*वाटेगावच्या युवकाचा उपक्रम*
पशुपालनाकडे शेतकर्यांकडून कृषिपूरक उद्योग म्हणून बघितले जाते. जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी जनावरे भाकड झाली की ती विकली जातात.
मात्र वाटेगाव (ता. वाळवा) येथील शेतकर्याने उत्तम प्रतीच्या देशी गायींसमवेतच भाकड गाई सांभाळल्या आहेत. भाकड गायींपासून त्याने महिन्याला सरासरी दहा हजार रुपये उत्पन्न मिळविण्यास प्रारंभ केला आहे.

वाटेगाव येथे चार एकर जमीन भाड्याने घेऊन तेथे गोपालन करण्याचा अनोखा उपक्रम राबविणार्या युवकाचे नाव आहे प्रतीक भिडे ! इतिहास विषय घेऊन एम. ए. शिक्षण घेत असलेल्या प्रतीकला शेतीची पहिल्यापासूनच आवड़ त्यांचे शेतही होते. मात्र घरगुती कारणाने शेत विकावे लागले. कालांतराने प्रतीक यांनी देशी गायींविषयीची माहिती मिळविली. मागील पाच वर्षांपासून मोरया गो संवर्धन या नावाने गोपालनाचा उपक्रम सुरू केला. प्रारंभापासूनच घरच्यांचा पाठिंबा असल्याने त्याने चार एकर जमीन भाड्याने घेतली. त्यापैकी दहा गुंठे भागात
गोशाळा उभारुन उर्वरित भागात ओला व सुका चार्याची निर्मिती केली. गोमुत्र व शेणापासून विविध वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. यामध्ये दंतमंजन, गोअर्क, साबण, श्ॉम्पू आदींचा समावेश आहे. जर्सी किंवा होस्टन जातीच्या गायींपेक्षा देशी गायींपासून दूध हे कमी मिळते. त्यामुळे साहजिकच गोमुत्र व शेण हे मुख्य प्रॉडक्ट आणि दूध हे दुय्यम प्रॉडक्ट आहे, हे गृहीत धरुनच त्यांनी वाटचालीस प्रारंभ केला. हा उपक्रम सुरू झाल्याचे कळताच परिसरातील काही शेतकर्यांनी त्यांच्या गोशाळेत भाकड गायी हक्काने आणून दिल्या. पुढील महिन्यात कोकणातील शेतकरी दहा भाकड गायी आणून देणार आहेत. सध्या त्यांच्याकडे तीस गायी आहेत.

पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट शेतीकरीता पिकांवर फवारणी करण्याकरीतागोमुत्र लागते. ताजे गोमुत्र त्यांच्याकडे २0 रुपये लिटर या दराने मिळते. मात्र यासाठीही बहुतेक दिवशी वेटिंग लिस्ट असते.
आज नंबर लावला की दोन ते तीन दिवसांनी गोमुत्र मिळते.
त्याचप्रमाणे शेणाला देखील वाढती मागणी आहे. बहुतांशी गायी भाकड असल्याने दिवसाला २0 ते २५ लिटरच दूध त्यांना मिळते.
त्यातून फारसा फायदा होत नाही. मात्र शेण व गोमुत्रापासून त्यांचे घर सुस्थितीत सुरू आहे.
जिल्ह्यात हा पहिलाच उपक्रम असल्याचा त्यांचा दावा आहे.गोहत्या बंदीचा कायदा कशासाठी ?

सरकारने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला आहे.
वास्तविक या कायद्याची काहीही गरज नाही. कारण भाकड जनावरे कत्तलखान्याकडे पाठवायची ही येथील बहुतांशी शेतकर्यांची मानसिकता आहे.
तुम्ही जर भाकड जनावरांचे काय करायचे हे त्यांना सांगितले नाही, तर शेतकरी दुसरे काय करणार?
यापेक्षा त्या जनावरांपासूनही शेतकर्याला महिन्याला लाभ होतो याबाबतची जागृती करणे गरजेचे आहे.

- प्रतीक भिडे, गोपालक, वाटेगाव.
वाटेगावच्या तुपाला अमेरिकेतून मागणी
देशी तूप हे औषधी असते. साधारणत: बाजारात मिळणारे तूप हे जर्सी गायीच्या दुधापासून बनविलेले असते. परिणामी त्याची किंमत ५00 ते ६00 रुपये किलो अशी असते.
मात्र विशिष्ट प्रक्रिया केलेले देशी तूप बाजारभावाच्या किंमतीपेक्षा चौपट महाग असते. सध्या अमेरिकेतील मराठी बांधवांकडून प्रतिमाह आठ किलो तुपाला मागणी आहे.
मात्र प्रतीक यांनी तुपासह गोमुत्र व शेणावर प्रक्रिया करण्यावरच भर देणार असल्याचे सांगितले.

*मोरया गोसंवर्धन**९८९००८२०४५
by -
*दैनिक पुण्यनगरी**२५-०१-१७*
*वार्ताहर - नरेंद्र रानडे*
.*सांगली*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा