गुरुवार, १० एप्रिल, २०१४

आहार सुधारणे / वजन कमी करणे

सुखवस्तू भारतीयांच्या आहारात सामान्यतः खालील दोष आढळतात
१. हिरव्या भाज्या, सलाद, फळं यांचं प्रमाण कमी.
२. धान्यातील कोंडा (ब्रान) काढून पांढरं स्वच्छ धान्याचं पिठ (मैदा) किंवा तांदूळ वापरणं.
३. वरील १ व २ मुळे फयबर व अँटीऑक्सीडंट व्हिटामिन कमी.
४. सच्यरेटेड फॅटचं प्रमाण अधिक, तूप दुध-दही, अंडी व मांसाहार हे सच्यरेटेड फॅटचं प्रमुख स्त्रोत.
५. मिठाई व तळलेले पदार्थ अधिक. तळलेले पदार्थ वजन तर वाढवतातच शिवाय तळताना तेलात ट्रान्सफॅटी ऍसिड्स निर्माण होतात. जे कॅन्सर निर्मिती करतात.
६. ओमेगा ३ फॅटी ऍसिड्चं प्रमाण कमी.

आपला आहार योग्य करण्यासाठी व वजन कमी करण्यासाठी मला आढळलेली काही उपयुक्त माहिती व युक्त्या अशा
१. वजन किती असावं ? वजनाच्या टेबल्सवरून इच्छित वजन ठरवू नये. ते तख्ते बहुदा जुन्या माहितीवर आधारित आहेत, जेव्हा बॉडी मास इंडेक्स २५ ते ३० सुरक्षित मानला जात होता. वजन किती असावं हे ठरवण्याचे तीन मापदंड
वजन कि.ग्रॅ.
बॉडी मास इंडेक्स १८ ते २१ असावा.
उंचीचा (मीटर) वर्ग
वेस्ट / हिप रेश्यो ०.८५ किंवा कमी असावा.
तुमचं वजन २५ व्या वर्षी जितकं असेल तितकचं कायम ठेवावं. या आधारावर आपलं इच्छित वजन ठरवावं.
२. शरीरातील चरबी वाढून वजन वाढतं ते ‘खाणं जास्त, श्रम कमी’ या असंतुलनामुळे. हे असंतुलन बदलवलं की वजन कमी होतं.
३. केवळ आहार नियंत्रणाने थोड्या काळापर्यंत वजन नियंत्रण होतं. कायम नियंत्रणासाठी शरीराचे स्नायू वाढवणं आवश्यक आहे. स्नायू वाढवले, की शरीरातील भट्‍टी जास्त जोरात जळते. त्यामुळे शरीरातील फॅट लवकर कमी होतं. स्नायू वाढवण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. अशा प्रकारे व्यायाम आहार नियंत्रण दोन्ही हवे.
४. चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज किमान ३ ते ४ कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी.
५. शरीरातील १ किलो फॅटमधून ८००० कॅलरीज निघतात. व्यायामानं रोज ३०० कॅलरीज जाळल्यास महिन्याभरात ३०० / ३० ९००० कॅलरीज म्हणजे जवळपास दर महिन्याला १ किलो वजन कमी होईल (आहार न वाढवल्यास)
६. कॅलरीज जाळण्यासाठी रोज चाला
चालण्याची गती वाढल्यास प्रति मिनिट जास्त कॅलरीज जळतात. रमत गमत डोलत चालू नका. भरभर, गतीने चाला ब्रिस्क किंवा एरोबिक वॉक घ्या.
घरकाम करा. पुरूषांनाही उपयोगी - शेती किंवा बगिच्यात काम करा.
७. चरबी वाढवणारे सर्वात महवाचे दोन अन्नघटक फॅटस व साखर. फॅट्समध्ये ९ कॅलरीज असतात. शिवाय श्रम करून त्या कॅलरीज वापरल्या नाहीत तर खालेल्या फॅटची ९७ टक्‍के चरबी बनते. साखर किंवा गोड कार्बोहायड्रेट्समधे प्रतिग्रॅम ४ कॅलरिज असतात. प्रोटीन, व्हिटामिन, फायबर नसतात. त्यामुळे त्यांना ‘पोकळ कॅलरीज’ म्हणतात.
८. लहानपणापासून आपल्याला बक्षीस म्हणून, आनंदाचा प्रसंग म्हणून गोड व फॅट असलेल्या मिठाया खायला देऊन मनाला व जिभेला या स्वीट-फॅट जोडगोळीची सवय लागते. स्वीट-फॅटची आवड ही व्यसनासारखीच असते. त्याची आस निर्माण होते. निव्वळ गोड किंवा निव्वळ फॅट फार खाता येत नाही. स्वीट-फॅटची जोडी केली की खूप जास्त खाता येते, खाल्ली जाते. शिवाय लठ्‍ठ लोकांना फॅट जास्त आवडतात. विषचक्रच!
९. हृदयरोग झालेल्यांनी कोलेस्टिरॉल कमी करण्यासाठी आपल्या आहारातील फक्त १० टक्‍के कॅलरीज फॅटमधून मिळवाव्या. रोज किती फॅट खाता येईल. व त्यातील किती सच्युरेटेड फॅट खाता येईल हे प्रकरण ७.५ मध्ये दिलं आहे.
१०. हृदयरोग नसणार्‍यांनी किंवा कोलेस्टिरॉल १५० मि.ग्रॅ. पेक्षा अधिक वाढलेलं. नसणार्‍यांनी फॅट इतकं मर्यादित करण्याची गरज नाही. पण तरी आहारातील फॅट कमी ठेवल्याने वजन व कोलेस्टिरॉल वाढणार नाही. सर्व प्रकारचे फॅट्स धरून एकूण कॅलरीज पैकी २० टक्‍केच्या वर कॅलरीज फॅटद्वारा मिळू नयेत. ११. तेल, लोणी, तूप, चीज, यातील फॅट दिसतंच. पण दुध व दुधाचे पदार्थ, मिठाई, चॉकलेट, आईसक्रिम, अंडी, मांस, मासोळी, तळलेले पदार्थ, शेंगदाण्याचे पदार्थ यात देखील भरपूर फॅट असतं.
१२. घरातील सर्व व्यक्ती मिळून एका महिन्याला किती तेल वापरायचं हा हिशोब करून तेवढंच तेल घरात आणावं. शेंगदाणा किंवा तीळ, सनफ्लावर व सरसो/मोहरी तेलाचं समप्रमाण मिश्रण वापरावं. स्वयंपाकघर सांभाळणार्‍या व्यक्तीने तेलाचं मासिक कोट्यातून दर आठवड्याचं राशन काढून तेवढं तेल आठवडाभर पुरवावं.
१३. फॅटवरची ही मर्यादा लहान मुलांसाठी नाही. त्यांची वाढ होत असल्याने त्यांना अधिक कॅलरीज हव्यात, पण मुलांना लहान वयात जे खाण्याची सवय लागेल तीच आवड आयुष्यभर टिकणार, हे लक्षात घेऊन स्वीट-फॅट खाण्याच्या सवयी लावू नये.
१४. घरात तळलेले पदार्थ किंवा मिठाईचे गोड पदार्थ आठवड्यातून एकदा यापेक्षा अधिक वेळा बनवू नयेत किंवा बाजारातून आणू नयेत.
१५. फायबर काढलेले प्रोसेस्ड फूड्स, बेकरी प्रॉडक्टस, फास्ट फूड्स बाजारात खूप मिळतात. यांचा वापर टाळावा.
१६. मूंग, मटकी यासारख्या डाळी अंकुरित करून त्या जेवणात वापराव्या.
१७. जेवणाच्या सुरूवातीस मुख्य अन्नाने सुरवात न करता ताटात फक्त अंकुरीत डाळी, सूप, सलाद, गाजर, काकडी असल्या गोष्टी वाढाव्या.
त्या खाऊन झाल्यानंतरच मुख्य अन्न वाढावं. त्यामुळे आपोआपच मुख्य अन्न फार खाता येत नाही. उपाशी न राहता देखील डायेटिंग करता येतं.
दिवसातून दोनदा खूप पोट भरून खाल्ल्याने (शरीरामधे अन्नाचं परिवर्तन शुगरमध्ये होत असल्याने) रक्तात शुगरचा पूर निर्माण होतो. त्याऐवजी दिवसातून ४-५ वेळात पसरून खाल्ल्याने रक्तातील कोलेस्टिरॉल देखील कमी होतं.
१९. दोन जेवणांच्या मध्ये खरी भूक लागल्यास गोड खाऊ नये. गोड खाल्ल्यानंतर ताबडतोब रक्तातील शूगर वाढते व २ तासांनी ती झपाट्याने कमी होते.(रिबाऊँड हायपोग्लायसिमिया) त्यामुळे पुन्हा गोड खाण्याची इच्छा होते.
२०. मधल्या काळात खाण्यासाठी भाजलेले फूटाणे (सालीसकट), मुरमुरे, लाह्या, अंकुरित डाळी, गाजर, टमाटे, काकडी, स्किम्ड दुधाचं ताक असले पदार्थ वापरावे.
२१. मनावरील ताण किंवा काळजी असली की त्या काळजीच्या विचारांपासून पळवाट म्हणून आपण उगाच खातो. भूक नसली तरी मनाला ‘काही तरी’ खाण्याची आठवण होते. आपली खरी भुक ओळखायला शिकणं, हा पुनर्शिक्षणाचा भाग आहे. शिवाय ताण, काळजी कमी करण्यासाठी उपाय करावे.
२२. पिठातील कोंडा, तांदळावरील लालसर साल, डाळींची साल, बटाट्यावरील साल काढू नका. त्यातील तांदूळ पॉलीश केलेला चकचकीत पांढरा वापरू नका. त्यातील फायबर निघून गेलेलं असतं. ब्रेड ही कोंड्यासकटच पिठाची - म्हणजे ब्राऊन ब्रेड- वापरावी.
२३. फळाचे रस (ज्यूस) प्याल्यामुळे (फायबर काढून टाकून फळातली निव्वळ शुगर पोटात गेल्याने) रक्तात शुगरचा पूर निर्माण होतो. त्याऐवजी पूर्ण फळं खाणं अधिक चांगलं.
२४. मेथीचे दाणे अंकुरित करून किंवा भूकटी करून जेवणापूर्वी २ चमचे खावे त्याने शूगरचा पूर कमी. शिवाय कोलेस्टिरॉल देखील कमी होतं. मात्र काही जणांना गॅसेस होऊ शकतात.
२५. तेलाचा वापर स्वयंपाकात कमी व्हावा म्हणून निर्लेप सारखी भांडी वापरा.
२७. आपलं वजन, बॉडीमास इंडेक्स, वेस्ट-हिप रेश्यो, ब्लड शुगर व कोलेस्टिरॉल नियमितपणे मोजा व ती माहिती टिपून ठेवा.


सौजन्य - आरोग्य.कॉम  

आहार म्हणजे काय?

स्थूलमानाने आहाराची व्याख्या करायची झाली तर जगण्यासाठी बाहेरून आपण आत ज्या वस्तू घेतो त्याला आहार म्हणतात. आहाराबद्दलच्या शास्त्रीय महितीचा बहुतांशी अभावच आढळतो, म्हणून या नेहमीच्या वाटणार्‍या परंतु अत्यंत महत्वाच्या अशा गोष्टीसंबंधीची माहीती

आहाराची आवश्यकता - मानवाला काम करण्यासाठी उर्जा लागते. ही उर्जा किंवा कॅलरीज अन्नातून मिळतात म्हणून अन्नाची किंवा आहाराची आवश्यकता असते. माणसाला वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, भाज्या दूध, वगैरे पदार्थापासून उर्जा मिळत असते. किंबहूना आहारात जेवढे वैविध्य असेल तेवढा समतोल अधिक आणि अर्थातच तुमची आरोग्याची गाडी सदैव रूळावरच! अखेर जीवन म्हणजे तरी काय हो?

शरीरेंद्रिय - सत्वात्मसंयोग: आयु उच्चते
शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांच्या संयुक्तीकरणाने जीवन बनते. शरीरधारा व चित्तधारा यांच्या मिलाफाने जीवनधारा यशस्वी होत असते.

आहाराचे महत्व
आहार हा केवळ पोटाची खळगी भरून ढेकर देण्यासाठी नाही तर पुढील गोष्टीसाठी आहाराची आवश्यकता आहे,
१. दैनंदिन उर्जा निर्माण करणे.
२. शरीराची वाढ करणे.
३. नवीन पेशींची निर्मिती करणे.
४. रोग प्रतिबंधक शक्तीची निर्मिती व संवर्धन करणे.
५. विद्युत चुंबकीय लहरींची निर्मिती व (PH) चे रक्षण करणे.
६. उत्सर्जन क्रिया सुलभ करणे.
७. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट परिपूर्ण करण्यास मदत करणे.
इतक्या महत्वाच्या गोष्टींशी आहाराचा, पर्यायाने आरोग्याचा आणि अस्तित्वाचा किंवा जीवनाचा निकटचा संबंध आहे म्हणुन त्याकडे दुर्लक्ष करू नका.

आहाराचे स्वरूप आणि प्रकार
हवा आणि पाणी यांना रोम आहार असे म्हणतात आणि घन स्वरूपात घेतल्या जाणार्‍या आहाराला कवल आहार असे म्हणतात.

अ) हवा, पाणी आणि सुर्य प्रकाश हे देखील अन्नच पण याची जाणीव फार थोड्यांना आहे. खरे तर हवेला सर्व अन्नामध्ये अधिक महत्व आहे. खायला नसेल तर उपाशी पोटी का होईना, पण काही काळ (महिने) मनुष्य जगी शकतो. पाण्याशिवाय काही दिवस राहू शकतो. पण हवेशिवाय काही मिनिटे देखील जिंवत राहू शकत नाही. म्हणून हवेला परम अन्न असे संबोधिले जाते.

आपल्या शरीराचा ६३ टक्‍के भाग हा पाण्याने बनला आहे. शरीरातील निरनिराळ्या पेशिंना जे अन्न पोचवले जाते ते रक्तामधून आणि रक्ताची द्रवता ही पाण्यामुळे टिकून राहते.

ब) कवल आहार - आपण दैनंदिन जीवनात भात, भाजी, फळे या स्वरूपात जो आहार घेतो तो आहार म्हणजे कवल आहार होय. या कवल आहाराची निर्मिती ही दोन प्रकारात असते.

१. शाक किंवा वनस्पतीजन्य आहार (फळे, धान्य इ.)
२. मांस किंवा पशुजन्य आहार (अंडी, मांस, मासे इ.)


सौजन्य - आरोग्य.कॉम 

अध्यात्म आणि आहार

अध्यात्म तत्वान्वये ‘निरोगी शरीर’ ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. निरोगी शरीरात निरोगी मन राहाते. आहाराचा मानसिक आरोग्याशी संबंध असतो संयमित आणि संतुलित आहारामुळे निरोगी शरीरातील मन आनंदी व निर्भय रहाते.

काय खावं आणि काय खाऊ नये?
शरीराच्या समग्र प्रक्रिया अत्यंत रासायनिक आहेत. माणसाच्या शरीरात जर दारू गेली तर तो त्या रसायनानुसार वागेल, ते नशेनं व्यापून जाईल. विष प्यायला दिल्यानं सॉक्रेटिसचा मृत्यू घडला. विष हे बघत नाही. की हा माणूस सॉक्रेटिस आहे की सामान्य माणूस, अन्‌ भोजनही हे पाहात नाही.

जेवण मादक असेल तर मनुष्याच्या चेतनेमध्ये बाधा आणेल, उत्तेजकता आणेल, सुप्रसिध्द डॉ. केनेथ वॉकर म्हणतात ‘लोक जे भोजन घेतात त्यातल्या अर्ध्या भोजनानं त्याचं पोट भरतं आणि अर्ध्या भोजनानं डॉक्टरांची पोटं भरतात. जगामध्ये जेवून मरणारांची संख्या भुकेमुळे मरणार्‍यांच्या संख्येपेक्षा नेहमीच जास्त राहिली आहे. एखादा माणूस तीन महिनेपर्यंत उपाशी राहू शकतो परंतु एखादा तीन महिनेपर्यंत भरमसाठ जेवण करत राहिला तर तो कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहू शकणार नाही.

प्राचीन काळापासून ‘आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य’ हे ध्येय वैद्यक शास्त्राने पुढे ठेवलेले आहे.‘ तुमच्या रक्तवाहिन्या जितक्या कार्यक्षम असतील तितके तुम्ही तरूण असाल असे म्हणतात. त्यासाठी उत्तम आहार. हवा, उत्तम म्हणजे महाग नव्हे, तर शरीराचे पोषण करणारा, झीज भरून काढणारा व मानवणारा असावा. अशा अध्यात्मपूर्ण आहारापासून आरोग्यसंपन्न दिर्घायुष्याच्या प्राप्तीचा विचार करता येईल.

माणूस ज्याप्रकारे भोजन करतो, तसे त्याचे भाव, विचार, बुध्दि नि स्फुरणं घडतात. जे लोक मद्य. मांस वगैरे तामसी पदार्थ सेवन करतात. त्यामध्ये निष्ठूरता, क्रूरता आणि निर्दयता अधिक आढळतो. तामस, राजस आहाराने काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, मत्सर वगैरे दोष होऊन साधकाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडतात.

नियमितपणे मांसाशन करणार्‍या मंडळींना पावसाळ्यात ते अगदी कटाक्षाने टाळावे असे जे धर्म शास्त्राचा आधार देऊन सातत्याने सांगितले जाते. त्याला मात्र तितकाच शास्त्रीय आधार आहे. कारण ते तसे प्रकृतीला अपायकारकच असते.

काहीजण उपवास करतात. तेव्हा साबुदाणा, खिचडी, शाबुवडे, वरीतांदूळ, शेंगदाणे, वापरतात. हे सात्विक आहारात बसत नाहीत. नेहमीच्या आहारात आम्लप्रमाण (acids) जास्त असते म्हणून उपवासावेळी अल्कीप्रमाण अधिक अन्नपदार्थात असावेत, उपवासात बटाटा, रताळी व सुरण वापरतात. त्यात जास्त पिष्टमय घटक (carbohydrates) आहेत.

उपवासाचे खरे कार्य म्हणजे शरीरातील घाम बाहेर टाकण्यास मदत करणे, शरीर स्वच्छ करणे, पचनेंद्रियांना जरूर ती विश्रांती देणे व नवीन उत्साह- आरोग्य संपादणे, उपवासास आहाराची निवड योग्य अशी करावी की शरीराला जास्त क्षार व जीवनसत्वे मिळतील.

एकंदर अध्यात्मानुसारच्या आहार- प्रणालीने आरोग्य संपदा मिळवणे आज काळाची गरज आहे ज्या आहारामुळे शारीरिक ताकद मिळते. मानसिक तत्परता रहाते. रोगप्रतिबंधक शक्ती निर्माण होते, सौंदर्य वाढते आणि दीर्घायुषी जीवन मिळते. अशा समतोल आहाराला परतत्वाचे अधिष्ठान दिले तर माणसात आरोग्यसवे दैव संपत्तीचे संरक्षण अन्‌ संवर्धन घडू लागेल असे वाटते.


सौजन्य - आरोग्य.कॉम 

पोषक पदार्थ आणि अन्न

Food Pyramid
न्यूट्रीशन हे अन्नाच शास्त्र आहे पोषकता आणि त्याचा शरीरवर होणारा परिणाम याचाच अभ्यास या शास्त्रात होतो.

यामधे अन्न पोटात घेणे, पोषक द्रव्य पचविणे शोषून घेणे, पाठविणे आणि वापर करणे व शेवटी त्याचा निचरा करणे यांचा समावेश होतो. या प्रक्रियेला ‘पचन’ असे म्हणतात.

अन्नाबाबतीतील प्रत्येक गोष्ट, खाण्यापासून ते त्याचा निचरा होइपर्यंतची प्रत्येक गोष्ट न्युट्रिशन मधे अंर्तभूत आहे. अन्नाचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीत असे विविध पैलू आहेत. त्यांचा आहार आणि पथ्ये यांमधे अभ्यास केला जातो.

‘आहार शास्त्र’ ही योग्य आहार घेण्याची कला असून विविध गटातील, वेगवेगळ्या परीस्थितील लोकांच्या आरोग्य परीस्थितीनूसार व त्यांच्या आहाराच्या व पोषकतेच्या तत्वांचा यांमधे अभ्यास केला जातो. पोषण हे समतोल आहाराचे शास्त्र आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली रहाते, व रोगांपासूनही संरक्षण होते थोडक्यात व्यवस्थीत पोषणामुळे शरीराच्या विविध भागांना योग्य असा अन्नाचा पुरवठा होतो, याशिवाय अन्नाचा पूरवठा, हा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, व मानसिक या गोष्टींवरही अवलंबून असतो.


 सौजन्य - आरोग्य.कॉम

पुरूषांसाठी समतोल आहार ...

  1. रोज सकाळी जीवनसत्व घ्या.
  2. विविध अभ्यासपाहणीतून असे सिध्द झाले आहे की, नियमित जीवनसत्वाचा पुरवठा झाल्याने शरीराला कर्करोगाच्या विरोधातील अधिकच संरक्षण मिळते.
  3. नाष्ठ्याच्या वेळेस दुधात कॉफी टाका, कॉफीत दूध नको.
  4. शरीराची दैनदिन ‘डी’ जीवनसत्वाची गरज भागविण्यासाठी रोज सकाळी कपभर दूध घ्या. चहा व कॉफीतील दूधामुळे २५ टक्की ‘ डी ’ जीवनसत्व मिळते.
  5. प्रत्येक जेवणाआधी दोन ग्लास पाणी घ्या.
  6. यातून दोन गोष्टी होतात, एक म्हणजे शरीराला पुरेसे पाणी मिळते व पाण्यामुळे तुम्ही थोडे कमी खाता. दोन ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी होते. व अन्न कमी घेतल्याने वजन कमी होते.
  7. प्रत्येक खाण्यानंतर कांदा खा.
  8. कांद्यात हृदयरोगप्रतिबंधक घटक असतात, ज्याला ‘फ्लॅवोनाइड्‌स’ असे म्हटले जाते. म्हणून कांदा खाण्यास हरकत नाही. फक्त त्यानंतर ब्रश करण्यास विसरू नका.
  9. पिझ्झा नेहमी जास्त टोमॅटो सॉस व कमी चीज याच्याबरोबर असावा.
  10. जेव्हा तुम्ही फास्टफूड घ्याल, त्यानंतर दोन ग्लास पाणी घ्या.
  11. बर्गर, चीप्स, पिझ्झा, चिवडा इं. पदार्थ चरबीयुक्त असतात जे तुमच्या हृदयास धोकादायक असतात. भरपूर पाणी पिऊन अतिरिक्त क्षार बाजूला सारा.
  12. दर मंगळवारी मासे खा.
  13. बुधवार किंवा रविवारीही काही फरक पडत नाही. आठवड्यातून एकदा मासा खाणे चांगले. त्यात चरबी असते व ओमेगा ३ नावाचे जे द्रव असते त्यामुळे ह्रदयचे कार्य सुरळीत पार पडते. नियमित मासे खाणार्‍यांत हृदयरोगाचे झटके येण्याचे प्रमाण खूप कमी आढळते.
  14. नियमित गोड पदार्थ खा. असे का ? तर गोड बिस्किटात चरबीयुक्त घटक कमी असतात जेवणाच्या शेवटी खाल्लेले गोड दही, मेंदुकदे जेवण संपल्याचा गोड संदेश पोहचवते. अशा जेवणानंतर शांत झोप लागेल.
मधुमेहींनी त्यांच्या डॉक्टरशी याबाबत सल्ला मसलत करावी व साजुक तुपातला गाजर हलवा खाण्याचे टाळावे.


सौजन्य - आरोग्य.कॉम 

आयुर्वेदाच्या मदतीने शरिराची काळजी

शरिराला मसाज करणे हे प्रत्येक वयोगटातील व्यक्तींसाठी फायदेशीरच असते. यामुळे शरिरातील मृत पेशी स्वच्छ होतात व रक्तसंचार वाढण्यास मदत मिळते. नियमित वापरामुळे त्वचेला सुदृढता येते व त्वचा ताजीतवानी रहाते.


सामग्री प्रमाण प्रक्रिया
सरिवा
हरडा
कुश्ता
लिंबाचा पाला
वाच
देवदर
आवळा
मुलाटी
प्रत्येकी एक भाग यादीतील प्रत्येक पदार्थ चांगल्या प्रकारे पाण्यात मिसळून घ्यावा, त्यामिश्रणाचा चेह-यावर लेप द्यावा, हा लेप त्वचेवर २० मिनिटे किंवा रात्रभर ठेवावा.
बवाची (बिया)
खुस (मुळ)
नागरमोटा
शिकाकाई
प्रत्येकी दोन भाग
कापूर कर्चि (मुळ) प्रत्येकी चार भाग

वर उल्लेख केलेल्या मिश्रणाची सुकी पावडर बनवता येते तसेच हवाबंद डब्यात साठवूनही ठेवता येते. आंघोळ करताना त्यापावडरची पातळ पेस्ट पाण्यात किंवा दुधात मिसळुन वापरता येते.

सौजन्य - आरोग्य.कॉम 

योग

Yoga योग
पतंजलींची योग विषयक केलेली व्याख्या आहे. योगश्चित्त वृत्ती निरोध: अर्थात, चित्ताच्या - मनाच्या वृत्तींचा प्रतिबंध करणे म्हणजे योग!

मन तर सारखे बाहेर धावत असते. त्याला स्थिर करणे यासाठी धावणा-या मनाला अडवायला हवे. रोखायला हवे. ते करताना वेगवेगळे मार्ग पतंजलींनी सांगितले आहेत. त्यातला एक मार्ग अष्टांग योग.

अष्टांग योगाची आठ अंगे कोणती?
  1. यम
  2. नियम
  3. आसन
  4. प्राणायाम
  5. प्रत्याहार
  6. धारणा
  7. ध्यान
  8. समाधी
अशी आठ अंगे आहेत. या आठही अंगांचा सराव करावा लागतो. किंबहुना योग ही एक जीवनपध्दती आहे.

आज जे तणाव आपल्या भोवती आहेत त्यामुळे आपण अनेकदा अस्थिर होतो. गोंधळतो. आणि ‘विवेक’ राहत नाही. खरं तर अढळ विवेकज्ञान हाच दु:खांपासून मुक्तता मिळविण्याचा उपाय आहे. विवेख्याति: अविल्पवा हानोपाय:

विवेक तर हवाच आहे. विवेक म्हणजे केवळ चांगले वाईट एवढेच मर्यादित नाही. विवेक केवळ सु-विचार नाही. सर्व परिस्थितीचा सांगोपांग अभ्यास करुन, क्षणाक्षणाच्या क्रमाचा विचार करुन, भविष्यातील उद्दीष्टांवर नजर ठेवून, आपल्या अनुभवाचा, माहितीचा, ज्ञानाचा उपयोग करुन घेतलेला व्यापक स्वहिताचा निर्णय म्हणेज विवेक. आपलं जीवन म्हणजे एक निर्णयांची/निवडींची मालिका असते. प्रत्येक निर्णय विवेकाने घेतला तर दु:ख नाहीसे होईल. आणि विवेकाने निर्णय घेण्यासाठी, मन स्थिर हवे. त्याकरता योगाभ्यास हवा. योगाभ्यास म्हणजे केवळ आसने नाही. योगाभ्यास जीवनमार्ग आहे.

यम म्हणजे काय?
अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रहमचर्य अपरिग्रहा यमा:
अहिंसा: म्हणजे कोणत्याही सजीव प्राण्यास मुद्दामून आपणहून शारीरिक/मानसिक/भावनिक इजा न पोचवणे.
प्रत्येक हिंसेची अप्रत्यक्ष प्रतिक्रिया असते. आणि ही प्रतिक्रिया माणसाच्या दु:खाला आमंत्रण देते. आज मी कुणाचा अपमान केला तर आज ना उद्या तो त्याच्या पध्दतीने प्रतिक्रिया देणार....आणि क्रिया-प्रतिक्रियांच्या साखळीत माझे मानसिक स्वास्थ्स बिघडणार!
सत्य: म्हणजे जे आहे ते. जसे घडले तसे. जे घडले ते मान्य करणे म्हणजे सत्य. वास्तवाचा स्वीकार म्हणजे सत्य. पण आपलं मन वास्तव स्वीकारायला घाबरतं, नाकारतं आणि ‘प्रत्यक्ष आहे पण मन स्वीकारत नाही’ अशी द्विधा अवस्था येते. जिथे द्वंद्व आहे तिथे शांती कशी?
अस्तेय: चोरी न करणे म्हणजे अस्तेय, आज जी समस्या आहे ती ही "माझे नाही ते माझे झालेच पाहिजे"! त्या करता कोणताही मार्ग मी घेतो/निवडतो आणि मग अतिशय त्रास होतो. ‘वरकड’ कमाई आणि ‘ह्र्दयविकार’ यांचा घनदाट संबंध दिसून येतो.
ब्रम्हचर्य: अर्थात ब्रहमाला धरुन आचरण.
आश्रम धर्माप्रमाणे स्त्री पुरुष समागम म्हणजे सुध्दा ब्रहमचर्यच. गृहस्थधर्म नीतीनियम पाळणे म्हणजे ब्रम्हचर्यच! 
 
सौजन्य - आरोग्य.कॉम 

माझ्याबद्दल