मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

शिक्षण क्षेत्र: आईवडिलांच्या एका शाळेचा विस्तार १९ देशांत



शिक्षण क्षेत्र: आईवडिलांच्या एका शाळेचा विस्तार १९ देशांत
दिव्य मराठी 
सनी दोन वर्षांचे असताना वडील ब्रिटिश बँकेत काम करण्यासाठी दुबईत आले होते.







कर्तृत्व | सनी वर्की, दाते, आंत्रप्रेन्योर
>जन्म- १९५७
>वडील- केएस (बँकर होते), आई-मिरिअम्मा(शिक्षिका),
एक थोरली बहीण
>शिक्षण- केरळच्या कॅथॉलिक बोर्डिंग स्कूलनंतर ब्रिटनच्या बेंब्रिज
स्कूल आणि दुबईच्या ब्रिटिश काैन्सिलमधून ए-लेव्हल केली.
>कुटुंब- पत्नी, दोन मुले - डिनो आणि जय

चर्चेत- त्यांनी नुकतीच आपली अर्धी संपत्ती शिक्षण क्षेत्रासाठी दान केली.

सनी दोन वर्षांचे असताना वडील ब्रिटिश बँकेत काम करण्यासाठी दुबईत आले होते. रिकाम्या वेळेत त्यांची आई आणि वडील लोकांना इंग्रजी शिकवत होते. एके दिवशी अरब राजघराण्याकडून त्यांना बोलावणे आले होते. सन चार वर्षांचे होते तेव्हा आईवडिलांनी कॅथॉलिक बोर्डिंग स्कूलमध्ये शिकण्यासाठी केरळला पाठवले. ११ व्या वर्षी त्यांच्या मनात आंत्रप्रेन्योरशिप जागृत झाली. जास्तीचा पैसा कमावण्यासाठी ते कधी कधी फळविक्रीही करत होते. १९७७ मध्ये ते दुबईत परत आले.

आईवडिलांनी १९६८ मध्ये एक इंग्रजी शाळा सुरू केली होती. त्या काळात अरब देशांत केवळ अरबी शाळाही असत. आईवडिलांनी सुरू केलेल्या शाळेत ४०० मुले होती. त्यानंतर वर्की यांनी त्याचा विस्तार करण्याचा निश्चय केला. त्यांनी भारतीय, पाकिस्तानी आणि ब्रिटिश शाळा सुरू केली. यामध्ये सीबीएसईपासून आयसीएसईपर्यंत कोर्स शिकवले जाऊ लागले. अरब देशांत शाळांचे नेटवर्क स्थापन केल्यानंतर वर्की यांनी ग्लोबल एज्युकेशन मॅनेजमेंट सिस्टिम सुरू केली. ही आज जगातील सर्वात मोठी प्रा. स्कूल कंपनी आहे. त्यांच्यामार्फत जगातील १९ देशांत १०० पेक्षा जास्त शाळा चालवल्या जातात. २००४ मध्ये त्यांनी भारतात पहिली शाळा सुरू केली. एका मुलाखतीत दान देण्याचे संस्कार वडिलांपासून मिळाल्याचे त्यांनी सांगितले. वडील कुटुंबाच्या गरजांकडे डोळेझाक करत जास्त दान करत होते. आता त्यांनी ६७,६१० कोटी रुपयांची संपत्ती दान केली आहे. २०१२ मध्ये त्यांनी दुबईत वेस्टमिनिस्टर स्कूल बंद करण्यास सांगितले तेव्हा त्यांच्या कंपनीची प्रतिमा खराब झाली होती. कमी पैशात चांगले आणि पुरेसे शिक्षण दिले जाऊ शकत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. मोठी बहीण सुसन नर्सरीचे काम पाहते. पत्नी आणि आई त्यांच्या कामात सहकार्य करतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल