शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

जीवामृत एक चमत्कारी विरजण-




जीवामृत एक चमत्कारी विरजण झिरो बजेट नॅचरल फार्मिंगचा जणू जीवच आहे. त्यांच्या या कृषी पद्धतीतीचे जे चार आधार स्तंभ सांगितले आहेत,त्यात बीजामृत,जीवामृत,आच्छादन आणि वापसा यांचा समावेश होतो. शून्य खर्चाची शेती करयची असेल तर शेतकर्यांकडे एक देशी गाय असणे गरजेचे आहे.एका गाईच्याशेण- गोमुत्राचा वापर करून 30 एकर शेती उत्तम प्रकारे करता येते.त्यासाठी मग कोणतेही रासायनिक खत ,जीवाणू खत,सेंद्रिय खत म्हणजेच शेताच्या बांधावर तयार होणारे कंपोस्ट,नॅडेपखत ,किंवा अनुदान घेऊन शेतातच तयार केलेले गांडूळ खत वापरायची अजिबात आवश्यकता नाही. तरीही पिके उत्तम येतात पिकांचे उत्पादन .ऊसाचे टनेज आणि फळांचे उत्पन्नही भरपूर मिळते आणि सर्व फळे एकाच आकाराची येतात.पिकांवर कोणताही रोग पडत नाही .अर्थात त्यासाठी पेरणीच्या वेळी बिजामृत नंतर जीवामृतासोबत आच्छादन व वापसा तंत्रही समजून घेऊन ते वापरावेच लागते. देशी गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव असतात असे मानले जाते ते असतात की नाही माहिती नाहीपण गाईच्या पोटात अनंत कोटी उपयुक्त जीवाणू असतातआणि या जिवाणूंना अनेक पटीत गुणाकार पद्धतीने वाढवण्याचे तंत्र पाळेकरांनी शोधून काढले आहे. हेच जीवाणू निकोप वाढीसाठी पिकांना झाडांना मदत करतात. मात्र विदेशी किंवा जर्सी गाईचे शेण गोमुत्र मात्र या साठी अजिबात चलणार नाही. जीवामृत नावचे विरजण ,अर्थात सुभाष पाळेकर संशोधित जीवामृत हे देशी गाईच्या शेण आणि गोमुत्र यांच्यापासून बनवायचे असते ते खत नसून विरजण आहे .पण त्याचे त्याचे सामर्थ्य एवढे आगाध आहे की ते वापरले की सर्व प्रकारच्या रासायनिक आणि सेंद्रिय खतांची शेतीतून सुट्टी होते. जीवामृत तयार करण्याची विधी ,त्याला लागणारा अवधी,आणि वापर कसा करावा याची माहिती या लेखमालेत क्रमश: घेणार आहोत .अर्थात हे सर्व ज्ञान माझे नसून कृषी ऋषी सुभाष पाळेकर यांच्या तपश्चर्येचे हे फळ आहे.त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात या जीवामृताबद्दल सविस्तर माहिती दिली जाते त्यांच्या पुणे येथील शिबिरात मीआणि मझ्या मुलाने घेतलेल्या माहितीच्या आधारावर आणि आमच्या शेतात विविध पिकांना जीवामृत वापरल्यामुळे आलेल्या अनुभवावर हे लिखाण आवलंबून आहे.याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. जीवामृत कसे तयार करतातयाची कृती बघण्यापूर्वी जीवामृत तयार करायला कोणते साहित्य लागते ते समजून घ्यावे लागेल. साहित्य: 200 लिटर पाणी ,5 ते 10 लिटर देशी गाईचे गोमुत्रज्यात देशी गाईचे गोमुत्र आणि 10 किलो देशीगाईचे शेणआणि गोमुत्र वापरताना , 50 टक्के गोमुत्र असणे आवश्यकच आहे. बाकी निम्मे बैलाचे किंवा म्हशीचे मुत्र घेतले तरी चलते मात्र कोणत्याही परिस्थितीत जर्सी गाईचे गोमुत्र चालणार नाहीकारण त्या प्राण्यात गाईची कोणतीच लक्षणे नाहीत. शेणाचे प्रमाणही गोमुत्रासारखेच लागेल.म्हणजे 5 किलो गाईचे शेण अनिवार्य 50 टक्के म्हणजे पाच किलो बैलाचे अथवा म्हशीचे कोणाही एकाचे वापरता येते. 1 किंवा 2 किलो डाळीचे पीठ ज्यात तूर ,मुग,हरभरा ,घेवडा,चवळी अश्या कोणत्याही कडधान्याचे चालते . फक्त सोयबीन आणि शेंगदाण्याचे पीठ चालत नाही कारण त्यांच्या तेल तवंगामुळे जीवामृतातील जीवाणूंची वाढ खुंटते. या शिवाय एक किलो काळा गूळ ,किंवा चार लिटर ऊसाचा रस ,किंवा 1 किलो कोणत्याही गोड फळाचा गर ज्यात पेरू ,पपई ,चिकू इ. आणि एक मुठभर बांधावरील जीवाणू माती.एवढे सारे साहित्य जीवामृत बनवायला लागते ज्यातील बहुतेक शेतकर्यांच्या शेतात तयार होणारे आहे.बाजारातून काहीही विकत आणायचे नाही.ही झिरो बजेट शेती करणार्‍या शेतकर्याची प्रतिज्ञा आहे. गोमुत्र संकलन कसे करावेजर गाईचे गोमुत्र मिळवायचे असेल तर पहाटे पाच वाजताच उठावे लागते आणि गाय रात्रभर विश्रांती घेऊन उठायच्या आत गोमुत्र धरायचे भांडे घेऊन घेऊन गाय बंधलेल्या ठिकाणी ते उठायच्या वेळी हजर राहावे लागते. हे करण्यासाठी काही गरीब होतकरू शेतमजुरांची मुले निवडता येतील. ज्यांच्या घरी गाय आहे अशा मुलांना जर आपण देशी गाईच्या गोमुत्राच्या संकलनाचे काम दिले तर ते मिळणार्‍या पैशाच्या आशेने पहाटे पाच वाजता उठून गोमुत्र संकलन करतील.त्यांना एक लिटर गोमुत्राच्या मोबदल्यात पांच ते दहा रुपये दिले तर ते पैसे त्यांच्या शिक्षणाच्या कामी येतील.यातून स्वार्थ आणि परमार्थ साधेल. पण झिरो बजेट शेती असल्याने गोमुत्र विकत घेण्यापेक्षा एक देशी गाय पाळली तर गोमुत्रासोबत दुध आणि गाईपासून बैल व गाई मिळवता येतील . एक गाय विकत घेऊन पाळली तर तिच्या गोमुत्र आणि शेणापासून 30 एकर शेतीसाठी वापरावे लागणारे जीवामृत वर्षभर तयार करता येते. आणि गोमुत्राच्या साह्याने तयार होणार्या जीवामृताचा वापर करून चारा लागवड केली तर 10 गुंठे चारा एका गाईल वर्षभर पुरतो. आपली शेती झिरो बजेट असल्याने गोमुत्र विकत घेणे परवडणार नाही .त्या ऐवजी देशी गाय पाळावी ती ज्या गोठ्यात बांधताततो गोठा साधारणत: 11.5फुट बाय 13 फुटाच्या जागेत बांधून घ्यावा ज्याच्या फरशीचा किंवा बेड चा उतार गाईच्या पायाकडील बाजुला काढून सर्व गोमुत्र नालीत एका बाजूला उताराकडे वाहत जाऊन ते एका हौदात जमा होईल अशी व्यव्यस्था करता येते. वरील सर्व साहित्य वापरून जीवामृत तयार करण्यासाठी एक प्लास्टिकचा 200 लिटरचा ड्रम किंवा मातीचा रांजणकिंवा लोखंडाचा ड्रम वापरता येतात .या पैकी कहीही विकत घ्यायचे नसेल तर सावलीत खड्डा करून त्याला त्याला दगडाने ठोकून गच्च करा आणि शेणाने लिंपून प्लास्टिकच्या अस्तराने झाकून त्यात पाणी टाकून जीवामृत करता येते.त्या साठे लागणारा पोहरा आपल्याकडे असेलेया कोणत्याही कीटकनाशकाचा डब्बा घेऊन त्याला समांतर दोन छिद्रे पडून त्यात एक लोखंडी ग्जालीचा तुकडा बसवून पोहरा करता येतो. धर्म उपलब्ध असेल तर तो उन व पावसाचे पाणी लागणार नाही अशा जागी सावलीत ठेऊन पाण्याने भरा. त्यात सर्वप्रथम हाताने शेण कालवून घ्यावे.त्यानंतर पाच ते दहा लिटर गोमुत्र मिसळावे ,एक किलो गुळ आणि एक किलो बेसन पीठ त्यात मिसळावे .गुळाऐवजी चार लिटर उसाचा रस किंवा एक किलो गोड फळाचा गर टाकून मिसळावा.अर्थात ही फळे शेतातच कायम मिळावी म्हणून अशा फळाचे एकेक झाड लावता येते किंवा बागवान सायंकाळी घरी परतत असताना ती पिकलेली फळे फेकून देतो त्याला सांगितले तर ही गोड अति पिकलेली फळे तुम्हाला फुकट देईल किंवा अत्यंत कमी पैशात ती घेता येतील कारण आपली झिरो बजेट शेती आहे.त्यामुळे महागडी फळे विकत घेऊन ती वापरायची नाहीत. शेतातील 10 किलो वजनाचे उसाचे धांडे बारीक तुकडे करून टाकता येतील.शेजारीही फुकट देईल गूळ देखील घाऊक विक्रेत्या दुकानदाराकडे गेलात तर कळा किंवा गुळाच्या विक्री नंतर उरलेले गुळाचे तुकडे अतिशय स्वस्तात मिळतात .नांदेडमध्ये इतवारा भागात अशी काही दुकाने आहेत त्यांच्याकडे हा न विकला जाणारा काळा गूळ 10 ते 15 रुपये किलोने मिळतो.जीवामृतात गूळ ,उसाचा रस ,उसाचे धांडे ,गोड फळाचा गर या पैकी फक्त एकच गोड पदार्थ वापरायचा आहे,.बांधावरील मुठभर जीवाणू माती (50 ग्राम) घेऊन या द्रावणात टाकावी व हे द्रावण आपल्या हाताने कालवून घ्यावे व एक लांबट लाकूड किंवा काठी घेऊन क्लाकवाईज अर्थात ब्रह्मांड गतीने ,विश्वगतीने म्हणजे पृथ्वी ज्या दिशेने डावी कडून उजवीकडे फिरते त्या दिशेने किंवा देवाला प्रदक्षिणा घालतात त्या दिशेने दोन मिनिट ढवळावे. गोणपाट झाकून ठेवावे ड्रमाचे तोंड इतके पक्के बांधून नका की त्यातून हवाच बाहेर पडणार नाही म्हणून सच्छिद्र गोणपाट बांधून तोंड बंद कारावे. या ड्रमावर उन्हे पावसाचे पाणी पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि सकाळ संध्याकाळ गोणपाट काढून लाकडाने दोन मिनिटे ढवळावे. 48 तास किण्वनक्रिया होण्यासाठी लागतात. त्यानंतर हे द्रावण जीवामृत बनते आणि वापरायला तयार होते. त्याची एक्सपायरी डेटते तयार झाल्यावर सात दिवसांनी येते .त्या आधीच ते वापरून टाकावे. आज कवी श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर असते तर ते या जीवमृताचे सामर्थ्य बघून म्हणाले असते. माझिया जीवामृताचिये बोलु कवतिके सर्व खतांच्या मात्रांशीही पैजा जिंके या नंतरच्या लेखात आपण जीवामृत कसे कार्य करते त्याचे फायदे पिकांना कसे मिळतात . प्रत्येक पिकला कितीआणि ते कसे वापरावे याची माहिती घेणार देणार आहे.
---*---







