मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०२१

जीवनाचे नाव आहे शिकत राहणे...

 


जीवनाचे नाव आहे शिकत राहणे

सध्या टीव्हीवर एक जाहिरात बरीच लोकप्रिय झाली आहे. त्या जाहिरातीत एक आजी आपल्या नातवाकडून सायकल चालविण्यास शिकत आहे. ते पाहून हसायला येतं, तसाच आनंदही होतो, तसे पाहिले तर काही नवे शिकणे आनंद देते. जगातील कोणत्याही भागातील यशस्वी लोकांच्या यशस्वीतेच्या कथा वाचा. ते असे लोक आहेत, की जे वयाच्या कोणत्याही वळणावर नवीन काही शिकण्यास मागे पाऊल घेत नाहीत.
जपानमध्ये सततच्या व कधीही न संपणार्‍या प्रगतीच्या प्रयत्नांसाठी एक शब्द वापरला जातो. कैजन हा केवळ जपानच्या व्यापार विश्वातील शब्द नाही तर तो त्यांच्या यशाचे सूत्र आहे. हा योद्ध्यांच्या जीवनाचेही दर्शन घडवितो. आश्चर्याची गोष्ट अशी , की जपानच्या लोकांची ही दृष्टी आता जगभरातील लोकांची दृष्टी बनली आहे. जगातील वेगवेगळ्या भागातील यशस्वी लोकांना मी भेटलो आहे. मग ते कला, खेळ, उद्योग जगातील असतील. ते सर्व नेहमीच स्वतःच्या चांगल्या प्रदर्शनासाठी कार्यरत राहिले आहेत. त्यांना ही गोष्ट माहीत आहे, की सतत बदलणार्‍या या जगात यश मिळवण्यासाठी सतत नव्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. तसेच पहिल्यापेक्षा काहीतरी चांगले शोधून काढले पाहिजे. यशस्वी लोक कुणाच्या दबावाखाली येऊन काम शिकवण्यासाठी बध्द नसतात. तर ते जवळपासच्या बदलत्या जगाप्रमाणे स्वतःमध्ये बदल घडवून आणत असतात. त्यामुळे ते जगाला चांगल्या पध्दतीने समजू शकतील.

तुम्ही नवे शिकवण्यासाठी उत्सुक आहात?
जर तुम्ही हे निश्चित करु शकत नसाल, की तुमच्यात काही नवे शिकण्याचा जोश आहे किंवा नाही, तर या गोष्टी ते निश्चित करण्यासाठी तुम्हाला मदत करु शकतील. तुम्ही काही नवे यासाठी शिकता, कारण तुम्हाला शिकावेसे वाटते. ती तुमची मजबुरी आहे म्हणून नव्हे. नेहमी काही तरी नवीन शिकण्यासाठी प्रेरीत होणारे लोक केवळ अधिक प्रश्नच विचारत नाही तर त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही स्वतःच करतात. तुम्ही जर अशा लोकांपैकी असाल तर आपली आवड व त्यासाठी आवश्यक माहीती गोळा करण्यासाठी मग्न राहता. तर तुम्ही जीवन व बदलत्या जगातील कार्यपध्द्तींचा सुंदर मेळ घालू शकता. आपली उद्दिष्टे व स्वप्नपूर्तीसाठी चांगली दिशा तयार करण्यासाठी आवश्यक कौशल्य व माहिती तुम्ही चांगल्या पध्द्तीने मिळवू शकता.


तुम्हाला सर्वच काही माहीत नाही असे मानण्याचे कारण नाही.
काही लोक स्वतःकडून काही नवे शिकण्यासाठी प्रेरणा घेत असतात. त्यांना तुमचे कौशल्य, तुमच्यातील कमतरता यांची चांगली जाण असते. त्यांना तुमच्याबद्दल काहीच चूकीची माहीती नसते. जर तुम्ही तुमच्या प्रगतीचा मार्ग व आपली माहीती यातील अंतर स्वतःच समजून घेतलं, तुम्ही तुमचे कौशल्य वाढविण्याचा स्वतःच प्रयत्न केलातं तर तुम्हाला तुमचे उद्दिष्ट साद्य करण्यास मदत मिळेल.


तुम्ही मोठे धोके स्वीकारण्यास व त्यानुरुप चांगले परिणाम मिळण्यासाठी नेहमी तयार राहता. 
तुम्ही नेहमी मोठ्या अपेक्षा ठेवता आणि त्यांच्या पूर्ततेसाठी जीव तोडून काम करता. नेहमी काहीतरी नवीन शिकण्यासाठी प्रेरित होणार्‍या लोकांसाठी आपल्या कौशल्यावर तुमचा विश्वास असतो. कारण तो तुम्ही सुरु केलेल्या प्रयत्नांच्या ताकदीवर आपल्या जीवनात बरेच काही प्राप्त करतो. जर तुम्हाला तुमच्या सुरक्षीत क्षेत्रातून बाहेर पडून मोठा धोका पत्करण्यास भीती वाटत नसेल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही जिवनात बरेच काही साध्य करु शकता.


कोणतेही काम सुरु केल्यानंतर तुम्ही ते मध्येच सोडून देत नाहीत.
आव्हानांपासून दूर राहणे, त्रास पाहून पाऊल मागे घेणे आपल्याला आवडत नाही? असे लोक जे स्वतःकडून काही तरी नवे शिकण्याचा प्रयत्न करतात. जे आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी अधिक जागृक असतात. ते कष्ट करण्यास किंवा आव्हानांचा सामना करण्यास मागे पाहत नाहीत. जीवनात यश मिळवण्यासाठी कोणाला तरी जबाबदार धरण्यापेक्षा स्वतःला जबाबदार धरले पाहिजे. जर तुम्ही स्वतःला जबाबदार मानत असाल तर निश्चितपणे उद्दिष्टपूर्तीच्या मार्गातील अडचणी तुम्ही स्वतःच दूर करु शकाल. तसेच तुमचे उद्दिष्ट गाठू शकाल.


सौजन्य: संध्यानंद  Thanks - Atul Rajoli Sir

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल