बुधवार, ९ एप्रिल, २०१४

कृषी प्रक्रिया उद्योगाचे माहेरघर : नाशिक

नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात आता टोमॅटोच्या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे . भाजीपाला पिकात महत्त्वाचा घटक बनलेल्या टोमॅटोच्या लागवडीला दिवसेंदिवस चालना मिळते आहे . पण , टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याने त्याचा परिणाम शेतीवर होत आहे . म्हणून या पिकाला कृषी प्रक्रिया उद्योगाची जोड देण्यात आली आहे . खासगी सहकारी भागीदारी अर्थात पीपीपी या संकल्पनेवर आधारीत केवळ जिल्ह्यातीलच नाही तर देशातील पहिला कृषी प्रक्रिया उद्योग दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथे उभारण्यात आला आहे . या प्रकल्पात अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होण्याबरोबरच जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांना खात्रीशीर टोमॅटोची विक्री उपलब्ध झाली आहे . १३ मे २०१२ रोजी या प्रकल्पातून हापूस आंब्याचा पल्प काढण्यास सुरुवात करण्यात आली . त्यानंतर पेरुचा पल्प काढण्यात आला . आणि आता टोमॅटोची पेस्टचे उत्पादन करण्यात येत आहे . देशात प्रथमच ७५० शेतकऱ्यांबरोबर करार करुन त्यांचा शेतीमाल थेट शेतातून प्रकल्पात आणण्यात आला . प्रकल्पात पहिल्याच वर्षी सुमारे ४ हजार मेट्रीक टन उत्पादन घेण्यात आले . म्हणूनच पुढील वर्षी सुमारे दहा हजार मेट्रिक टन उत्पादन घेण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले आहे . त्यासाठी हिन्दुस्थान युनिलिव्हर कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे . त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा भारताच्या नकाशावर आला आहे . यापुढील काळात या प्रकल्पातून पपई , अननस , संत्री , लिंबू पल्पचे उत्पादन करण्याचे प्रस्तावित आहे .

अनोखा प्रयोग

शेतकरी त्यांचा शेतीमाल बाजार समितीत विक्री करण्यासाठी नेतात तेव्हा त्यावर ७ टक्के कमिशन घेतले जाते . हमाली , वाहतूक खर्च यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते . मात्र , आता शेताच्या बांधावरुनच शेतीमाल घेण्याचा ट्रेण्ड रुढ होत आहे . जिल्ह्याच्या विविध भागातील जोन हजार शेतकऱ्यांना या प्रकल्पाशी जोडण्याचे विचाराधीन आहे . त्यादृष्टीने कार्यवाही सुरु आहे . बियाणे , खते यांचा पुरवठा शेतकऱ्यांना करुन त्यांचा शेतीमाल शेतातच खरेदी करण्याचा हा प्रकार आता चांगलाच रुढ झाला आहे . त्यामुळे दिवसेंदिवस अदिकाधिक शेतकरी यात जोडले जात आहेत . स्थानिक भागातच रोजगार उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह आहे . त्यामुळे येत्या काळात शेतीचे उत्पादन वाढण्याची चिन्हे आहेत . प्रकल्पातून तयार होणारा पल्प भारतासह इटली , जर्मनी , स्पेन , नेदरलँड , इजिप्त , दुबई , आखाती देशांमध्ये विक्री केला जात आहे . या प्रकल्पाने सरकारला कर रुपाने आजवर जवळपास दीड कोटी रुपये दिले आहेत . अशा प्रकारच्या प्रकल्पांचे पायाभरणी नाशकात झाल्यास जिल्ह्याचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो .

लघु ते मोठ्या उद्योगांना संधी

किमान दहा शेतकऱ्यांचा गट एकत्र आला तरी लघु कृषी प्रक्रिया उद्योग सुरु होऊ शकतो . सहकारी तत्त्वावरही असे उद्योग सुरु होऊ शकतात . जिल्ह्यातील कृषी वाणांवर त्यामुळे प्रक्रिया करता येवू शकते . खासकरुन द्राक्ष , डाळींब , करवंद , जांभूळ , आंबा यासारखया पिकांवर प्रक्रिया करुन उत्पादित होणाऱ्या पदार्थांची देशभरात विक्री करता येवू शकते . सरकारी पातळीवरुन अशा प्रकारच्या उद्योगांना प्रोत्साहन मिळाले तर कृषी क्षेत्राचा कायापालट होऊ शकतो .

घोटीचा तांदूळ

इगतपुरी तालुक्यात भात हे मुख्य पीक आहे . यावरच शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन व उदरनिर्वाह चालतो . भाताच्या साळीवर प्रक्रिया करून त्यापासून तांदळाची निर्मिती करणाऱ्या भात गिरण्या उभ्या राहिल्या . या भात गिरण्यांची जागा हळूहळू तांदळाच्या मिलने घेतली . यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला . त्यामुळेच आजघडीला साधारण ३०च्या आसपास तांदूळ मिल घोटी परिसरात आहेत . येथील व्यापाऱ्याचा तांदूळ विक्री हाच मुख्य व्यवसाय आहे . घोटीतून महिन्याला शेकडो ट्रक , तर वर्षाला हजारो ट्रक तांदूळ विक्री होते . तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भात पिकवतात . हाच भात राज्यासह परराज्यातही विकला जातो . अगदी साध्या बारीक तांदळापासून तुकडा , बासमती असे नानाविध प्रकार घोटी परिसरात पिकतात आणि त्यांची विक्री होते . पूर्वी हातसडीचा तांदूळ मुबलक असायचा , आता मात्र तो शोधावा लागतो . अगदी किरकोळपासून ठोक विक्रीपर्यंत घोटी परिसरात तांदळाची प्रचंड उलाढाल होते .

घोटीचे मुरमुरे

पाच दशकांपूर्वी इगतपुरी तालुक्यात भाताचे विक्रमी उत्पादन होत असल्याने या भातावर प्रक्रिया करणाऱ्या विविध प्रकारच्या उद्योगांना चालना मिळाली आहे . तांदळापासून मुरमुरे , लाह्यांची निर्मिती हा त्याचाच एक भाग आहे . तांदळापासून बनणारा घोटीतील मुरमुरादेखील अत्यंत प्रसिद्ध आहे . त्यामुळेच घोटी मुरमुरा हा जणू ब्रँड बनला आहे . म्हणूनच तांदळापासून मुरमुरा निर्मितीचा व्यवसाय घोटीत भरभराटीस आला आहे . भातापासून आठ पोते लाह्यांचे उत्पादन एका भट्टीतून केले जाते . मुरमुरा उत्पादनाबरोबर सणासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या प्रसादाच्या लाह्यांची निर्मितीही येथे केली जाते . अत्यल्प भांडवलात पुरेसा नफा देणाऱ्या या व्यवसायाकडे अनेक जण आकर्षित झाले आहेत . मुरमुरा निर्मितीचे असंख्य लघु उद्योग घोटी परिसरात कार्यरत झाल्याचे दिसून येते . यामुळे घोटी गाव हे मुरमुऱ्यांसाठी प्रसिद्ध झाले आहे . या मुरमुऱ्यांनी स्थानिकांची भूक भागविण्याबरोबरच महाराष्ट्रासह देशातील अनेक प्रमुख देवस्थानात प्रसादाच्या रूपाने हा मुरमुरा पुजेचा मानकरी ठरला आहे . हळूहळू केवळ महाराष्ट्राच्या प्रमुख बाजार पेठेत जाणारा हा चवदार मुरमुरा त्याच्या चवदारपणामुळे आंतरराष्ट्रीय बाजार पेठेतही जाऊ लागला आहे . घोटी शहरासह इगतपुरी तालुक्यातही या मुरमुरा भट्ट्यांनी पा रोवले आहेत . बदलत्या काळात या व्यवसायाचेही यांत्रिकीकरण होणे आवश्यक आहे . तसेच मार्केटिंगची जोड त्यास लाभली तर नक्कीच हा उद्योग जिल्ह्यासह राज्याच्या विकासावरही परिणाम करणारा ठरु शकेल . या उद्योगांना प्रोत्साहन , कर्जाची उपलब्धता , थोड्या सोयी - सवलती मिळाल्यास हा उद्योग चांगल्या प्रमाणात बहरु शकतो .

नाशिक हे कृषी क्षेत्रात अत्यंत अग्रेसर आहे . याच कृषी क्षेत्राला वेगाने विकसीत करण्याची क्षमता असणा - या कृषी प्रक्रिया उद्योगासाठी नाशिक अत्यंत पोषक आहे . आज अल्प प्रमाणात विकसीत असलेला हा उद्योग मोठ्या प्रमाणात वाढण्याची गरज आहे . तसे झाल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करु शकेल , अशा कृषी प्रक्रिया उद्योगाचे अस्तित्व नाशकात निर्माण होऊ शकते .

म.टा. च्या सौजन्याने....

सेंद्रिय शेतीचा सिक्कीम पॅटर्न

आखण्यात आलं आहे. भात , आलं , मका , गहू , कांदा , मोहरी , बटाटा , मिरची , टोमॅटो , मोसंबी या पिकांबरोबरच फुलांवरही प्रामुख्याने लक्ष केंद्रित केलं आहे. ' सिक्कीम ' हाच सेंद्रिय ब्रॅण्ड म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे लवकरच सिक्कीम केवळ भारतातीलच नव्हे , तर जगातील संपूर्ण सेंद्रिय शेती करणारं पहिलं राज्य ठरेल.

सिक्कीममध्ये सेंद्रिय शेतीची संकल्पना खरंतर २००३मध्ये पुढे आली. तज्ज्ञांकडून हे ' मिशन ' पूर्ण करण्यासाठी लागलीच आराखडे बांधण्यात आले. याबाबत संशोधन , प्रशिक्षणाच्या पाठबळासाठी स्वित्झर्लंडच्या एफआयबीएल इन्स्टिट्यूट ऑफ ऑरगॅनिक रिसर्चशी सामंजस्य करण्यात आला. राज्यात ' सिक्कीम ऑरगॅनिक बोर्ड ' ही स्थापन करण्यात आलं. २००६-०७पासून राज्य सरकारने केंद्र सरकारकडून मिळणारा रासायनिक खतांचा कोटा घेणं बंद केलं. तसंच रासायनिक खतांची विक्रीकेंद्रेही बंद करण्यात आली. शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचा पुरवठा करण्यासाठी २००९पर्यंत २४ हजार ५३६ कंपोस्ट खत आणि १४ हजार ४८७ गांडुळ खतांचे युनिट शेतात तयार करण्यात आले.

मार्केटही सज्ज

अशा प्रकारे एक एक पायरी चढत असतानाच या पिकांच्या उत्पन्न आणि उत्पादनाची समस्या होतीच. सेंद्रिय शेतीचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे असले तर उत्पादन , मार्केटिंग , किंमत अशा सगळ्याच अंगाने प्रश्न उभे राहतात. परंतु सिक्कीमने या प्रश्नांवरही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला. केवळ ग्राहकच नाही तर शेतकरीही समाधानी राहील , हे या ' मिशन ' च्या अनेक उद्दीष्टांपैकी एक मुख्य उद्दिष्ट. उत्पादनाची किंमत कमी राहावी , यासाठी शेतकरी थेट माल ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकेल , अशी सोय करण्यात आली आहे. यासाठी राज्यात १० ' किसान मंडी ' तयार करण्यात आल्या आहेत. या व्यवहारात दलालांची साखळी नसते. तसेच दिल्लीमध्ये सेंद्रिय उत्पादनांसाठी खास रिटेल शॉप सुरू करण्यात आलं. या उत्पादनांची विक्री करण्यासाठी १५० शेतकऱ्यांचे गट तयार करण्यात आले असून यामध्ये जवळपास १७५० शेतकऱ्यांचा समावेश आहे. या उत्पादनांचं ब्रॅण्डिंग करण्यासाठीही योजना हाती घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना प्रत्येक गांडुळ खत युनिटच्या उभारणीसाठी सरकार १५ हजार , तर कंपोस्ट खताच्या युनिटसाठी २० हजार रुपयांचं अनुदान देतं. तसंच शेतीची गुणवत्ता राखण्यासाठी तज्ज्ञगट नेमण्यात आले आहेत. या गटातील सदस्य प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करतात. शालेय वयापासून सेंद्रिय शेतीचं महत्त्व कळावं , याकरिता पाचवी ते सातवीच्या अभ्यासक्रमात सेंद्रिय शेतीविषयक अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. कोणत्याही शेती उत्पादनांसाठी इतर राज्यांवर अवलंबून राहू नये , हे राज्याचं आणखी एक ध्येय. म्हणजे आयात केलेल्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत शंका तर असतेच , शिवाय अधिक पैसेही मोजावे लागतात. म्हणून आमच्या शेतकऱ्याने आपल्याच शेतात सगळी उत्पादनं घेण्याइतकं सक्षम व्हावं , असं या मिशनसंबंधी मंत्र्यांचं म्हणणं आहे.

या ' मिशन ' ची व्यापकता मोठी आहे. ते केवळ शेतकऱ्यांच्या फायद्यापुरतं मर्यादित नाही. तर या माध्यमातून टुरिझम व्यवसायाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सेंद्रिय शेती पाहण्यासाठी पर्यटक पसंती देत आहेत. ते उत्सुकतेने अन्नधान्य विकतही घेतात. हे लक्षात घेऊन गावांना टुरिझम डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्यासाठी काही कुटुंबांना अतिथ्य आणि विविध पदार्थ बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याआधी १४ हजार शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांना रेनवॉटर हार्वेस्टिंगसारख्या पर्यावरणस्नेही प्रयोगांचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्लास्टिक पिशव्यांचा वापर न करण्याबाबत जागृती करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीमुळे डेअरी व्यवसायालाही फायदा होतो. चांगल्या दर्जाच्या दुधाचे प्रमाण वाढत आहे. एकूणच हा प्रयोग अनेक अंगाने राज्याची आर्थिक बाजू भक्कम करणारा ठरतोय.

सिक्कीमचा हा प्रयोग आता इतर राज्यांनाही खुणावतो आहे. केरळमधील कसारगड जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचा पायलट प्रकल्प राबवण्याची घोषणा नुकतीच करण्यात आली. याबाबत सिक्कीमचे मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. सिक्कीमच्या तुलनेत लोकसंख्या अधिक असल्याने केरळमध्ये अनेक आव्हानं आहेत. पण पुढील दुष्परिणाम लक्षात घेतले तर आता मेहनत करायलाच हवी , असं केरळच्या शेती संचालकांचे म्हणणं आहे.

लोकसंख्या आणि आकाराच्या दृष्टीने सिक्कीम हे लहान राज्य असल्याने तेथे हा प्रयोग यशस्वी होत आहे , असा एक सूर आळवला जातो. पण सिक्कीम पॅटर्नवर अजून थोडं काम केलं तर मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांनाही तो राबवणं कठीण नाही. त्यासाठी प्रबळ इच्छा आणि सांघिक प्रयत्नांचं भांडवल मात्र हवं



दै. महाराष्ट्र टाइम्स यांच्या सौजन्याने

गणपतीच्या पूजेत २१ पत्री


भारतीय संस्कृतित पूजेत वाहण्यात येणारी फुले, पाने यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध देवतेनुसार पूजा साहित्यामध्ये बदल बघावयास मिळतो. काही दिवसांत गणेशाचे आगमन होणार आहे. गणपतीच्या पूजेत २१ पत्रीचा समावेश असतो. या पत्रींचे औषधी गुण आपण जाणून घेऊ यात.

१- पिपंळ - याला 'बोधीवृक्ष' म्हणतात. गौतम बुध्दांना याच झाडाखाली आत्मज्ञान प्राप्त झाले होत. हवा शुध्दकरण्यासाठी हे एकच झाड एअरकुलर सिस्टीमच्या पाचपट अधिक काम करते.  याच्या पानांत औषधी गुणधर्म असतात म्हणून आदिवासी भागात या पानांवर मुलांना जेऊ घातले जाते. पिपंळाची लाख (राख) खडीसाखरेबरोबर दिल्यास चांगली झोप लागते.

२ - केवडा - ही वनस्पती समुद्र किनार्‍यावर मोठया प्रमाणात आढळते. ही वनस्पती थायरॉईडच्या दोषावर गुणकारी ठरते.

३ - हादगा - हादग्याला आपण 'अगस्ती' म्हणूनही ओळखतो. याच्या फुलांची भ्‍ाजी छान लागतात. या फुलात अनेक जीवनसत्वांचा खजिना आहे. हा वृक्ष मध्यम आकाराचा आहे.

४ - बोर - बोराच्या बियांचे चुर्ण चेहर्‍यांवर लावल्यास पुटकुळया जातात. मध्यम आकाराचा हा काटेरी वृक्ष डोळे जळणे, तापावरील दाह यासाठी उपयुक्त ठरतो.

५ - मधुमालती - मधुमालती ही वेल तशी शहरात बंगल्यांमध्‍ये सहज बघावयास मिळते. ही एक काष्ट वेल आहे. गुलाबी, पांढर्‍या, पिवळया रंगाची फुले व सदाहरित पाने हे त्याचे वैशिष्टय. 

फुफ्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. 

६ - माका - पावसाळयात आढळणारी ही वनस्पती डोंगर - टेकडयांवर नजर लावून तिचा शोध घ्यावा लागतो. माका रसायन आहे. रसायन म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग होऊ न देणारे 

औषध. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचूदंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते. 

७ - बेलपत्र - शंकराचे बेलपत्र सर्वांना परिचित आहे. या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो.

८ - धोतरा - धोतर्‍याचा काळा, पांढरा, व राजधोतरा अशा तीन जाती आहेत. या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचे औषध काढतात. वेदनाशक म्हणून त्याचा उपयोग केला जातो. ही वनस्पती  पडिक जागेत उगविणारी विषारी वनस्पती आहे. काटेरी पांढर्‍या लांब नरसळ्यासारखे फूल दमा, कफ, संधिवात आदी रोगांवर उपयुक्त ठरते. या वनस्पतींची रोपे शहरात रस्त्याच्या कडेला  हमखास दिसतात.

९ - तुळस - ही वनस्पती चोवीस तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना पळवून लावणारी तुळस जवळपास प्रत्येक घरात बघावयास मिळते. तुळशीत राम, कृष्ण असे दोन प्रकार असले तरी 

आणखी तीन चार इतर प्रकारही आहेत. कफ, दम, सर्दी, कीटक दंश तसेच कॅन्सर सारख्या रोगांवर तुळशीचा रस औषध उपयोगी पडतो.

१० - दुर्वा - ही एक गवताच्या जातीची वनस्पती आहे. पांढरी (श्वेत) आणि निळा (नील) या दोन जाती आहेत. पांढ-या दुर्वा गणेशाला प्रिय असते. आपल्याकडे तिला 'हरळ' म्हणतात. 

नाकातून रक्त येणे, ताप, अंगातील दाह कमी करण्यासाठी दूर्वांचा रस अमृतासमान असतो. दूर्वा रस्त्याच्या बाजूला, बागेतही मिळतात.

११ - शमी - शमीला सुप्त 'अग्नीदेवता' असेही म्हणतात. त्यामुळे यज्ञाच्या ठिकाणी शमीची रवी ठेवतात. हा वृक्ष कोरडया हवामानात वाढणारा आहे. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर  शमी प्रभावी ठरते. 

१२ - विष्णुकांता - या वनस्पतीला आपल्याकडे 'शंखपुष्पी' म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती विद्यार्थी वर्गात लोकप्रिय आहेत. ब्रेन टॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. निळसर फुले  येणारी ही वनस्पती जमिनीलगत उगविणारी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारावर औषध म्हणून केला जातो. नदीच्या बाजूला, डोंगर-टेकडया आदी ठिकाणी ही आपण बघू  शकतो.

१३ - आघाडा - ऋषीपंचमीच्या दिवशी महिला मुखमार्जनासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग व दंतरोगावर उत्तम औषध आहे. ही वनस्पती पडिक जागेत माळरानांवर बघावयास  मिळते.

१४ - डाळिंब - आपल्याकडे आरक्ता आणि गणेश अशा दोन जाती मोठयाप्रमाणात बघावयास मिळतात. देखणी फुले, काहीसे काटेरी झुडूप आहे. याचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही उपयोग केला जातो.

१५ - डोरली - या रोपाला 'काटे रिंगणी' म्हणूनही ओळखतात. या वनस्पतीच्या पानवर देखील काटे असतात. त्वचारोग, पोटातील विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरते. आदिवासी  भागात हे झुडूप मोठ्या प्रमाणात आढळते. 

१६ - देवदार - हा महाकाय वृक्ष पश्चिम घाट, हिमालयात आढळतो. या वृक्षाचे लाकूड अतिशय मजबूत असते. 


परप्रकाशित... 

पिक व्यवस्थापन

विविध पिकांवरिल रासायनिक खतांचा वापर 


केळी
लागवडीनंतर १५-३० दिवसांनी 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
चिलेटेड झिंक 1 ग्रॅम
लागवडीनंतर ४५-६० दिवस कॅल्शियम नायट्रेट 4-5 ग्रॅम
२० टक्के बोरॉन 1 ग्रॅम
केळ फुल तोडल्यानंतर ४ -७ दिवसांनी 13-00-45 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ८ दिवसांनी 00-00-50 4-5 ग्रॅम
जी.ए. 10 पीपीएम
वरिल फवीरणीनंतर ८ दिवसांनी 13-00-45 4-5 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ८ दिवसांनी 00.-00.-50 4-5 ग्रॅम

केळी पिकास लागवडीपुर्वी 1 एकर क्षेत्रात ५ ते १० बैलगाडया भरुन कुजलेले शेणखत, ५०० किलो निंबोळी पेंड तसेच ५०० किलो गांडुळ खत घालावे. त्यासोबतच २५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. लागवड करण्यापुर्वी जमिनीत थायमेट एकरी १० किलो, व मॅन्कोझेब ५०० ग्रॅम ते १ किलो टाकावे. तसेच जर बेण्यापासुन लागवड होणार असेल तर २०० लिटर पाण्यातुन ५०० मिली क्लोरोपायरीफॉस, ५०० ग्रॅम मॅन्कोझेब व २५० ग्रॅम बाविस्टीन तसेच २०० ग्रॅम पोटॅशियम ह्युमेट ग्रॅन्यअल्स, व १०० ग्रॅम सिलीका च्या द्रवाणात १००० खोड ५ मिनीट बुडवुन मग लागवड करावी. केळी पिकांस द्यावयाच्या जमिनीतील खतांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

0-15 25 25 25 00 00 00 00 00 00
30-40 25 25 50 10 10 10 25 01 00
60-70 25 00 50 00 00 00 25 01 00
90-100 00 10 00 05 05 05 25 01 250 ग्रॅम
120-130 25 00 50 00 00 00 00 00 00
150-160 00 00 00 2.5 00 00 00 01 250 ग्रॅम
180-200 00 10 50 2.5 00 00 25 01 250 ग्रॅम
240-250 25 00 50 00 2.5 10 00 00 100 ग्रॅम
300-310 25 00 50 00 00 00 00 00 00
एकुण 150 70 325 20 17.5 25 100 05 850 ग्रॅम

(किलो प्रती १००० खोड)
केळी पिकाची पालाशची गरज ही जास्त असल्या कारणाने त्या पिकासाठी देण्यात येणा-या रासायनिक खतांच्या शिफारशीत मॅग्नेशियम सल्फेट चे प्रमाण १०० किलो प्रती १००० खोड करण्यात आले आहे. या १०० किलो मॅग्नेशियम सल्फेट खतांतुन ९ किलो मॅग्नेशियम पिकास मिळतो. पालाश युक्त खतांच्या जास्त वापराने केळी पिकांत मॅग्नेशियमची कमतरता सतत जाणवत असते, शिवाय या कमतरतेमुळे मुळांच्या वाढीवर तसेच केळीच्या आकारावर विपरित परिणाम जाणवतात.
वरिल खतांचे शिफारस पत्रक हे रावेर, यावल तसेच मुक्ताईनगर परिसरात काम करित असतांना केळी पिकाच्या पक्वतेच्या काळातील नत्र तसेच पालाश खतांच्या वापरातुन आढळुन आलेल्या उत्पादन वाढीवरुन तयार केलेले आहे.

द्राक्ष (खरड छाटणी)
छाटणीनंतर २० दिवस 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 ग्रॅम
छाटणीनंतर 30 दिवस 19-19-19 4-5 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 1 ग्रॅम
केळ फुल तोडल्यानंतर ४ -७ दिवसांनी 13-00-45 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ८ दिवसांनी 00-00-50 4-5 ग्रॅम
जी.ए. 10 पीपीएम
वरिल फवीरणीनंतर ८ दिवसांनी 13-00-45 4-5 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ८ दिवसांनी 00.-00.-50 4-5 ग्रॅम

छाटणी अगोदर २० ते ३० दिवस 00-52-34 2.5 -3 ग्रॅम
बोरॉन 1 ग्रॅम
५-६ पान अवस्था कॅल्शियम नायट्रेट 4-5 ग्रॅम
२० टक्के बोरॉन 1 ग्रॅम
चिलेटेड झिंक 1 ग्रॅम
घड पोपटी होतांना 00-52-34 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत 13-40-13 4-5 ग्रॅम
बोरॉन 1 ग्रॅम
वरिल फवीरणीनंतर ८ दिवसांनी 13-00-45 4-5 ग्रॅम
मण्यांमध्ये पाणी फिरतांना 00-00-50 4-5 ग्रॅम

पपई
लागवडीनंतर १५ -२० दिवस 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
चिलेटेड झिंक १ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट 4-5 ग्रॅम
२० टक्के बोरॉन 1 ग्रॅम
चिलेटेड झिंक 1 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत 00-52-34 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
फळ धारणा 00-52-34 4-5 ग्रॅम
बोरॉन 1 ग्रॅम
फळ पोसत असतांना 00-00-50 4-5 ग्रॅम
फळ पोसत असतांना 00-00-50 4-5 ग्रॅम
बोरॉन 1 ग्रॅम

उस
लागवडीनंतर १५ -२० दिवस 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
चिलेटेड झिंक व फेरस १ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट 4-5 ग्रॅम
जी.ए. 10 पीपीएम
चिलेटेड झिंक 1 ग्रॅम

कापुस
लागवडीनंतर १५ -२० दिवस 19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
चिलेटेड झिंक १ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
कॅल्शियम नायट्रेट
4-5 ग्रॅम
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
चिलेटेड झिंक १ ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
बोंड धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
मॅग्नेशियम सल्फेट 2 ग्रॅम
बोंड पोसत असतांना
00-00-50
4-5 ग्रॅम
मॅग्नेशियम सल्फेट
4-5 ग्रॅम

संत्री,मोसंबी,लिंबु
पाणी दिल्यानंतर 00-52-34
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
बोरॉन १ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
13-00-45
4-5 ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट
2-2.5ग्रॅम

आंबा
फुलोरा येण्यापुर्वी ३०-४० दिवस 00-52-34
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
बोरॉन १ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
13-00-45
4-5 ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट
2-2.5ग्रॅम

मिरची, भेंडी, वांगी व टोमॅटो
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
13-00-45
4-5 ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट
2-2.5ग्रॅम

कलिंगड, काकडी,भोपळा ,खरबुज
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
13-00-45
4-5 ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट
2-2.5ग्रॅम

आले व हळद
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
चिलेटेड झिंक १ ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
चिलेटेड फेरस
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ४ महीन्यांनी
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ६ महीन्यांनी दोन ते तिन वेळेस
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
लागवडीनंतर ८ महीन्यांनी
00-00-50
4-5 ग्रॅम
कॅल्शियम नायट्रेट
2-2.5ग्रॅम

तुर,हरभरा,उडीद,मुग
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
२० टक्के बोरॉन
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
फुलोरा अवस्थेत
00-52-34
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २)
2.5-3 ग्रॅम
फळ धारणा
00-52-34
4-5 ग्रॅम
बोरॉन
1 ग्रॅम
फळ पोसत असतांना
00-52-34
4-5 ग्रॅम

कांदा, लसुण
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये
2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी
00-52-34
1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ४० दिवसांनी
00-00-50
4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ५० -६० दिवसांनी 13-00-45 4-5 ग्रॅम

कोबी, फ्लावर
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19 2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी 19-19-19 1 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3 ग्रॅम
लागवडीनंतर ४० दिवसांनी 12-61-00 4-5 ग्रॅम
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
बोरॉन १ ग्रॅम
लागवडीनंतर ५० -६० दिवसांनी 13-00-45 4-5 ग्रॅम

पालेभाज्या
लागवडीनंतर १० - १५ दिवसांत 19-19-19
2.5 -3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी कॅल्शियम नायट्रेट 2.5-3 ग्रॅम
सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5 -3 ग्रॅम



http://www.haritpane.com यांच्या सौजन्याने  ...

सेंद्रिय शेतीतील पर्यावरणीय विचार

१९६० नंतर भारतात औद्योगिक (व्यापारी) शेतीला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी संकरित व जी. एम. (जनुक परिवर्तित) बियाणे, रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके, तणनाशके व मशागतीसाठी ट्न्ॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्याचबरोबर जमिनीच्या वर साठवलेल्या व जमिनीतील पाण्याचा वापर अनिर्बंधपणे करण्यात आला. त्यामुळे पर्यावरणीय गंभीर समस्या निर्माण झाल्या.

१) झाडांची संख्या घटली.
२) जैविक विविधता संपत आली.
३) पाणी दूषित व दुर्मिळ झाले.
४) हवा दूषित झाली.
५) मातीचा पोत नष्ट झाला.
६) अन्न विषमय झाले.
७) पक्षी व सजीवांची संख्या घटली.
८) ग्रामीण जनतेचे स्थलांतर होऊन शहरे वाढली.


माणसांचे व एकूणच सजीवसृष्टीचे जीवन समतोल व आनंदी व्हायचे असेल तर निसर्गाचा समतोल म्हणजेच नैसर्गिक संसाधनांची (जल, जंगल, जमीन, हवा, सूर्यप्रकाश, जैवविविधता, पशु-पक्षी, खनिज तेल इ.) लूट न करता संवर्धनच व्हावे असा त्या संसाधनांचा वापर झाला पाहिजे तरच पर्यावरणाचा समतोल कायम राहतो. परंतु गेल्या अनेक वर्षांतील माणसांच्या अनिर्बंध व हव्यासी वर्तनाने नैसर्गिक संसाधनाची लूट झाल्यामुळे ही संसाधने संपत आली आहेत. त्यामुळे मानवासहित सजीव सृष्टीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
पाश्चात्त्य भोगवादी संस्कृतीमुळे माणसांच्या ज्या चैनीच्या गरजा वाढल्या आहेत त्या भागविण्यासाठी माणूस नैसर्गिक संसाधनांची लूट करीत आहे. त्यासाठी माणसाने व्यापारी-रासायनिक शेतीचा स्वीकार केला. त्यातून पर्यावरणीय व इतर गंभीर समस्या निर्माण झाल्या.
मग आता त्यावर उपाय काय ?

१) झाडांची संख्या वाढवावी लागेल - वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविण्याच्या नावाखाली झाडे तोडून जंगलाखालची जमीन लागवडीखाली आणली गेली. झाडांची संख्या कमी झाल्याने हवेतील ऑक्सिजनचे व आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले. झाडे कमी झाल्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले त्यामुळे पावसाचे प्रमाणही कमी झाले. पडलेले पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याचे प्रमाणही कमी झाले.त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल गेली त्यामुळे पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणेही मुष्किल झाले.
हे थांबवायचे असेल तर जमिनीच्या एक तृतीयांश क्षेत्रावर झाडांची मिश्र लागवड करावी लागेल. सध्या फळबाग लागवडीखाली एकाच प्रकारच्या आंबा, द्राक्षे, केळी, चिकूंच्या झाडांची व्यापारी दृष्टिकोनातून लागवड केली जात आहे. तीही पर्यावरणाच्या दृष्टीने घातक आहे. ते टाळायचे असेल तर एकाच शेतात दीर्घ मुदतीची (चिंच, आंबा, जांभूळ, चिकू इ.) व अल्प मुदतीची (सीताफळ, शेवगा, हादगा, बोर, कवठ इ.) आणि कमी पाणी लागणारी किंबहुना पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या झाडांची मिश्र लागवड करावी लागेल.


२) जैवविविधता वाढवावी लागेल
रासायनिक शेतीतील संकरित व जी. एम. बियाण्यांमुळे व एक पीक पद्धतीमुळे निसर्गातील जैविक विविधता संपत चालली आहे. त्यामुळे झाडांच्या व पिकांच्या कित्येक जाती नष्ट झाल्या आहेत. हे थांबविण्यासाठी संकरित व जी. एम. बियाणे नाकारून ेशी (गावरान) बियाणांचा वापर वाढवून व त्याचे जतन करून जैविक विविधता वाढविली पाहिजे.

३) शुद्ध व मुबलक पाण्यासाठी
शेतीत व्यापारी वृत्ती आल्यामुळे रासायनिक शेतीचा स्वीकार करण्यात आला. त्यामुळे ऊस, केळी, द्राक्षं, फुलशेती व इतर जास्त पाणी लागणाऱ्या व्यापारी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली त्यामुळे जमिनीतील पाण्याचा उपसा वाढला त्यामुळे पाणी दुर्मिळ झाले तसेच रासायनिक खत, कीटकनाशके, तणनाशकांच्या प्रचंड वापरामुळे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे मानवासहित सर्व सजीवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.हे टाळायचे असेल तर मूलभूत गरजांवर आधारित कमी पाणी लागणाऱ्या व पावसाच्या पाण्यावर येणाऱ्या पिकांचे उत्पादन सेंद्रिय पद्धतीने घेतले तर रसायनांचाही वापर टाळला जाईल. त्यामुळे पाण्याची पातळी वाढेल व शुद्ध आणि मुबलक पाणी मिळेल.

४) शुद्ध हवेसाठी
रासायनिक शेतीत झाडांची संख्या कमी झाली तसेच रसायनांची फवारणी वाढली व मशागतीसाठी ट्न्ॅक्टरचा वापर वाढला त्यामुळे हवा दूषित झाली आहे. हे थांबविण्यासाठी झाडं वाढविण्याबरोबरच फवारणीसाठी रसायनांचा वापर बंद करावा लागेल तसेच मशागतीसाठी ट्न्ॅक्टर वापरणे बंद करून बैलांच्या साह्याने शेतीची हलकी मशागत करावी लागेल.

५) मातीचा पोत वाढविण्यासाठी
रासायनिक खत, कीटकनाशके, तणनाशके यामुळे, ट्न्ॅक्टरच्या मशागतीमुळे आणि अति पाणी वापरामुळे जमिनीचा पेात कमी झाला आहे. हे शासनासहित सर्व लोक मान्य करीत आहेत. हे थांबविण्यासाठी कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचे नियोजन करून रासायनिक खत, कीटकनाशके, तणनाशके वापरणे बंद करून जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवून त्यावर जगणाऱ्या जीवाणूंची संख्या वाढवावी लागेल तरच जमिनीचा पोत वाढेल. तसेच ट्न्ॅक्टरची मशागत बंद करून बैलांच्या साह्याने हलकी मशागत केली तर मातीचा पोत वाढेल.

६) विषमुक्त अन्नासाठी
जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासातून शेतकरी रासायनिक खते, कीटकनाशके व तणनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. रासायनिक खतातील व फवारलेल्या औषधातील विष, फळे, भाज्या व धान्याच्या पेशीत व चरबीमध्ये साठवले जात आहे. त्यामुळे बाजारातून आणलेले धान्य, फळे, भाज्या कितीही धुवून घेतल्या तरीही त्यातील विष नाहीसे होत नाही. आपण खात असलेल्या अन्नाचा, फळाचा व भाज्याचा प्रत्येक घास थोडे थोडे विष आपल्या शरीरातील चरबीत साठवत असतो व ते विष जसजसा काळ जाईल तसतसे शरीरात पटीने वाढत जाते. त्यामुळे माणसाची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती घटत घटत नष्ट होते.
हे सर्व टाळायचे असेल तर देशी (गावरान) बियाणे वापरून व सेंद्रिय पदार्थ व त्यावर जगणाऱ्या जिवाणूंची मातीत संख्या वाढवून टिकाऊ व सकस, चवदार धान्य, भाज्या व फळांचे उत्पादन मिळू शकते.

७) पक्षी व इतर सजीवांची संख्या वाढविण्यासाठी -
रासायनिक शेतीतील फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या जास्त शक्तिशाली विषारी औषधामुळे हे औषध फवारलेले धान्य, भाज्या व फळे खाऊन अनेक पक्षी व प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे अनेक पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या जाती नष्ट होत आहेत. पूर्वी गावात कुठेही दिसणारे गिधाड व घार आता दिसत नाहीत तसेच कावळे चिमण्यांची संख्या कमी झाली आहे. मोरही दिसेनासे झाले आहेत. मधमाश्यांची संख्या घटली आहे. हे टाळायचे असेल तर शेतीतील रासायनिक खतांचा व कीटकनाशक-तणनाशकांचा वापर बंद करून सेंद्रिय पद्धतीने शेती करावी लागेल.

८) पर्यावरण रक्षणासाठी शरीरश्रम करावे लागतील -
१०० वर्षांपूर्वी भारत हा खेड्यांचा देश होता. त्यावेळी शहरात कमी व खेड्यात जास्त लोक राहत होते. खेड्यातील सर्व लोक शेतीशी निगडित शरीरश्रम करून जगत होते. म्हणून त्यावेळी भारतात चोर व भिकारी जवळपास नव्हता म्हणून इथे समृद्धी होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर औद्योगिकीकरणाला अग्रक्रम दिल्यामुळे व शेतीवरील श्रमाला कवडीमोल किंमत दिल्यामुळे आणि मेकॉलेच्या, ``चोर, भिकारी आणि गुलामीची मानसिकता'' निर्माण करणाऱ्या शिक्षण पद्धतीमुळे माणूस शरीरश्रम न करता पैसा मिळविण्यासाठी पैसा व कामचोर, लाचार, भिकारी, गुलाम बनला व माणसाने शेतीपेशा सोडून शहराचा रस्ता धरला. खरे तर शेतीवर शरीरश्रम करणे म्हणजे अन्ननिर्मिती करणे म्हणजेच नवनिर्मिती करणे. शरीरश्रमाशिवाय माणसाच्या सृजनशीलतेचा विकास होत नाही. सध्याच्या शिक्षण पद्धतीत श्रमाला कसले स्थान नाही. मेकॉलेने शिक्षणाची श्रमापासून फारकत केली आहे. कारण ब्रिटिशांना भारतीय माणसांची सृजनशीलता नष्ट करून त्याला गुलाम करायचे होते. स्वातंत्र्यानंतरसुद्धा मेकॉलेचीच शिक्षणपद्धत राज्यकर्त्यांनी कायम ठेवली.
भारतातील राज्यकर्त्यांनी, प्रस्थापित वर्गाने व शरीर श्रम न करणाऱ्या सृजनशीलता घालवून बसलेल्या लोकांनीच आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाचे वाटोळे व निसर्गाची लूट केली आहे व करीत आहेत. खरोखर पर्यावरणाचे रक्षण व निसर्गाची लूट थांबवायची असेल तर माणसाला सृजनशील व्हावे लागेल. सृजनशीलतेच्या विकासासाठी माणसाला मन-मेंदू-मनगटाने शरीरश्रम करावे लागतील. सध्या शेतात काम करणारा माणूस नाखुषीने काम करतोय. त्याने खुषीने, बुद्धीने व मनापासून शेतात मनगट चालवावे लागेल तरच त्याच्या सृजनशीलतेचा विकास होईल व त्याला काम करताना निर्भेळ आनंद मिळेल. आणि तेव्हाच त्याला पर्यावरणाचे महत्त्व पटेल.

www.miloonsaryajani.com  यांच्या सौजन्याने ...

माझ्याबद्दल