जीवामृत एक चमत्कारी विरजण ‘झिरो बजेट नॅचरल फार्मिंग’चा जणू जीवच आहे. त्यांच्या या कृषी पद्धतीतीचे जे चार आधार स्तंभ सांगितले आहेत,त्यात बीजामृत,जीवामृत,आच्छादन आणि वापसा यांचा समावेश होतो. शून्य खर्चाची शेती करयची असेल तर शेतकर्यांकडे एक देशी गाय असणे गरजेचे आहे.एका गाईच्याशेण- गोमुत्राचा वापर करून 30 एकर शेती उत्तम प्रकारे करता येते.त्यासाठी मग कोणतेही रासायनिक खत ,जीवाणू खत,सेंद्रिय खत म्हणजेच शेताच्या बांधावर तयार होणारे कंपोस्ट,नॅडेपखत ,किंवा अनुदान घेऊन शेतातच तयार केलेले गांडूळ खत वापरायची अजिबात आवश्यकता नाही. तरीही पिके उत्तम येतात पिकांचे उत्पादन .ऊसाचे टनेज आणि फळांचे उत्पन्नही भरपूर मिळते आणि सर्व फळे एकाच आकाराची येतात.पिकांवर कोणताही रोग पडत नाही .अर्थात त्यासाठी पेरणीच्या वेळी बिजामृत नंतर जीवामृतासोबत आच्छादन व वापसा तंत्रही समजून घेऊन ते वापरावेच लागते. देशी गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे मानले जाते ते असतात की नाही माहिती नाही, पण गाईच्या पोटात अनंत कोटी उपयुक्त जीवाणू असतातआणि या जिवाणूंना अनेक पटीत गुणाकार पद्धतीने वाढवण्याचे तंत्र पाळेकरांनी शोधून काढले आहे. हेच जीवाणू निकोप वाढीसाठी पिकांना झाडांना मदत करतात. मात्र विदेशी किंवा जर्सी गाईचे शेण गोमुत्र मात्र या साठी अजिबात चलणार नाही. जीवामृत नावचे विरजण ,अर्थात सुभाष पाळेकर संशोधित जीवामृत हे देशी गाईच्या शेण आणि गोमुत्र यांच्यापासून बनवायचे असते ते खत नसून विरजण आहे .पण त्याचे त्याचे सामर्थ्य एवढे आगाध आहे की ते वापरले की सर्व प्रकारच्या रासायनिक आणि सेंद्रिय खतांची शेतीतून सुट्टी होते. जीवामृत तयार करण्याची विधी ,त्याला लागणारा अवधी,आणि वापर कसा करावा याची माहिती या लेखमालेत क्रमश: घेणार आहोत .अर्थात हे सर्व ज्ञान माझे नसून कृषी ऋषी सुभाष पाळेकर यांच्या तपश्चर्येचे हे फळ आहे.त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात या जीवामृताबद्दल सविस्तर माहिती दिली जाते त्यांच्या पुणे येथील शिबिरात मीआणि मझ्या मुलाने घेतलेल्या माहितीच्या आधारावर आणि आमच्या शेतात विविध पिकांना जीवामृत वापरल्यामुळे आलेल्या अनुभवावर हे लिखाण आवलंबून आहे.याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. जीवामृत कसे तयार करतात? याची कृती बघण्यापूर्वी जीवामृत तयार करायला कोणते साहित्य लागते ते समजून घ्यावे लागेल. साहित्य: 200 लिटर पाणी ,5 ते 10 लिटर देशी गाईचे गोमुत्र, ज्यात देशी गाईचे गोमुत्र आणि 10 किलो देशीगाईचे शेणआणि गोमुत्र वापरताना , 50 टक्के गोमुत्र असणे आवश्यकच आहे. बाकी निम्मे बैलाचे किंवा म्हशीचे मुत्र घेतले तरी चलते मात्र कोणत्याही परिस्थितीत जर्सी गाईचे गोमुत्र चालणार नाही, कारण त्या प्राण्यात गाईची कोणतीच लक्षणे नाहीत. शेणाचे प्रमाणही गोमुत्रासारखेच लागेल.म्हणजे 5 किलो गाईचे शेण अनिवार्य 50 टक्के म्हणजे पाच किलो बैलाचे अथवा म्हशीचे कोणाही एकाचे वापरता येते. 1 किंवा 2 किलो डाळीचे पीठ ज्यात तूर ,मुग,हरभरा ,घेवडा,चवळी अश्या कोणत्याही कडधान्याचे चालते . फक्त सोयबीन आणि शेंगदाण्याचे पीठ चालत नाही कारण त्यांच्या तेल तवंगामुळे जीवामृतातील जीवाणूंची वाढ खुंटते. या शिवाय एक किलो काळा गूळ ,किंवा चार लिटर ऊसाचा रस ,किंवा 1 किलो कोणत्याही गोड फळाचा गर ज्यात पेरू ,पपई ,चिकू इ. आणि एक मुठभर बांधावरील जीवाणू माती.एवढे सारे साहित्य जीवामृत बनवायला लागते ज्यातील बहुतेक शेतकर्यांच्या शेतात तयार होणारे आहे.बाजारातून काहीही विकत आणायचे नाही.ही झिरो बजेट शेती करणार्या शेतकर्याची प्रतिज्ञा आहे. गोमुत्र संकलन कसे करावे? जर गाईचे गोमुत्र मिळवायचे असेल तर पहाटे पाच वाजताच उठावे लागते आणि गाय रात्रभर विश्रांती घेऊन उठायच्या आत गोमुत्र धरायचे भांडे घेऊन घेऊन गाय बंधलेल्या ठिकाणी ते उठायच्या वेळी हजर राहावे लागते. हे करण्यासाठी काही गरीब होतकरू शेतमजुरांची मुले निवडता येतील. ज्यांच्या घरी गाय आहे अशा मुलांना जर आपण देशी गाईच्या गोमुत्राच्या संकलनाचे काम दिले तर ते मिळणार्या पैशाच्या आशेने पहाटे पाच वाजता उठून गोमुत्र संकलन करतील.त्यांना एक लिटर गोमुत्राच्या मोबदल्यात पांच ते दहा रुपये दिले तर ते पैसे त्यांच्या शिक्षणाच्या कामी येतील.यातून स्वार्थ आणि परमार्थ साधेल. पण झिरो बजेट शेती असल्याने गोमुत्र विकत घेण्यापेक्षा एक देशी गाय पाळली तर गोमुत्रासोबत दुध आणि गाईपासून बैल व गाई मिळवता येतील . एक गाय विकत घेऊन पाळली तर तिच्या गोमुत्र आणि शेणापासून 30 एकर शेतीसाठी वापरावे लागणारे जीवामृत वर्षभर तयार करता येते. आणि गोमुत्राच्या साह्याने तयार होणार्या जीवामृताचा वापर करून चारा लागवड केली तर 10 गुंठे चारा एका गाईल वर्षभर पुरतो. आपली शेती झिरो बजेट असल्याने गोमुत्र विकत घेणे परवडणार नाही .त्या ऐवजी देशी गाय पाळावी , ती ज्या गोठ्यात बांधतात, तो गोठा साधारणत: 11.5फुट बाय 13 फुटाच्या जागेत बांधून घ्यावा ज्याच्या फरशीचा किंवा बेड चा उतार , गाईच्या पायाकडील बाजुला काढून सर्व गोमुत्र नालीत एका बाजूला उताराकडे वाहत जाऊन ते एका हौदात जमा होईल अशी व्यव्यस्था करता येते. वरील सर्व साहित्य वापरून जीवामृत तयार करण्यासाठी एक प्लास्टिकचा 200 लिटरचा ड्रम किंवा मातीचा रांजण, किंवा लोखंडाचा ड्रम वापरता येतात .या पैकी कहीही विकत घ्यायचे नसेल तर सावलीत खड्डा करून त्याला त्याला दगडाने ठोकून गच्च करा आणि शेणाने लिंपून प्लास्टिकच्या अस्तराने झाकून त्यात पाणी टाकून जीवामृत करता येते.त्या साठे लागणारा पोहरा आपल्याकडे असेलेया कोणत्याही कीटकनाशकाचा डब्बा घेऊन त्याला समांतर दोन छिद्रे पडून त्यात एक लोखंडी ग्जालीचा तुकडा बसवून पोहरा करता येतो. धर्म उपलब्ध असेल तर तो उन व पावसाचे पाणी लागणार नाही अशा जागी सावलीत ठेऊन पाण्याने भरा. त्यात सर्वप्रथम हाताने शेण कालवून घ्यावे.त्यानंतर पाच ते दहा लिटर गोमुत्र मिसळावे ,एक किलो गुळ आणि एक किलो बेसन पीठ त्यात मिसळावे .गुळाऐवजी चार लिटर उसाचा रस किंवा एक किलो गोड फळाचा गर टाकून मिसळावा.अर्थात ही फळे शेतातच कायम मिळावी म्हणून अशा फळाचे एकेक झाड लावता येते किंवा बागवान सायंकाळी घरी परतत असताना ती पिकलेली फळे फेकून देतो त्याला सांगितले तर ही गोड अति पिकलेली फळे तुम्हाला फुकट देईल किंवा अत्यंत कमी पैशात ती घेता येतील कारण आपली झिरो बजेट शेती आहे.त्यामुळे महागडी फळे विकत घेऊन ती वापरायची नाहीत. शेतातील 10 किलो वजनाचे उसाचे धांडे बारीक तुकडे करून टाकता येतील.शेजारीही फुकट देईल गूळ देखील घाऊक विक्रेत्या दुकानदाराकडे गेलात तर कळा किंवा गुळाच्या विक्री नंतर उरलेले गुळाचे तुकडे अतिशय स्वस्तात मिळतात .नांदेडमध्ये इतवारा भागात अशी काही दुकाने आहेत त्यांच्याकडे हा न विकला जाणारा काळा गूळ 10 ते 15 रुपये किलोने मिळतो.जीवामृतात गूळ ,उसाचा रस ,उसाचे धांडे ,गोड फळाचा गर या पैकी फक्त एकच गोड पदार्थ वापरायचा आहे,.बांधावरील मुठभर जीवाणू माती (50 ग्राम) घेऊन या द्रावणात टाकावी व हे द्रावण आपल्या हाताने कालवून घ्यावे व एक लांबट लाकूड किंवा काठी घेऊन क्लाकवाईज अर्थात ब्रह्मांड गतीने ,विश्वगतीने म्हणजे पृथ्वी ज्या दिशेने डावी कडून उजवीकडे फिरते त्या दिशेने किंवा देवाला प्रदक्षिणा घालतात त्या दिशेने दोन मिनिट ढवळावे. गोणपाट झाकून ठेवावे ड्रमाचे तोंड इतके पक्के बांधून नका की त्यातून हवाच बाहेर पडणार नाही म्हणून सच्छिद्र गोणपाट बांधून तोंड बंद कारावे. या ड्रमावर उन्हे पावसाचे पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि सकाळ संध्याकाळ गोणपाट काढून लाकडाने दोन मिनिटे ढवळावे. 48 तास किण्वनक्रिया होण्यासाठी लागतात. त्यानंतर हे द्रावण जीवामृत बनते आणि वापरायला तयार होते. त्याची एक्सपायरी डेटते तयार झाल्यावर सात दिवसांनी येते .त्या आधीच ते वापरून टाकावे. आज कवी श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर असते तर ते या जीवमृताचे सामर्थ्य बघून म्हणाले असते. माझिया जीवामृताचिये बोलु कवतिके सर्व खतांच्या मात्रांशीही पैजा जिंके या नंतरच्या लेखात आपण जीवामृत कसे कार्य करते त्याचे फायदे पिकांना कसे मिळतात . प्रत्येक पिकला कितीआणि ते कसे वापरावे याची माहिती घेणार देणार आहे.
---*---
बुधवार, २८ जानेवारी, २०१५
by - ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा