सध्या वजन कमी करण्याच्या क्षेत्रात करोडो रुपयांची उलाढाल होत आहे पण या कमी वजनाला आपल्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने खरेच किती महत्त्व आहे याचा आता विचार केला जात आहे. कार्यक्षम लोक आणि अकार्यक्षम लोक यांच्यात तुलना केली असता असे लक्षात आले आहे की एखादा माणूस केवळ वजन जास्त आहे म्हणून अकार्यक्षम आहे असे काही दिसत नाही. भरपूर व्यायाम करून, खाण्याची पथ्ये पाळून एखादा माणूस वजन नियंत्रणात ठेवतो किंवा एखाद्याच्या शरीराची मूळ ठेवणच अशी असते की त्याचे वजन आपोआप नियंत्रणात राहते पण म्हणून ही अशी स्लिम माणसे कार्यक्षम असतातच असे नाही. तज्ज्ञांच्या मते केवळ वजन हा घटक आपली कार्यक्षमता ठरवत नाही. तर एकुणात शारीरिक तंदुरुस्ती आणि मनाची ठेवण या दोन गोष्टी कार्यक्षमतेवर परिणाम करीत असतात. कार्यक्षमतेच्या शारीरिक मापदंडात म्हणजे तंदुरुस्तीत तज्ज्ञांनी काही परिमाणे निश्चित केली आहेत. एखाद्या व्यक्तीचे वजन जास्त असते. त्याला खायलाही खूप लागते. पण एवढ्यावर तो कार्यक्षमता गमावत नाही. त्याने खाल्लेले अन्न त्याला पचते की नाही यावर त्याची कार्यक्षमता ठरते. अमेरिकेत या संबंधात १४ हजारावर लोकांचे वजन, खाणे आणि शारीरिक तंदुरुस्तीची इतर मापे यांचा तुलनात्मक अभ्यास केला असता ही गोष्ट समजून आली. हृदय विकार होणे आणि मृत्यू यांचा संबंध केवळ वजनाशी नसून तंदुरुस्तीच्या इतर मापांशीही आहे असे या अभ्यासात दिसून आले. एकंदरीत सध्या वजन कमी करण्याचे जे वेड वाढत आहे त्या वातावरणात तरी वजन जास्त असणारांना ही खुष खबर आहे. कारण जे लोक सतत कार्यरत असतात आणि न थकता उल्हसित मनाने काम करतात त्यांना वजन जास्त असले तरीही हृदय विकाराचा त्रास होण्याची ङ्गार कमी शक्यता असते. डकश्युल ली यांनी हे निष्कर्ष जाहीर केले आहेत. त्यांच्या मते तंदुरुस्ती आणि सतत कार्यरत राहणे या गोष्टी आरोग्याला चांगल्या असतात. तंदुरुस्तीत चांगली झोप, खाल्लेल्या अन्नाचे पचन, आनंदी जीवन जगण्याची प्रवृत्ती या गोष्टींचा समावेश होतो. माणूस शरीराने थकत नसतो. तो मनाने थकत असतो. एखादा माणूस धडधाकट असूनही मनाने आनंदी नसेल तर लवकर थकतो पण एखादा त्यामानाने अशक्त माणूस मनाने आनंदी असेल तर न थकता खूप काम करू शकतो. आपण कधी शतायुषी ठरलेल्या लोकांच्या मुलाखती वाचतो. तेव्हा हे लोक आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगतात. त्यांची जाडी किंवा बॉडी मास इंडेक्स ङ्गार आदर्श असतो असे काही दिसत नाही. तो कमी जास्तही असतो पण ते लोक सतत कार्यरत रहात असतात. मलेशियातल्या ११५ वर्षे जगलेल्या एका महिलेला तिच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय असे विचारले असता तिने सतत कार्यरत राहाणे हे आपल्या आयुष्याचे रहस्य असल्याचे सांगितले होते. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई हे ८४ व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. साठी पासष्टीतल्या लोकांनाही लाजवेल अशी कार्यक्षमता त्यांनी जोपासली होती. ते कधी आजारी पडल्याचे कोणी पाहिले नाही. त्यांच्यावर कसलीही शस्त्रक्रिया झाली नव्हती. मरेपर्यंत त्यांचे हृदय मजबूत होते.
असाच प्रकार ब्रिटनचे दुसर्या महायुद्धाच्या काळातले पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचाही होता. ते ९५ वर्षे जगले.
मोराराजी देसाई तर ९९ वर्षे जगले.
या दोघांच्या बाबतीत एक समान गोष्ट आढळत होती. त्यांची इच्छाशक्ती ङ्गार जबरदस्त होती.विन्स्टन चर्चिल तर सिगारेट ओढत असत आणि आपल्या दीर्घायुष्याचे हेच रहस्य आहे असे म्हणत असत. मोरारजीही शिवांबू प्राशन करीत असत आणि आपल्या दीर्घायुष्याचे हेच रहस्य आहे असे ठामपणे म्हणत असत. अर्थात हे दोघेही दीर्घायुष्यी होते हे खरे पण त्यांना आपल्या या दीर्घायुष्याचे खरे शास्त्रीय कारण माहीत नव्हते. सततोद्योग आणि इच्छाशक्ती हे ते शास्त्रीय कारण होते. हाच विषय कामगारांच्या बाबतीत येतो. कार्यक्षमतेचे गणित मांडताना कामगार किती दणकट आहेत याला महत्त्व नसते तर काम करताना त्यांची मनस्थिती कशी होती याला महत्त्व असते. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत असेच सांगितले आहे. आपल कामात आपल्याला यश येणार की नाही हे बर्याच घटकांवर अवलंबून असतेच पण ते काम करताना आपली मनस्थिती कशी होती याला जास्त महत्त्व असते असे गीतेत म्हटले आहे. मिनेसोटा विद्यापीठात झालेल्या एका संशोधनाला भगवान श्रीकृष्णाच्या या प्रतिपादनाने दुजोरा मिळाला आहे. कामगारांची मनस्थिती हा भांडवलाइतका आणि तंत्रज्ञानाइतकाच महत्त्वाचा घटक ठरला आहे. म्हणून कामगारांची प्रेरणा कायम ठेवणे यशस्वी उद्योजकांसाठी आवश्यक ठरले आहे आणि ती कायम ठेवण्यासाठी उद्योजक कितीही पैसा खर्च करायला तयार होत आहेत. यातून अमेरिकेत कार्यप्रेरणा वाढवण्यावर मोठी उलाढाल होत आहे. या कार्यप्रेरणेला मोटिव्हेशन असे म्हटले जाते. या उद्योगाला मोटिव्हेशन इंडस्ट्री असे म्हटले जायला लागले आहे.
आभार - नवशक्ती

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा