शेळीला भारतात ‘गरीबाची गाय’ म्हणतात आणि कोरड्या जमिनीवर शेती
करणायांसाठीहा
एक फार महत्वाचा घटक आहे. किरकोळ किंवा चढउतार असलेल्या
पृष्ठभागाच्याजमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्या जनावरांसाठी चांगल्या
नसतील, पण शेळीहा उत्तम पर्याय आहे. फार थोडी गुंतवणूक करून शेळी पालन हा
किरकोळ आणि लहानशेतकÚयांसाठी एक फायदेशीर उद्यम ठरू शकतो.
हे कोण सुरू करू शकते?
- लघु आणि मध्यम शेतकरी
- ज्यांच्याकडे जमीन नाही असे श्रमिक
- सामान्य कुरणांची उपलब्धता
सुरू करण्याची कारणे
- कमी भांडवल निवेश आणि लवकर प्राप्ती होणे
- साधे आणि लहान शेड पुरेसे आहे
- स्टॉल (एका जनावरास बांधण्याची जागा) फेड स्थितीत ठेवल्यास नफा देणारे
- शेळ्यांचा उच्च प्रजोत्पादन दर
- वर्षभराचे काम
- चर्बी नसलेले मांस आणि कमी वसा असलेले व सर्व लोकांना आवडणारे
- केव्हां ही विकून पैसे मिळविता येतात
तुमच्यासाठी कोणती प्रजाति चांगलीआहे?जमनापरी :-
- चांगली उंची असलेले जनावर
- प्रौढ जमनापरीमध्ये चांगले सुबक बाकदार रोमन नाक आणि किमान 12 इंच लांबीचे हेलकावे घेणारे कान
- बोकडाचे वजन सुमारे 65 ते 85 किलोग्राम असते वशेळ्यांचे वजन 45 ते 60 किलोग्राम असते
- प्रत्येक विण्याच्या वेळी एकच करडू
- सहा महिन्यांच्या करड्याचे वजन सुमारे 15 किलोग्राम असते
- दर रोज किमान 2-2.5 लिटर दुधाचे उत्पादन
तेलीचेरी :-
- शेळ्यांचा रंग पांढरा, भुरा किंवा काळा असतो
- एका विण्यात 2-3 करडी
- बोकडाचे वजन सुमारे 40 ते 50 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 30 किलोग्राम असते
बोअर : -
- संपूर्ण विश्वभरात मांसाकरीता पाळतात
- वाढीचा दर तीव्र आहे
- बोकडाचे वजन सुमारे 110 ते 135 किलोग्राम असते व शेळ्यांचे वजन 90 ते 100 किलोग्राम असते
- 90 दिवसांच्या करड्याचे वजन 20-30 किलोग्राम असते .
महाराष्ट्रातील शेळी-मेंढी पालन व्यवसाय :- राज्यातील मेषपालन व्यवसाय जवळपास एक लाख कुटुंबांकडून केला जातो, तर ९५ टक्के खेडयामध्ये ४८ लाख कुटुंबाकडून शेळीपालन केले जाते.
महाराष्ट्रातील मांसाचे उत्पादन:-
महाराष्ट्र राज्याच्या सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार सन २००८-२००९ मध्ये शेळया-मेंढयापासून मिळणा-या मांसाचे उत्पादन हे एकूण मांस उत्पादनाच्या ३४.५२ टक्के (मेंढी ११.३४ टक्के आणि शेळी २३.१८ टक्के) आहे. यामध्ये महाराष्ट्रात शेळया-मेंढयापासून मिळणारे सरासरी उत्पादन हे ११ कि.ग्रॅ एवढे आहे.
महाराष्ट्रातील मांसाचे उत्पादन:-
महाराष्ट्र राज्याच्या सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार सन २००८-२००९ मध्ये शेळया-मेंढयापासून मिळणा-या मांसाचे उत्पादन हे एकूण मांस उत्पादनाच्या ३४.५२ टक्के (मेंढी ११.३४ टक्के आणि शेळी २३.१८ टक्के) आहे. यामध्ये महाराष्ट्रात शेळया-मेंढयापासून मिळणारे सरासरी उत्पादन हे ११ कि.ग्रॅ एवढे आहे.
शेळया-मेंढयापासून मिळणा-या मांसाची निर्यात:-
जगातील सन २००७ मध्ये मेंढयापासून मिळणा-या मासांचे उत्पादन
८.८९ दशलक्ष टन तर शेळयापासून मिळणा-या मांसाचे उत्पादन ५.१४
दशलक्ष टन होते. भारताचा शेळयांपासून मिळणा-या मांसाच्या उत्पादनामध्ये
दुसरा तर मेंढयांपासून मिळणा-या मांसाच्या उत्पादनामध्ये सातवा क्रमांक
लागतो. सन २००६-२००७ मध्ये शेळया-मेंढयाच्या मांसाचे निर्यात शुल्क
६५.८७ कोटी होते. हे आता सन २००७-०८ मध्ये वाढून १३४.१०
कोटी एवढे झालेले आहे.
लोकर उत्पादन:-
राज्यातील लोकर प्रामुख्याने काळी-पांढरी-मिश्र रंगाची आहे. लोकर कातरणी
ही वर्षातून दोनदा केली जाते. पहिली जून-जुलैमध्ये तर दुसरी ही साधारणत:
त्यानंतर सहा महिन्यानंतर केली जाते. महाराष्ट्र राज्यातील मेंढयांपासून
सरासरी ५८५ ग्रॅम एवढी लोकर उत्पादित होते. सन २००८-०९ मधील
राज्याचे लोकरीचे उत्पादन १७०७ मेंटन एवढे होते.
राज्यात एकूण उत्पादित होणा-या लोकरीपैकी २० टक्के लोकर
घोंगडया व जेन उत्पादनाची वापरली जाते तर उर्वरित ८० टक्के लोकर
उत्तरेकडील राज्यातील हरियाणा, पंजाब येथील व्यापारी, मिल मालक
लष्करासाठी लागणा-या बरॅक ब्लँकेटच्या उत्पादनासाठी खरेदी करतात.
शेळीपासून मिळणा-या दुधाचे उत्पादन:-
सन २००८-०९ मध्ये राज्याचे शेळीपासून मिळणा-या दुधाचे उत्पादन
२७७.२४८ हजार में.टन होते. महाराष्ट्रातील शेळयांचे एका दिवसाचे सरासरी
उत्पादन २१९ ग्रॅम्स आहे. राज्यामध्ये उत्पादित होणा-या दुधापैकी एकूण ४
टक्के हिस्सा शेळयांच्या दुधाचा आहे.
महाराष्ट्रातील शेळी-मेंढी पालन व्यवसाय :-
राज्यातील मेषपालन व्यवसाय जवळपास एक लाख कुटुंबांकडून केला
जातो, तर ९५ टक्के खेडयामध्ये ४८ लाख कुटुंबाकडून शेळीपालन केले जाते.
महाराष्ट्रातील मांसाचे उत्पादन:-
महाराष्ट्रराज्याच्या सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार सन २००८-२००९
मध्येशेळया-मेंढयापासून मिळणा-या मांसाचे उत्पादन हे एकूण मांस
उत्पादनाच्या३४.५२ टक्के (मेंढी ११.३४ टक्के आणि शेळी २३.१८ टक्के)
आहे. या मध्येमहाराष्ट्रात शेळया-मेंढयापासून मिळणारे
सरासरी उत्पादन हे ११ कि.ग्रॅ एवढेआहे.
शेळया-मेंढयापासून मिळणा-या मांसाची निर्यात:-
जगातील सन २००७ मध्ये मेंढयापासून मिळणा-या मासांचे उत्पादन
८.८९ दशलक्ष टनतर शेळयापासून मिळणा-या मांसाचे उत्पादन
५.१४ दशलक्ष टन होते. भारताचाशेळयांपासून मिळणा-या मांसाच्या
उत्पादनामध्ये दुसरा तर मेंढयांपासूनमिळणा-या मांसाच्या
उत्पादनामध्ये सातवा क्रमांक लागतो. सन २००६-२००७ मध्येशेळया-मेंढयाच्या
मांसाचे निर्यात शुल्क ६५.८७ कोटी होते. हे आता सन२००७-०८
मध्ये वाढून १३४.१० कोटी एवढे झालेले आहे.
लोकर उत्पादन:-
राज्यातीललोकर प्रामुख्याने काळी-पांढरी-मिश्र रंगाची आहे. लोकर
कातरणी ही वर्षातूनदोनदा केली जाते. पहिली जून-जुलैमध्ये तर
दुसरी ही साधारणत: त्यानंतर सहामहिन्यानंतर केली जाते. महाराष्ट्र
राज्यातील मेंढयांपासून सरासरी ५८५ग्रॅम एवढी लोकर उत्पादित होते.
सन २००८-०९ मधील राज्याचे लोकरीचे उत्पादन१७०७ मेंटन एवढे होते.
राज्यात एकूण उत्पादित होणा-या लोकरीपैकी २०टक्के लोकर घोंगडया
राज्यात एकूण उत्पादित होणा-या लोकरीपैकी २०टक्के लोकर घोंगडया
व जेन उत्पादनाची वापरली जाते तर उर्वरित ८० टक्के लोकरउत्तरेकडील
राज्यातील हरियाणा, पंजाब येथील व्यापारी, मिल मालक लष्करासाठी
लागणा-या बरॅक ब्लँकेटच्या उत्पादनासाठी खरेदी करतात.
शेळीपासून मिळणा-या दुधाचे उत्पादन:-
सन
२००८-०९ मध्ये राज्याचे शेळीपासून मिळणा-या दुधाचे उत्पादन २७७.२४८
हजारमें.टन होते. महाराष्ट्रातील शेळयांचे एका दिवसाचे सरासरी उत्पादन
२१९ग्रॅम्स आहे. राज्यामध्ये उत्पादित होणा-या दुधापैकी एकूण ४ टक्के
हिस्साशेळयांच्या दुधाचा आहे.
महाराष्ट्र राज्यातील दुध उत्पादनाचा तपशिल खालिलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्यातील दुध उत्पादनाचा तपशिल खालिलप्रमाणे आहे.
महाराष्ट्रातील शेळयांच्या व मेंढयांच्या जाती कोणत्या आहेत?
महाराष्ट्रामध्ये
उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण कन्याल आणि सुरती या शेळयांच्या तर दख्खनी व
माडग्याळ या मेंढयांच्या प्रमुख जाती आहेत दख्खनी मेंढयांमध्ये संगमनेरी,
लोणंद, सांगोला (सोलापूर)आणि कोल्हापूरी हे उपप्रकार आढळतात.
पैदाशीकरिता शेळयांची निवड कशी करावी ?
जातीची सर्व लक्षणे बरोबर असावीत, शक्यतो त्यांच्यामध्ये उभयगुण
(मांस आणि दूध)असावेत.
1. सरासरी वय एक वर्षाचे पुढे, वजन ३०-३२ किलोच्या पुढे असावे
2. मादीचा चेहरा थोडासाही नरासारखा नसावा. अशा मादया द्वीलिंगी
असू शकतात व पैदाशीकरिता निरोपयोगी असतात.
3. कपाळ रुंद असावे, मान लांब आणि पातळसर असावी,डोळे तरतरीत असावेत.
4. पाठ मानेपासुन शेपटापर्यंत शक्यतो सरळ असावी, बाक नसावा.
5. पाठीमागुन पाहिल्यावर मांडयात भरपुर अंतर असावे, योनीमार्ग स्वच्छ असावा.
6. कास मोठी आणि लुशलुशित, दोन्ही सड एकाच लांबीचे आणि जाडीचे,
दुध काढल्यावर लहान होणारे असावेत.
7. नियमितपणे माजावर येणारी, न उलटणारी, सशक्त, निरोगी, जुळी पिल्ले देणारी,
8. जास्त दुध देणारी, स्वत:च्या करडांविषयी मातृत्वाची भावना असणारी शेळी निवडावी.
पैदाशीकरिता कळपामध्ये किती बोकड ठेवावेत ?
शेळयांच्या संख्येच्या तीन ते चार टक्के पैदाशीचे बोकड ठेवावेत म्हणजेच
२ ते ३० शेळयांना एक जातीवंत बोकड हे प्रमाण ठेवावे. दर दोन ते तीन वर्षानी
कळपातील बोकड बदलावा म्हणजे समरक्त पैदास टाळून सशक्त करडे जन्माला येतील.
शेळयांचे व्यवस्थापन कसे करावे?
किफायतशीर शेळीपालनासाठी व्यवस्थापन :
- शेळयांच्या संख्येच्या ३ ते ४ टक्के पैदाशीचे बोकड ठेवावे म्हणजेच २५ ते ३० शेळयांना १ बोकड हे प्रमाण ठेवावे.
- दर दोन वर्षांनी शेळयामधील बोकड बदलावा म्हणजे समरक्त पैदास टाळून सशक्त करडे जन्माला येतील.
- गाभण / दुधाळ शेळयांना आणि पैदाशीच्या बोकडांना पैदास काळात त्यांच्या वजनानुसार अतिरिक्त हिरवाचारा, वाळलेला चारा व खुराक देण्यांत यावा.
- सर्व शेळयांना नजिकच्या पशुधन विकास अधिका-यांच्या सल्ल्याने लसीकरण आणि जंतप्रतिबंधक औषधोपचार नियमितपणे करावा.
- गोचीड, उवा इत्यादी बाहय किटकांच्या प्रतिबंधासाठी किटकप्रतिबंधक औषध फवारणी करावी.
- शेळयांचा विमा उतरविण्यांत यावा.
- एखादी शेळी आजारी/मृत पावल्यास तात्काळ नजिकच्या पशुचिकित्सालयासी संपर्क साधावा. तीची परस्पर विल्हेवाट लावू नये.
- शेळयासाठी योग्य आकाराचा स्वस्त निवारा करावा आणि त्याची स्वच्छता ठेवण्यांत यावी.
- शेळयांना दररोज आवश्यकतेनुसार दोनदा स्वच्छ आणि थंड पाणी देण्याची व्यवस्था करावी.
शेळया-मेंढयांचे वय कसे ओळखावे ?
करडास जन्मल्यानंतर पहिल्या आठवडयात समोरच्या दुधी दाताच्या मधल्या तीन
जोडया येतात. बाहेरची चौथी जोडी वयाच्या चौथ्या आठवडयात उगवते. कालांतराने
करडू जसजसे मोठे होते ज्ञसज्ञसे हे दुधी दात पडतात व त्याजागी कायमचे दात
उगवतात. त्याचा कालावधी खालीलप्रमाणे पहिली जोडी - १५ ते १८ महिने
दुसरी जोडी- २० ते २५ महिने तिसरी जोडी- २४ ते ३१ महिने चौथी
जोडी- २८ ते ३५ महिने या विशिष्ट दातावरुन शेळी- बोकड
यांच्या वयाचा अंदाज येतो.
***********************************************************************
सातारा गोट फार्मकडे खालील जातीच्या शेळ्या / बोकड खात्रीशीर व योग्य दारात मिळतील.
१. उस्मानाबादी, २. संगमनेरी, 3. शिरोही, ४. सोजत, ५. जमानापारी,
६. तोतापारी, ७. बारबेरी, ८. बीटल, ९. सानेन, १०. बोअर
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
: वरील शेळ्यांचे गुण विशेष :
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
उस्मानाबादी
मराठवाड्यातील
जात. रंग काळा किंवा तांबडा. मोठी शिंगे व लांब कान. १४ महिन्यात दोन वेते
देते. २ ते 3 काटडे एका वेताला. नर ४५ ते ५० किलो. मादी ३५ ते ४० कोलो.
बंदिस्त शेळीपालन करण्यास कमी प्रतिसाद.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
शिरोही
राजस्थानातील
सिरोही जिल्ह्यातील शेळी. रंग तांबडा तपकिरी अंगावर गर्द ठिपके. भारतात
सर्वात जलद वाढणारी जात. नर ४५ ते ६० किलो. मादी ३० ते ५० किलो. बंदिस्त
शेळीपालनाला योग्य.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
सोजत
राजस्थानातील
सोजत जिल्ह्यातील शेळी. रंग पांढरा. अंगावर डाग, गुलाबी कानाच्या शेळीला
जास्त किंमत. बकरी ईदला बोकडांना जास्त किंमत. नराचे ४० ते ६० किलो. तर
मादीचे ३० ते ४० किलो. बंदिस्त शेळीपालनाला योग्य.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
जमनापारी
उत्तर
प्रदेशातील युमेनच्या खोऱ्यातील शेळी. दुध व मांस दोन्हीसाठी उत्तम.
पांढरा, पिवळसर रंग, मान व मागील पायांवार केस किंवा दुमडलेले कान,बोकडाचे
वजन ६० ते ९० किलो. दुध देण्याची क्षमता २ ते ४ लिटर. शेळीला बंदिस्तपेक्षा
फिरणे आवडते.
जमनापारीमध्ये मुख्य तीन प्रकार आढळतात
अ) इटवा जमनापारी :- वरील वर्णनाप्रमाणे असलेली शेळी.
ब) हैद्राबादी जमनापारी :- शुभ्र पंढरी व गुलाबी त्वचा. गुलाबी १ फुटापर्यंत असलेले कान. या शेळ्या कमी प्रमाणात असल्याने शौकीन लोक जास्त किमतीत खरेदी करतात.
क) हंसा जमनापारी :- पंढरी शुभ्र व नाजूक शेळी. अत्यंत नजाकदार. व डाग विरहीत असल्याने महाग विकली जाते.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
बीटल (अमृतसरी)
ठराविक
रंग नाही. पंजाबमध्ये आढळते. काळा व लालसर रंग जास्त आढळतो. लांब कान. मादी
४० ते ५० किलो व नर ५० ते ८० किलो. दुध ५ ते ७ लिटर. बंदिस्तला चांगली
शेळी.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
उस्मानाबादी
मराठवाड्यातील
जात. रंग कला किंवा तांबडा. मोठी शिंगे व लांब कान. १४ महिन्यात दोन वेते
देते. २ ते 3 करडे एका वेताला. नर वजन ४५ ते ५० किलो. मादी ३५ ते ४० किलो.
बंदिस्तला कमी प्रतिसाद.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
सिरोही
राजस्थानातील
सिरोही जिल्यातील शेळी. रंग तांबडा किंवा तपकिरी. अंगावर गर्द ठिपके.
भारतात सर्वात जलद वाढणारी जात. नर ४५ ते ६० किलो. मादी 30 ते ५० किलो.
बंदिस्तला योग्य.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
सोजत
राजस्थानातील
सोजत जिल्यातील शेळी. रंग पांढरा. अंगावर डाग, गुलाबी कानाच्या शेळीला
जास्त किंमत. बकरी ईद ला जास्त किमत. नराचे ४० ते ६० किलो. तर मादीचे ३० ते
४० किलो. बंदिस्तला चांगला.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
सानेन
स्विझर्लंड
मधील सानेन नदीच्या खोर्यातील. रंग पंधरा, टोकदार शिंगे. बोकडाचे वजन ६०
ते ७५ किलो. शेळी ५० ते ६० किलो. एका वेतात 100 ते १५० लिटर दुध देऊ शकते.
परंतु भारतात उष्ण हवेत दुध कमी देते. दैनंदिन १ ते 3 लिटर दुध. दुध व
मांसासाठी उत्तम.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
बोअर
दक्षिण
आफ्रिकेतील जात. उष्ण कटिबंधात तग धरणारी. रंग तपकिरी पंधरा. बोकड ८० ते
१०० किलो. शेळी ६० ते ९० किलो. जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी जात. वर्षात
दोनदा विणारी. जुळ्यांचे प्रमाण चांगले. दररोज पाव किलो वजनवाढ . दुध २ ते 3 लिटर.
० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ० ०
*****************************************************************
परजीवी जीवसृष्टी
गोचीड
प्राण्यांच्या संधिपाद संघातील अष्टपादअॅरॅक्निडा वर्गात गोचिडांचा समावेश होतो. मुखांगांच्या दोन जोड्या आणिपायांच्या चार जोड्या ही या वर्गाची खास वैशिष्ट्ये आहेत. टणक गोचिडे (आयक्झोडिडी) आणि मऊ गोचिडे (अरगॉसिडी) अशी त्यांची दोन कुले आहेत. टणकगोचिडांचे शरीर कठिण असून त्याची मुखांगे वरून दिसतात, तर मऊ गोचिडांचेशरीर मऊ असून त्याची मुखांगे वरून सहजपणे दिसत नाहीत. गोचीड रक्तशोषक असूनत्यांचा माणूस, पाळीव प्राणी, पक्षी आणि साप-सरड्यांसारखे सरपटणारे प्राणीयांना उपद्रव होतो.
गोचिडाच्या शरीराचे शीर्षवक्ष आणि उदरअसे दोन भाग असतात. मुखांगे आश्रयींच्या (ज्याच्यावर गोचिडे असतात तेप्राणी) त्वचेत खुपसून त्यांच्या रक्ताचे शोषण करण्यास सोयीची असतात. गोचीडजेव्हा चावा घेते तेव्हा आश्रयीच्या त्वचेत आपले दात खुपसून घट्ट बसते.अशी गोचीड काढणे अवघड काम असते. रक्त पिऊन तट्ट फुगल्यावर ती आपली पकड ढिलीकरते व आश्रयीपासून गळून पडते.
गोचिडाची मादी नरापेक्षा आकाराने मोठीअसते. त्या जमिनीवर अथवा गवतावर हजारो अंडी घालतात. ओलावा आणि ऊन याघटकांनुसार सुमारे महिन्याभरात अंड्यांतून सहा पायांचे डिंभ (अळीसारखीअवस्था) बाहेर पडतात. पहिल्यांदा कात टाकल्यानंतर डिंभांचे रूपांतर आठपायांच्या अर्भकात होते. ही अर्भके झु़डपांच्या पानांच्या कडेला बसूनराहतात आणि जवळून जाणार्या आश्रयींच्या अंगावर स्वार होतात. जमिनीचीकंपने, स्पर्श आणि उष्णतेची जाणीव तसेच काही जीवरसायने यांवरून त्यांनाआश्रयीची चाहूल लागत असते. आश्रयीपासून शोषल्या गेलेल्या रक्तावर अर्भकपोसते आणि त्याचे रूपांतर प्रौढात होते. गोचिडाचा पोषण कालावधी हाजातीनुसार आणि अर्भकाच्या अवस्थेनुसार ठरतो. उदा., पृषत ज्वर गोचीड (स्पॉटेड फिवर टिक) नावाच्या गोचिडाला प्रौढावस्था प्राप्त होण्यासाठीसाधारण दोन वर्षे लागतात. पूर्ण वाढ झालेल्या गोचिड्या अन्नाशिवाय बरीचवर्षे जगतात. तसेच काही डिंभ अन्नाशिवाय बरेच महिने जगल्याचेही आढळून आलेआहे.
माणसांना आणि पाळीव प्राण्यांना त्रासदायक ठरणारी गोचिडे बहुतांशी टणक गोचिडे आहेत.डरमॅसेंटर व्हेन्यूस्टसही जाती माणसाच्या ‘रॉकी माउंट ठिपके’ ज्वराची वाहक आहे.डरमॅसेंटर रेटिक्यूलेटसया जातीमुळे कुत्र्यांमध्ये पीतज्वराचे संक्रमण होते. असाच रोग दक्षिण आफ्रिकेतहीमोफायसॅलिस लिचीया जातीच्या चाव्यामुळे होतो. मॉरगॅरोपस अॅन्यूलेटस ही जाती जनावरांच्यारक्तमूत्र रोगाच्या जंतूंची वाहक आहे. दक्षिण कर्नाटकात ‘कॅसनूर फॉरेस्टडिसीज’ या प्राणघातक आजाराचे विषाणू माकडांवरील गोचिडे माणसामध्ये नेतहोती. काही टणक गोचिडांच्या चावण्यामुळे ‘गोचीड पक्षाघात’ होतो. गोचिडेकाढून टाकताच हा रोग बरा होतो.ऑर्निथोडोरस ट्युरिकेटाही गोचीड स्पायरोकिटी या जंतूंची वाहक असून त्यामुळे मानवाला ‘पुनरावर्ती’ ज्वर होतो.अर्गस मिनिएटसही जाती स्पायरोकिटी या जंतूंची वाहक असून त्यामुळे कोंबड्यांनास्पायरिलोसिस रोग होतो. कीटकनाशके वापरून गोचिडांचे नियंत्रण करता येते.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
ऊ
समतापी प्राण्यांवर आढळणारा संधिपादसंघातील परजीवी कीटक. माणसाच्या डोक्यात आढळणारी ऊ ही पेडिक्यूलिडी कुलातीलकीटक असून तिचे शास्त्रीय नावपेडिक्यूलस ह्यूमॅनस कॅपिटीसअसे आहे. कीटक वर्गात उवांचा समावेश होत असला तरी त्यांना पंख नसतात.
या कीटकाची लांबी १.५-३.५ मिमी., आकारचपटा व रंग मळकट पांढरा असतो. डोके लहान असून त्यावर संयुक्त नेत्र, शृंगिका आणि मुखांगे असतात. उदर नऊ खंडांचे बनलेले असते. पायाच्या तीनजोड्या असून प्रत्येक पायास शेवटी आकड्यासारख्या नख्या असल्याने डोक्याच्यात्वचेला ऊ घट्ट पकडून ठेवते. सुईसारख्या मुखांगांनी ऊ आश्रयीचे (ज्यावर तीजगते त्याचे) रक्त शोषते. मुखांगाचे टोचणे क्लेषकारक व तापदायक असते.उवांची अंडी लांबट पांढरी असून डोक्यावरील केसांना, चिकटून घातली जातात.याच अंड्यांना लिखा म्हणतात. ७-८ दिवसांनी लहान उवा बाहेर पडतात ; १५-१९दिवसांत त्या वाढतात व त्यानंतर १-३ दिवसांत प्रजननास योग्य होतात. यांचीपैदास फार झपाट्याने होते.
माणसाच्या अंगावर आणि जांघेत वेगळ्या प्रजातीच्या उवा आढळतात. या उवा थिरीडी कुलातील असून त्यांचे शास्त्रीय नावथिरस प्यूबिसअसे आहे. या उवांद्वारे टायफस ज्वराचा प्रसार होतो. जीवाणू आणि विषाणू यादोन्हींचे काही गुणधर्म असणारे रिकेटसिया सूक्ष्मजीव उवांमध्ये असतात. केवळचावल्यामुळे नाही तर कातडीस चिरटलेल्या उवा अगर त्यांची विष्ठा लागूनहीज्वराचा प्रसार होतो. गर्दी, अस्वच्छता, कपडे, पांघरुणे, कंगवे यांद्वारेउवांचा प्रसार झपाट्याने होतो. तो रोखण्यासाठी स्वच्छता, कीटकनाशकद्रव्यांचा वापर इ. प्रतिबंधक उपाय योजतात.
माणसांप्रमाणे शेळ्या, घोडे, कुत्रे, डुकरे, उंदीर, खारी, हत्ती यांवर, तसेच सील, वॉलरस इ. सागरी सस्तनप्राण्यांवरही उवा आढळतात. काही प्रकारच्या उवा पक्षी आणि मासे यांवरहीआढळतात. सस्तन प्राण्यांवरील उवा सायफन्क्युलेटा (अॅनोप्ल्यूरा) गणात आणिपक्ष्यांवरील उवा मॅलोफॅगा गणात मोडतात.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
गर्भ विज्ञान
बहुपेशीय सजीवांच्या प्रारंभिक अवस्थेतीलविकास आणि वाढ यांचा अभ्यास गर्भविज्ञान किंवा भ्रूणविज्ञान या शाखेत केलाजातो. सामान्यपणे ही शाखा प्राणिशास्त्राशी संबंधित असल्याचे मानले जाते.मात्र, वनस्पतींबाबतही ही संकल्पना वरील अर्थानेच वापरतात. प्राणी किंवावनस्पतींमध्ये जोपर्यंत आवश्यक ऊती आणि अवयव विकसित होत नाहीत तोपर्यंतत्यांच्या प्रारंभिक अवस्थेला गर्भ किंवा भ्रूण संबोधले जाते. व्यापकदृष्टीने, अंडपेशीच्या फलनापासून अर्भकात वाढ होईपर्यंत सर्व प्रक्रियांचासमावेश गर्भविज्ञानात होतो.
विदरणानंतर विभाजित होणार्यापेशीकंदाचे (मोरूलाचे) रूपांतर पोकळ कोरकगोलात (ब्लास्टुलात) होते वत्याच्या एका टोकाला छिद्र पडते. द्विपार्श्व सममित प्राण्यांमध्येकोरकगोलाचा विकास दोनपैकी एका प्रकारे घडून येतो. विकास होण्याच्यानिकषानुसार अखंड प्राणिसृष्टी दोन अर्ध्या भागांत विभागली गेली आहे. कीटक, कृमी, मृदुकाय अशा अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये कोरकगोलाच्या पहिल्याछिद्रापासून तोंड तयार होते, तर पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये कोरकगोलाच्यापहिल्या छिद्रापासून गुदद्वार तयार होते. दरम्यानच्या काळात कोरकगोलाचेरूपांतर होऊन आद्यभ्रूण (गॅस्ट्रूला) तयार होते.
आद्यभ्रूणापासून पेशींचे तीन वेगवेगळेस्तर तयार होतात आणि त्यापासून इंद्रिये व ऊती तयार होतात. आतला स्तरम्हणजे अंत्यत्वचेपासून पचनेंद्रिये, फुप्फुसे आणि मूत्राशय तयार होतात.मधला स्तर म्हणजे मध्यजनक स्तरापासून स्नायू, सांगाडा आणि रक्ताभिसरणसंस्था विकसित होते. बाहेरील स्तर म्हणजे बाह्यस्तरापासून चेतासंस्था आणित्वचा निर्माण होते.
गर्भविज्ञानाच्या शाखेत वर्णनात्मकगर्भविज्ञान आणि प्रायोगिक गर्भविज्ञान समाविष्ट आहे. वर्णनात्मकगर्भविज्ञानात गर्भावधीत इंद्रियाची वाढ होत असताना ती कोणत्या क्रमानेहोते ते पाहिले जाते. या माहितीमुळे प्रौढातील इंद्रियांची संरचना आणि रचनासमजते. सतराव्या शतकात गर्भविज्ञानाचा अभ्यास निरीक्षणांमधून केला जाऊलागला. या क्षेत्रात गर्भाच्या ऊतीतील बदलांचा क्रम आणि गर्भाच्या सामान्यरूपाचा अभ्यास केला जाऊ लागला. यासंदर्भात जसजशी माहिती जमा होऊ लागलीतसतसे वेगवेगळ्या भ्रूणांचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. पृष्ठवंशी प्राणीत्यांच्या प्रारंभिक अवस्थेत जवळपास सारखेच दिसतात, हे तौलनिक अभ्यासातूनलक्षात आले. एकोणिसाव्या शतकात भ्रूणांचा तौलनिक अभ्यासाला विशेष महत्त्वआले. याचे कारण चार्ल्स डार्विन आणि एर्न्स्ट हेकेल यांनी ‘सजीवांच्याउत्क्रांतीचा इतिहास त्यांच्या भ्रूणांचा विकास होत असताना समजतो’ असे मतमांडले. ही कल्पना तेव्हा अमान्य झाल्यामुळे गर्भविज्ञानाच्या अभ्यासातअडथळा आला.
विसाव्या शतकात भ्रूणाच्या विकासातीलप्रक्रियांचे नीट आकलन होण्यासाठी या प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप करण्याससंशोधकांनी सुरुवात केली. तेव्हापासून प्रायोगिक गर्भविज्ञान उदयास आले असेम्हणता येईल. वर्णनात्मक गर्भविज्ञानाबरोबर प्रायोगिक गर्भविज्ञानदेखीलमहत्त्वाचे आहे. गर्भाचा विकास होत असताना जे बदल घडून येतात ते स्वायत्तकी अनुकूलित असतात, अशाही प्रश्नांचा अभ्यास या शाखेत केला जातो. प्रायोगिकगर्भविज्ञानातील प्रात्यक्षिके मनुष्यासारखा भ्रूणाचा विकास असलेल्याकोंबडी आणि उंदीर यांसारख्या प्राण्यांवर केली जातात. या अभ्यासात एवढीप्रगती झाली आहे की, गर्भविज्ञानाचा अभ्यास आता रेणवीय पातळीवर केला जातआहे. रेणवीय विविधतेमुळे सजीवांमध्ये कोणता फरक असतो आणि भ्रूणाच्याविकासाची दिशा व नियंत्रण यांमध्ये वेगवेगळे जीवरासायनिक पदार्थ कोणतीभूमिका बजावतात, यांसंबंधी संशोधन चालू आहे.
सजीवांचे वर्गीकरण, उत्क्रांती, शरीरशास्त्र इ. क्षेत्रांत गर्भविज्ञानाचा अभ्यास अतिशय मोलाचा ठरत आहे. याअभ्यासातून आधुनिक काळात गर्भविज्ञानातील संशोधनाचा उपयोगवैद्यकशास्त्राच्या दृष्टीने मोलाचा ठरत आहे. केवळ एका पेशीपासून (फलितअंडपेशीपासून) वेगवेगळे अवयव किंवा ऊती कशा तयार होतात किंवा त्याचीकार्यक्षमता कशी विकसित होते, याची माहिती मिळते. अर्भक मातेशी ज्याद्वारेजुळलेला असतो असे वार, नाळ व गर्भपटल कसे विकसित होतात, हेही या अभ्यासातूनसमजते. त्यामुळे प्रसूतिविद्या आणि प्रसवपूर्व निदान करण्यास त्याचा उपयोगहोतो. गर्भाची वाढ, विकास किंवा विभेदन नीट न झाल्यास विशिष्ट विकृती कशानिर्माण होतात, हेही स्पष्ट होते. कर्करोगावरील संशोधनासाठी गर्भविज्ञानाचाअभ्यास पूरक ठरतो, कारण प्रारंभिक किंवा भ्रूण अवस्थेतील अनेक लक्षणेकर्कजन्य पेशींमध्ये दिसून आलेली आहेत.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
हा रोग क्लॉस्ट्रीडियम परफ्रिजन्स नावाच्या जिवाणूंमुळे होतो. आंत्रविषार हा
हा रोग बॅन्सिलस ऍन्ट्रॉसिस या जिवाणूंमुळे होतो. शेळ्यांमधील हा अतिशय घातक रोग आहे.
लक्षणे : यामध्ये शेळी एकाएकी चक्कर येऊन गोल फिरून जमिनीवर पडते.
करताना सकस चारा, गाभण शेळ्यांची - करडांची काळजी घ्यावी.
आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण
होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.
साधारणपणे शेळ्यांना ...........दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक
किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला
आवश्यक आहे. यामध्ये मुख्यतः शेवरी,
बोर, बाभूळ, आंबा, चिंच, तुती, केळीच्या पानांचा समावेश होतो. त्याचबरोबर
गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या
बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता असते. शेळ्यांचे ऊन - पावसापासून
संरक्षण करता येईल, अशा पद्धतीने गोठा बांधावा.
शेळ्यांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत. मल-मूत्राची रोजच्या रोज विल्हेवाट लावावी.
गोठ्यात स्वच्छ पाणी उपलब्ध
असावे. गोठ्यात हवा खेळती असावी. ............मुक्त गोठा पद्धतीने शेळीपालनात
शेळ्या दिवसभर चरण्यासाठी
सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही; मात्र बंदिस्त
शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक
नियोजन करणे आवश्यक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ.
एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी.
त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा,
उडदाच्या भुश्श्याचा वापर करावा.
शेळ्यांची जोपासना
1) गाभण शेळीची जोपासना -
गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी. तिला ओला व सुका चारा
आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी. शेवटच्या
दोन - तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण
आहार द्यावा. शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्यक असते.
2) दुभत्या शेळीची जोपासना
दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त
ऊर्जेची आवश्यकता भासते. म्हणून त्यांना ओल्या व सुक्या चाऱ्यासोबतच
100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा.
चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.
3) करडांची जोपासना -
करडाच्या जन्मानंतर शेळी त्या पिल्लाला चाटू लागते; मात्र असे न घडल्यास
कपड्याने करडास स्वच्छ पुसून घ्यावे. नाका-तोंडातील चिकट द्रव स्वच्छ करून
घ्यावा. नाळ स्वच्छ ब्लेडने कापून टिंक्चर आयोडीन लावावे. करडास
एक - दोन तासांतच शेळीचा चीक पाजावा. करडाने नैसर्गिकरीत्या चीक
न प्यायल्यास त्याला तो काढून पाजावा. दोन - तीन आठवड्यांनंतर
त्याला कोवळा पाला द्यावा. पहिले तीन - चार महिने दूध पाजावे. त्यानंतर
मात्र त्याला शेळीपासून तोडून चरण्यास सोडावे.
4) पैदाशीच्या बोकडाची जोपासना
पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची
निवड करावी. निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे,
तो मारका नसावा. अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा,
खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक
कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे
व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यता असते.
रोगाचे व लसीचे नाव |
लसीकरणाची वेळ |
लसीची मात्रा |
१) आंत्रविषार |
पावसाळयापूर्वी (एप्रिल,मे) दुसरी मात्रा १४ दिवसांनी | २.५ मि.ली. |
२) घटसर्प | मे - जून | २.५ मि.ली. |
3) लाळ्या खुरकत |
एप्रिल - सप्टेंबर | 3 मि.ली. |
४) फाशी |
मार्च, एप्रिल
(रोग प्रादुर्भाव आढळलेस)
|
०.५ मि.ली. |
५) देवी | डिसेंबर | ५ मि.ली. |
करा लसीकरण होईल जनावरांचे प्राणसंरक्षण
लसीकरण कशासाठी ?
१) गाई, म्हशी,व शेळ्या, मेंढया हे पाळीव प्राणी घटसर्प, फ-या, फाशी व
आंत्रविषार या साथिच्या रोगांमुळे तडका फडकी मरतात. या रोगाची लागण
झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ
मिळत नाही. परिणामी मौल्यवान जनावरे दगावल्याने पशुपालकाचे फार
मोठे नुकसान होते.
२) लाळ्या खुरकूत रोगामुळे सहसा मृत्यु मुखी पडत नाहीत. परंतु या
रोगामुळे विशेषतः संकरित गाई व म्हशी अनुत्पादन होतात किंवा त्याची
क्षमता घटते. पर्यायाने पशुपालकास फर
मोठा आर्थिक फटका बसतो.
लसीकरणापुर्वी हे करा ! :
१) कोणत्याही जनावरास लसीकरण करण्याच्या १ आठवड्या
अगोदर अंतररजिविंच्या नायनाटासाठी जंतनाशक औषध देवून घ्यावीत.
२) जनावरांचे शरिरावरिल बाह्य परोपजिविंचा ( उदा. गोचिड, गोमाशा, उवा, पिसवा)
नायनाट करण्याकरिता जनावरांसाठी वापरल्या जाणा-या किटकनाशक
औषधांची फवारणी करुन घ्यावी.
लसीकरण करतांना ही काळजी घ्यावी :
०१) जनावराना दिली जणारी लस ही चांगल्या नामांकित कंपणीची असावी.
०२) लस खरेदी करतांना त्यावरिल औषध काल बाह्य होण्याची तारीख
पाहुन घ्यावी व त्या लसीचा बॅच नंबर नोंदवून ठेवावा.
०३) काही लसी (उदा. खुरी, श्वासदंश, धनुर्वात) औषधी दुकानातुन
आनत असतांना ‘थर्मासमध्ये’ किंवा कॅरीबॅगमध्ये बर्फावर ठेऊन आणाव्यात
व जनावरास देई पर्यंत बर्फातच ठेवाव्यात,
बाहेर काढुन ठेवु नयेत.
०४) घरी लस आणल्यानंतर फ्रिज असेल तर लस फ्रिजमध्ये (वरचा म्हणजे बर्फाचा कप्पा सोडुन)
ठेवावी किंवा लस बजारातुन आणल्या बरोबर लगेच वापरुन टाकावी.
०५) लसीकरण हे निरोगी जनावरांनाच करावे.
०६) लसीकरण शक्यतो दिवसातील थंड वेळेत म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी करावे.
०७) लसीकरण करतांना लसीकरणाची सुई प्रत्येक वेळी पाण्यात उकळून निर्जतूक करून घ्यावी.
०८) फोडलेल्या बाटलीतील लस तशीच साठवून पुन्हा वापरू नये.
०९) लस योग्य जागेत व योग्य मार्गाद्वारे द्यावी.
१०) शक्यतो एकाच दिवशी एका गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.
लसीकरणानंतर ही दक्षता घ्या !
१) बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे जेणे करून
शरीरावर ताण पडणार नाही.
२) उत्तम रोगप्रतिकारक शक्ति निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा.
३) लसीकरणानंतर जनावरांचे अतिउष्ण व अतिथंड
वातावरणापासून संरक्षण करावे. तसेच त्यांची लांबवर वाहतूक टाळावी.
४) लसीकरणानंतर ताप अथवा प्रतिक्रिया काही अपाय घडू शकतात,
मात्र ते तात्कालीन व सौम्य स्वरूपाचे असतात.
लसीकरणा विषयीच्या शंका व त्याचे निरसन
१)लसीकरण केल्यास गाठी येतात का ?
‘घटसर्प’ व ‘फ-या‘ रोगाची लस दिल्या नंतर काही जनावरांच्या
मानेवर गाठी येतात हे खरे, पंरतू गाठ येते म्हणून लसीकरण
टाळणे अत्यंत चुकिचे आहे. गाठीमुळे प्राण्यांचा जीव धोक्यात येत नाही.
तसेच आता अनेक पशुपालकांना लसीची गाठ येते हे माहीत झाल्याने
ते बाजारात जनावरांची खरेदी- विक्री करतांना गाठीस दोष अथवा बट्टा
मानत नाही.लस दिल्यानंतर त्या जागेवर हलके चोळल्यास गाठ येण्याचे
प्रमाण कमी होते. तसेच आलेल्या गाठीस कोमट पाण्याने शेकले तर गाठ जिरून जाते.
२)लसीकरणामुळे जनावरे गाभडतात का ?
नाही, मात्र काही अशक्त जनावरात अगदी क्वचित म्हणजे १० हजारात
एखाद्या जनावरांत असा प्रकार घडू शकतो. तोही लस दिल्यानेच
होतो असे नाही. परंतू जनावरांच्या जिविताचा विचार करता सर्व
गाभण जनावरांना लस देऊन घेणे उत्तम विशषत: आंत्रविषार व
धनूर्वाताची लस ही गाभण शेळ्या मेंढ्यास दिल्याने विण्याच्या
सुमारास त्यांना व नविन करडांना हे आजार होत नाहीत. कारण
नवजात पिल्लांना चिकाद्वारे रोग प्रतिकारक शक्ति मिळते.
( अपवादानेही गाभण मेंढ्यांना देवी रोगाची लस देऊ नये )
३)लसीकरणानंतर दूध कमी होते का ?
लसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा लस दिल्यानंतर
काही वेळेस येणारा हलकासा ताप यामुळे दूध कमी होवू शकते,
परंतू ते तात्कालीन असते.
४)रोगांची साथ आल्यानंतर लसीकरण केले तर फायदा होतो का ?
जनावरांना रोग होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण
करावे कारण लसीकरणामुळे रोग प्रतिकारक शक्ति येण्यास दोन
ते तीन आठवडे लागतात. त्यामुळे रोगाची साथ येण्या आधीच
जमावरे रोग प्रतिकारक बनतात. रोगाची साथ आल्यानंतर केलेल्या
लसीकरणांचा फारसा उपयोग होत नाही.
५)लसीकरण कुठल्या वयाच्या जनावरात करावे ?
घटसर्प व फ-या रोगांची लसीकरण सहा महिण्याच्या वासरात
व त्यापेक्षा मोठ्या जनावरात करावे. लाळ्या खुरकूत रोगाची लस
जर वासराच्या आईला दिली नसेल तर सहा ते आठ आठवडे
वयाच्या वासरात व त्यापुढील जनावरांना लस द्यावी. आंत्रविषारी
लस पिलाच्या आईला दिली नसेल तर ती पिलांना पहिल्या
आठवड्यात द्यावी व दिली असेल तर चार ते सहा आठवडे वय झाल्यानंतर द्यावी.
६)लसीकरण करूनही रोग होऊ शकतो का ?
नियमित लसीकरण केल्या नंतर घटसर्प, फ-या ई. रोग
सहसा होत नाहीत. परंतू लाळ्या खुरकूत हा रोग लसीकरणानंतरही
एखाद्या वेळी होवू शकतो. कारण या रोगाच्या विषाणूंच्या मुख्य ७ शिवाय
६० पेक्षा अधिक उपजाती समाविष्ट केलेल्या असतात. या शिवाय इतर
उपजातीच्या विषाणूंचा प्रादुर्भाव जनावरांना झाल्यास लाळ्या खुरकूत रोग होतो.
७)लसीकरण दिल्यावरही रोग होण्याची कारणे कोणती ?
लसीची मात्रा योग्य प्रमाणात दिली न जाणे. लसाची साठवणूक योग्य
पध्दतीने ( थंड जागेत ) केलेली नसणे. लसीकरणात अनियमितता असणे.
लसीची मुदत संपल्यावर किंवा उरलेली लस वापरणे. जनावरांत अंतर व
बाह्य परोपजीवींचा प्रादुर्भाव असणे. लस देते वेळी जनावर अशक्त किंवा आजारी असणे.
शेळी दीड वर्षातून दोनदा विते. शेळी शक्यतो दोन-तीन करडांना एका वेळी
जन्म देते. ही करडे सहा महिन्यांत विक्रीस तयार होतात. शेळ्यांपासून
दुधाची गरजही भागविली जाते. एखाद्या संसर्गजन्य रोगाने शेळ्या मेल्या
तर आर्थिक नुकसान होते. शेळ्यांचे रोगापासून संरक्षण होण्यासाठी जिवाणूजन्य
रोगाची माहिती असणे आवश्यक आहे.
आंत्रविषार
आंत्रविषार
हा रोग क्लॉस्ट्रीडियम परफ्रिजन्स नावाच्या जिवाणूंमुळे होतो. आंत्रविषार हा
रोग पावसाळ्यात खूप आढळतो. कारण उन्हाळ्यात शेळ्यांची उपासमार
झालेली असते आणि पावसाळ्यात जेव्हा हिरवा चारा येतो तेव्हा शेळ्या
खूप चारा खातात. पोट गच्च भरल्यामुळे पोटात थोडीही जागा शिल्लक राहत नाही.
त्यामुळे पोटातील वातावरण ऑक्सिजन विरहित होऊन हे जिवाणू वाढतात आणि
विष तयार होते. तयार झालेले विष आतड्याद्वारे शोषले जाऊन शेळ्यांना विषबाधा
होते व शेळ्या मृत्युमुखी पडतात.
रोगाची लक्षणे : या रोगाची लक्षणे खूप कमी कालावधीसाठीच दिसतात. हा रोग
रोगाची लक्षणे : या रोगाची लक्षणे खूप कमी कालावधीसाठीच दिसतात. हा रोग
शेळ्यांपेक्षा करडांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो व त्याच्याच मरतुकीचे प्रमाण
जास्त असते. संध्याकाळी शेळ्या/ करडे चरून आल्यानंतर त्यांना चक्कर
आल्यासारखे दिसते आणि त्या गोल फिरून
पडतात व पाय झाडत प्राण सोडतात.
फारसा तापही दिसत नाही. दीर्घकाल परंतु कमी प्रमाणात विषबाधा झाल्यास
शेळ्यांमध्ये आणि करडांमध्ये हगवण आढळून येते.
औषधोपचार : या रोगाची लक्षणे किंवा विषबाधा झाल्यानंतर उपचाराचा फारसा
औषधोपचार : या रोगाची लक्षणे किंवा विषबाधा झाल्यानंतर उपचाराचा फारसा
उपयोग होत नाही. जास्त प्रमाणात शिरेवाटे ग्लुकोज दिल्यास शेळी/करडू
वाचण्याची शक्यता असते. पशुवैद्याच्या सल्ल्याने प्रतिजैविक आणि एखादे लिव्हर टॉनिक घ्यावे.
शवविच्छेदन परीक्षण : मेलेल्या शेळीचे शवविच्छेदन केल्यास शेळीची/करडांची
शवविच्छेदन परीक्षण : मेलेल्या शेळीचे शवविच्छेदन केल्यास शेळीची/करडांची
आतडी रक्ताळलेली किंवा लालसर दिसतात. मूत्रपिंड थोडेसे मोठे झालेले आढळते.
मूत्रपिंड बिलबिलीत व लाल
झालेले आढळते. लाल झालेली आतडी न उघडता दोन्ही बाजूंनी दोरीने घट्ट बांधून
(सहा-आठ इंच) इतका लांबीचा तुकडा
एका रिकाम्या बाटलीत टाकून, ती बाटली बर्फावर ठेवून चार तासांच्या आत
प्रयोगशाळेत पाठवल्यास रोगनिदान करता येते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना : या रोगावर लस उपलब्ध आहे. पशुवैद्याच्या
प्रतिबंधात्मक उपाययोजना : या रोगावर लस उपलब्ध आहे. पशुवैद्याच्या
सल्ल्याने लसीकरणाच्या दोन मात्रा वर्षातून दोन वेळा घ्याव्यात. शेळ्यांना आणि
करडांना नवीन आलेले ताजे गवत,
पाला इ. भरपूर प्रमाणात खाऊ देऊ नये. चारा किंचित सुकलेला असाच घ्यावा.
सांसर्गिक फुफ्फुसदाह (सीसीपीपी) : हा रोग मायकोप्लासमा या जिवाणूंमुळे होतो.
सांसर्गिक फुफ्फुसदाह (सीसीपीपी) : हा रोग मायकोप्लासमा या जिवाणूंमुळे होतो.
हा रोग ज्या प्रदेशात जास्त पाऊस, कोंदट दमट हवामान असते अशा प्रदेशात
जास्त प्रमाणात आढळतो.
निकृष्ट गोठा व्यवस्थापन, (उदा. गोठ्यात घाण असणे, पिण्याचे स्वच्छ पाणी
नसणे इ.) शेळ्याही रोगप्रतिकारशक्ती
कमी असणे, सकस आहाराची कमतरता, अशक्तपणा तसेच वातावरणात
कडाक्याची थंडी आणि जास्त आर्द्रता व शेळ्यांना
जंताचा प्रादुर्भाव असेल तर शेळ्यांना सांसर्गिक फुफ्फुस गृहाची लागण फार लवकर होते.
लक्षणे : फुफ्फुसाचा दाह होतो, शेळी खात नाही, अशक्त बनते, सारखा
लक्षणे : फुफ्फुसाचा दाह होतो, शेळी खात नाही, अशक्त बनते, सारखा
खोकला येतो. श्वासोच्छ्वास घेताना त्रास होतो. रोगाच्या सुरवातीस शेळीच्या/
करडाच्या नाकातून पाणी येते. नंतर ते घट्ट
होऊन नाकास शेंबूड येतो. बऱ्याच शेळ्यांना, करडांना हगवण लागते.
शेळ्यांत आणि करडांत लक्षणीय मर दिसते.
प्रतिबंधात्मक उपाययोजना : थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उष्णता
प्रतिबंधात्मक उपाययोजना : थंडीपासून संरक्षण करण्यासाठी उष्णता
द्यावी त्यासाठी २०० वॉटचे बल्ब लावावेत. शेळ्यांना, करडांना सकस
आहार द्यावा. शेळ्यांचे, करडांचे उत्तम
व्यवस्थापन करावे. शेळ्यांच्या वयोमानानुसार पशुवैद्याच्या सल्ल्याने
शेळ्यांचे आणि करडांचे जंतनिर्मुलन करावे.
योग्य वेळी पशुवैद्यकाची मदत घेऊन कळपाचे आरोग्य राखावे.
घटसर्प :
हा रोग "पाश्चुरेल्ला मल्टोसीडा' या जिवाणूंमुळे होतो. निकृष्ट व्यवस्थापन
घटसर्प :
हा रोग "पाश्चुरेल्ला मल्टोसीडा' या जिवाणूंमुळे होतो. निकृष्ट व्यवस्थापन
हवामानातील बदल, इतर आजार, प्रवासाचा ताण, परजीवी जंत,
बाह्यपरोपजीवींचा प्रादुर्भाव, ऊन, पाऊस, थंडी इ. गोष्टींचा
ताण पडला की या रोगांच्या जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. हा श्वसन संस्थेचा आजार आहे.
लक्षणे : शेळ्यांना खूप ताप येतो. खाण्यापिण्यावर लक्ष नसते, रवंथ करणे थांबविते.
लक्षणे : शेळ्यांना खूप ताप येतो. खाण्यापिण्यावर लक्ष नसते, रवंथ करणे थांबविते.
नाकातून पाणी गळते, घशातून घरघर असा आवाज येतो व श्वसनास खूप त्रास होतो.
उपचार : या रोगावर तातडीने उपचार केला गेला नाही तर शेळी दगावण्याची
उपचार : या रोगावर तातडीने उपचार केला गेला नाही तर शेळी दगावण्याची
दाट शक्यता असते. वरील लक्षणे दिसताच पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार
प्रतिजैविकाचा वापर करावा.
प्रतिबंधात्मक उपाय : पावसाळ्याच्या आधी मार्च, एप्रिल महिन्यात शेळ्यांना
प्रतिबंधात्मक उपाय : पावसाळ्याच्या आधी मार्च, एप्रिल महिन्यात शेळ्यांना
लसीकरण करून घ्यावे.
फाशी किंवा काळपुळी :
फाशी किंवा काळपुळी :
हा रोग बॅन्सिलस ऍन्ट्रॉसिस या जिवाणूंमुळे होतो. शेळ्यांमधील हा अतिशय घातक रोग आहे.
लक्षणे : यामध्ये शेळी एकाएकी चक्कर येऊन गोल फिरून जमिनीवर पडते.
लाथा झाडून गतप्राण होते. बहुतेक वेळा शेळी कोणतेही लक्षण न दर्शविता मरते.
मेल्यानंतर शेळीच्या नाकातून, तोंडातून, कानांतून,
गुदद्वारामार्गे काळसर न गोठलेले रक्त वाहत असते.
प्रतिबंधात्मक उपाय : ज्या प्रदेशात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल
प्रतिबंधात्मक उपाय : ज्या प्रदेशात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल
व वारंवार दिसत असेल अशा भागामध्ये "ऍन्ट्राक्स स्पोर व्हॅक्सीन' वापरून
लसीकरण करता येते. अशा प्रकारचे लसीकरण पशुवैद्यक तज्ज्ञांच्या साह्याने करावे.
या रोगाने मेलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करू नये. तसेच मेलेल्या शेळ्यांना
या रोगाने मेलेल्या जनावरांचे शवविच्छेदन करू नये. तसेच मेलेल्या शेळ्यांना
उघड्यावर न टाकता खोल खड्डा करून जमिनीत पुरावे. अथवा जाळावे
पीपीआरची लस :
* पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांना आजार होऊ नये म्हणून लसीकरण करतात.
श्वसनाबरोबर बुळकांडी सदृश्य घातक आजार होऊ नये, म्हणून दर तीन वर्षांनी
श्वसनाबरोबर बुळकांडी सदृश्य घातक आजार होऊ नये, म्हणून दर तीन वर्षांनी
पी पी आर ची लस दिली जाते.
लाळ्या खुरकूत :
हा एक झपाट्याने वाढणारा संसर्गजन्य रोग आहे. याचा प्रसार हवा, पाणी व
रोगी प्राण्याच्या संपर्कात आलेला चारा यामुळे होतो. यामध्ये शेळ्यांची भूक
मंदावून त्या अशक्त बनतात. दुभत्या शेळ्यांचे दूध कमी होते, खूप ताप येतो
व तोंडातून स्राव वाहतो. तोंडात पांढऱ्या रंगाचे फोड येतात, खुरांतही फोड येऊन
जखमा होतात, त्यामुळे खाणे आणि चालणे अशक्य होते. शेळ्या दगावण्याचीही शक्यता असते.
धनुर्वात :
या रोगामुळे शेळ्यांचे स्नायू ताठरतात, सर्वांगाला कंप सुटतो, शेळ्यांना
चालताना त्रास होतो. त्यासाठी वेळेवर लसीकरण, वैद्यकीय सल्ला व निदान करून घ्यावे.
फऱ्या :
हा रोग तीव्रपणे पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. या रोगामध्ये खूप ताप येतो,
पाय व सांधे यांना सूज येते, या सुजेवर दाबले असता दुखते व गरम लागते.
या रोगामुळे जनावरास नीट चालवतही नाही, त्यामुळे ते लंगडते, म्हणूनच
या रोगास "एकटांग्या' असेही म्हणतात.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
दुर्लक्ष नको शेळ्यांच्या आरोग्याकडे...
शेळ्यांचे कमी खर्चात चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करता येते. शेळी व्यवस्थापनकरताना सकस चारा, गाभण शेळ्यांची - करडांची काळजी घ्यावी.
आरोग्याच्यादृष्टीने वेळच्या वेळी लसीकरण केल्यास संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण
होऊन अपेक्षित फायदा शेळीपालकाला मिळू शकतो.
साधारणपणे शेळ्यांना ...........दररोज तीन ते चार किलो हिरवा चारा व एक
किलो वाळलेला चारा लागतो. त्याचप्रमाणे शेळ्यांच्या खाद्यामध्ये झाडपाला
आवश्यक आहे. यामध्ये मुख्यतः शेवरी,
बोर, बाभूळ, आंबा, चिंच, तुती, केळीच्या पानांचा समावेश होतो. त्याचबरोबर
गाभण शेळी, दूध देणारी शेळी, पैदाशीच्या
बोकडासाठी पूरक आहाराची आवश्यकता असते. शेळ्यांचे ऊन - पावसापासून
संरक्षण करता येईल, अशा पद्धतीने गोठा बांधावा.
शेळ्यांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत. मल-मूत्राची रोजच्या रोज विल्हेवाट लावावी.
गोठ्यात स्वच्छ पाणी उपलब्ध
असावे. गोठ्यात हवा खेळती असावी. ............मुक्त गोठा पद्धतीने शेळीपालनात
शेळ्या दिवसभर चरण्यासाठी
सोडल्यामुळे अतिरिक्त आहाराची तितकीशी आवश्यकता भासत नाही; मात्र बंदिस्त
शेळीपालनासाठी चाऱ्याचे वार्षिक
नियोजन करणे आवश्यक आहे. कडवळ, गजराज, बरसीम, लसूणघास, मका इ.
एकदल व द्विदल पिकांची लागवड करावी.
त्याचप्रमाणे वाळलेल्या चाऱ्याकरिता कडबा, गहू, सोयाबीन, तांदळाचा कोंडा,
उडदाच्या भुश्श्याचा वापर करावा.
शेळ्यांची जोपासना
1) गाभण शेळीची जोपासना -
गाभण शेळीची व्यवस्था स्वतंत्ररीत्या करावी. तिला ओला व सुका चारा
आणि मुबलक स्वच्छ पाणी यांची योग्य प्रमाणात व्यवस्था करावी. शेवटच्या
दोन - तीन महिन्यांत 200 ते 250 ग्रॅम पोषण
आहार द्यावा. शेळी नैसर्गिकपणे विते; मात्र काही घटनांमध्ये वैद्यकीय मदत आवश्यक असते.
2) दुभत्या शेळीची जोपासना
दुभत्या शेळ्यांना शारीरिक गरजेसाठी लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा अतिरिक्त
ऊर्जेची आवश्यकता भासते. म्हणून त्यांना ओल्या व सुक्या चाऱ्यासोबतच
100 ग्रॅम खुराक प्रति लिटर दुधामागे जास्त द्यावा.
चारा देताना त्यामध्ये योग्य प्रमाणात मीठ व खनिजद्रव्ये मिसळून द्यावीत.
3) करडांची जोपासना -
करडाच्या जन्मानंतर शेळी त्या पिल्लाला चाटू लागते; मात्र असे न घडल्यास
कपड्याने करडास स्वच्छ पुसून घ्यावे. नाका-तोंडातील चिकट द्रव स्वच्छ करून
घ्यावा. नाळ स्वच्छ ब्लेडने कापून टिंक्चर आयोडीन लावावे. करडास
एक - दोन तासांतच शेळीचा चीक पाजावा. करडाने नैसर्गिकरीत्या चीक
न प्यायल्यास त्याला तो काढून पाजावा. दोन - तीन आठवड्यांनंतर
त्याला कोवळा पाला द्यावा. पहिले तीन - चार महिने दूध पाजावे. त्यानंतर
मात्र त्याला शेळीपासून तोडून चरण्यास सोडावे.
4) पैदाशीच्या बोकडाची जोपासना
पैदाशीकरिता योग्य शारीरिक व वांशिक गुण असणाऱ्या निरोगी बोकडाची
निवड करावी. निवड करताना त्याचे वय एक वर्षापेक्षा जास्त असावे,
तो मारका नसावा. अशा बोकडास योग्य प्रमाणात हिरवा, वाळलेला चारा,
खुराक व मुबलक पाण्याची व्यवस्था करावी.
शेळी ही निसर्गतः काटक व रोगांना कमी बळी पडते; मात्र अनेक
कारणांमुळे विविध रोगांचे संक्रमण होऊन शेळीपालन व्यवसायाचे
व्यवस्थापन बिघडण्याची दाट शक्यता असते.
-------------------------------------------
विदेशी शेळ्या
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
शेळ्यांमध्ये चार भाग पडतात.
१) Dairy Goat . 2) Fiber Goat. 3) Meat Goat. 4) Pet Goat.
चालातर मग... पुढे आपण छायाचित्रांसह प्रत्येक शेळ्यांच्या भागाचे विभाग पाहू.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
1. Dairy Goat.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
a. Alpine
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
b. La Mancha
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
c. Nubian goats
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
d.Oberhasli
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
e. Saanen
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
f. Sable
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
g. Toggenburg
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
2. Fiber Goat
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
a. Angora
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
b. Cashmere
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
c. Nigora goats
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
d. Pygora goats
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
3. Meat Goat.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
a. Boer
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
b. Genemaster
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
c. Kiko
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
d. Moneymaker
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
e. Savanna
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
f. Spanish
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
g. TexMaster
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
3. Pet Goat.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
a. Kinder tend
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
b. Nigerian Dwarf
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
c. Pygmy
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
****************************************
चारा
हायड्रोपोनिक्स
तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपरिक पद्धतीने तयार
केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असतो. चाराटंचाई परिस्थितीत कमी
खर्चामध्ये हिरवा चारा निर्मितीचा हा चांगला पर्याय आहे.
- 1) हायड्रोपोनिक्स चारा तयार करण्यासाठी बांबू, तट्या, प्लॅस्टिक ट्रे, 50 टक्के क्षमतेचे शेडनेट, मिनी स्प्रिंकलर किंवा फॉगर सिस्टिम व टायमर यांची गरज असते.
- 2) या साधनसामग्रीचा वापर करून 72 स्क्वेअर फूट जागेत बसेल असा 25 फूट x 10 फूट x 10 फूट आकाराचा सांगाडा अवघ्या 15 हजार रुपये खर्चात तयार होतो.
- 3) यामध्ये प्रकाश, तापमान, आर्द्रता आणि पाण्याचे नियंत्रण करून दररोज 100 ते 125 किलो पौष्टिक हिरवा चारा तयार करता येतो.
- 4) चारा तयार करण्यासाठी मका, गहू, बाजरी, बार्ली याचा वापर केला जातो. धान्याला ई.एम.च्या द्रावणात बीजप्रक्रिया करावी लागते.
- 5) हे धान्य 12 तास भिजत ठेवून, 24 तास गोणपाटात अंधाऱ्या खोलीत ठेवावे.
- 6) त्यानंतर प्लॅस्टिक ट्रेमध्ये (3 फूट x 2 फूट x 3 इंच ) साधारणतः 1.5 ते 1.75 किलो बी पसरावे.
- 7) अशा प्रकारे प्रतिदुभत्या जनावरांना दहा ट्रे या प्रमाणे जनावरांच्या संख्येवरून ट्रेची संख्या ठरवावी.
- 8) हे प्लॅस्टिक ट्रे हायड्रोपोनिक चारा निर्मिती गृहात सात ते आठ दिवस ठेवावेत.
- 9) एक इंची विद्युत मोटारीला लॅटरलची जोड देऊन फॉगर पद्धतीद्वारे प्रत्येक दोन तासाला पाच मिनिटे याप्रमाणे दिवसातून सात वेळा पाणी द्यावे. एका दिवसासाठी 200 लिटर पाणी लागते. ही यंत्रणा स्वयंचलित आहे. पाण्याची टाकी उंच ठिकाणी ठेवल्यास सायफन पद्धतीने विद्युत मोटारीचा वापर न हायड्रोपोनिक्स चाऱ्यास पाणी देता येते.
- 10) चाऱ्याची 7 ते 8 दिवसांत 20 ते 25 सें.मी. उंचीपर्यंत वाढ होते. साधारणपणे एक किलो गव्हापासून नऊ किलो, तर एक किलो मक्यापासून 10 किलो हिरवा चारा तयार होतो.
चारा देण्याचे प्रमाण
- भाकड जनावरे 6 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.
- दुभती जनावरे 15 किलो प्रतिदिवस प्रतिजनावर.
हायड्रोपोनिक्स चाऱ्याचे फायदे
- 1. चारा टंचाई परिस्थितीत हिरवा चारा निर्मितीचा चांगला पर्याय.
- 2. कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत, स्वस्तात हिरवा पौष्टिक चारानिर्मिती.
- 3. जनावरांना 90 टक्के चारा पचतो.
- 4. पशुखाद्याचा खर्च 40 टक्के कमी.
- 5. जनावरांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ.
- 6. दुधाच्या फॅटमध्ये वाढ. किमान अर्धा लिटरने दुधात वाढ.
- 7. जनावरांची प्रजनन क्षमता सक्षम होते.
- 8. जनावरांच्या शरीरात प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वाच्या उपलब्धतेत वाढ.
- 9. जमिनीवर चारा उत्पादन घेण्याच्या तुलनेत 5 ते 10 टक्के पाण्याची आवश्यकता आहे.
- 10. प्रथिने, जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स, फॉलिक ऍसिड, ओमेगा-3, स्निग्ध पदार्थ हरितद्रव्य मोठ्या प्रमाणात असतात.
पशुसंवर्धन विभाग
महाराष्ट्र शासन (भारत)
________________________________________________
************************************************
छान.. Satara Goat Farm, Wagholi.
उत्तर द्याहटवाउत्तम
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवामला शेळ्या घ्यच्या आहे
उत्तर द्याहटवा8329183089