रविवार, ९ एप्रिल, २०१७

स्टीव्ह जॉब्स- कलंदर आयुष्यातील प्रत्येक वळण हाच एक संदेश


56 वर्षांच्या आयुष्यात जगाचा निरोप घेणा-या स्टीव्ह जॉब्स या अवलियाच्या कलंदर आयुष्यातील प्रत्येक वळण हाच एक संदेश ठरले. आजचे वर्तमान आणि उद्याच्या भविष्याचा अचूक वेध घेत त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षीच कॉम्प्युटरच्या व्यवसायात शिरकाव केला. तंत्रशिक्षणाची पदवी नसल्याने त्यांनी या क्षेत्रातील तरबेज सहकाºयांना निवडले. 
बाजारपेठेच्या गरजेची नस पकडत जॉब्स यांनी एकापेक्षा एक अत्याधुनिक व सरस उत्पादने धूमधडाक्यात उतरवली. प्रख्यात कॉप्युटर कंपनी आयबीएमने पर्सनल कॉम्प्युटर आणण्याच्या चार वर्षे आर्धीच त्यांनी आपला अ‍ॅपल-1 हा पीसी लाँच केला. अ‍ॅपलच्या सहकाºयांसोबत मतभेद झाल्याने आपलीच कंपनी सोडली. 1997 मध्ये तोट्यात चालत असलेल्या अ‍ॅपलच्या सल्लागारपदावर ते परतले. 2000 मध्ये अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. यानंतर त्यांनी बाजारात आयपॉड, आयफोन अणि आयपॅड सादर केला. त्यांच्या या नेतृत्व व दूरदर्शीपणास जगभराने सलाम ठोकला आहे. 
कॉम्प्युटर इंजिनिअर नसतानाही...
जॉब्स आणि रीड कॉलेजमधील त्यांचा मित्र स्टीव्ह व्होज्नियाकने शिक्षण अर्ध्यावरच सोडले होते. 1971 मध्ये त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा जॉब्स 16, तर व्होज्नियाक 21 वर्षांचा होता. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या व्होज्नियाकने पहिल्या व्हिडिओ गेमचा टेलिटाईप व नंतर मायक्रोप्रोसेसर बनविला होता. मात्र, त्या वेळी हा गेम विकावा कसा, अशी अडचण होती. 
70च्या दशकात कॉम्प्युटर क्षेत्रात नवनवे प्रयोग व नवनिर्मिती होत होती. नेमकी हीच नस पकडत जॉब्सने 1976 मध्ये व्होज्नियाकवर कॉम्प्युटर निर्मितीची जबाबदार सोपवीत स्वत: मार्केटिंगमध्ये लक्ष घातले. अशा रितीने अ‍ॅपलची सुरुवात झाली. त्यांना 50 कॉम्प्युटर्सची पहिली आॅर्डरही मिळाली खरी, मात्र हे संगणक वेगवेगळ्या सुट्या भागांत न देता पूर्णपणे एका मशिनीच्या स्वरुपात मिळावे, अशी अट होती. 

खडतर बालपण
सिरीयाचा मुस्लिम विद्यार्थी अब्दुल फतेह जॉन जंदाली व जोआन शिबिल यांनी विवाहाआधी जन्मलेले मूल अनाथालयाला दिले होते. त्यासाठी त्यांची एकच अट होती. त्यांचे मूल दत्तक घेणारे कुटुंब हे सुशिक्षित असले पाहिजे. कॅलिफोर्नियातील पॉल व क्लरा जॉब्स या आर्मिनियन कुटुंबाने त्यांचे मूल दत्तक घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. जॉन - जोआन यांचे मूल त्यांना दत्तक देण्यात आले. त्या मुलाला स्टिव्हन पॉल जॉब्स असे नाव मिळाले. जॉब्स यांचे कुटुंब मजुरी करणारे आहे हे समजल्यानंतर त्यांची आई जोआनने स्टीव्हला दत्तक देण्यास आक्षेप घेतला. 6 महिन्यांच्या चर्चेनंतर जोआन दत्तक करारावर स्वाक्षरी केली. या ओढाताणीचा स्टीव्ह याच्या मनावर गंभीर परिणाम झाला. कुणालाच न आवडणारा मी एकमेव मुलगा आहे, असे त्याचे मत बनले होते.

56 वर्षांच्या आयुष्यात जॉब्सने जिंकली दुनिया
जागतिक तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा बदलवून टाकणाºया स्टीव्हन पॉल जॉब्स या अवलियाचा जन्म 24 फेबु्रवारी 1955 मध्ये सॅनफ्रान्सिको येथे झाला. एकाच विद्यापीठात शिकणारी जोआन शिबल व सीरियाचे मुस्लिम वंशाच्या अब्दुल फताह जंदाली या जोडप्याच्या पोटी स्टीव्हचा जन्म झाला. यामुळे स्टीव्हला कॅलिफोर्नियाचे पॉल आणि क्लॅरा जॉब्स यांना दत्तक दिले. 
- हायस्कूलमध्ये असताना स्टीव्हला ह्यूलेट पॅकर्डच्या कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. येथेच त्याची स्टीव्ह व्होज्नियाकसोबत ओळख झाली. 
- 17 वर्षांचे वय असताना त्यांना (1972) पोर्टलँड येथील 
रीड कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, मात्र सहाच महिन्यांत त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला. 
- 19 व्या वर्षी (1974) साली ते व्हिडीओ गेम बनविणाºया कंपनीसोबत जुळले
तीन नवनिर्माण ज्यांनी जग बदलले
संगीताचे जग : आयपॉडने
2001 साली अ‍ॅपलने 5 गिबाबाईट क्षमतेचा पहिला आयपॉड लाँच केला. हा सर्वांत लहान म्युझिक प्लेअर होता. यात एक हजार गाणे स्टोअर करता येतील, असे कंपनीने सांगितले होते. अ‍ॅपलच्या मार्केटिंगने सोनी वॉकमनला कडवे आव्हानच दिले नाही तर बाजारपेठेतून जवळपास बाहेरच रवानगी केली.
फोनचे जग : आयफोनने
2007 वर्षात आयफोनच्या लाँचही केला. टचस्क्रीन आणि सोप्या इंटरफेसमुळे हा मोबाईल अपेक्षेपेक्षा अधिक लोकप्रिय झाला. वर्षभरातच कंपनीने आयफोन थ्रीजीही सादर केला. याच्या वेगवान डाटा ट्रान्स्फरने मोबाईलवेड्यांना आणखीच वेड लावले.
टॅब्लेटचे जग : आयपॅडने
2010 साली आलेला पहिला टॅब्लेट पीसीने पुन्हा जगभरातील गॅजेटप्रेमींना वेड लावले. हा टॅब्लेट हातोहात विकला गेला. टचपॅड तंत्रज्ञानावर आधारलेल्या या अतिशय छोट्या कॉम्प्युटरने अनेक उणीवा असतानाही इंटरफेस, वेगवान प्रोसेसर आणि चित्राच्या स्पष्ट गुणवत्तेमुळे लोकप्रिय झाला. नंतर आयपॅड थ्रीजी आणि आयपॅड-2 मध्ये अनेक उणीवा दुरुस्त करण्यात आल्या.
मृत्यूची चाहूल आणि नवे पुस्तक...
जॉब्स अनेक वर्षांपासून अन्नाशयाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. या मृत्यूची चाहूल त्यांन आधीच लागली असावी. अ‍ॅपलचे सहसंस्थापक वॉल्टर आयजॅक्सन यांचे स्टीव्ह जॉब्स यांच्यावरील पुस्तक 21 नोव्हेंबर रोजी बाजारात येणार आहे. त्यातही जॉब्स यांचे मृत्यूबाबतचे विचार वाचावयास मिळतात. बुधवारी त्यांचे निधन झाल्याने या पुस्तकाबाबत वाचकांच्या मनात उत्सुकता व अपेक्षा आणखी वाढतील. 
वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालात म्हटले आहे की, आयजॅक्सन यांनी चार आठवड्यांपूर्वी जॉब यांची मुलाखत घेतली होती. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी पद सोडतेवेळी जॉब्स यांनी ही मुलाखत दिली होती. जॉब्स यांनी त्या वेळी आपला मृत्यू जवळ आल्याचे संकेत दिले होते. ही सविस्त घटना पुस्तकाच्या शेवटी वाचावयास मिळेल. आयजॅक्सन यांनी गेल्या दोन वर्षाच्या काळांत जॉब्स यांचे मित्र, त्यांच्या परिवारातील जवळच्या व्यक्तींच्या भेटी घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. 
एवढेच नव्हे तर जॉब्स यांच्यासोबत जवळपास 40 बैठका घेऊन त्यांचे अंतरंग जाणून घेतले. आयजॅक्सन यांनी अल्बर्ट आइन्स्टाईन व बेन फँकलिन यांचेही जीवनचरित्र लिहिले असून ते प्रचंड लोकप्रिय ठरले आहे प्रकाशाकांच्या मते जॉब्स यांनी या पुस्तकात कुठलाही आडपडदा किंवा नियंत्रण न ठेवता स्वत: विषयी सांगितले आहे. प्रतिस्पर्ध्यांबाबतही ते अतिशय कठोरपणे बोलले आहेत. बाजारात येण्याआधीच या पुस्तकाला वाचकांचा उर्त्स्फुत प्रतिसाद मिळण्याच चिन्हे आहेत. अ‍ॅमेझॉन डॉट कॉम वर या पुस्तकाला 384 वे स्थान मिळाले आहे




- By Divya Marathi 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल