देवी दुर्गा आणि उद्योजकीय नेतृत्व !
देवी दुर्गा आणि उद्योजकीय नेतृत्व !
नमस्कार मित्रांनो,
नवरात्रौत्सवहा आपला सर्वात उत्साही सण आहे. देवी दुर्गा ही आपल्या देशाला एकसंध बांधणारा महत्वाचा दुवा आहे असे आपण म्हणू शकतो कारण नवरात्रोत्सव भारतभर मोठ्या उत्साहात साजराकेला जातो. जसे, उत्तरेला व्रत, उपवास व जागरण केले जाते, पश्चिमेकडे गरबा आणि दांडिया, दक्षिणेला वैविध्यपूर्ण आरास तर पूर्व भागात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक उत्सवाच्या स्वरूपात हा सणसाजरा केला जातो. देवी आपल्यामध्ये भक्ती रूपाने चैतन्य निर्माण करते. देवीची आभा, प्रतिमा, पौराणिक कथा आपल्याला दैनंदिन जीवनात प्रेरित करतात.
देवी दुर्गेचा सर्व शक्तिमान अवतार आपल्याला प्रामुख्याने व्यवस्थपनाचे ६ धडे देतो.
दुर्गा, मूळ शब्द दुर्गम, निर्भयता दर्शवतो. समस्या लहान असो व मोठी, प्रतिकूल परिस्थितींमध्ये आपल्याला अतुलनीय आंतरिक शक्ती प्रदान करते. जितके आपण अंतःकरणापासून स्थिर असू तितकेचआपल्याला बाह्यरूपाने खंबीरपणे संकटाना सामोरे जाणे शक्य होते. देवी दुर्गा वाघावर आरूढ आहे, जे निडरतेचे रूपक दर्शविते, म्हणजेच निडर व्यक्ती वाघाप्रमाणे भयंकर समस्यांचा सामना करूशकते व त्यांच्यावर मात करू शकते. व्यवसायात देखील प्रगती साधण्यासाठी आपल्याला अनेक समस्यांना कणखरपणे तोंड द्यावे लागते.
२. अखंड अष्टावधान -
दुर्गा मातेचे आठ हात हे अष्टावधानतेचे प्रतीक आहे, उद्योजकलाही व्यवसायात एकाच वेळी अनेक मे करावी लागतात. व्यवसायात अखंड सावधान असल्यामुळे उद्योजक मानसिकरीत्या सक्रियराहतो, जेणेकरून वेळ व साधनांचा इष्टतम वापर होऊन उदयोजक स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनतो.
३. दृष्टी आणि समता -
दुर्गा देवीची कोणतीही मूर्ती पहा, आपले लक्ष वेधून घेणारे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देवीचे सुंदर, शांत आणि दक्ष डोळे. देवीचे हे डोळे दुरद्रुष्टी चे प्रतिक आहे. केवळ आपले ध्येय निश्चित असूनभागत नाही, तर आपल्याला ध्येयपूर्तीच्या संपूर्ण प्रवासात सदैव सतर्क असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे देवीचे शांतचित्त आपल्याला जीवनात समतोल साधण्याचे कसब शिकवतो, ज्याप्रमाणे भव्य ध्येयसाधण्यासाठी अतिउत्साही नेतृत्वापेक्षा एक रचनात्मक व सर्वांना सोबत घेऊन जाणारे संयत नेतृत्व अधिक श्रेयस्कर ठरते.
४. अनुकूलता -
नवरात्रीच्या ९ दिवसांत देवी दुर्गा ९ वेगवेगळे अवतार धारण करते. त्याचप्रमाणे व्यवसायात शाश्वत यश मिळवण्यासाठी उद्योजकाला परिस्थितीनुरूप आपला स्वभाव, शैली, आचरण व वर्तन यांत सुयोग्यबदल घडवून सिध्द व्हावे लागते.
ज्याप्रमाणे दुर्गा देवीची उपासना व विश्वास लाखोंना एकत्र आणतो. त्याचप्रमाणे उद्योजकाचे वर्तन गोंद प्रमाणे असावे जो, सर्वांना एकसंध ठेवण्याचे काम करतो. कारण गमावणे हे कमावण्यापेक्षा खूपचसुलभ असते.
६. नेतृत्व हे स्वतंत्र आहे,
कोणाची मक्तेदारी नव्हे -
कोणाची मक्तेदारी नव्हे -
सर्वात महत्वाचे म्हणजे, लक्षात ठेवा - जेव्हा इतर सर्व शक्तिशाली देव महिषासुराला रोखण्यास असमर्थ ठरले तेव्हा सर्वोच्च शक्तीला विजय मिळविण्यासाठी देवी दुर्गाचा अवतार धारण करण्याची गरजभासली. त्याचप्रमाणे आज २१ व्या शतकात व्यावसायिक नेतृत्व ही पुरुषांची वा विशिष्ट व्यक्तींची मक्तेदारी राहिली नसून, प्रत्येकाला आपल्या कुवतीनुसार नेतृत्व सिध्द करण्याच्या समान संधी उपलब्धआहेत. हे आपल्या राष्ट्राच्या प्रगतीचे लक्षण आहे.
नवरात्रोत्सवच्या हार्दिक शुभेच्छा ! जय दुर्गा माता !
(अनुवादीत )
मधुकर कुमार,
सौजन्य - इकॉनॉमिक टाइम्स
Thanks - Atul Rajoli Sir
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा