उद्योगपतींच्या शैक्षणिक मुलाखती घेते मिलर यांची कंपनी
दिव्य मराठी न्यूज नेटवर्क |
मिलर आंत्रप्रेन्योर परिवारातील आहेत. त्यांचे वडील स्काय डायव्हिंग बिझनेस करत होते; परंतु त्यांचा मृत्यू एका दुर्घटनेत झाला. तेव्हा मिलर यांचे वय होते फक्त १५ वर्षे. लॉच्या शिक्षणासाठी मिलर यांना स्कॉलरशिप मिळाली.
मिलर आंत्रप्रेन्योर परिवारातील आहेत. त्यांचे वडील स्काय डायव्हिंग बिझनेस करत होते; परंतु त्यांचा मृत्यू एका दुर्घटनेत झाला. तेव्हा मिलर यांचे वय होते फक्त १५ वर्षे. लॉच्या शिक्षणासाठी मिलर यांना स्कॉलरशिप मिळाली. वास्तविक, हायस्कूल पास करताच त्यांनी आपली पहिली कंपनी ‘ऑमेफर’ बनवली. तेव्हा ते १९ वर्षांचे होते. ही कंपनी त्यांनी थोड्याशा फायद्यासोबत न्यूझीलंड सरकारला विकली. यानंतर मिलर यांनी बनवली ‘अनफिल्टर्ड.’ ही कंपनी जगातील प्रसिद्ध बिझनेस लीडर्सचे इंटरव्ह्यू घेते. आतापर्यंत त्यांनी २००पेक्षा जास्त इंटरव्ह्यूचे व्हिडिओ बनवले आहेत. यात व्हर्जिन ग्रुपचे रिचर्ड ब्राॅनसन, टेस्लाचेे को-फाउंडर इयान राइट, न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांच्यासह अनेक नामवंतांचा समावेश आहे. त्यांचे इंटरव्ह्यू विशेषत: शैक्षणिक विषयावर असतात. हे इंटरव्ह्यू ‘अनफिल्टर्ड’च्या सबस्क्रायबर्ससाठी उपलब्ध असतात. शालेय दिवसांत मिलर यांनी रिचर्ड ब्राॅनसन यांची ऑटोबायोग्राफी वाचली अाहे. ते सांगतात की, यामुळे मी खूपच प्रभावित झालो. मीसुद्धा आपला बिझनेस सुरू करण्याबाबत विचार करू लागलो. शाळेतून बाहेर पडताच ‘ऑमफेर’ सुरू केली. वेगवेगळ्या क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेणे, ही त्यांची संकल्पना होती. तेव्हा फोकस फक्त बिझनेसवर होता. अॅक्टर, कॉमेडियन्स, बिझनेसशी संबंधित व्यक्ती, सेलिब्रिटी शेफसह विविध क्षेत्रांतील लोकांकडे आम्ही जात होतो. त्यांना प्रश्न विचारत होतो, कशी सुरुवात केली? व युवा कसे यशस्वी होऊ शकतात? आम्ही या प्रकारे सुमारे २०० इंटरव्ह्यू केले. मग २०१५मध्ये ‘अनफिल्टर्ड’ सुरू केली. यासाठी आतापर्यंत १०० इंटरव्ह्यू केले आहेत. सांगण्याचा उद्देश आहे की, कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारे बिझनेस उभा करू शकते. इंटरव्ह्यूसाठी फक्त लोकच नव्हे, तर कंपन्यासुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सबस्क्राइब करत आहेत. कंपन्या या माध्यमातून अापल्या कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देत आहेत की, कशा प्रकारे बिझनेसमध्ये बदल हाेत आहेत. मिलर यांच्या इंटरव्ह्यू देणाऱ्यांमध्ये न्यूझीलंडमधील काही अशा व्यक्ती सहभागी आहेत की, त्या मीडियाशी बोलण्यापासून बचाव करतात. अशीच एक व्यक्ती अाहे करोडपती स्टीफन जॅनिंग. ते मीडियाशी बोलण्यापासून वाचतात. मात्र, त्यांनी मिलर यांना ५० मिनिटे इंटरव्ह्यू दिला. आपल्या बिझनेसचा विस्तार करण्याबाबत मिलर म्हणतात की, ११ महिनेअगोदर दोन जण एकत्र येऊन त्यांनी कंपनी सुरू केली. आज कंपनीत १० कर्मचारी आहेत. ते तीन देशांत काम करत आहेत. ते अमेरिकेत पैसा कमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. आगामी सहा ते १२ महिन्यांत अमेरिकेत काम सुरू करण्याची योजना अाहे. मिलर सांगतात की, काही आठवड्यांपूर्वी आम्ही जनरल मोटर्सच्या प्रेसिडेंटचा इंटरव्ह्यू घेतला. हे माहिती असणे महत्त्वाचे आहे की, आगामी १० वर्षांत कंपनीची काय स्ट्रॅटेजी आहे. कोणाशीही बोलताना जास्तकरून पॉझिटिव्ह चर्चा समोर येते. आम्ही मीडिया किंवा न्यूज कंपनी नाही. त्यामुळे काही वेगळा अँगल अथवा वादग्रस्त लाइनचा शोध नसतो; ज्यासंदर्भात इंटरव्ह्यू देणारे नंतर म्हणतील की, या लाइनला एडिट करा. खरे तर या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लोकांना एज्युकेट करू इच्छितो.
जॅक मिलर, फाउंडर- अनफिल्टर्ड
जॅक मिलर २१ वर्षांचे आहेत. बिझनेस एज्युकेशनच्या पॅशनला त्यांनी एक नवीन प्रकारे व्यवसायात बदलवले आहे. ही कंपनी जगातील प्रसिद्ध बिझनेस लीडर्सचे इंटरव्ह्यू घेते. आतापर्यंत त्यांनी २००पेक्षा जास्त इंटरव्ह्यूचे व्हिडिओ बनवले आहेत. त्यांचे इंटरव्ह्यू एज्युकेशनल टॉपिकवर असतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा