शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१

उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे....

 

उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे


उद्योजकाने अपयशी होणे महत्वाचे असण्याची ७ कारणे

उद्योजकाचे जीवन ही एक अडथळ्यांची शर्यत आहेपुढे जाण्यासाठी आपल्याला सतत तयारअसणे आवश्यक असतेएक चुकीची हालचाल आपल्याला पडण्यासाठी पुरेशी असू शकतेआपणसुपरहिरो नाहीतम्हणून आपण अनेकदा चुका करतो किंवा चुकीचे वळण घेतो ज्यामुळेआपल्याला अपयशाला सामोरे जावे लागतेपरंतु अपयश खरोखरच आपल्या स्वप्नांपासुनआपल्याला परावृत्त करते काजर याचे उत्तर होकारार्थी असेल तरआपण चुकीचे आहोत.
उद्योजकाच्या जीवनात यशाइतकेच अपयश देखील तितकेच महत्वाचे आहे हे आपण ०७कारणांद्वारे जाणून घेऊया.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
अपयश हे आपल्या प्रवासातील एक मैलाचा दगड आहे " - ओप्रा विनफ्रे
अपयश प्राप्त होणे ही घटना सुखद नसतेतरीसुद्धा आपण यशाच्या आणखी एक चरण जवळजात असतोकारण अपयशानंतर आपण अधिक जोमाने प्रयत्न करू लागतोआपण अयशस्वीहोतो याचा अर्थ आपण आपल्या ध्येयपूर्तीसाठी नक्कीच काहीतरी हालचाल करतोया छोट्यागोष्टीही आपल्या उद्योजकीय अनुभवाला अंतर्बाह्य समृद्ध करत असतातआणि सरतेशेवटीआपल्याला साहाय्यभूत ठरतातज्याप्रमाणे आपण  धडपडता सायकल शिकू शकत नाहीत्याचप्रमाणे आपण  अडखळता यशाच्या शिखरावर पोहोचू शकत नाही  ठामपणे उभे राहूशकत नाहीम्हणून भव्य यशप्राप्तीसाठी अपयशाची पायरी ओलांडणे महत्वाचे आहे

जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण काहीतरी शिकतो.

यश साजरे करणे चांगले आहेपरंतु अपयशाच्या धड्याकडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचे आहे." - बिल गेट्स
अपयश आपल्याला काहीतरी शिकवून जातेकदाचित पहिल्या प्रयत्नात आपल्याला अपेक्षितपरिणाम मिळणार नाहीतदुसऱ्या प्रयत्नात देखील आपले उद्दिष्ट सध्या होणार नाहीपरंतु जेव्हाआपण अयशस्वी होतो तेव्हा नक्कीच आपण त्यातून काहीतरी धडा घेतोजीवनात अपयशामुळेआपण सहजपणे निराश होतोबर्याचदा आपण अपयशातून काय शिकलो यापेक्षा काय गमावलेयावर लक्ष केंद्रित करून स्वतःला निराशेच्या गर्तेत ढकलतोत्यापेक्षा आपण "मी अयशस्वी काझालो? " या प्रश्नाचा विचार केल्यास आपल्याला निश्चितपणे काही ठोस उत्तरे मिळतीलज्यामुळे आपल्याला पुढील वेळी अधिक तयारी करता येईलम्हणजेच,अपयश ही काहीतरीनवीन शिकण्याची दुसरी संधी आहे.

अपयश आपल्याला निडर बनविते.

"फक्त एकच गोष्ट आहे जी आपले स्वप्न साध्य करणे अशक्य करते ती म्हणजे अयशस्वीहोण्याची भीती." पाउलो कोएलो
यश मिळवण्याची सर्वात मोठी अडचण ही अपयशाची भीती आहेआपण कृती करण्याआधी बराचविचार करतो आणि अपयशाच्या भितीने कृती करण्याचे टाळतोपरंतुअपयश खरोखरआपल्याला  निडर बनवू शकतेआपल्याला वाटेल हे कसे शक्य आहेआपण बऱ्याच गोष्टींमध्येऐकतो कि आपण नेहमी सकारात्मक विचार करावाउद्योजक म्हणून आपण आपल्या ध्येयाचाविचार करावा नकारात्मक विचार करू नयेतजगप्रसिद्ध उद्योजक रिचर्ड ब्रान्सन यांना देखीलत्यांच्या जीवनात सात वेळा अपयशाला सामोरे जावे लागलेपण ते आपल्या उद्योजकीयध्येयापासून बधले नाहीतत्याऐवजी त्यांनी आपल्या कौशल्यांचे पुनर्वालोकन केले आणि"Where did I miss the X factor? असा विचार करून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपल्यायोजना अंमलात आणल्याएकदा आपण अपयशाची कडू चव चाखल्यावर भिती  बाळगता कृतीकरण्यावर भर दिला पाहिजे.

अपयश आपल्या अनुभवात मोलाची भर घालतात.

"अपयश अशी गोष्टच अस्तित्वात नाही - ते आहे फक्त अनुभव आणि त्यांचे प्रतिसाद." - टॉमक्रूझ
जेव्हा आपण प्रयत्न करताना अयशस्वी होतो तेव्हा आपण बऱ्याच कटू-गोड अनुभवातून जातोउद्योजक म्हणूनआपण अपयशाच्या सकारात्मक बाजूकडे दुर्लक्ष करतोजेव्हा आपणअयशस्वी होतोतेव्हा नेमके काय घडले हे कमीतकमी जाणून घेणे आवश्यक आहेहाआपल्यासाठी अतिशय महत्वाचा व्यावहारिक अनुभव असतोजो आपण एखाद्या उच्चबिझिनेस स्कुलमधून देखील मिळवू शकत नाहीआपण अयशस्वी होण्याचा अनुभव ही एकमौल्यवान संपत्ती आहे जी भविष्यात आपल्या उद्योजकीय जीवनात मदत करेलकारणअयशस्वी झाल्यानंतरनव्याने सुरूवात करताना आपण नेहमीच दुसऱ्या दृष्टिकोनातून विचारकरण्याचा प्रयत्न करतोशिवायप्रत्येक समस्येचे निराकरण कसे करावे हे आपण शिकतोअडथळे आपण संधींच्या दृष्टीकोनातून पाहू लागतोम्हणून जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हानिराश होऊ नका त्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपल्या व्यवसायाच्या योजनेचाचांगली आखणी कराया मार्गांनीआपण आपल्या अपयशांना अनुभवाच्या संसाधन स्त्रोतामध्येबदलू शकतो.

अपयश आपल्या उद्योजकीय गुणवैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करते.

आपण आपल्या जीवनात प्रत्येक अपयशानंतर अनुभवसमृद्ध होऊन एक चांगला उद्योजकबनतोआपण अधिकतम उत्पादनक्षमता मिळविण्यासाठी आपल्याकडील उपलब्ध साधनांचेप्रभावीपणे व्यवस्थापन करतोआपण वेळ आणि पैसा यांची ध्येयानुरूप योजनाबद्धरीत्याआखणी करतोआपण व्यवसायासाठी स्मार्ट मार्गांबद्दल विचार करतोअशा प्रकारे आपणआपल्या उद्योजकीय मानसिकतेचा  क्षमतांचा विकास करतो आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावरआपला प्रवास अव्याहतपणे सुरु राहतो.

जेव्हा आपण अयशस्वी होतो तेव्हा आपण अधिक द्रुढनिश्चयी होतो.


"प्रयत्न केलातअयशस्वी झालातकाही फरक पडत नाहीपुन्हा प्रयत्न करापुन्हा आणखीचांगल्या प्रकारे अपयशी व्हा."- सॅम्युएल बेकेट
व्यवसायात अयशस्वी होणे दुःखद आहेपरंतु प्रत्येक वेळी जेव्हा आपलयाला अपयश येते तेव्हाआपण आपल्या व्यावसायिक उद्दिष्टांबद्दल अधिक उत्साही होतोकारण आपल्याला व्यवसायातअपयश देणाऱ्या विविध बाबींचा वा घटकांचा आपण विचार करून पुढच्या वेळी अधिक जोमानेसज्ज होतोतुम्हांला माहित आहे काबिल गेट्स यांनी खूप आधी ट्रॅफ--डेटा नावाची एककंपनी सुरू केली जी दुर्दैवी ठरलीपण त्यातून शिकून त्यांनी मायक्रोसॉफ्टची स्थापना केलीआणिसंगणक क्षेत्रात इतिहास घडवलाम्हणून जेव्हा अपयश येते तेव्हा काळजी करू नकाफक्त कृतीकरत रहाकारण कोण जाणेआपण आपल्या स्वप्नापासून केवळ एकच चरण दूर असू शकतो.

अपयश आपल्या यशाचा आनंद द्विगुणीत करते.

मी तुम्हांला एक गोष्ट सांगतो ज्यामध्ये कडू अपयश हे भव्य यशाची नांदी ठरले१९८५ मध्येउच्चस्तरीय व्यवस्थापन समस्यांमुळे स्टीव्ह जॉब्स यांना आपणच स्थापन केलेल्या कंपनीचाराजीनामा द्यावा लागलाआपणच स्थापन केलेल्या कंपनीपासून दूर राहणे हा त्यांच्यासाठीकठीण निर्णय होताया कालखंडात त्यांनी बरेच संघर्ष केले आणि Next Computers कंपनीचीस्थापना केलीजी अत्यंत यशस्वी झाली१९९६ साली Next Computers विकत घेतल्यानंतरस्टीव्ह जॉब्स Apple मध्ये परतलेस्टीव्ह जॉब्स जेव्हा पुन्हा रुजू झाले तेव्हा Apple ची वाटचालदिवाळखोरीच्या दिशेने सुरु होतीपरंतु त्यांनी Apple ला त्यांच्या नाविन्यपूर्ण निर्णयांसहपुनरुज्जीवित केले आणि जगातील सर्वात फायदेशीर कंपनीमध्ये रूपांतरित केलेकधी काळीApple साठी नावडते ठरलेले स्टीव्ह जॉब्स तारणहार ठरलेस्टीव्ह जॉब्स यांचा प्रवास प्रेरणादायीआहे कारण त्यांनी अपयशाचा सामना केला.म्हणूनच यश मिळवण्याच्या आवडीचा आनंदघेण्यासाठी तुम्ही प्रथम कडू अपयशाचा सामना जरूर करावा.

  • सुहैल
अनुवादित )


- Thanks Atul Rajoli Sir 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल