स्मृती- मायकेल फरेरो, फरेरो रोशर व न्यूटेला कंपनीचे मालक
दिव्य मराठी टीम |
फरेरो एम्पायरला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे श्रेय मायकेल यांना जाते. मात्र, त्यांचे वडील पेट्रो यांनी १९४० च्या दशकात न्यूट्रेलामध्ये कंपनीची स्थापना केली होती.
श्रीमंत कँडीमॅन, संपत्ती 1385 अब्ज रुपये-
फरेरो एम्पायरला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे श्रेय मायकेल यांना जाते. मात्र, त्यांचे वडील पेट्रो यांनी १९४० च्या दशकात न्यूट्रेलामध्ये कंपनीची स्थापना केली होती. मायकेल यांनी वडिलांचे स्वप्न जगातील सर्वात मोठ्या कॉन्फेक्शनरी एम्पायरमध्ये रूपांतरित केले. १९४६ मध्ये दुस-या महायुद्धादरम्यान पेट्रो यंानी इटलीत एका कॉफी बारमध्ये कामाची सुरुवात केली.
१९४९ मध्ये मायकेल वडिलांच्या कामात मदत करू लागले. सुरुवातीस न्यूटेला तयार करण्यासाठी कोकोचा वापर केला होता. मात्र, जागतिक युद्धानंतर कोको महाग झाले आणि पुरवठा कमी होऊ लागला तेव्हा लोकल नट्सचा वापर करून कोको-हेजलनट बेसद्वारे न्यूटेला तयार केले. चॉकलेट बेसमुळे त्याचा लूक ब्रेडसारखा होता. यानंतर त्यास क्रीम फॉर्म देण्यात आला व फरेरो स्पा कंपनीची स्थापना केली. हेजलनटपासून तयार न्यूटेलाची चव लोकांना आवडू लागली आणि एप्रिल १९६४ मध्ये ११ फरेरो कारखान्यांत जगभरात ३,६५,००० टन न्यूटेला तयार झाले. एक वर्षानंतर मिल्क बेस्ड किंडर चॉकलेट लाइन लाँच करण्यात आले. १९८२ मध्ये फरेरो रोशर चॉकलेट बनवण्यात आले. आजारी असतानाही मायकेल आठवड्यातून एक दिवस अल्बा येथील सर्वात मोठ्या चॉकलेट कारखान्यात नवी रेसिपी टेस्ट करण्यासाठी जात होते. इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जियो मेटारेला यांनी देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते बॉर्न आंत्रप्रेन्योर होते या शब्दांत त्यांनी गौरव केला. ब्लमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांची संपत्ती १४.४ अब्ज पाउंड (१३८५ अब्ज रुपये) असल्याचे सांगितले. इटलीतील ही सर्वाधिक संपत्ती आहे. फोर्ब्जने त्यांच्या कुटुंबाला जगातील अब्जाधीशांच्या यादीत ३० वे स्थान दिले आणि त्यांना "द रिचेस्ट कँडीमॅन ऑन द अर्थ'चा किताब दिला.
एकूण मालमत्ता-१३८५ अब्ज रुपये, इटलीत सर्वाधिक
एकूण कंपन्या- ७०
प्रॉडक्शन युनिट- १५
कर्मचारी- २२ हजार
कुटुंब : मारिया फ्रेंका(पत्नी), पेट्रो ज्युनियर फरेरो व जियोवनी फरेरो. थोरल्या मुलाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू. लहान जियोवनी कंपनीमध्ये सीईअो.
हे सर्व ब्रँड : न्यूटेला, फरेरा रोशर, मॉन चेरी, किंडर चॉकलेट, टिक टॅक (पॉकिट मिंट), िकंडर एग्ज, पॉकिट कॉफी.