विनोद खन्ना यांचं आयुष्य अनेकविध घटनांनी भरलं होतं. त्यांच्या आयुष्यातल्या या काही महत्त्वाच्या घटना
27 एप्रिल : विनोद खन्ना यांचं आयुष्य अनेकविध घटनांनी भरलं होतं. त्यांच्या आयुष्यातल्या या काही महत्त्वाच्या घटना
1- त्यांच्या काळातले नायक कधी खलनायिकी भूमिकेनं सुरुवात करायचे नाहीत. पण विनोद खन्ना यांच्या करियरची सुरुवातच निगेटिव्ह रोलनं झाली. 1968मध्ये सुनील दत्त यांच्या 'मन का मीत' सिनेमातून त्यांनी सुरुवात केली.
2- एकटा हिरो म्हणून त्यांना पहिला ब्रेक मिळाला तो 1971मध्ये 'हम, तुम और वो' या सिनेमातून. भारती विष्णूवर्धन त्यांची नायिका होती.
3- पुरब और पश्चिम, सच्चा झुटा, मेरा गांव मेरा देश या सिनेमांमध्ये काम करूनही अमिताभ बच्चनसोबतच्या 'परवरीश' सिनेमांतूनच ते प्रसिद्धीच्या झोतात आले. आणि त्याच वर्षी रिलीज झालेला अमर,अकबर,अँथाॅनी तर सुपरहिट ठरला.
4- 1971ते 1982 या काळात त्यांनी 47 मल्टिहिरो सिनेमांमध्ये काम केलं.
5- कुर्बानी सिनेमा सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्याकडे गेलेला, पण त्यांनी नाही म्हटलं म्हणून तो विनोद खन्ना यांच्याकडे आला आणि सर्वात मोठा म्युझिकल हिट ठरला.
6- 1974 ते 1982 या काळात विनोद खन्ना यांना इन्सान सिनेमात जितेंद्रपेक्षा जास्त पैसे दिले गेले. परवरिश, हेराफेरी, खूनपसीना, अमर अकबर, अँथोनी यामध्ये अमिताभपेक्षा जास्त पैसे मिळाले होते.
7- 1982मध्ये त्यांनी बाॅलिवूडमधून 5 वर्षांसाठी ब्रेक घेतला होता. ते ओशो रजनीश यांच्या आश्रमात राहात होते
by - ?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा