ट्रम्प यांच्या सर्वात माेठ्या दात्याने १२ व्या वर्षी सुरू केला व्यवसाय
शेल्डन एडलसन यांचा जन्म मेसाच्युसेट्समध्ये १९३३ मध्ये झाला. गरिबीपासून श्रीमंतापर्यंत त्यांचा प्रवास अाश्चर्यकारक अाहे. त्यांचे वडील टॅक्सी-कॅब चालवत हाेते. अाई लहान-माेठी शिवण्याची कामे करत हाेती. गरिबीमुळे परिवाराचा खर्च चालवणे अवघड हाेते.
शेल्डन एडलसन यांचा जन्म मेसाच्युसेट्समध्ये १९३३ मध्ये झाला. गरिबीपासून श्रीमंतापर्यंत त्यांचा प्रवास अाश्चर्यकारक अाहे. त्यांचे वडील टॅक्सी-कॅब चालवत हाेते. अाई लहान-माेठी शिवण्याची कामे करत हाेती. गरिबीमुळे परिवाराचा खर्च चालवणे अवघड हाेते. यामुळे शेल्डन यांनी वृत्तपत्रे विकणे सुरू केले. कमी वर्षांत आंत्रप्रेन्योर झालेले शेल्डन यांनी वयाच्या १२व्या वर्षी पहिला व्यवसाय सुरू केला. ते टॉयलेटरीज विकत हाेते. अाज एडलसन लास वेगास सँड्स कॉर्पोरेशन बोर्डाचे चेअरमन अाणि सीईओ अाहेत. १९७०मध्ये एका काॅम्प्युटर ट्रेड शो ‘कॉमडेक्स’मुळे त्यांचे नशीब बदलले. एडलसन यांनी ५०पेक्षा जास्त कंपन्या सुरू केल्या. त्यांनी तयार केलेला ‘कॉमडेक्स’ ट्रेड शो २०पेक्षा जास्त देशांमध्ये सुरू अाहे. १९९५मध्ये त्यांनी जपानच्या साॅफ्ट बंॅकेस हा ‘काॅमडेक्स’ शाे विकून टाकला. २००४मध्ये एडलसन यांना संॅड्स मकाऊ सुरू केले. हे अाशियात अमेरिकन स्टाइलचे पहिले कसिनाे हाेते. या कसिनाेने एडलसन यांना श्रीमंतापेक्षा जास्त श्रीमंत बनवून दिले.
एडलसन यांनी न्यूयाॅर्कच्या सिटी काॅलेजमध्ये कॉर्पोरेट फायनान्ससाठी प्रवेश घेतला हाेता; परंतु दाेन वर्षांत त्यांनी ड्रॉप आऊट केले अाणि अमेरिकन अार्मीत दाखल झाले. आर्मी सर्व्हिसनंतर मॉर्गेज ब्रोकर अाणि गुंतवणूक सल्लागार म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्यानंतर बोस्टनमध्ये रिअल इस्टेट ब्रोकरेजचा व्यवसाय सुरू केला. १९६०च्या दशकात अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली; परंतु ताे काळ मंदीचा असल्यामुळे त्यांना माेठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले. १९७०च्या दशकात त्यांनी अापला मॉर्गेज बिझनेस रुळावर अाणण्याचा प्रयत्न केला. एका प्राॅपर्टी मार्केटसाठी ट्रेड शाे करण्याची चांगली संधी त्यांना मिळाली. त्यांची भेट एका प्राॅपर्टी मॅगझिनच्या प्रकाशकाशी झाली. ते अनेक मॅगझिन काढत हाेते. त्यात काॅम्प्युटर युजर्सच्या कामाचे मॅगझिनही हाेते. यामुळे एडलसन यांना वाटले की, या पद्धतीचे शाे काॅम्प्युटर बिझनेसमध्येेही करता येऊ शकतात. त्यानंतर त्यांनी काॅम्प्युटर इंडस्ट्रीसाठी ट्रेड शो सुरू केले.
एडलसन म्हणतात, ‘जेव्हा मी काेणताही व्यवसाय करताे, तेव्हा सर्वात अाधी पाहताे की, त्या व्यवसायाचे भवितव्य किती वर्षे असेल. म्हणजेच, किती वर्षे अापण हा व्यवसाय करू शकताे.’ यामुळे एडलसन त्या माेजक्या लाेकांमध्ये अाहेत, ज्यांनी चीनमध्येही यश मिळवले अाहे. अमेरिकेत या वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांनी रिपब्लिकन पार्टीसाठी सर्वात माेठी देणगी दिली. अमेरिकेत सर्वात कमी वेळात श्रीमंत झालेल्या लाेकांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. मात्र, इतर श्रीमंतांच्या तुलनेत त्यांना कमी प्रसिद्धी मिळाली. कसिनोसंदर्भात त्यांनी अनेक बेसिक रूल बदलले. कसिनाेचे जुने डिझाइन घेतले. ते म्हणतात, ‘जुन्या डिझाइनचे कसिनाे लाेकांना जास्त अावडतात.’ एडलसन यांनी लास वेगासमधील लाेकांसमाेर हे सिद्ध करून दाखवले की, नवीन पद्धतीची अंमलबजावणी करू शकतात. एडलसन यांनी दाेन लग्ने केली अाणि त्यांना पाच मुले अाहेत. ते काेट्यवधी रुपये चॅरिटेबल कामांसाठी खर्च करतात. ते म्हणतात, ‘माझ्याकडे नेहमी अपेक्षेपेक्षा जास्त पैसे अाणि काम अाहे.’ त्यांचे मित्र म्हणतात, एडलसन स्वत: अापल्यासाठी लक्ष्य तयार करतात अाणि जेव्हा त्यात यशस्वी हाेतात.
अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या पक्षासाठी त्यांनी ४७ दशलक्ष डॉलर्सचा निधी दिला.
फोर्ब्जनुसार त्यांची एकूण संपत्ती ३१०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त अाहे.
लहान असताना कुटुंबाच्या मदतीसाठी वृत्तपत्रे विकली. ७०च्या दशकात केला काॅम्प्युुटर ट्रेड शो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा