गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

कोड ( Vitiligo)


कोड ( Vitiligo)


त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसतात, 
त्यांना ‘कोड’ किंवा ‘पांढरे कोड’ म्हणतात. 
कोड हा संसर्गजन्य रोग नाही. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात,
तसेच त्यांचे स्थान निश्चित असे नसते.
कोणत्याही रंगाच्या व वयाच्या व्यक्तींना कोड होऊ शकतात.

पांढरे कोड

कोडाच्या पांढर्‍या डाग ची सुरुवात त्वचेवरील दर्शनी भागांपासून
म्हणजे हातापायांची बोटे, कोपर, गुडघे, ओठ व तळवे यांपासून होते.
 या डागमुळे वेदना, खाज किंवा दाह होत नाही. परंतु प्रखर 
सूर्यप्रकाशात या डागमुळे दाह जाणवतो.
कोडासंबंधी निश्चित अंदाज वर्तविता येत नाहीत. 
कोडाचे डाग आकाराने वाढू शकतात वा तसेच राहतात.
 ज्या भागांवर कोड येतात त्या भागांतील केसही पांढरे होतात.
कोडाची निश्चित कारणे अजून माहीत झालेली नाहीत
. संशोधकांच्या मते, या विकाराला काही प्रमाणात 
आनुवंशिकता कारणीभूत असू शकते. या विकारात सतराव्या 
गुणसूत्रावरील ‘१७ पी १३’ जनुकामधील बिघाडामुळे व 
परस्परसंबंधित गुंतागुंतीच्या साखळी प्रक्रियेमुळे त्वचेतील मेलॅनीन 
तयार करणार्‍या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. मेलॅनिनाच्या
 निर्मितीनुसार त्वचेचा आणि केसांचा रंग ठरतो. तसेच अवटू ग्रंथीमधील
 बिघाड आणि प्रतिरक्षा यंत्रणेमधील बिघाड याही बाबी कोड निर्माण
 करण्यास कारणीभूत असल्याचे आढळले आहे. मानसिक ताण हे या 
विकाराला सुरुवात होण्याचे एक कारण मानले जाते. इतर कोणत्याही
 विकारापेक्षा कोड झाल्याचा मानसिक ताण व्यक्तीवर अधिक असतो.
 शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचो डाग दिसल्यास अशा व्यक्ती
 निराश होतात किंवा त्यांना न्यूनगंड येतो.
कोडावर अजून निश्चित इलाज सापडलेला नाही. अनेक रुग्ण कोडाचे 
डाग झाकण्यासाठी त्वचारोपण करून घेतात. कोड झालेल्या जागी सोरॅलीन
 नावाचे औषध लावून सूर्यप्रकाशात उभे राहिल्यास वा कृत्रिम रीत्या अतिनील प्रकाश
 पाडल्यास त्वचेचा रोग काही प्रमाणात वा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकतो. 
या उपचारामुळे कोड झालेल्या जागी मेलॅनोसाइट पेशींची पुन्हा निर्मिती होते. 
काही वेळा अमीबाजन्य ( अमीबायासिस ) विकारामुळे त्वचेवर पांढरे डाग दिसतात. 
मात्र औषधोपचारानंतर हे डाग नाहीसे होतात.













 मोहन मद्वाण्णा
स्त्रोत: मराठी विश्वकोश

---------------------------------------------------------------------------

त्वचा रोगांचे कारण मळाची आतडी

माणसाचा आहार‍ विहार जसा जसा नकली होत गेला तस तस मलसंचय 

शरीराच्या पचनमार्गात मोठ्या आड्यात वाढत केला. 

आज घरोघरी मळबद्धता हा विकार दिसून येत आहे.

 मळाच्या आतडीतील जमा विकृत मळाचे आक्रमण जेव्हा शरीराच्या 

त्वचा संस्थानवर होते त्यावेळेस सोर्‍यासिस, एक्झीमा, चेहर्यावर मुरुम, खाज, 

गजकर्ण, पांढरे डाग, काळे डाग, त्वचा फाटणे, त्वचेवर गाठी येणे, डोक्यात कोंडा 

होणे असे विकार उद्भवतात. आहारात ज्वारीच्या लाह्या, कण्या, 

भाकरी, सलाद, भाज्या, पालेभाज्या, आंबट गोड फळे असा आहार 

मलसंचय होऊ देत नाही व रक्ताला शुद्ध ठेवून योग्य पोषण देतो. 




त्वचा रोगांवर रामबाण शोधनचिकित्सा 
त्वचा रोगांना समूळ नष्ट करण्यासाठी शोधनचिकित्सा शंभर टक्के गुणकारी आहे. 
शोधनचिकित्सा प्राकृतिक आहार विहार व पृथ्वी, जल, सूर्यप्रकाश,
 हवा व आकाशतत्वाची चिकित्सा आहे. या ट्रिटमेंटमध्ये अपयश नाही.
 शंभर टक्के गुण येतो व तो जन्मभर टिकतो असा अनुभव आहे




स्त्रोत: ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल