॉलर्सना विकली गेली. नंतर त्यांचा संघर्ष कित्येक दशकं सुरूच राहिला. वयाच्या 75 व्या वर्षी " सेलिब्रेशन " नावाचे खोलीच्या आकाराचे भव्य चित्र तब्बल तीन लाख अमेरिकी डॉलर्सना विकलं गेलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच एका भारतीय चित्रकाराची दखल घेतली गेल्यामुळे सर्वांनाच ती कौतुकास्पद गोष्ट वाटली होती. त्यानंतर त्यांच्या " महिषासुर " ची विक्रमी विक्री झालि. हे चित्र न्युयोर्कमद्धे तब्बल सोळा लाख डॉलर्सना म्हणजे आजच्या पावणे नऊ कोटी रुपयाना विकले गेले. कुठल्याही भारतीय चित्रकाराने तोपर्यंत आपल्या चित्राला इतकी प्रचंड रक्कम मिळवली नव्हती. तोपर्यंत तैब मेहता ऐशी वर्षाचे झाले होते. आयुष्यभर मुंबईकर म्हणून वावरलेल्या तैब मेहता यांचे वयाच्या 85 व्या वर्षी मुंबईतच 2009 साली निधन झाले.
वि' चा केला 'ठोबा' त्याचे नाव विठोबा 
 * वि म्हणजे ज्ञान , 

ठोबा म्हणजे मुर्ती 

विठठ्ल म्हणजे ज्ञानाची मुर्ती*
केस अर्पुनी कुठे पुण्य मिळते
नारळ अर्पुनी कुठे भाग्य उजळते
केस अन् नारळ विकुनी होतो व्यापार
सोनं- चांदी अर्पुन काय मिळते
सोने -चांदीच्या दागिन्यांचा होतो लिलाव
काय उपयोग सांग मानवा
अशा या दान धर्माचा ??

कधी शेतक-याला बियाणं
दान देऊन बघ
कधी निराधार कन्येचा विवाह लाऊन बघ
कधी एखाद्या निराधार बालकाचा
पालक होऊन बघ
कधी एखाद्या उपाश्याला भरवुन बघ
कधी एखाद्या अपंगाला आधार देऊन बघ
कधी एखाद्या शाळेचा जीर्णोध्दार करून बघ
कधी एखाद्या वृध्दाश्रमास
दान करून बघ
कधी एखाद्या आश्रमातील
निराधारांवर प्रेम करून बघ
एकदा दान धर्माच्या व्याख्या
बदलून तर बघ !!
जेव्हा मंदिरात जाणाऱ्या रांगा वाचनालयात जातील,
तेव्हा भारत जगात महासत्ता बनेल ..
पुस्तकानं माणसाच
मस्तक सशक्त होत.....
सशक्त झालेलं मस्तक
कुणाच हस्तक होत नसत....
आणि हस्तक न झालेलं मस्तक
कुठेही नतमस्तक होत नसत...!

शुक्रवार, ४ डिसेंबर, २०१५

यशस्वी मंत्र

**********************************************
सार्वजनिक जीवनात कसे वागावे .....
**********************************************
१) तुमचे धेय्य निश्चित करा. मला काय करायचय, काय व्हायचय, कुठे पोहचायच, काय मिळवायचंय हे आज, आत्ता, ताबडतोब ठरवा...
२) त्या दृष्टीने प्रयत्न करा, यासाठी कोणाची मदत होईल, कोण साथ देईल, कोणती पुस्तके वाचावी लागतील, कोणाच सहकार्य घ्यावे लागेल या अनेक गोष्टींची यादी करा. त्यांना भेटा. त्या गोष्टी मिळवा.
3) काहीही झाले तरी आपला यशाचा मार्ग सोडू नका. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला, कोणी नावे ठेवली, पाय ओढले, थट्टा मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही होवो. चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान, सन्मान, इगो, मोठेपणा, अहंकार सर्व सोडा. फक्त धेय्य गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटो वा पारंबी धेय्य गाठायचे म्हणजे गाठायचे.
4) कोणावर सर्वस्वी अवलंबून राहू नका. स्वतः करा.
5) मी गरीब आहे. पैसा नाही. हे नाही . ते नाही. म्हणत जगासमोर गेला तर लोक मदत करतच नाहीत पण मजबुरीचा फायदा घेतात.
स्वतःला मजबुत करा. मजबुर नाही
6) सर्वांशी चांगले संबंध ठेवा. तुम्ही ज्या संघटनेत, पक्षात, जातीत, प्रदेशात आहात तेथेच तुमचे जास्त शञू असतात, हे लोक आतुन गेम करतात. आणि कधीकधी बाहेरचे आणि ज्यांना आपण शञू मानतो ते लोक अचानक मदत करतात. यामुळे शञू कोणाला मानू नका. जे विचार पटत नाहीत ते बाजूला ठेवून जे पटतात ते घेऊन मैञी करा.
मोठे पुढारी, नेते, संघटनेचे वरीष्ठ लोक असेच वागतात आणि यशस्वी होतात.
7) कोणाची जातपात पाहू नका. कतृत्ववान मग तो कोणीही असेल त्याला जवळ करा. आपले माना.
८) जो तुम्हाला चांगले सांगतो, तुमच्या भल्याचा विचार करतो अशा व्यक्तीला आपले गुरू माना. मग तो वयाने लहान असो वा मोठा याचा विचार करू नका. अशा चांगल्या व्यक्तीने अपमान केला. रागावली. लाथाडले तरी त्याला सोडू नका.
कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात.
हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एकच चंद्र शोधा. आणि हजार चंद्र शोधण्यापेक्षा एकच सुर्य जवळ ठेवा.
9) प्रत्येक गोष्टीचा तीन बाजुने विचार करा
१ ही गोष्ट माझ्या हिताची आहे का ?
२ हे सांगणाऱ्याचा काही स्वार्थ नाही ना ?
३ हे असच का ?
या तीन बाजूने विचार करा. आणि वाटले की समोरची व्यक्ती माझ्या भल्याचा विचार करते. यात त्याचा स्वार्थ नाही आणि यात माझा फायदा आहे तरच ती गोष्ट डोळे झाकुन करा.
10 ) पाय जमिनीवर ठेवा. माणसाशी माणूस म्हणून नाते जोडा. यश तुमच्या पायात लोळण घेईल


******************************
वैयक्तिक जीवनात कसे वागावे ......
*******************************
१) सकाळी सुर्योदयापुर्वीच उठा म्हणजे उठाच..
२) रोज थोडा का होईना व्यायाम कराच
३) अंघोळ शक्यतो थंड पाण्याने करा
४) ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या
उदा. देव, महामानव, आईवडील इत्यादी
५) नाश्ता , जेवन घरीच करा. हाँटेलमधील, टपरीवरील काहीही खाऊ नका. पिऊ नका. गरज असेल तर फळे खा.
६) प्रसन्न मनाने घराबाहेर पडा. प्रसन्न मनानेच काम करा
७) सहकारी व हाताखाली काम करणाऱ्यांशी सन्मानाने वागा
८) गाडी चालवताना, रस्त्याने चालताना मोबाईलचा वापर करू नका. कानात हेडफोन एका जागी उभे असतानाच घाला.
९) फेसबुक, whatsapp, यांचा वापर मर्यादित करा. फायद्यासाठी करा. Timepass करायला आयुष्य पडले आहे.
आता करिअर कडे लक्ष द्या .
१०) आई वडील आणि शिक्षकांचा कधीच अपमान, थट्टा करू नका.
११) दारू पिण्यापुरते जवळ येणाऱ्या मिञांना मोकळ्या बाटलीसारखे दुर फेका
१२) मयत, दहावा, तेरावा आणि लग्न एवढ्यापुरतेच भेटणार्या आणि संकटाच्या वेळी दुर जाणाऱ्या पाहूण्यांना, मिञांना पायाजवळही उभे करू नका.
१३) कोणतेही व्यसन करू नका. असेल तर सोडा आणि नसेल तर त्या वाटेला जाऊ नका.
जे लोक तुम्हाला व्यसन करायला लावतात ते तुमचे मिञ असू शकत नाहीत
१४) विद्यार्थ्यांनी रोज वेळेवर आभ्यास करावा. जे विद्यार्थी नाहीत त्यांनीही रोज वाचन करावे
१५) tv व चिञपटात चांगले ते पहावे.
१६) कोणाशी कोणताही वाद घालू नका. नाही पटत तर सोडून द्या पण फालतू वेळ घालवू नका
१७) शक्यतो मांसाहार टाळा, घरची भाजी भाकरी अमृत आहे.
१९) आजारपणात मेडिकल पेक्षा आयुर्वेदीय उपचार करा
२०) शक्य झाल्यास रोज प्राणायाम, सुर्यनमस्कार घाला
२१) झोपताना लवकर झोपा. लवकर उठा
२२) वाईट गोष्टी टाळा. चांगल्या स्विकारा.
अपयश टाळा. यश स्विकारा.
मी म्हणत नाही की मी सांगतो तेच करा..
पण विचार करा... पटले तर कृती करा..
आणि तुमच्या परिसरात व्याख्यानाला आलो की भेटून सांगा काय बदल झाला.
मी हे सांगण्यात माझा काही स्वार्थ नाही यामुळे हे विचार जे घेतील ते यशस्वी होतीलच याची मला खात्री आहे

सौजन्य : कुणीतरी आपलाच....
‘प्लेटलेट्स म्हणजे काय?’ हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल. हिमोग्लोबिन, प्लाझ्माप्रमाणे प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे. रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात. या प्लेटलेट्स मुळातच एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात. त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे. या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’ ही संज्ञा वापरली आहे. रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात. लालपेशी (आरबीसी), पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी) आणि प्लेटलेट्स (तंतुकणिका). त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते. प्लेटलेट्स या मोठया हाडांतील रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात. त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं. जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात. प्लेटलेट्सचं कार्य रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं. ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं. तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते. एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते. अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात. त्यामुळेच प्लेटलेट्सना ‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं. प्लेटलेट्सची संख्या सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते. संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन, रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास, शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो. संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो. म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं. त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो. जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही. जास्त रक्त गेल्याने थकवा येतो. प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं • डेंग्यू, मलेरियाचा ताप • अनुवंशिक आजार • केमोथेरपी संख्या कमी झाल्यास... डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते. त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास, त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी : • लसूण खाऊ नये. • अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये. • अॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत. • दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. • सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे. • बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी. • त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्लेटलेट्स कमी झाल्यास, त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत. प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत. पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं. नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ . जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता. शरीरात प्लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते. पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.... १.पपई - पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते. २.गुळवेल गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते. ३.आवळा प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता. ४.भोपळा भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते. ५.पालक पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4 ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता. ६.नारळ पाणी शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे. ७.बीट बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

खोकून खोकून कोरडा झाला जर का घसा
मधातून चाटा हळद, ज्येष्ठमध आणि अडुळसा ||1||

लागला मुका मार,सुजून पाय झाला ना गारद
लेपासाठी तुरटी ,रक्त चंदन उगला आंबेहळद ||2||

कोंड्याचा झाला आहे का डोक्यामधे साठा
केस धुताना लावा मेंदी, शिकेकाई, रिठा ||3||

सकाळी सकाळी उठा देवाला करातुम्ही वंदन
उन्हाळ्यात थंडाव्यासाठी कपाळी लावा चंदन ||4||

उन्हामधे रापून चेहरा झाला का सावळा गडद
कांती उजळण्यासाठी दुधातून प्या थोडी हळद ||5||

बारीक आहे कुडी म्हणून होऊ नको तू बावरी
दूध आणि साखरेबरोबर खा थोडी शतावरी ||6||

पिकला एक केस होईल डोक्यावर चांदी
नैसर्गिक रंग आहे, केसांना लावा मेंदी ||7||

केसाना लावा कचूर सुगंधी,मेंदी जास्वंद
केस होतील लांब सडक सुगंध दरवळेल मंद ||8||

गाणं म्हणण्यासाठी झाला आहात तुम्ही अधीर
गोड मधुर आवाजासाठी खा ज्येष्ठमध,शंगीर ||9||

अशक्तपणामुळे तुमचा दुखतो आहे का सांधा ?
शक्तीसाठी गायीच्या दुधातून प्या अश्वगंधा ||10||

पित्तप्रकोप झाला आहे ,पोटातून येत आहेत कळा
पोटात घ्या आवळा,हिरडा,बेहडा म्हणजेच त्रिफळा ||11||

वातामुळे पोटामध्ये होत आहेत का वेदना ?
खा ओवा,सैंधव मीठ, आलं,लिंबू पुदिना ||12||

संगणकावर काम करून थकली आहे का नजर
डोळ्यांसाठी चांगले खावे पपई आणि गाजर ||13||

लहान वयामधेच ढोल मटोल झाला तुमचा बेटा
जाडी कमी करण्यासाठी जरा कमी खा बटाटा ||14||

धूर धूळ प्रदूषणाचा झाला आहे आता कळस
शुद्ध हवेसाठी झाडे लावा कडूनिंब आणि तुळस ||15||

छोटे छोटे आजार बर का घरच्या घरीच हटवा
प्रत्येकाच्या घरी आहे ना आजीबाईचा बटवा ||16||

सौजन्य : सोशल मिडिया
</div>

माझ्याबद्दल