इच्छाशक्तीच्या जोरावर सकारात्मक विचार
आपली इच्छाशक्ती किती तीव्र आहे; यावर आपण नक्की कुणाच्या ताब्यात आहोत हे अवलंबून असतं. आपलं मन आपल्याला विविध दिशांनी खेचत असतं, त्याचबरोबर अनेकदा मनात नकारात्मक विचारांचं प्राबल्य असतं अशावेळी इच्छाशक्तीच्या जोरावर आपण मनात सकारात्मक विचार रुजवू शकतो. इंग्रजीत एक म्हण आहे 'व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे' इच्छा असेल तिथे मार्ग सापडू शकतो.
इच्छाशक्तीची ताकद वाढवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपले ध्येय निश्चित करायला पाहिजे. आपण किती वेळा ठरवतो व्यायाम करु, वजन कमी करु पण ना व्यायाम होतो ना आपलं वजन कमी होतं. कारण काय तर कुठेतरी इच्छाशक्ती कमी पडते. जेव्हा केव्हा तुम्ही ठरवलेले ध्येय सोडून देण्याचा विचार मनात येईल तेव्हा तेव्हा तुमच्या ध्येय पूर्तीबद्दल तुम्ही केलेला विचार आठवा. कधीतरी आपण आपल्या ध्येयापासून भरकटतो किंवा काही काळासाठी निराळ्या पध्द्तीने विचार करुन मग पुन्हा मूळ पदावर परततो.
आपली इच्छाशक्ती आपण शाबूत ठेवायची असते. तिच्या जोरावर आपण जी वाटेल ती गोष्ट साध्य करु शकतो. एखादी गोष्ट मिळणं, पूर्ण करणं अशक्यं वाटत असलं तरीही इच्छाशक्तीच्या बळावर आपण ती गोष्ट सहज साध्य करु शकतो. त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विचार करताना आपली इच्छाशक्ती कशी आहे याचा जरुर विचार करा.
सौजन्य: संध्यानंद
सौजन्य: संध्यानंद
व्यवसाय विकासाचे ७ मार्ग - अतुल राजोळी
पहा व्यवसाय प्रशिक्षक अतुल राजोळी यांचा उद्योजकांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी प्रेरणा देणारा जबरदस्त व्हिडीओ
20 April 2017
नेतृत्वगुणांच्या १० टिप्स
जेव्हा कुणी पहिल्यांदा व्यवस्थापकाच्या जागी विराजमान होतो. तेव्हा निश्चितपणे त्याची योग्यता त्याला या जागी येण्यासाठी कारणीभूत ठरते. एक कामगार म्हणून काम करणे यात मोठा फरक आहे. व्यवस्थापकाला आपल्या टीमचे नेतृत्व करत त्या सर्वांना पुढे न्यायची जबाबदारी असते. जर तुम्ही प्रथमच अशी जबाबदारी पेलत असाल तर काम करताना यशस्वीपणे काम करण्यासाठी या दहा टिप्स.
१) शिकणे: तुमच्या विशेषत्वाशिवाय आपल्या सहकार्यांकडून काही नवे शिकण्याची वृत्ती ठेवा.
२) संभाषण: आपल्या टीमच्या सदस्यांना प्रकल्पाचे उद्देश स्पष्टपणे सांगा. प्रकल्पाची आवश्यकता व महत्त्वपूर्ण बाबी पूर्ण करण्याची अंतिम वेळ ही सांगा.
३) उदाहरण: ज्या पद्धतीचा व्यावसायिक व्यवहार तुम्ही दुसर्याकडून अपेक्षित ठेवता तो प्रथम स्वतः अंगीकारा.
४) फिडबॅक: टीमला विश्वास द्या की, तुम्ही त्यांच्याकडून नव्या कल्पना ऐकण्यासाठी तत्पर आहात. प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी उपाय ऐकण्यास उत्सुक आहात.
५) ओळख: आपल्या टिमच्या सदस्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला सर्वासमक्ष त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहीजे.
६) स्पष्टपणा: आपल्या मूडनुसार दररोज बदलणार्या नेतृत्त्वाचे लोक आपल्या टीमला पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे एकदा घेतलेल्या निर्णयावर कायम रहा.
७) मदत: आपल्या टीमला चांगल्या पधद्तीने समजून सांगणे ही सुद्धा एक गुंतवणूक आहे. तुम्ही तुमच्या सहकारी कर्मचार्यांना स्पष्टपणे सांगा की हा प्रकल्प कंपनीच्या धोरणानुसार कसा महत्त्वाचा आहे.
८) शिकण्याचे वातावरण: तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक बाब शिकण्याची भरपूर आवड असेल, परंतु तुमच्या टीमला एवढे स्वातंत्र्य जरुर द्या की चुकांमधून शिका. तसेच त्यांच्या एखाद्या चांगल्या रचनात्मक कल्पनांबद्दल त्यांना बक्षिसही द्या.
९) व्यावसायिक मार्गदर्शन: आपल्या स्टाफसाठी सदैव वेळ द्या. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या करिअर विकासासाठी प्राधान्य देता. त्यामुळे टीमचा उत्साह वाढेल.
यशाच्या शिखरावरही पूर्वीची दु:खस्थिती न विसरणारे 'अलिबाबचे' संस्थापक जॅक मा
जॅक मा यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या दयनीय स्थितीचा विसर पडला नाही. त्यांच्या यशातून प्रेरणा घेणार्या कुणालाही प्रोत्साहन देण्यास ते कुचराई करत नाहीत.
जॅक मा, अलिबाबा समूहाचे संस्थापक, २७.९ दशलक्ष डॉलर्सच्या साम्राज्यातून ते चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. मा यांना हे यश काही एका रात्रीत मिळालेले नाही. संघर्ष, पिळवणूक आणि मेहनत यांची परिसीमा गाठल्यानंतर ते येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या यशामागे एक कहाणी आहे.
कदाचित अपयश आल्यावर त्यातून बाहेर पडण्याची जबरदस्त क्षमता त्यांच्यात असावी त्यामुळेच हे शक्य झाले. जॅक मा गरीब विद्यार्थी होते. बालपणीच मा यांना त्यांच्या प्राथमिक शाळेतील जीवनात दोनदा नापास व्हावे लागले, माध्यमिक परीक्षेत ते तीनदा नापास झाले,तर विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत हांगझोऊ सर्वसाधारण विद्यापीठात येण्यापूर्वी देखील तिनदा ते नापास झाले होते. या परिक्षेत तर त्यांना गणित विषयात एक टक्केपेक्षा कमी गुण मिळाले होते. अनेकदा त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते.
मा यांची जिद्द आणि चिकाटी यांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे; कारण त्यांना सुमारे तीस वेळा वेगवेगळ्या कामांवरुन काढून टाकण्यात आले. मात्र ते नाराज न होता दुसरे काम शोधत राहिले. इतकेच काय, केएफसीमध्ये निवड झालेल्या २४ जणांमधून, हाकलून लावण्यात आलेले ते एकमेव होते. केवळ पाच उमेदवारांमधील ते एकजण होते ज्याची निवड पोलीसदलात झाली होती, मात्र तेथून काढून टाकण्यात आलेले ते एकमेव होते, कारण त्यांना सांगितले गेले की ते 'चांगले' नाहीत. हार्वर्डने त्यांना दहावेळा नाकारले. १९९९ मध्ये मा यांनी मित्रांच्या मदतीने अलिबाबाची स्थापना केली पण सिलिकॉन व्हॅलीला निधीसाठी गळ घातली नाही.
एका वेळी अलिबाबा दिवाळ्यात जाण्यापासून केवळ १८ महिने दूर होते. पहिली तीन वर्ष,अलिबाबाला काहीच महसूल मिळाला नाही. सप्टेंबर २०१४ मध्ये अलिबाबा सार्वजनिक कंपनी झाली. त्यातून ९२.७० डॉलर्सचे समभाग विकण्यात आले. असे करुन ती अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी आय. पी. ओ. ठरली.
सन २००९ मध्ये आणि २०१४ मध्ये मा यांचे नाव सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून 'टाइम'नियतकालिकात झळकले होते. बिझनेस विकमध्ये चीनमधील सर्वांत शक्तीवान व्यक्ती म्हणून त्यांची निवड झाली. फोर्बच्या मुखपृष्ठावर देखील त्याची छबी चीनमधील पहिला मुख्य प्रवाहातील उद्योजक म्हणून झळकली आहे. जॅक मा यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या दयनीय स्थितीचा विसर पडला नाही. त्यांच्या यशातून प्रेरणा घेणार्या कुणालाही प्रोत्साहन देण्यास ते कुचराई करत नाहीत,त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, तुम्ही जर काही त्याग केला नसेल तर तुम्हाला अजूनही संधी आहे, तसे करता न येणे हे मोठे अपयश आहे.
सौजन्य: संध्यानंद
Thanks - Atul Rajoli Sir
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा