बिल गेट्स, अमानसिओ ऑर्टेगा, वॉरेन बफे,कार्लोस स्लिम, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग,लॉरेन्स एलिसन आणि मायकल ब्लूमबर्ग ही जगातील आठ सर्वांत श्रीमंत लोक आहेत. लक किंवा चान्स मिळाल्यामुळे ते जगश्रीमंत अब्जाधीश बनलेले नाहीत. कठोर मेहनत, शिस्त, परिस्थितीसोबत जुळवून घेण्याची लवचीकता यांसारख्या अनेक अंगभूत गुणांचा वापर करुन ते जगश्रीमंत बनलेले आहेत. त्यांचे विचार नक्कीच आत्मसात करण्यासारखे आहेत.
अमानसिओ ऑर्टेगासंस्थापक आणि माजी चेअरमन - इंडिटेक्स
एकूण संपत्ती- ४ लाख ५६ हजार ६०५ कोटी रुपये.
सूत्र: समाधानी राहू नका, अधिकासाठी प्रयत्न करा.
अमानसिओ ऑर्टेगा म्हणतात - 'जी व्यक्ती स्वतःसंदर्भात पूर्ण समाधानी असते, आता आपल्याला काही करायचं बाकी नाही असं तिला वाटतं तेव्हा हा विचार सर्वात वाईट असतो. प्रगती करा, मोठे व्हा नाहीतर मरुन जा'. आज 'अमानसिओ ऑर्टेगा' हे स्वतःला अजिबात समाधानी ठेवत नाहीत किंवा राहू देत नाहीत. कायम कल्पकता वापरुन नव्या गोष्टी साध्य करण्याचा त्यांचा स्वभाव आहे.
बिल गेट्ससंस्थापक आणि माजी सीईओ - मायक्रोसॉफ्ट
एकूण संपत्ती- ५ लाख ११ हजार १२५ कोटी रुपये.
सूत्र: केवळ ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.
स्पष्ट ध्येय आणि ते साध्य करण्यासाठी कठोर मेहनत यावर बिल गेट्स यांचा पूर्ण विश्चास आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या सगळ्या प्रक्रियेत उद्दिष्ट नजरेच्या टप्प्यात येण्यासाठी योग्य उपायही करावे लागतात. योग्य उद्दिष्ट निश्चित करणं आणि ते साध्य होईपर्यंत कठोर मेहनत करणं हे बिल गेट्स यांचं वैशिष्ट्य आहे आणि हाच त्यांचा जिनिअसनेस आहे.
जेफ बेझोसफाऊंडर, चेअरमन - अॅमेझॉन डॉट कॉम
एकूण संपत्ती- ३ लाख ०८ हजार ०३८ कोटी रुपये.
सूत्र: अपयशाची भीती झुगारा.
यश मिळवायचं तर अपयशी होण्याचं धाडस असायलाच हवं असं बेझोस म्हणतात. ते अपयशाचा विचार न करता नवे प्रयोग करतात. अपयशाकडे ते संधी म्हणून बघतात आणि त्या अपयशातला अनूभव हे स्वतःच्या सुधारणेसाठी वापरतात. इन्संट सक्सेस हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही.
मार्क झुकरबर्गसहसंस्थापक, चेअरमन आणि सीईओ- फेसबूक
एकूण संपत्ती- ३ लाख ०३ हजार ९४९ कोटी रुपये.
सूत्र: प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण नको.
ज्यावेळी टीका होते तेव्हा झुकरबर्गची प्रतिक्रीया आणि कृती तात्काळ होते. परिस्थितीप्रमाणे तो बदल आत्मसात करतो. आज फेसबुकचा चेहरामोहरा दर दिवशी बदलत आहे; पण त्यात त्याचा सहभाग असतोच असं नाही. त्याच्या या भूमिकेमुळे युझर्सच्या प्रतिसाद आणि प्रतिक्रियांवर फेसबुक दर दिवशी नव्याने आकाराला येत असतं.
लॉरेन्स एलिसनसहसंस्थापक आणि पूर्वीचे सीईओ ओरॅकल कॉर्पोरेशन
एकूण संपत्ती- २ लाख ९७ हजार १३४ कोटी रुपये.
सूत्र: जोखीम स्वीकारा
जोखिम घेतल्याशिवाय यश मिळू शकत नाही यावर एलिसन यांचा पूर्ण विश्चास आहे. जोखीम घेण्याची भीती वाटत असल्याने लोक काही नवं करत नाहीत आणि जे स्वतःला जोखीमीत झोकून देतात ते यशाच्या कळसावर जाण्याची शक्यता सर्वात जास्त असते.
वॉरेन बफेइनव्हेस्टर अँड सीएओ - बर्कशायर हाथवे
एकूण संपत्ती- ४ लाख १४ हजार ३५२ कोटी रुपये.
सूत्र: स्वतःच्या कौशल्यात पूर्ण प्राविण्य मिळवा.
वॉरेन बफे यांचं गुंतवणूक करण्याचं धोरण हे जुन्या वळणाचं आणि कंटाळवाणं समजलं जातं कारण या गुंतवणुकीचे फायदे मिळायला अनेक वर्षे लागतात; पण तरीही ते स्वतःचं धोरण कोणत्याही कारणावरुन बदलत नाहीत. त्यांचा जो दृष्टीकोन असतो, त्याविषयी ते पूर्ण ठाम असतात आणि आपल्या निर्णयावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. यामुळे आज वॉरेन बफे हे जगातील सर्वात जास्त यशस्वी गुंतवणूकदार ठरले आहेत.
मायकल ब्लूमबर्गसंस्थापक आणि सीईओ- ब्लूमबर्ग एलपी
एकूण संपत्ती- २ लाख ७२ हजार ६०० कोटी रुपये.
सूत्र: आत्मविश्वासाने सामोरं जा.
ज्यावेळी ब्लूमबर्ग यांच्यासमोर आव्हान उभं राहतं तेव्हा ते त्या आव्हानाला पूर्ण तयारीने आणि आत्मविश्वासाने सामोरं जातात. आपल्या सहकार्यांचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढवण्याची अद्भुत क्षमता त्यांच्यात आहे. एक लिडर म्हणून ते इतरांनाही त्यांच्या आव्हानात्मक परिस्थितीला समोर जाण्यासाठी बळ देतात.
कार्लोस स्मिलसंस्थापक- ग्रुपो कार्सो आणि मेक्सिको
एकूण संपत्ती- ३ लाख ४० हजार ७५० कोटी रुपये.
सूत्र: साधेपणावर भर.
कार्लोस स्मिल हे जगातील अतिशय साधे श्रीमंत व्यक्ती आहेत. ते साध्या घरात राहतात आणि कुठे जायचं असेल तर ते स्वतः कार ड्राईव्ह करतात. मिळवलेली संपत्ती ते स्वतःवर खर्च करण्या ऐवजी परत स्वतःच्या बिझनेसमध्ये गुंतवतात. त्यांच्यामध्ये गुंतवणूक ही बाग आहे जी सतत फुलवावी लागते.
सौजन्य: संध्यानंद
Thanks - Atul Rajoli Sir