| स्फुरदयुक्त खतांना पिकांद्वारे प्रतिसाद देण्यावर परिणाम करणारे घटक- | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| पिकांस माती परिक्षणानुसार स्फुरदयुक्त खते देत असतांना
त्याव्यतिरिक्त देखिल काही महत्वपुर्ण घटक स्फुरद उपलब्धतेवर परिणाम करित असतात. या
मध्ये मातीचे स्वरुप, जमिनीतील हवेचे प्रमाण, जमिनीचे तापमान, जमिनीतील पाण्याचे
प्रमाण, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीतील सेद्रिय पदार्थ, मातीचा सामु, इतर
अन्नद्रव्यांसोबतची अभिक्रिया, जमिनीचे जैविक गुणधर्म तसेच पिकाचा प्रकार या
घटकांचा समावेश होतो.याशिवाय खतांचे स्वरुप, खतांची पाण्यातील विद्राव्यता तसेच
स्फुरदचे रासायनिक स्वरुप देखिल त्याच्या उपलबेधतेवर परिणाम करित
असते. मातीचे स्वरुप- ज्या जमिनीतील माती हि जाड कणांनी बनलेली असते त्या जमिनीत स्फुरदयुक्त खतांचे वहन होण्यात अडचणी येतात. ज्या जमिनीतील माती बारीक किंवा सुक्ष्म कणांनी बनलेली असते त्या जमिनीत स्फुरदचे वहन जरी व्यवस्थितरित्या होत असले तरी देखिल स्फुरदचे स्थिरीकरण होणे जलद रित्या पार पडते. अशा जमिनीत स्फुरदयुक्त खते जास्त प्रमाणात द्यावी लागतात. जमिनीतील हवा-पाण्याचे गुणोत्तर - मुळांद्वारे स्फुरदचे शोषण होण्यासाठी कर्बोदकांची गरज भासते. कर्बोदकांपासुन आवश्यक ती उर्जा निर्माण करण्यासाठी ऑक्सिजनची गरज भासते. जर जमिनीतील मातीचे कण एकमेकांशी घट्ट चिकटलेले असतिल तर त्यातुन हवा खेळती राहत नाही, व मुळांना योग्य तो ऑक्सिजन न मिळाल्याने कर्बोदकांपासुन उर्जा निर्मिती होत नाही. त्यामुळे स्फुरद शोषणावर विपरित परिणाम होतो. मातीचे कण घट्ट असल्यामुळे स्फुरदच्या वहनात देखिल अडथळे निर्माण होतात. जमिनीचे तापमान व आर्द्रता- कमी तापमानामुळे स्फुरदच्या उपलब्धेतेवर विपरित परिणाम होतो. कमी तापमानात मुळांची वाढ देखिल कमी होते. तसेच कमी आर्द्रतेमुळे देखिल स्फुरदची उपलब्धता कमी होते. जमिनीचे रासायनिक गुणधर्म - जमिनीतील कॅल्शियम, लोह व अल्युमिनीयम मुलद्रव्यांमुळे स्फुरदचे स्थिरीकरण होते. जमिनीतील सेद्रिंय कर्बाच्या प्रमाणानुसार तसेच सेंद्रिय पदार्थांच्या प्रमाणानुसार स्फुरदची उपल्बधता वाढते. जास्त सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत स्फुरदची उपलब्धता वाढते. जमिनीचा सामु ६ ते ७ च्या दरम्यान असल्यास स्फुरदची उपलब्धता जास्त असते. जमिनीत झिक (जस्त) यु्क्त खतांसोबत स्फुरदचा वापर केल्यास झिंकची कमतरता जाणवते. तसेच अमोनिकल-नत्र (NH4-N) च्या उपस्थितीत जमिनीचा सामु कमी होत असल्याने स्फुरदची उपलब्धता वाढते. स्फुरदयुक्त खते जमिनीच्या वरच्या थरात राहत असल्या कारणाने तेथुनच पिकांस मिळतात, मात्र पाण्याचा ताण बसल्यास हि खते तेथुन पिकास मिळत नाहीत, अर्थात अशा वरील थरात कायम पाणी राहणे मुश्किलच असते, त्यामुळे स्फुरदयुक्त खते जमिनीत थोडी खोलवर टाकावीत. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| रासायनिक खते आणि त्यांच्या वापराने जमिनीच्या सामुवर होणारा परिणाम | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| माती परिक्षण करताय थोडा विचार करा | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| माती परिक्षण करुन पिकास त्या परिक्षणाच्या आधारे खते
देणे हे शास्रिय दृष्ट्या योग्यच आहे. बहुतेक करुन माती परिक्षण करीत असतांना आपणास
सांगण्यात येते की, ज्या ठीकाणी पिक नसेल किंवा खते पडत नसतिल त्या ठिकणाची माती
आणावी. हे शेताच्या मातीचे परिक्षण करण्यासाठी योग्य आहे. कारण यातुन शेतात असणारी
अन्नद्रव्ये आपणास कळणार आहेत. परंतु पिक तर सबंध शेतात वाढत नाही, त्याच्या मुळ्या
ह्यातर काही ठराविक भागच व्याप्त करित असतात. आपण पिकांस खते देतांना देखिल ती
मुळांच्या परिसरातच देत असतो. जमिनीच्या रासायनिक अभिक्रिया ह्या मुळांजवळील
परिसरातच जास्त प्रमाणात घडत असतात. जमिनीत टाकली जाणारी विविध सेंद्रिय व रासायनिक
खते काही प्रमाणात तेथिल जमिनीवर परिणाम करित असतातच. तेव्हा माती परिक्षणाचा जेथे
पिक किंवा पिकाच्या मुळ्या नाहीत तेथिल रिपोर्ट हा जेथे मुळ्या आहेत त्यापेक्षा
वेगळा हा असणारच. वर्षानुवर्षे पिकास खते देवुन देवुन त्या परिसरातील खतांचे प्रमाण
वाढलेले असणारच हा प्रकार साधराणतः फळबागांबाबत जास्त घडेल, मग आपण माती परिक्षण
अहवालानुसार कसे काय पिक संगोपन करु शकत असु कारण तो रिपोर्ट तर जेथे मुळ्या नाहीत
तेथला आहे. जेथे पिकाच्या मुळा वाढतात तो परिसर रायझोस्पिअर म्हणुन ओळखला जातो. हा रायझोस्पिअरच आपणासाठी महत्वाचा आहे. माती परिक्षण करित असतांना या परिसरातील रासायनिक खते टाकण्यापुर्वी माती काढुन तीचे परिक्षण केल्यास काही महत्वाच्या बाबींचा तपास लावणे सोपे जाईल, जसे त्या परिसरातील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण, तसेच त्या परिसरातील कॅटायन एक्सचेंज कॅपिसिटी, सामु वै, शिवाय नेहमीच्या पध्दतीने तपासलेल्या नुमन्याशी याची पडताळणी करुन बघता येईल. ज्यावरुन आपणास आपल्या विविध रासायनिक तसेच सेंद्रिय खतांच्या वापराने जमिनीवर काय परिणाम होतो आहे हे स्पष्ट होईल. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| पिकाच्या मुळ्या ह्या मुद्दाम ठरवुन काही
अन्नद्रव्यांच्या साठ्यापर्यंत वाढीत नाहीत. जमिनीत असलेली अन्नद्रव्ये मुळांच्या
जवळ असली हवीत. ह्या अन्नद्रव्यांचे मुळांमध्ये वहन किंवा प्रवेश खालिल पैकी एका
किंवा अनेक मार्गांनी होत असतो. मुळांमध्ये शिरणे (रुट इंटरसेप्शन) - मुळा वाढीत असतांना त्या कधी कधी ज्या ठीकाणी अन्नद्रव्ये आहेत त्या साठ्याच्या ठिकाणी जाउन पोहचतात. अशा वेळेस तेथिल अन्नद्रव्ये मुळ्यांमध्ये शिरतात. हा प्रकार असा आहे जसा शि-याच्या कढईत चमचा टाकणे. पाण्याच्या वहना द्वारे (मास फ्लो) - जमिनीत असलेली अन्नद्रव्ये पाण्यात विरघळतात आणि पिक जेव्हा पाणी शोषुन घेते त्याद्वारे ती मुळांमध्ये शिरतात. डिफ्युजन - स्फुरद व पालाश सारखी अन्नद्रव्ये मातीच्या सुक्ष्म कणांवर पक्की आर्कषली जातात त्यामुळे ती काही प्रमाणातच जमिनीतील पाण्यात असतात. ज्यावेळेस मुळे त्यांच्या जवळील मातीच्या कणांतुन अन्नद्रव्ये शोषुन घेतात त्या वेळेस त्या मातीच्या कणांवरील अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते व ते अन्नद्रव्य ते शेजारील कणीवरुन मिळवतात असे मिळवलेले अन्नद्रव्य पुन्हा मुळांद्वारे शोषले जाते. अशा प्रकारे डिफ्युजन क्रियेद्वारे पिकाच्या मुळ्या अन्नद्रव्य ग्रहण करतात. खालिल टेबल मध्ये मका पिकाद्वारे वरिल तिन प्रकारे किती अन्नद्रव्य ग्रहण केले जाते ते दिलेले आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| मातीचा सामु कमी करणे | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| मातीचा सामु कमी करणे ही एक खर्चिक बाब आहे. जास्त उत्पन्न देणा-या पिकांसाठीच ती परवडणारी आहे. विविध स्रोतांकडुन घेतलेल्या माहीतीवरुन खालिल टेबल मध्ये सध्याच्या सामु आणि हवा असलेल्या सामु साठी किती सल्फर टाकावे हे दिलेले आहे. यात कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी देखिल ठरवता येणार आहे. समजा सध्याचा सामु आहे 8.5 आणि आपणास तो ६.५ पर्यंत कमी करावयाचा आहे तर १ सी.ई.सी. साठी 200 किलो, ५ सी.ई.सी. साठी 500 किलो या प्रमाणे सल्फर टाकावे. या ठीकणी सी.ई.सी. म्हणजे कॅटायन एक्सचेंज कॅपेसिटी आहे. सी.ई.सी. आणि इ.सी. वेगवेगळ्या संज्ञा आहेत. इ.सी. म्हणजे केवळ मातीतुन किती करंट (विद्युत प्रवाह) वाहतो हे होय, या वरुन केवळ एकुण विरघळलेले क्षार कळतात, तर सी.इ.सी. वरुन जमिनीतील विविध धनभार (पॉझिटीव्ह) मुलद्रव्यांचे प्रमाण कळते ज्यावरुन पिकास जमिन किती अन्नद्रव्ये देणार आहे हे स्पष्टपणे सांगता येते, जे केवळ इ.सी. वरुन कळत नाही. तथापी इ.सी. प्रमाणे सी.इ.सी. बाबत असे सांगता येत नाही की तो किती असवा. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| वरिल तक्त्यानुसार एक एकऱ क्षेत्राचा सामु बदलविण्यासाठी ९९ टक्के सल्फर किती किलो लागेल हे दिलेले आहे, मात्र जमिनीत जर सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया नसतिल तर हि प्रक्रिया होत नाही. त्यामुळे सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरीया जमिनीत घालणे गरजेचे आहे. तसेच या प्रक्रियेस ८ ते १२ महिने कालावधी लागतो. उपाययोजना केल्यानंतर जमिनीचे परिक्षण करुन घेणे गरजेचे आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| बेड तयार करणे | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| विविध पिकांची लागवड करित असतांना बेड किंवा वाफे तयार करुन लागवड करणे फायदेशिर ठरते आहे. बेड तयार करित असतांना खालिल बाबींचा विचार करणे गरजेचे आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| वरिल प्रमाणे पिकाच्या पोषणाशी तसेच निरोगी वाढीसाठी अढथळा ठरणारे बरेच जीव नियंत्रणात आणण्यासाठी बेड ची रचना मह्तवपुर्ण ठरु शकते. बेड मधिल निंबोळी पेंड, करंज पेंड चा वापर निमॅटोड, तसेच इतर किडींच्या नियंत्रणास मदत करतो. शिवाय बेड मधिल शेणखत तसेच पेंडींमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढुन पिकाच्या वाढीसाठी अत्यावश्यक अन्नद्रव्ये पिकास मिळण्यास मदत मिळते. आदर्श बेड मध्ये पाणी धरुन ठेवण्याची तसेच पाण्याचा उत्तम निचरा होण्याची क्षमता एकाच वेळेस असणे गरजेचे आहे. | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| वरिल तक्त्यात प्रातिनीधिक स्वरुपातील बेड चे मिक्षण कसे
असावे हे दिलेले आहे. त्यात शेणखत तसेच गांडुळ खताचे प्रमाण वाढुवुन घेता येवु
शकते. मात्र फार जास्त प्रमाणात सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्यास पिकाच्या
वाढीवर प्रतिकुल परिणाम देखिल जाणवतो, कारण सेंद्रिय पदार्थांच्या वाढीसोबतच
जमिनीचा किंवा बेड चा कार्ब-नायट्रोजन रेशो देखिल बदलत असतो. तो ३ किवा त्यापेक्षा
कमी असल्यास जमिनीतील हानीकारक बुरशी जसे पिथियम, फ्युजॅरियम वै च्या वाढीसाठी
अनुकुल ठरतो, तसेच त्यापेक्षा जास्त असल्यास हानीकारक बॅक्टेरियाच्या वाढीसाठी
अनुकुल ठरतो. जमिनीत टाकण्यात आलेल्या सेद्रिय खतांतील तसेच मातीतील कार्बन च्या
प्रमाणास नत्राच्या प्रमाणाने भागितले असता कार्बन-नायट्रोजन रेशो समजतो. हा रेशो
माहीत असल्यावर पिकाच्या संरक्षणासाठी करावयाच्या उपाययोजनांची तसेच पिकावर येणा-या
विविध रोगांची अटकळ बांधणे सोपे जाते. (संदर्भ- कार्बन-नायट्रोजन रेशो ऑफ फ्लडेड
सॉईलस्) | ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| ||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
बुधवार, ९ एप्रिल, २०१४
जमिन व्यवस्थापन
कृषी प्रदूषण
कृषी व्यवसायाशी संबंधित असलेल्या निरनिराळ्या कार्यांमुळे
उद्भवणारे कृषी क्षेत्रातील पर्यावरणाचे मानव व इतर सजीवांस अपायकारक असणारे
प्रदूषण, म्हणजे कृषी प्रदूषण. कृषी व्यवसायात बी-बियाणे, पाणी, खते, कीटकनाशके,
मानवी श्रम आणि ऊर्जा यांचा उपयोग केला जातो. शेती वेगवेगळ्या पद्धतींनी केली जाते.
काही शेतकरी वर्षातून तीन पिके घेतात, तर काही शेतकरी जमिनीचा कस सुधारण्यासाठी
काही काळ जमीन पडीक ठेवतात. कृषी व्यवसायामुळे अन्नधान्य, फळे व भाज्या इ. उत्पादन
मिळते; परंतु शेतीचे काही अनिष्ट परिणामसुद्धा दिसून येतात. शेतीमुळे टाकाऊ
पदार्थांची निर्मिती होते. त्यांना कृषी अपशिष्टे म्हणतात. तेलबियांच्या रोपांतील
बियांचा उपयोग होतो; परंतु झाडांच्या फांद्या व मुळे यांचा प्रत्यक्ष उपयोग होत
नाही. त्यामुळे तो भाग टाकून द्यावा लागतो. उत्पादन प्रक्रियेमुळे ही काही अपशिष्टे
निर्माण होतात.
जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी सेंद्रिय खते व रासायनिक खते वापरली जातात. सेंद्रिय खते ही नैसर्गिक खते असतात. ती जैवविनाशी घटकांपासून तयार झालेली असतात. परंपरागत शेती पद्धतीत सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. रासायनिक खतांत प्रामुख्याने रसायनांचा वापर केला जातो. आधुनिक शेतीत या खतांचा भरपूर प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे पर्यावरणावर गंभीर स्वरूपाचे परिणाम होत आहेत. पिकांसाठी वापरलेल्या एकूण खतांपैकी ६०% भाग रोपांकडून शोषला जातो. उरलेला भाग जमिनीत तसाच साचून राहतो. नंतर तो डबकी, तळी, नद्या यांच्या पाण्यात मिसळतो. पाण्यात मिसळलेल्या रासायनिक खतांमुळे शैवालांची वाढ वेगाने होते. शैवालांद्वारे उत्पादित झालेल्या विषारी द्रव्यांमुळे मासे मरतात व माणसांनादेखील आजार होतात. काही भागातील भूजलात या खतांची विषारी द्रव्ये मिसळतात. असे प्रदूषित पाणी पिण्यासाठी वापरल्यास आरोग्यास धोका संभवतो. या खतांमुळे नायट्रोजन वायू बाहेर पडतो. त्यामुळे धातुजन्य विषारी द्रव्यांचा हवेत फैलाव होतो. जमिनीत साचलेली खते हवेत पसरतात व हवा प्रदूषित होऊ शकते.
पिकांचा नाश करणार्या काही घातक किडी व कीटकांचा नायनाट करण्यासाठी कीटकनशके वापरतात. काही वेळा शेतातील कीटकनाशके पावसाच्या पाण्याबरोबर वाहून झरे व तळ्यांच्या पाण्यात मिसळतात. अशा प्रदूषित पाण्याचा वापर केल्यास ते लोकांना घातक ठरू शकते. कीटकनाशके माणसांच्या त्वचेतून, डोळ्यांतून किंवा नाकातोंडातून शरीरात प्रवेश करू शकतात. त्यांच्यामुळे डोळ्यांची जळजळ व इतर दृष्टिविकार होण्याची शक्यता असते. दीर्घकाळ त्यांच्या सान्निध्यात राहणार्या लोकांना थकवा येणे, वेदना होणे व चक्कर येणे असे विकार होऊ शकतात. ती इतर प्राणी व सजीवांसाठीदेखील धोकादायक ठरतात. ती तळ्याच्या व नंद्याच्या पाण्यात मिसळल्यास त्यांतील मासे मरतात. शेतीला उपयुक्त असलेली गांडुळेदेखील त्यांच्यामुळे मरतात.
कृषी प्रदूषणाला प्रतिबंध घालण्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचा पर्याय सुचविला जातो. भारतातील काही राज्यांत, विशेषत: महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर सेंद्रिय शेती केली जात आहे. सदर शेतीस केंद्र शासन व महाराष्ट्र शासन प्रोत्साहन देत आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई यांचे सौजन्याने ...

घरच्या घरी बनवा सेंद्रिय खते
रासायनिक खतांच्या वापराने उत्पादनात वाढ होत असली तरी जमिनीचा पोत
सुधारून तिची उत्पादन क्षमता टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्त्व
मोठे आहे. सेंद्रिय खते तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ शेतक-यांना सहज उपलब्ध
असल्याने या प्रकारची खते तयार करणे शेतक-यांना आर्थिकदृष्टय़ा फायद्याचे ठरत
आहे.
सेंद्रिय खतांच्या वापरामुळे पिकाच्या वाढीस आवश्यक
असणा-या सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. याबरोबरच मातीच्या कणांची घडण बदलून
जमिनीचा पोतही सुधारतो. जमिनीत हवा खेळती राहते व जमिनीचे तापमान कमी राहते.
जमिनीतील उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत व कार्यक्षमतेत वाढ झाल्याने
अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेतही वाढ होते. सेंद्रिय पदार्थामुळे जमिनीची जलधारण शक्ती
व निचरा शक्ती सुधारते. सेंद्रिय खतांचे विघटन होऊन पिकांच्या वाढीस आवश्यक असलेली
पोषणद्रव्ये उपलब्ध होत असतात. जमिनीच्या नैसर्गिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये सुधारणा घडवून
आणण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे.
सेंद्रिय खतांमध्ये प्रामुख्याने हिरवळीची
खते, शेणखत, कम्पोस्ट
खत, मासळीचे खत, नारळाची पेंड, पक्ष्यांची
विष्टा, भुईमूग पेंड, करंज पेंड, कडुलिंब
पेंड, तिळाची पेंड, उंडीची पेंड, गोबरगॅसची
मळी, गांडूळखत आदींचा समावेश होतो. सेंद्रिय खते ही घरच्या घरी तयार
करता येत असल्याने त्यांचा खर्च अत्यंत कमी असतो. आपल्या घराजवळील व परिसरातील
टाकाऊ पदार्थापासून सेंद्रिय खते तयार करता येतात. ताग, घेवडा,
बरसीम, मूग, चवळी, गिरीपुष्प आदी
पिकांपासून हिरवळीची खते तयार करता येतात. गिरीपुष्पाचा पाला शेतात हेक्टरी 10 टन
घातल्यास भाताचे उत्पादन शिफारस केलेल्या रासायनिक खतांपासून मिळणाऱ्या
उत्पन्नाएवढेच मिळते. हिरवळीची खते तयार करताना झाडांचा पाला शेतात कुजवणे आवश्यक
आहे. पाला कुजण्याची प्रक्रिया लवकर होत असल्याने ही अन्नद्रव्ये पिकाला लगेच
उपलब्ध होतात. हिरवळीच्या खतासाठी लागणारी पिके शेतक ऱ्यांना सहजरीत्या उपलब्ध होत
असल्याने हिरवळीची खते खर्चाच्या दृष्टीने किफायतशीर ठरतात.
सेंद्रिय खतांमध्ये सहजरीत्या तयार करता येणारे खत
म्हणजे कंपोस्ट खत म्हणता येईल. कंपोस्ट खतासाठी झाडांचा पालापाचोळा, टाकाऊ गवत, गोठय़ातील
काडीकचरा, जनावरांचे मलमूत्र, टाकाऊ मासळीचे
अवशेष, शेतातील तण, पिकाची धसकटे,
भुसा, पेंढा, कोंडा आदी निसर्गात सहजरीत्या उपलब्ध
होणा-या पदार्थाचा वापर करता येतो. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आपल्या परसबागेत
आवश्यक त्या आकाराचा खड्डा तयार करावा. हा खड्डा शक्यतो उंच जागी असावा. खड्डय़ाची
खोली 3 फूट, रुंदी 6 फूट आणि लांबी आवश्यकतेनुसार ठेवावी. खड्डय़ाचा
तळ व सर्व बाजू ठोकून टणक कराव्यात. कंपोस्ट खताची निर्मिती करताना खड्डय़ात प्रथम
सहा त आठ इंची जाडीचा बारीक केलेल्या पदार्थाचा आणि त्यावर शेणकाल्याचा थर द्यावा.
असे आलटून-पालटून थर रचून खड्डा भरावा. शेणकाल्यामध्ये प्रतिटन सेंद्रिय पदार्थास
अर्धा किलो ग्रॅम या प्रमाणात कंपोस्ट जिवाणू मिसळावेत. खड्डा भरताना जनावरांचे
मलमूत्र आणि पाणी यांचे मिश्रण करून शेण व कचरा यांच्या प्रत्येक थरावर शिंपडावे.
त्याचप्रमाणे अर्धा किलो युरिया किंवा एक किलो अमोनियम सल्फेट, दोन
किलो सुपर फॉस्फेट तसेच सेंद्रिय पदार्थाच्या सहा टक्के प्रमाणात चुना हे सर्व
पदार्थ सेंद्रिय पदार्थाच्या थरावर पसरून टाकावेत. अशा प्रकारे थरावर थर देऊन
जमिनीवर साधारण एक ते दीड फू ट उंची गेल्यावर खड्डा भरणे बंद करावे. नंतर तो खड्डा
ओल्या मातीने सर्व बाजूने लिंपून घ्यावा. चार ते पाच महिन्यांनी या ठिकाणी चांगले
कंपोस्ट खत तयार होते. खड्डय़ातील थर सोळा दिवसांनी, एक महिन्यांनी व
दोन महिन्यांनी खाली-वर केल्यास कुजण्याची क्रिया जलद होते. या प्रक्रियेमध्ये दर
वेळेस पाणी शिंपडून खड्डा लिपून घ्यावा. अशा खड्डय़ातून सुमारे अडीच ते तीन क्विंटल
कंपोस्ट खत तयार होते.
सेंद्रिय खतातील महत्त्वाचा घटक असलेलीगांडूळ खत
निर्मिती ही आता सर्वत्र के ली जाते. टाकाऊ सेंद्रिय पदार्थ कुजवण्यासाठी
गांडुळांचा उपयोग केला असता गांडूळ सेंद्रिय पदार्थाचे तुकडे गिळून त्याचे पचन करून
कणीदार मातीच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकतात. गांडूळ खतासाठीसुद्धा कंपोस्ट
खताप्रमाणेच पिकांचे अवशेष जनावरे,
पक्षी व प्राण्यांपासून मिळणारी उपउत्पादने, हिरवी पिके,
घरातील केरकचरा, झाडांचा पालापाचोळा, इतर कुजणारे टाकाऊ पदार्थ यांचा वापर केला जातो. गांडूळ
खतनिर्मितीसाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मीटर लांबीचे व 90 सें.मी. रुंदीच्या सेंद्रिय
पदार्थाचे ढीग तयार करावेत. प्रथम जमिनीवर पाणी शिंपडून जमीन ओली करावी. ढिगाच्या
तळाशी नारळाचा काथ्या, गवत,
भाताचे तूस यांसारखे लवकर न कुजणा-या पदार्थाचा 3 ते 5 सें.मी. जाडीचा थर
रचावा. त्यावर पुरेसे पाणी शिंपडावे. या स्तरावर 3 ते 5 सें.मी. जाडीचा अर्धवट कु
जलेला मातीचा थर रचावा. या थराचा उपयोग गांडुळांना तात्पुरते निवासस्थान म्हणून
असो. साधारणत: 100 किलो ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून खत तयार करण्यासाठी त्यावर 7
हजार प्रौढ गांडूळ सोडणे गरजेचे आहेत.दुस-या थरावर सर्व प्रकारच्या टाकाऊ
पदार्थाचा वापर करावा. संपूर्ण ढिगाची उंची 60 सें.मी.पेक्षा अधिक होणार
नाही, याची
दक्षता घ्यावी. कुजणा-या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50
टक्के पाणी असावे. गांडूळ खत तयार करण्यासाठी निवा-याची व्यवस्था करावी. हे खत दोन
ते अडीच महिन्यांत तयार होते. आयसेनिया फटीडा आणि युड्रिलस युजिनी या जातीच्या एका
जोडीपासून तीन महिन्यांनंतर 60 गांडुळांची निर्मिती होते. या गांडुळांचा उपयोग
सेंद्रिय खतनिर्मितीसाठी करतात. गांडूळ खत तयार झाल्यावर चाळून गांडूळ बाजूला करून
खत वापरावे.
दै. प्रहार यांचे सौजन्याने ...
शनिवार, ५ एप्रिल, २०१४
सेंद्रिय शेती जनजागृति अभियान
आपला आहार आरोग्यदायी आहे का?
रासायनिक खते, कीटकनाशके आणि तणनाशके इत्यादी रसायनांचा शेतीत अर्निबध वापर होत आहे. त्यामुळे जमिनीचा पोत बिघडून त्या नापीक होत आहेत. भूजलही दूषित होत आहे. युरिया खतातील नाइट्रेटचे अंश भूजलातून पेयजलात पोहोचतात. नाइट्रेटमुळे मानवी रक्ताची प्राणवायूची वहनक्षमता घटते. हृदयविकाराचे हेसुद्धा एक कारण आहे. प्रत्येक पिकाचा एक विशिष्ट हंगाम असतो. इतर हंगामात ती पिकविल्यास रोग आणि किडींचा प्रभाव वाढतो. त्यामुळे कीटकनाशकांचा वापरही वाढतो. म्हणजे, बिगरहंगामी पिके घेणे व त्यांचे सेवन करणे आरोग्यदृष्टय़ा अपायकारकच. केळी, आंबा आणि इतर फळे पिकविण्यासाठी रसायनांचा वापर सर्वत्र आणि सर्रास होत आहे. अर्धी-कच्ची, अपक्व फळे कृत्रिमरीत्या पिकवून बाजारात आणली जातात. यामुळे केळीसारख्या सर्वाना सहज उपलब्ध असणाऱ्या फळाबाबतही आरोग्याच्या दृष्टीने शंका वाटत आहे. आंब्याची कथाही काही वेगळी नाही.
गूळ देखणा दिसावा म्हणून घातक रसायने वापरली जातात. ती न वापरता गूळ केल्यास तो काळपट, लालसर असेल, चमकदार नसेल. असा गूळ ग्राहक पसंत करणार नाहीत, ही उत्पादकाची समजूत असते. ग्राहकांना यातले काहीच माहीत नसते. अमेरिकेत बंदी असलेले (कर्करोगकारक) भेंडीपावडर नावाने शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेले रसायन आता वापरात आलेय. धान्य साठविताना गोदामांमध्ये कीटकनाशकांचा वापर केला जातो. योग्य ती काळजी न घेतल्यास तेथेही प्रदूषण संभवते. कर्करोग, हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, पक्षाघात हे आजार ग्रामीण भागात श्रमजीवींमध्येसुद्धा वाढत आहेत. हे आजार जंतुसंसर्गाचे नव्हे, तर आपल्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आहेत.
निरोगी जीवनासाठी पर्यावरणस्नेही शेती आणि जीवनशैलीच माणसाला तारेल. आरोग्यदायी सेंद्रिय शेती त्यासाठीचे एक पाऊल आहे. मात्र आज त्याही क्षेत्राचे बाजारीकरण व्हायला लागले आहे, ही चिंतेची बाब आहे. सेंद्रिय शेतीची लोकचळवळ करण्यास शहरी ग्राहकांनी हातभार लावावा. शेतकरी कुटुंबांच्या थेट संपर्कात ते यावेत. शेतकऱ्यांचे ते मित्र बनावेत. भरमसाट नफा आकारणारी मधली कडी बाद व्हावी. शहरी जागृत ग्राहकांनी याकामी पुढाकार घेतल्यास चित्र नक्कीच बदलेल.
दै. लोकसत्ता यांचे सौजन्याने ...

सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सेंद्रिय शेती म्हणजे जिवंत पर्यावरणीय रचना आणि जीवनचक्रास समजुन घेउन व रसायनांचा वापर टाळून केलेली एकात्मिक शेती पद्धती होय. सिक्कीमने २०१५ पर्यंत संपूर्ण राज्य सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे ध्येय त्या सरकारने हाती घेतले आहे.
सेंद्रीय शेतीची तत्त्वे
आरोग्याचे तत्त्व
सेंद्रिय शेतीने टिकाव धरावयास हवा व माती,धान्याची रोपे,पशु,पक्षी, मनुष्यप्राणी व निसर्गचक्राचे आरोग्य वाढविणे हा त्यातील अविभाज्य व परिणामकारक घटक हवा.
पर्यावरणीय तत्त्व
सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून व अनुरूप हवी. त्यातील जीवसृष्टीला धरून चालणारी हवी.
निष्पक्षतेचे तत्त्व
सेंद्रिय शेती ही निसर्गचक्रातील परस्परांच्या संबंधात कोणत्याही एका बाजूस कलणारी नसावी. निष्पक्षतेची खात्री देणारी असावी.
संगोपनाचे तत्त्व
यात अंतर्भूत असलेल्या सर्व घटकांचे संगोपन सुयोग्यरित्या व्हावयास हवे.त्याने या पिढीतील व पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य व कल्याण योग्य रितीने राखल्या जाईल.
वैशिष्ट्ये स्थानिक गोष्टी व पुनर्वापर करण्याजोग्या वस्तुंचा वापर
- मातीचा आरोग्य स्तर कायम ठेवण्यास मदत.
- पिके व आजुबाजूस असणाऱ्या वनस्पती यांच्यामधील पोषक तत्त्वांचा व सभोवतालच्याच सेंद्रिय पदार्थांचा पुनर्वापर.
- निसर्गाचे संतुलन कायम राखण्यासाठी,अनैसर्गिक वस्तु,निसर्गाशी अनोळखी जीवांचा (कीटकनाशके,रासायनिक पदार्थ,जीएमओ इत्यादी)
- उत्पादनात वैविध्य
- शेतीवर अवलंबून् असणाऱ्या जीवांना नैसर्गिक जीवन जगण्याचा हक्क देते.पर्यावरण संरक्षणात महत्त्वाची भूमिका.
- अन्न सुरक्षेची खात्री व जीवनमान उंचावण्यास मदत.
- आर्थिक उत्पनात वाढ व खर्चात घट याद्वारे उत्तम आर्थिक नियोजन.
- एकमेकाशी निगडीत पद्धती
विविध टप्पे
शेतातील मातीचे संवर्धन व पोषण:रसायनांचा वापर बंद.सेंद्रिय व जैविक खतांचा वापर करणे.मागे घेतलेल्या पिकांचे उरलेल्या पाने ,बुंधे, फांद्या इत्यादीचा वापर.पिक क्रमचक्र व पिकांत विविधता आणणे.अधिक नांगरणी टाळणे व शेतातील मातीस ओल्या किंवा हिरव्या गवताखाली झाकणे.
- "'तापमान अनुकुलन'":शेताच्या मातीचे तापमान योग्य राखणे व शेतीच्या बांधांवर वनस्पती लावणे जेणे करून जास्त उष्णता निर्माण होणार नाही'
- पावसाचे पाण्याचा व सौर उर्जेचा जास्तीत जास्त उपयोग:पाझर तलाव,शेत तळे तयार करणे,उताराच्या शेतीवर पायरी पद्धत.सारख्या उंचीचे बांध घालणे.सौर उर्जेचा वापर.जास्तीत जास्त हिरवळ तयार करणे.
- नैसर्गिक साखळी,निसर्गचक्राचे पालन: जैववैविध्याची निर्मिती.कीटकनाशक न वापरणे.शेतीचे क्षेत्र,माती, हवामान यास अनुकुल असे पिक घेणे.जैविक नत्राचे स्थिरीकरण(ग्लिरिसिडिया वृक्षांची लागवड)
- प्राण्यांचे एकीकरण: पाळीव जनावरांच्या शेण व मूत्राचा वापर,पशु-उत्पादन.सौर उर्जा, बायोगॅस इत्यादीचा वापर करणे
- स्वावलंबन:स्वतःस लागणाऱ्या बियाण्यांचे उत्पादन.शेणखत, गांडूळ खत ,द्रव खते,वनस्पती अर्क इत्यादीचे स्वतःच उत्पादन करणे.
किटक प्रबंधन
योग्य निवड
- रोगमुक्त बियाण्यांचा वापर करणे.,प्रतिरोधी बियाण्यांचा वापर,जैव विविधतेचे पालन
- पिक रोटेशन
- सापळा पिकांचा वापर करणे
शेतकी उपाय
- पक्ष्यांच्या घरट्यांची स्थापना (पक्षी किड खाउन टाकतात))
- दिव्याचा सापळा,चिकट बश्यांचा वापर,कामगंध सापळे यांचा वापर.
जैविक उपाय
- किटकभक्षक(परजीवी) जैविकांचा वापर,यजमान किटकांचा वापर
वनस्पतीजन्य किटकनाशकांचा वापर
अनेक वनस्पती ह्या किटनाशक असतात.यातील कडुनिंब सर्वात प्रभावी असते.याचे अर्काचा वापर हा किटनियंत्रणात एक महत्वाचा घटक आहे.याने सुमारे २०० किटकांचा उपद्रव नियंत्रणात येतो.
गोमूत्र
१:२० प्रमाणात वापर केल्याने किट नियंत्रण होते व पिकांची वाढपण नीट होते.
आंबवलेले दह्याचे पाणी
दशपर्णी अर्क
नीमास्त्र
ब्रम्हास्त्र
शुक्रवार, ४ एप्रिल, २०१४
श्री गणपतीची आरती

।। श्री गणपतीची आरती ।।
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ति । दर्शनमात्रे मनःकामना पुरती ।। धृ० ।
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणीं घागरिया ।। २ ।।
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना ।। ३ ।।
- समर्थ रामदासस्वामी
- समर्थ रामदासस्वामी
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)