 बुधवार२८ जानेवारी२०१५
by - ?

फसवणुकीनंतरही घेतली उभारी कोरफड प्रक्रियेत रोडे यांची भरारी


फसवणुकीनंतरही घेतली उभारी कोरफड प्रक्रियेत रोडे यांची भरारी
-

कंपनीकडून फसवणूक झालीतरी हाय न खाता जिद्दकष्ट आणि सकारात्मकतेतून संगमनेर तालुक्यातील दुर्गम भागातील नांदूर खंदरमाळचे तानाजी रोडे यांनी मात केली आहे. अवघे सहावीपर्यंत शिक्षण झालेल्या या शेतकऱ्याने संशोधकवृत्ती आणि उद्योजकतेतून कोरफडीपासून ज्युसकोल्ड्रिंक्सक्रीम बनवत भरारी घेतली आहे. 
- संदीप नवले 

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका मुळा नदीमुळे बागायती तालुका म्हणून ओळखला जातो. याच नदीवरच खंदर माळगाव हे साधारणपणे एक ते दीड हजार लोकसंख्येचे गाव असूनबहुतांश शेतकरी हे डाळिंबगहूहरभराभाजीपाला अशी पिके घेतात. अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी नवीन पिके घेत असतात. नांदूर खंदरमाळ येथील पारंपरिक पद्धतीने शेती करणारे तानाजी रोडे (वय ५०) दहा वर्षांपूर्वी जाहिरातीद्वारे झालेल्या फसवणुकीनंतरही कोरफड पिकांच्या विक्रीसाठी प्रक्रिया उद्योगांची उभारणी करत यशस्वी मार्ग काढला आहे. 

खोट्या जाहिरातीचा बळी - 
साधारणतः २००४ मध्ये पुण्यातील एका खासगी कंपनीने दिलेल्या ‘कोरफड लावालाखो रुपये कमवा’ जाहिरातीला तानाजी रोडे बळी पडले. पुण्यात कंपनीच्या अधिकाऱ्याशी भेटूनकंपनीने खरेदीची हमी दिल्यामुळे स्वतःच्या सात एकर पैकी एक एकर क्षेत्रावर कोरफड लागवड केली. कोरफड काढणीला आल्यानंतर संबंधित कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याचे कळले. कोरफड लागवडीत फसल्याचे लक्षात आल्यानंतर परिचितांमध्ये ते चेष्टेचा विषय झाले. अशावेळी एखादी व्यक्ती खचून गेली असतीमात्र तानाजी यांनी आत्मचिंतन करत स्वतःला नकारात्मक विचारांपासून दूर ठेवले.
कोरफडीवर केला अभ्यास - 
कोरफडीच्या आयुर्वेदिक गुणधर्म जाणून घेतल्यानंतर त्याचे अनेक फायदे तानाजी यांच्या लक्षात आले. कोरफडीच्या नुसत्या विक्रीपेक्षा त्यापासून उत्पादनांची निर्मिती केल्यास अधिक फायदा होऊ शकतेहे त्यांच्या लक्षात आले. मग त्यातून काय काय बनविता येईलयाविषयी माहिती मिळवली. कोरफडीपासून ज्यूसकोल्ड्रिंक्सक्रीम अशी विविध उत्पादने असली तरी त्याचे प्रशिक्षण किंवा प्रकल्प जवळपास कोठेही उपलब्ध नव्हते. त्यांनी प्रयोग करण्यास सुरवात केली.
गोठ्यालाच बनवले प्रयोगशाळा - 
कोरफडीची चव कडू असल्याने औषधी असूनही सहजासहजी माणूस खात नाही. मग त्याचा ज्यूस अन्य शीतपेयांप्रमाणे गोड स्वरूपात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने तानाजी रोडे कामाला लागले. घराजवळच्या गोठ्यातील गाई बाहेर काढत त्यांचे प्रयोग सुरू झाले. सुरवातीला कोरफड कापून त्यातून पांढरा गर बाजूला काढून विविध मिश्रणे बनवत ज्यूस बनविण्याचा प्रयत्न केला. अनेक चुकांतून शिकत योग्य असा कोरफड ज्यूस बनविला. मात्रतो चोवीस तासांपेक्षा अधिक टिकेना. तो टिकविण्यासाठी पुन्हा प्रयोग करत एक फॉर्म्युला शोधला. 

कोणत्याही फळाच्या ज्यूसपेक्षा कोल्ड्रिंक्सला अधिक मागणी असतेहे हेरून त्यांनी कोरफडीपासून कोल्डिंक्स बनविण्याचा प्रयोग सुरू केले. यात शेतीकडे दुर्लक्ष झाले. परिणामी परिस्थिती खालावली. पैशाची चणचण भासलीकी दावणीची गाय बाजारात जाऊ लागली. मात्रतानाजी यांचे संशोधन सुरूच राहिले. सुमारे पाच वर्षांनंतर कोल्ड्रिंक्स बनविण्यात यश आले. ज्यूसकोल्ड्रिंक्सक्रीम अशी विविध उत्पादने बनवली. तयार उत्पादने काही आजारी व्यक्तींना दिली. त्यांच्या चांगल्या प्रतिक्रियेमुळे उत्साह वाढला. मात्रशासनमान्य प्रयोगशाळेतून प्रमाणिकरण केल्याशिवाय व्यावसायिक उत्पादन घेता येत नसल्याचे त्यांना समजले. प्रयोगशाळेचा शोध सुरू झाला.
तपासणीचा रिपोर्ट आला अनुकूल - 
एका मित्राने सुचवलेल्या पाषाण (पुणे) येथील प्रयोगशाळेमध्ये जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नव्हते. हातउसने पैसे घेत पुणे गाठले. मात्रतिथे फक्त औषधांची तपासणी होत असल्याचे समजल्याने ते पूर्ण निराश झाले. घरी जाण्यासाठी शिवाजीनगरला जाताना लागलेल्या कृषी विभागाच्या कृषी भवन येथे चौकशीसाठी आत गेले.
संगमनेर येथील कृषी विभागाच्या एका कार्यक्रमात भेटलेल्या युवराज साळुंखे यांची आठवण झाली. त्यांचे पद वगैरे काही माहीत नव्हते. विभागामध्ये विचारत विचारत त्यांच्या केबिनमध्ये गेले. आपल्या पिशवीतील कोरफडीचे उत्पादन दाखवत प्रयोगशाळेविषयी विचारणा केली. त्यांचे शब्द संपण्याच्या आत ‘तुमचं काम झालंलॅब आपल्याकडेच आहे’ असे संचालक साळुंखे यांनी सांगितले. त्यांच्या उत्तराने तानाजी यांचा चेहरा खुलला.
या प्रयोगशाळेत उत्पादन तपासले गेले. त्याचा रिपोर्ट अनुकूल आला. जागतिक दर्जाची गुणवत्ता व केमिकल शून्यप्रॉडक्ट मानवी वापरास योग्य असल्याचे निदर्शनास आले.

परवान्यासाठी धडपड - 
उद्योग उभारणीसाठी यंत्रे व परवाना आवश्यक होता. परवान्यासाठी मुंबईला गेल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागाप्रकल्पबांधकाम याविषयी माहिती दिली. त्यानुसार गायीच्या गोठ्यात सुधारणा करत तीन लाख खर्चात शेड उभी केली. मात्रअधिकाऱ्यांच्या तपासणीत या शेडची उंची कमी असल्याने परवाना नाकारला गेला.
आतापर्यंत पावलोपावली नकार पचवत आल्याने नकाराने न खचता ते पुन्हा मुंबईला गेले. या प्रकल्पामागचा संपूर्ण संघर्ष संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलातेव्हा फाटक्या कपड्याआड लपलेला संशोधक शेतकरी अधिकाऱ्यांना कळला. पुन्हा पाहणी करत अधिकाऱ्यांनी अखेर त्यांना परवाना दिला. तानाजी यांच्या संघर्षाचे एक वर्तुळ पूर्ण झाले असले तरी भांडवल उभारणीची खरी लढाई अद्याप बाकी होती.
कर्जासाठी शोधाशोध सुरू - 
संशोधन व अन्य धावपळीतून खिसा पुरता मोकळा झाला होता. यंत्रे घेण्यासाठी कर्ज व अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पहिले प्रकरण खादी ग्रामोद्योगकडे केलेते नामंजूर झाले. मग तानाजींना गावातील पण पुण्यात स्थायिक झालेल्या कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योगच्या शोभना सुपेकर यांची आठवण झाली. त्यांना भेटले. सुपेकर यांनी तानाजींना खादी ग्रामोद्योगच्या एक लाखाच्या अनुदान मिळवण्यासाठी मदत केली. हे अनुदान मिळणार होते प्रकल्प सुरू झाल्यावर!
गावातील बँकेकडे कर्जाचे प्रकरण दिले. मात्रतांत्रिक त्रुटी काढत ते नाकारले गेले. कागदपत्रे पूर्ण केली तरी मंजूर होण्याचे नाव घेईना. मग मात्र तानाजी यांनी या अधिकाऱ्यांविरुद्ध ग्रामसभेत आवाज उठवला. हे समजताच सूत्रे हलली. त्यानंतरही एक वर्षाने ६ लाख २२ हजार रुपये कर्जाची रक्कम त्यांच्या हातात पडली.
कर्ज मिळाले असले तरी यंत्राच्या खरेदीसाठी लागत होते १५ लाख रुपये. या वेळी मात्र त्यांचा उपहासचेष्टा करणारे मित्रनातलग त्यांच्या मागे उभे राहिले. यंत्रे आणली आणि उत्पादनाला सुरवात झाली.
मार्केटिंगसाठी केली प्रयत्नांची पराकाष्ठा - 
उत्पादन सुरू केल्यानंतर प्रश्न होता तो मार्केटिंगचा. त्यासाठी कोल्ड्रिंक्स वितरणासाठी आवश्यक क्रेट व बॉटलच्या खरेदीसाठी टप्प्याटप्प्याने आतापर्यंत सुमारे ३० लाखांची गुंतवणूक झाली आहे.
प्रॉडक्ट चांगलेपण जाहिरात करायला पैसे नव्हते. मग तानाजींनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये उत्पादन नमुन्यादाखल मोफत देणे सुरू केले. यातून जाहिरात झाली. मात्रयात ८-९ लाख रुपयांचा खर्च वाढला. त्यांच्या ग्रीन व्हॅली हर्बल्स कंपनीला पहिल्या वर्षात तोटा झाला. उत्पादनामध्ये गुणवत्ता असल्याने हळूहळू चांगली मागणी येऊ लागली.
दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अठरा लाख रुपयांचा नफा झाला. मात्रआतापर्यंत उद्योगासाठी घेतलेले कर्ज एक कोटीपर्यंत पोचले होते. ते ही त्यांनी हळूहळू फेडले.
या वर्षी कंपनीला वीस लाख रुपयांचा खर्च जाता त्यांना अठरा लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले.
विस्तारणीकरणाचे रखडले काम - 
सध्या कोरफडीवर प्रक्रिया ते मार्केटिंगच्या कामासाठी मुले गणेश व सचिन हे कार्यरत असूनसुमारे १५ ते २० जण या टिममध्ये कार्यरत आहेत. पत्नी मीराबाई व दोन्ही सुना या शेतीमध्ये लक्ष देतात.
माणसांच्या साह्याने काम सुरू असल्याने सध्या उत्पादनांना मागणी चांगली असली तरी पूर्तता करण्यात अडचणी येत आहेत. केवळ नगरपुणे व नाशिक या जवळच्या प्रमुख शहरांमध्ये विक्री केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्यांच्या उत्पादनांची घारगावआळेफाटानारायणगावखेडमंचरचाकणतळेगावअकोलासंगमनेरजुन्नरसिन्नरशिर्डीराहुरीपारनेरनगरपुणे या ठिकाणी विक्री होते.
उद्योग उभा करून साधारणपणे दहा वर्षे झाली. कर्जही फिटले आहे. कंपनीच्या विस्तारीकरणासाठी तानाजी यांचे प्रयत्न सुरू आहेत. विस्तारीकरणासाठी आवश्यक कर्जाइतके तारण नसल्याने ते रखडले आहे.
सध्या सात एकरांवर कोरफड - 
दहा वर्षांपूर्वी एक एकर असलेले कोरफडीचे क्षेत्र आता संपूर्ण सात एकर झाले आहे.
दर दोन ते तीन वर्षांनी शेतात नवीन लागवड केली जाते. गेल्या काही वर्षांत सुमारे चार ते पाच फूट अंतरावर बारबाडीन सर मिलर या वाणाची लागवड सुरू केली आहे. यात ते विविध गहूहरभरा अशी आंतरपिके घेतात.
कोरफडीवर तांबेरा सोडून इतर कोणताही रोग येत नाही. तांबेरा नियंत्रण व खतासाठी सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत असल्याने एकरी दहा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.

कोरफडीचे फायदे - 
पित्तशामकउष्णता रोधकपेस्टीसाईड व केमिकलचा साईड इफेक्ट दूर करते.
पोट साफ ठेवण्यास मदत होते.
रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारून भूक वाढते.
यकृताची कार्यशक्ती वाढते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
चेहऱ्याला लावल्यास त्वचा मुलायम होऊन त्वचा उजळ होते.
स्त्रियांसाठी अतिशय बहुपयोगी
शासनाकडून अपेक्षा - 
शासनाने शेतीपूरक उद्योगासाठी भांडवल पुरवठा होण्यासाठी कर्जाचे धोरण बदलणे गरजेचे.
उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास थेट अनुदान उपलब्ध करावे.
कोरफडीसह औषधी वनस्पतींच्या प्रक्रियेसाठी योग्य प्रशिक्षण मिळावे.
या प्रकारात आहेत उत्पादने उपलब्ध 
दोन वर्षांच्या कोरपडीपासून तयार केलेल्या उत्पादनांमध्ये औषधी गुणधर्म अधिक असतातत्यामुळे त्याची किंमत ही अधिक असते. (उदा. एक लिटर ज्यूस ५०० रुपये)
साधारणपणे वर्षभर व्यवसाय असला तरी हंगामानुसार काही फरक होतो. हिवाळ्याची कोल्ड्रिंक्सची मागणी निम्म्याने कमी होते. या वेळी ज्यूस व क्रीम उत्पादन व विक्रीकडे अधिक लक्ष देतो.
कोरफड ज्यूस -- ५०० मिलि --- २१५ रुपये - औषध म्हणून
कोल्ड्रिंक्स --- २०० मिलि --- १५ रुपये - जिराऑंरेज आणि लेमन या तीन फ्लेवरमध्ये उपलब्ध --- कोल्ड्रिंक
क्रीम (जेली) --- ६० ग्रॅम ---- ९७ रुपये- भाजणेमालिश केल्यास उष्णता कमी होते. --- सौदर्यवृद्धीसाठी


तानाजी रोडे९८९०३८७०१९








by - Agrowon 

Tuesday, December 13, 2016 AT 05:45 AM (IST)
Tags: agro special

*वाटेगावच्या युवकाचा उपक्रम*



*वाटेगावच्या युवकाचा उपक्रम*
पशुपालनाकडे शेतकर्‍यांकडून कृषिपूरक उद्योग म्हणून बघितले जाते. जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी जनावरे भाकड झाली की ती विकली जातात.
मात्र वाटेगाव (ता. वाळवा) येथील शेतकर्‍याने उत्तम प्रतीच्या देशी गायींसमवेतच भाकड गाई सांभाळल्या आहेत. भाकड गायींपासून त्याने महिन्याला सरासरी दहा हजार रुपये उत्पन्न मिळविण्यास प्रारंभ केला आहे.
वाटेगाव येथे चार एकर जमीन भाड्याने घेऊन तेथे गोपालन करण्याचा अनोखा उपक्रम राबविणार्‍या युवकाचे नाव आहे प्रतीक भिडे ! इतिहास विषय घेऊन एम. ए. शिक्षण घेत असलेल्या प्रतीकला शेतीची पहिल्यापासूनच आवड़ त्यांचे शेतही होते. मात्र घरगुती कारणाने शेत विकावे लागले. कालांतराने प्रतीक यांनी देशी गायींविषयीची माहिती मिळविली. मागील पाच वर्षांपासून मोरया गो संवर्धन या नावाने गोपालनाचा उपक्रम सुरू केला. प्रारंभापासूनच घरच्यांचा पाठिंबा असल्याने त्याने चार एकर जमीन भाड्याने घेतली. त्यापैकी दहा गुंठे भागात
गोशाळा उभारुन उर्वरित भागात ओला व सुका चार्‍याची निर्मिती केली. गोमुत्र व शेणापासून विविध वस्तू तयार करण्यास सुरुवात केली. यामध्ये दंतमंजन, गोअर्क, साबण, श्ॉम्पू आदींचा समावेश आहे. जर्सी किंवा होस्टन जातीच्या गायींपेक्षा देशी गायींपासून दूध हे कमी मिळते. त्यामुळे साहजिकच गोमुत्र व शेण हे मुख्य प्रॉडक्ट आणि दूध हे दुय्यम प्रॉडक्ट आहे, हे गृहीत धरुनच त्यांनी वाटचालीस प्रारंभ केला. हा उपक्रम सुरू झाल्याचे कळताच परिसरातील काही शेतकर्‍यांनी त्यांच्या गोशाळेत भाकड गायी हक्काने आणून दिल्या. पुढील महिन्यात कोकणातील शेतकरी दहा भाकड गायी आणून देणार आहेत. सध्या त्यांच्याकडे तीस गायी आहेत.
पद्मश्री पुरस्कार प्राप्त सुभाष पाळेकर यांच्या झिरो बजेट शेतीकरीता पिकांवर फवारणी करण्याकरीतागोमुत्र लागते. ताजे गोमुत्र त्यांच्याकडे २0 रुपये लिटर या दराने मिळते. मात्र यासाठीही बहुतेक दिवशी वेटिंग लिस्ट असते.
आज नंबर लावला की दोन ते तीन दिवसांनी गोमुत्र मिळते.
त्याचप्रमाणे शेणाला देखील वाढती मागणी आहे. बहुतांशी गायी भाकड असल्याने दिवसाला २0 ते २५ लिटरच दूध त्यांना मिळते.
त्यातून फारसा फायदा होत नाही. मात्र शेण व गोमुत्रापासून त्यांचे घर सुस्थितीत सुरू आहे.
जिल्ह्यात हा पहिलाच उपक्रम असल्याचा त्यांचा दावा आहे.गोहत्या बंदीचा कायदा कशासाठी ?
सरकारने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला आहे.
वास्तविक या कायद्याची काहीही गरज नाही. कारण भाकड जनावरे कत्तलखान्याकडे पाठवायची ही येथील बहुतांशी शेतकर्‍यांची मानसिकता आहे.
तुम्ही जर भाकड जनावरांचे काय करायचे हे त्यांना सांगितले नाही, तर शेतकरी दुसरे काय करणार?
यापेक्षा त्या जनावरांपासूनही शेतकर्‍याला महिन्याला लाभ होतो याबाबतची जागृती करणे गरजेचे आहे.
- प्रतीक भिडे, गोपालक, वाटेगाव.
वाटेगावच्या तुपाला अमेरिकेतून मागणी
देशी तूप हे औषधी असते. साधारणत: बाजारात मिळणारे तूप हे जर्सी गायीच्या दुधापासून बनविलेले असते. परिणामी त्याची किंमत ५00 ते ६00 रुपये किलो अशी असते.
मात्र विशिष्ट प्रक्रिया केलेले देशी तूप बाजारभावाच्या किंमतीपेक्षा चौपट महाग असते. सध्या अमेरिकेतील मराठी बांधवांकडून प्रतिमाह आठ किलो तुपाला मागणी आहे.
मात्र प्रतीक यांनी तुपासह गोमुत्र व शेणावर प्रक्रिया करण्यावरच भर देणार असल्याचे सांगितले.
*मोरया गोसंवर्धन**९८९००८२०४५
































by -
*दैनिक पुण्यनगरी*
*२५-०१-१७*
*वार्ताहर - नरेंद्र रानडे*
.*सांगली*

किलोला २५०० रुपये दराने देशी तुपाची विक्री...


-
३० देशी गायींचे संगोपन गोमूत्र, गांडूळखत, नैसर्गिक सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती 
वेदशास्त्राच्या अभ्यासातून मिळालेले ज्ञान व गायींप्रति जिव्हाळा या गोष्टींच्या आधारे वाटेगाव (जि. सांगली) येथील भिडे कुटुंबाने देशी गोपालन सुरू केले. आरोग्यदायी तुपाचे मार्केट अोळखून त्याच्या उत्पादनावर भर दिला. गेल्या १२ वर्षांत त्याला २५०० रुपये प्रतिकिलो दराने राज्याच्या बाहेरही चांगले मार्केट तयार केले. तेवढ्यावर न थांबता गोमूत्र, शेण, जीवामृत, सौंदर्यप्रसाधने आदींच्या उत्पादननिर्मितीतून व्यवसायाचा विस्तारही केला. आज या उत्पादनांना चांगली मागणी येत असल्याचे भिडे सांगतात.
अभिजित डाके 

सांगली जिल्ह्यातील वाटेगाव (ता. वाळवा) परिसरात उसाची मोठी शेती आहे. साखर कारखानाही आहे. याच गावात भिडे कुटूंब राहते. मूळचे रत्नागिरी जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या भिडे कुटुंबांची सुमारे सातवी पिढी आज वाटेगाव येथे राहते. त्यांची एक गुंठाही शेती नाही. कुटुंबातील सध्याच्या पिढीचे प्रतिनिधित्व प्रतीक करतात. त्यांच्या वडिलांचा पूर्वी ट्रक व्यवसाय होता. त्यांनी प्रतीक यांना त्यांच्या नवव्या वर्षांपासून केरळ येथे वेदशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पाठविले होते. सन २००४ पर्यंत प्रतीक यांनी वेदशास्त्राचे धडे घेतले. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच वडिलांनी ट्रक व्यवसाय बंद केला. खिलार देशी गायीचे संगोपन करण्यास सुरवात केली. प्रतीक यांनीही केरळमध्ये ज्या वेदशाळेत शिक्षण घेत होते तेथे गोसंगोपनाचे धडे गिरवले होते. साहजिकच गायींप्रति लळा लागला होता. त्यामुळे दुसऱ्या कोणत्या व्यवसायाचा न करता गोसंगोपनच करण्याचा निर्णय घेतला. आज एका खिलार गायीपासून त्यांच्या गोठ्यात २५ ते ३० गायी मुक्तपणे वावरू लागल्या आहेत. पैकी कांकरेज ६ व उर्वरित गीर आहेत. ‘मोरया गोसंवर्धन’ असे या गोठ्याला नाव दिले आहे. सर्व गायी व पैदासासाठी वळू गुजरातमधून आणले आहेत. शुद्ध वंश असल्याने पुढील पिढीही त्याच गुणवत्तेची घडत आहे.

गोसंगोपनाचा प्रसार अाणि विस्तार 
देशी गायी या शेतकऱ्यांसाठी वरदानच आहेत. त्यांच्यापासून मिळणारी प्रत्येक गोष्ट शेतकऱ्याला आर्थिक उन्नती देणारी आहे अशी भिडे यांची विचारसरणी आहे. हे विचार केवळ आपल्यापुरते न ठेवता त्यांचा शेतकऱ्यांत प्रसारदेखील त्यांनी केला आहे. आज १२ वर्षांचा गोसंगोपनातील त्यांचा अनुभव तयार झाला आहे.

देशी तूपनिर्मिती हा मुख्य व्यवसाय 
सन २००७ च्या सुमारास देशी तूपनिर्मिती सुरू केली. आज याच उत्पादनावर सर्वाधिक भर असतो. हे काम चुलीवर मातीच्या भांड्यांमध्ये किंवा दगडी भांड्यांत पारंपरिक पद्धतीनेच केले जाते. त्यामुळेच तुपात सर्व सत्वे उतरतात व त्याची वेगळी चव मिळते असे भिडे म्हणतात. पुणे येथील एम.डी. आयुर्वेद असलेल्या डॉ. रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुपातील आरोग्यदायी घटकांची तपासणी करून घेतली.

तुपाचे मार्केटिंग 
वास्तविक आपणच उत्पादीत मालाचे मार्केटिंग करणे ही कला खूप अवघड आहे. भिडे यांनी त्यात हातखंडा मिळवला आहे. त्यांनी मार्केटिंगसाठी गावातूनच सुरवात केली. गावात अनेकजण "मॉर्निंग वॉक' म्हणजे सकाळी फिरायला जातात. हीच वेळ गाठून चौकात स्टॉल उभा केला. तेथून येणाऱ्या- जाणाऱ्या प्रत्येकाशी संवाद साधत तुपाचा नमुना दाखवण्यास सुरवात केली. 

अनेक वर्षांपासून गोशाळा सांभाळत असल्याने राज्याबरोबरच परराज्यातूनही अनेक अभ्यास सहली येथे येतात. त्यातील प्रत्येकाला नमुन्यापुरते तूप काही शुल्क आकारून दिले जायचे. पुढे हेच लोक भिडे यांच्या तुपाला आॅर्डर देऊ लागले. तुपाची ‘माउथ पब्लिसिटी’ होऊ लागली. हळूहळू ग्राहकांची संख्या वाढू लागली. आज मुंबई, पुणे, हैद्रराबाद, दिल्ली आदी ठिकाणी भिडे यांच्या देशी गायीच्या तुपाला मागणी आहे. मागणी फोनद्वारे केली जाते. त्यानंतर कुरिअरद्वारे ते पाठविले जाते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तुपाच्या दरात वाढ झाली आहे. सुरवातीला १२०० रुपयांपासून विक्रीला सुरवात केली. आज २५०० रुपये प्रतिकिलो दराने ग्राहक ते विकत घेतात. प्रत्येक गाय दर दिवसा सात लिटर दूध देते. सुमारे २२ ते २५ लिटर दुधापासून एक किलो तूप बनते. महिनाकाठी सुमारे ५० ते ७० किलो तुपाची विक्री होते. सध्या तुपाला मागणी जास्त आहेत. उत्पादन अपुरे पडते आहे. हे लक्षात घेऊन येत्या काळात गायींची पैदास वाढवण्याचा विचार आहे.

अन्य उत्पादनांतून व्यवसाय विस्तार 
केवळ तुपावर अवलंबून राहून व्यवसायवृद्धी होणार नाही हे समजले. त्‍यानंतर गेल्या वर्षापासून नैसर्गिक स्त्रोतांवर आधारित साबण, शाम्पू, दंत मंजन ,धुपकांडी, तेल आदी रासायनिक विरहीत उत्पादनांची निर्मिती व विक्री सुरू केली आहे. या व्यतिरिक्त गोमूत्र अर्क २५० रुपये प्रति लिटर दराने, दशपर्णी अर्क लिटरला ५० रु, गांडूळखत किलोला ३० रुपये, शेण किलोला १० रुपये तसेच जीवामृत पावडर आदींची विक्रीही सुरू केली आहे. शेतकऱ्यांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरात या उत्पादनांची विक्री सुमारे ४० हजार रुपयांपर्यंत गेली आहे. काही उत्पादनांना ‘फूड सेफ्टी’ विषयातील केंद्रीय संस्थेचा परवाना घेतला आहे. अन्य उत्पादनांसाठीही संबंधित प्रमाणपत्रे घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

गोशाळेची जागा 
भिडे यांच्या घरासमोर धर्मनाथ महाराज या नाथ संप्रदायातील महान योगींची समाधी अाहे. येथील ८ एकर जमीन देवस्थानासाठी आहे. यातील ४ एकर जमीन भिडे यांना देशी गोसंगोपन या हेतूसाठी कमी शुल्कात भाडेतत्त्वावर दिली आहे. गायींसाठी लागणारी वैरण, खाद्य आज विकत घ्यावी लागते. मात्र देवस्थानच्या मिळालेल्या जागेत काही गुंठ्यात यंदा यशवंत गवताची लागवड केली आहे. त्यामुळे पुढील काळात ताजी वैरण गायींसाठी उपलब्ध होईल. त्यामुळे वैरणीवरील खर्च कमी होईल. एकूण काय आज या ठिकाणी गोशाळेच्या रूपाने नंदनवन उभे राहिले आहे हे मात्र नक्की.

कुटुंबाची साथ 
प्रतीक यांचे वडील उमेश, आई प्रियांका, बहीण प्रतिज्ञा असे भिडे कुटुंबातील सर्व सदस्य गोशाळेची सर्व कामे अत्यंत आनंदाने सांभाळतात.

संपर्क : प्रतीक भिडे - ९४०३७७९९०१








by- agrowon 

Friday, December 23, 2016 AT 06:00 AM (IST)
Tags: agro special

रुबाबदार सुपरस्टार!


रुबाबदार सुपरस्टार!

नायकासाठी आवश्यक असलेला प्रसन्न चेहरारुबाबदार व्यक्तिमत्त्व,अभिनयाची उत्तम जाण आणि संवादफेकीचे कौशल्य हा सुपरस्टारबनण्यासाठीचा सगळाच मालमसाला विनोद खन्नांकडे ठासून भरलेलाहोताउमेदीच्या काळात विनोद खन्ना तरुणींच्या स्वप्नातील जणूराजकुमारच होतात्यामुळेच कुठेही गेला तरी त्याच्याभोवती तरुणींचागराडाच पडायचाहाच देखणा आणि रुबाबदार विनोद खन्ना आतास्वर्गस्थ झाला आहेतेथील अप्सराही आता सुपरस्टार विनोद खन्नाचीवाटच बघत असतील!
बॉलीवूडचा देखणा आणि प्रसन्न अभिनेता हरपला. सुपरस्टार विनोद खन्ना यांची गेले काही दिवस मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली. काळ बनून आलेल्या कॅन्सरसारख्या असाध्य आजाराने विनोद खन्ना यांच्याभोवती आपला पाश टाकला आणि या स्टायलिश हीरोला आयुष्याच्या बहुरंगी पडद्यावरून काळाच्या पडद्याआड जावे लागले. विनोद खन्ना म्हणजे जणू हिंदी चित्रपटसृष्टीतील मदनाचा पुतळाच! दिसण्यापासून ते अभिनयापर्यंत परमेश्वराने त्यांना सारे काही भरभरून दिले होते. विनोद खन्नांचे नाव उच्चारल्याबरोबर डोळय़ासमोर येते ती त्यांची  मजबूत शरीरयष्टी.  गौरवर्णीय सतेज कांती, सदैव क्लीन शेव्हड चेहरा, त्यावर उठून दिसणारे धारदार नाक, गोऱया गालांवर विसावलेले काळय़ाशार केसांचे लांब आणि रुंद कल्ले, सत्तरच्या दशकातील कान झाकणारी स्टेप कट आणि विशाल भालप्रदेशावरून भुवयांपर्यंत रेंगाळणारे झुबकेदार केस असे एकंदर हे देखणे रूप होते. अलीकडे रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची जी छबी जगासमोर आली तो हा विनोद खन्ना नव्हताच मुळी! तरणाबांड, आकर्षक विनोद खन्नास बघण्याची सवय लागलेल्या डोळय़ांना हॉस्पिटलच्या पोशाखातील कॅन्सरने खंगवलेला कृश आणि थकलेला विनोद खन्ना कसा बघवेल? विनोद खन्नाच्या अस्सल चाहत्यांनी ते खिन्न छायाचित्र तत्काळ डिलिट करून त्याचे तेच जुने देखणे रूप आपल्या मनःपटलावर कायमचे कोरून ठेवले. विनोद खन्नाचे जीवन आणि एकूणच करीअर हिंदी चित्रपटाच्या कथेला साजेसेच होते, असे म्हणावे लागेल. आता पाकिस्तानात असलेल्या पेशावरमध्ये
सधन व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या
विनोद खन्ना यांना खरे तर इंजिनीअर व्हायचे होते. फाळणीनंतर खन्ना
कुटुंबीयांनी पाकिस्तानातील गाशा गुंडाळून थेट मुंबई गाठली. कॉमर्स गॅज्युएट होऊन विनोदने आपला टेक्स्टाईलचा व्यवसाय सांभाळावा असे त्याच्या वडिलांचे मत होते. मात्र विनोद खन्ना यांची एका पार्टीत सुनील दत्त यांच्याशी भेट झाली आणि अभियंता होता होता ते अभिनेता बनले. आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि उंचापुरा बांधा बघून सुनील दत्त यांनी विनोद खन्ना यांना ‘मन का मीत’ या चित्रपटात आपल्या भावाची भूमिका देऊ केली. विनोदने ही ऑफर स्वीकारल्याचे कळताच वडिलांचे पित्त खवळले. दोन वर्षांत इंडस्ट्रीत जम बसला नाही तर निमूटपणे व्यवसाय सांभाळावा लागेल, असे वडिलांनी बजावले आणि त्या अटीवर विनोद खन्ना यांची बॉलीवुडमध्ये एण्ट्री झाली. प्रारंभिक काळात काही चित्रपटांत खलनायकाच्या भूमिका केल्यानंतर विनोद खन्ना ‘हीरो’ म्हणून उदयास आले ते १९७१ साली. सुनील दत्त आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘रेश्मा और शेरा’ हा चित्रपट त्यांनी केला. या चित्रपटातील अभिनयाबद्दल विनोद खन्नांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. याच वर्षात त्यांना नवीन दहा चित्रपट मिळाले आणि त्यांचे आयुष्यच बदलून गेले. नायकासाठी आवश्यक असलेला प्रसन्न चेहरा, रुबाबदार व्यक्तिमत्त्व, अभिनयाची उत्तम जाण आणि संवादफेकीचे कौशल्य हा सुपरस्टार बनण्यासाठीचा सगळाच मालमसाला विनोद खन्नांकडे ठासून भरलेला होता. त्यामुळेच निर्मात्यांच्या दारात त्यांना कधी जावे लागले नाही. किंबहुना निर्मातेच त्यांच्या घरी चित्रपट ‘साईन’ करण्यासाठी रांग लावत असत. एकदा तर एकाच आठवडय़ात त्यांनी तब्बल १५ चित्रपट ‘साईन’ केले. एकाहून अधिक अभिनेते, नायक घेऊन चित्रपट काढण्याच्या त्या जमान्यात विनोद खन्ना हे एक
सर्वोत्तम चलनी नाणे
होते. अमिताभ बच्चन, सुनील दत्त, राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी
अनेक चित्रपट केले. खास करून महानायक अमिताभ बच्चनबरोबर त्यांची जोडी अधिकच गाजली. ‘अमर अकबर ऍन्थोनी’, ‘हेराफेरी’, ‘खून पसिना’, ‘मुकद्दर का सिकंदर’ या सुपरहिट चित्रपटांतील अमिताभ-विनोदच्या जोडगोळीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. फिल्म इंडस्ट्रीतील करीअर असे ऐन भरात असतानाच विनोद खन्ना आध्यात्मिक गुरू ओशो रजनीश यांच्या कच्छपी लागले. ओशोंच्या पुण्यातील आश्रमात भांडी घासण्याचे आणि माळी म्हणूनही त्यांनी काम केले. ओशोंच्या अतिनादामुळे त्यांचा संसारही मोडला. पत्नी गीतांजलीने घटस्फोट दिला आणि दोन मुलांसह ती वेगळी झाली. पाच वर्षांनंतर ओशोंच्या संमोहनातून बाहेर पडल्यानंतर विनोद खन्ना यांनी पुन्हा एकदा फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवले. दुसरा संसार थाटला. ‘दयावान’सारखा सुपरहिट चित्रपट दिला. चित्रपटातील दुसरी इनिंग गाजवत असतानाच विनोद खन्ना राजकारणात उतरले. पंजाबातल्या गुरदासपूरमधून भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. एवढय़ा सगळय़ा घडामोडी एकाच आयुष्यात घडाव्यात, हे विनोद खन्नांचे विधीलिखितच असावे. उमेदीच्या काळात विनोद खन्ना तरुणींच्या स्वप्नातील जणू राजकुमारच होता. त्यामुळेच कुठेही गेला तरी त्याच्याभोवती तरुणींचा गराडाच पडायचा. हाच देखणा आणि रुबाबदार विनोद खन्ना आता स्वर्गस्थ झाला आहे. तेथील अप्सराही आता सुपरस्टार विनोद खन्नाची वाटच बघत असतील!

माझ्याबद्दल