गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

कोड ( Vitiligo) व आयुर्वेदिक औषधोपचार...


जनसामान्यांना कोड या आजाराची माहिती करुन देणे, आजाराबद्दल जनजाग्रती करणे हा या पाठीमागिल उद्देश आहे.
त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसतात, त्यांना ‘कोड’ किंवा ‘पांढरे कोड’ म्हणतात. कोड हा संसर्गजन्य रोग नाही. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात, तसेच त्यांचे स्थान निश्चित असे नसते. कोणत्याही रंगाच्या व वयाच्या व्यक्तींना कोड होऊ शकतात.



कोडाच्या पांढर्‍या डागांची सुरुवात त्वचेवरील दर्शनी भागांपासून म्हणजे हातापायांची बोटे, कोपर, गुडघे, ओठ व तळवे यांपासून होते. या डागांमुळे वेदना, खाज किंवा दाह होत नाही. परंतु प्रखर सूर्यप्रकाशात या डागांमुळे दाह जाणवतो. कोडासंबंधी निश्चित अंदाज वर्तविता येत नाहीत. कोडाचे डाग आकाराने वाढू शकतात वा तसेच राहतात. ज्या भागांवर कोड येतात त्या भागांतील केसही पांढरे होतात. कोडाची निश्चित कारणे अजून माहीत झालेली नाहीत. संशोधकांच्या मते, या विकाराला काही प्रमाणात आनुवंशिकता कारणीभूत असू शकते. या विकारात त्वचेतील मेलॅनीन तयार करणार्‍या पेशी (मेलॅनोसाइट) नष्ट होतात. मेलॅनिनाच्या निर्मितीनुसार त्वचेचा आणि केसांचा रंग ठरतो. मानसिक ताण हे या विकाराला सुरुवात होण्याचे एक कारण मानले जाते. इतर कोणत्याही विकारापेक्षा कोड झाल्याचा मानसिक ताण व्यक्तीवर अधिक असतो. शरीराच्या दर्शनी भागावर कोडाचो डाग दिसल्यास अशा व्यक्ती निराश होतात किंवा त्यांना न्यूनगंड येतो.
कोडावर अजून निश्चित इलाज सापडलेला नाही. अनेक रुग्ण कोडाचे डाग झाकण्यासाठी त्वचारोपण करून घेतात. कोड झालेल्या जागी विविध लेप किंवा तेल , मलमे अशी औषधे लावून सूर्यप्रकाशात उभे राहिल्यास वा कृत्रिम रीत्या अतिनील प्रकाश पाडल्यास त्वचेचा रोग काही प्रमाणात किंवा पूर्णपणे पूर्ववत होऊ शकतो. या उपचारामुळे कोड झालेल्या जागी मेलॅनोसाइट पेशींची पुन्हा निर्मिती होते. 



याव्याधीसंबंधी समाजात बरेच गैरसमज आढळ्तात. काही समज अंधश्रध्येतून निर्माण झालेले आहेत. काही अद्यनातून आलेले आहेत. 



आयुर्वेदात कोड या व्याधीचे द्यान आणि त्यावरील चिकित्सा फार प्राचीन काळापासुन प्रचलित आहे. आयुर्वेदातील आभ्यंतर व बाह्य चिकित्सा तसेच पंचकर्मादी उपचारांनी कोड हा आजार बरा करता येवू शकतो. पंचकर्मा मध्ये स्नेह्स्वेदपुर्वक वमन व विरेचन करुन शरिराचे वारंवार शोधन करावे लागते. यानंतरही संपुर्ण शरीर शुध्दीकरणानंतर सम्यक स्नेहपान करुन स्थानिक किंवा सार्वदेहीक रक्तमोक्षण करावे लागते. रक्तमोक्षणाद्वारे दुषित रक्त शरिराबाहेर जाते, त्यामुळे रक्त तसेच पित्त याची शुध्दी होण्यास मदत होते. त्यामुळे रक्ताचे जीवनकार्य, व्याधीनाश, वर्णप्रसादन व आयुष्यकर असे कार्य घडून येते. जलौकाद्वारे स्थानीक रक्तमोक्षणाचा चांगला फायदा होतो असे अनुभवावरुन दिसुन येते. चिकित्सा करताना प्रामुख्याने वानस्पतीक औषधी , रसकल्प, भस्मे याचा विचार केला जातो. ओजोवर्धक भस्मे, चुर्णे, कल्प, रस, तेले, लेप इत्यादी उपायांची रुग्णांचे बलाबल व व्याधीचे स्वरुप पाहून तारतम्याने योजना करावी लागते. या सर्व गोष्टी रुग्णाला सात्म्य होईल व त्यास कसलाही अपाय होणार नाही याची काळजी घेणेही आवश्यक असते. रुग्णाच्या मनात कोणताही शंका, संशय निर्माण होवू न देता त्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण करावा लागतो. याबरोबरच रुग्णाचे मानसिक बळ वाढविण्यासाठी त्यास समुपदेशन करणे, त्यास धीर देणे, आहाराचे व राहणीमानाची सर्व पथ्ये समजावून सांगितली जातात. आयुर्वेदिक औषधांचा उपयोग केल्यास परिणाम लवकर मिळतात व विकार कायमचा बरा होतो.


कोड हा आजार बरा होत नाही हा गैरसमज आहे. आयुर्वेदामध्ये उत्तम प्रकारची औषधोपचार पद्धती आहे. योग्य आहाराचे नियोजन, नियमित आणि योग्य औषधोपचार ह्याद्वारे कोड पूर्णपणे बरा होतो.









आभार - इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल