बुधवार, ५ डिसेंबर, २०१८

#ब्रँड नेम आणि #लोगो तुमच्या व्यवसायाची ओळख असतात,


#ब्रँड नेम आणि #लोगो तुमच्या व्यवसायाची ओळख असतात, तर #ट्रेड_मार्क हे तुमच्या ब्रँड चे संरक्षक कवच. तुमचा व्यवसाय हा तुमच्या ब्रँड नेम आणि लोगोवरून ओळखला जातो आणि ट्रेड मार्क तुमच्या ब्रँड चा इतर कुणाला त्याचा बेकायदेशीर वापर करण्यापासून रोखतो. म्हणूनच व्यवसायात या तीन गोष्टींचे अनन्यसाधारण महत्व आहे. ब्रँड नेम शिवाय तुमचा व्यवसाय शून्य आहे, लोगोशिवाय तुमचा व्यवसाय अपूर्ण आहे, आणि ट्रेड मार्क शिवाय तुमचा व्यवसाय असुरक्षित आहे.



उद्योजक मित्र - Udyojak Mitra

व्यवसायातील घोडचूका ...

व्यवसायाचे व स्वतःचे कोणतेही आर्थिक रेकॉर्ड नसणे बऱ्याच जणांचा एखादा घरगुती व्यवसाय असतो. काहींचा वर्षानुवर्षा...
बऱ्याच जणांचा एखादा घरगुती व्यवसाय असतो. काहींचा वर्षानुवर्षांपासून व्यवसाय चालू असतो. कुणी दुकान चालवत असतं तर कुणी एखादा लघुद्योग करत असतं, कुणी स्वयंरोजगाराच्या कामात असतो तर काहींचे भविष्यात व्यवसाय सुरु करण्याचे नियोजन असते. पण हे सर्वजण एका गोष्टीत सपशेल अपयशी असतात... आर्थिक रेकॉर्ड....
UDYOJAKMITRA.COM

#Top_Indian_Companies

#Mahindra & Mahindra...
देशातील एक अग्रगण्य प्रवासी व कमर्शियल वाहने उत्पादक तसेच जगातील सर्वात मोठ्या ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांपैकी एक कंपनी. आनंद महिंद्रा आणि पवनकुमार गोएन्का यांच्या नेतृत्वाखाली कंपनी मार्गक्रमण करत आहे. ९८,००० कोटींचे मार्केट कॅपिटल आणि ४०,००० जणांना रोजगार देणारी हि कंपनी आहे. सोबतच लाखभर अप्रत्यक्ष रोजगार सुद्धा कंपनी निर्माण करते. ऑटोमोबाईल कंपनी प्रत्यक्ष पेक्षा अप्रत्यक्ष रोजगार जास्त निर्माण करते. अप्रत्यक्ष म्हणजे व्हेंडर कर्मचारी, काँट्रॅक्टर्स चे कर्मचारी, स्थानिक रोजगार इत्यादी.
कंपनीची सुरुवात J.C. महिंद्रा, K.C. आमो मलिक गुलाम मोहम्मद या तिघांनी १९४५ साली लुधियाना येथे केली होती. सुरुवातीला कंपनीचे नाव Mohammad & Mahindra असे होते. कालांतराने १९४७ च्या फाळणीमधे मलिक गुलाम मोहम्मद पाकिस्तानात निघून गेले आणि पाकिस्तानचे पहिले अर्थमंत्री झाले. यानंतर १९४८ मधे कंपनीने नावात बदल करून Mahindra & Mahindra असे नाव केले.
देशातील SUV वाहनांच्या मार्केट मधे महिन्द्राचा दबदबा आहे, तर ट्रॅक्टर क्षेत्रात कंपनी अव्वल आहे. सोबतच कमर्शियल वाहनांच्या निर्मितीतही कंपनी काम करते. २०११ च्या Fortune India 500 यादीमधे कंपनीचा २१ वा क्रमांक होता.

मार्केट आपोआप बनण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. ...

मार्केट आपोआप बनण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. 
आता मार्केट नियोजनपूर्वक तयार केलं जातं.
हे मार्केट तयार करण्याचं काम कुणीही करू शकत.
फक्त आपण व्यावसायिकांनी एकमेकांना स्पर्धक न मानता सहकारी मानलं पाहिजे.












उद्योजक व्हा !...

२० वर्षांपूर्वी हा व्यक्ती आपल्याप्रमाणेच एक सामान्य उद्योजक होता... त्यामुळे हे आपल्याच्याने शक्य नाही असं वाटायचं काहीच कारण नाही. एक चांगली संकल्पना, धाडस आणि नियोजन असेल तर आपणही २० वर्षात स्वप्नवत यश मिळवू शकतो. जेफ बेझोस यांची संपत्ती आता १५० अब्ज डॉलर्स च्या पुढे गेली आहे. त्यांची संपत्ती प्रति सेकंद रु. ७५,०००/- या वेगाने वाढत आहे. 

संपत्ती आणि रोख रक्कम यात जमीन अस्मानाचा फरक आहे हे लक्ष्यात घ्या बरका.. बेझोस यांचे रोख उत्पन्न कदाचित जास्त वाढले नसेल पण त्यांची संपत्ती सेकंदाला जवळपास लाखाच्या वेगाने वाढत आहे. म्हणून महिना किती उत्पन्न मिळेल असले प्रश्न विचारण्यापेक्षा निवडलेला व्यवसाय जास्तीत जास्त मोठा कसा होईल याकडे लक्ष द्या. व्यवसाय मोठा झाला कि पैसा आपोआपच वाढतो.
आता बेझोस सेकंदाला ७५,०००/- रुपये कमावत असेल तर आपण सेकंदाला किमान १ रुपया कमवायचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवायला काहीच हरकत नाही... नाही का? आणि तुमचे हे उद्दिष्ट पूर्ण झाले असेल तर पुढचा टप्पा आत्ताच्या उत्पन्नापेक्षा किमान दुप्पट असायला हवा...
आणि महत्वाचे म्हणजे हे उद्दिष्ट गाठण्याची क्षमता फक्त उद्योजकांमध्येच असते. म्हणूनच ते जगातील एकूण लोकसंख्येच्या फक्त ५% असतात.
उद्योजक व्हा...

#मारवाडी समाज आणि #धंदा..

#मारवाडी समाज आणि #धंदा
व्यवसाय धंदा म्हटल कि #मारवाडी हा शब्द किंवा समाज आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो - आणि लगेच आपसूक वाक्य बाहेर पडतं, "" धंदा करायचं आपल काम नाही, धंदा करावा फक्त मारवाड्यानीचं "". अस का म्हणतो आपण किंवा अस काय आहे की ज्यामुळे #धंदा आणि मारवाडी हे सूत्र सहज जुळत ????
मित्रांनो, आपण मारवाडी समाजाची श्रीमती पाहतो - पण त्यामागचे त्यांचे कष्ट पाहतो का ?? त्यामागचा त्यांचा त्याग पाहतो का - एवढी श्रीमंती येण्यासाठी त्यांना कितीतरी अडचणीना सामोरे जावं लागत पण त्याही पलीकडे मारवाडी लोक हे कोणताही व्यवसाय करण्या अगोदर तो व्यवसाय ते लोक जगतात अर्थात त्या व्यवसायात काम करतात - म्हणजे त्यांना त्या व्यवसायातील पूर्ण माहिती मिळते मग शक्यतो त्यातून नफा जरी लवकर मिळाला नाही तरी तोटा मात्र कमी होतो किंबहुना होतंच नाही .... त्यांना कोणताही व्यवसाय करायची अजिबात लाज वाटत नाही - दुकानात असल्यावर ते एकदम साधे simple राहतात- कोणताही गिऱ्हाइक तुटणार नाही याची नेहमी काळजी घेतात - त्यांच्या बहुतेक कुटुंबातील सगळी लोक एकमेकाना समजून घेत व्यवसायात एकमेकांना मदत करतात -
नवीन कोणी व्यवसाय करत असेल तर एक समाज म्हणुन त्याला सर्वजण सांभाळून घेतात - आर्थिक बाजून तर घेतातच परंतू त्याला प्रोत्साहन देतात- मानसीक आधार देतात- त्यामुळे उद्योजकतेची मानसीकता आणि त्याबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या समाजात कायम नेहमी दिसून येतो....
अजून एक मुद्दा आवर्जून सांगावा लागेल तो म्हणजे, मारवाडी समाजातील तरून पोरांकडे नम्रपणा खूप असतो - थोर मोठ्याशी ते अगदी अदबीने बोलतात त्यांचा आदर करतात - त्यांच्या दुकानात तुम्हांला म्हातारी वृद्ध मंडळी गल्ल्यावर बसलेली शंभर टक्के दिसणार- त्यामुळे वयस्कर माणसांच्या अनुभवाचा फायदा धंद्यात सहज होऊन जातो - दुसऱ्या बाजूला या समाजामध्ये व्यसनाधीनता फार कमी आहे - शक्यतो दारुडा रस्त्यावर पडलेलाा व्यक्ती किंवा तरुण मारवाडी नसतोच - तुम्हांला शाळा कॉलेज मध्ये फालतू टुकारगीरी करताना- कट्ट्यावर- बाईकवर मोक्कार बोंबलत फिरताना - बापाच्या पैशावर पार्टी करताना - मित्रांना दारू पाजताना मारवाडी पोरगा विरळच दिसेल -
चिकट समाज म्हणून त्यांना सातत्याने हिनंवल जात- पण जरा माहिती काढा भारतात सर्वात जास्त दान धर्म करणारा हाच समाज आहे -शाळा - संस्था- हॉस्पिटल- अन्नदान -रक्तदान -वृद्धाश्रम- अनाथालय - वसतिगृह - अपंगाना- अश्या गरजेच्या ठिकाणी सर्वात जास्त यांचीच मदत असते - मात्र हि मंडळी योग्य ठिकाणी - योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनेच मदत करतात - आणि दान करतात म्हणूनच हे लोक धनवान आहेत -
मारवाड्याकडे श्रीमंती असते यापेक्षा त्यांना श्रीमती टिकवता येते कारण श्रीमती टिकवण्याचे सगळे गुण त्यांच्याकडे आहेत त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा मोठा धनदांडगा वारसा या समाजाला नव्हता- स्वतःच्या हजारो एकर जमीनीही नव्हत्या- परंतू मिळेल त्या ठिकाणी असेल त्या अवस्थेत - आहे त्या परिस्थितीमध्ये लाज न बाळगता - शांत-संयमी आणि नम्र राहून आपल्या मारवाडी बांधवांनी #जिद्द चिकाटी-सचोटी-एकजूट- जागरूकता- आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नम्रता ह्या या उपयुक्त गुणांच्या जोरावर व्यापारी क्षेत्रात स्वतःची ताकद उभी केली आहे-
शेवटी काय एक #उद्योजक म्हणून तुम्ही नेहमी सकारात्मक राहून आसपास ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आत्मसात केल्या पाहिजेत - आणि मारवाडी समाजाचा द्वेष न करता त्यांच्याकडून खूप खाही शिका- फायदा होईल.....।।




-9850504505

''व्यवसायाची कल्पना बिझनेस लहान पण नफा जास्त''...

''व्यवसायाची कल्पना बिझनेस लहान पण नफा जास्त''
"एक असा बिझनेस जो आपल्याला कमी भांडवली आणि जास्त नफा मिळवून देणारा असेल तर तो बिझनेस करायला आवडेल न", आज मी तुम्हला एका अशाच बिझनेस बद्दल सांगणार आहे. हा बिझनेस कमी भांडवलामध्ये आणि कमी खर्चात कोणीही चालू करू शकतो,
चला तर मग त्या बिझनेस बद्दल आपणसर्वजण माहिती करून घेवूया कि तो असा कोणता बिझनेस आहे. या बिझनेस नाव आहे चहा चे दुकान किवा चहाचा Stall सुरु करणे, हा बिझनेस ज्यादातर शहरी भागात अतिशय चांगला प्रमाणात चालणा सारखा आहे. कारण कि या बिझनेस साठी वर्दळ ची जागा हवी असते आणि अशी वर्दळ हि शहरी भागातच असतेच म्हणजे कि कॉलेज,सरकारी कार्यलय,कोर्ट,बसस्थानक रेल्वे-स्था-नक,इत्यादी ठिकाणी होय.
उदाहरण देवून मी तुम्हला स्पष्ष्टीकरण देतो, कि हा बिझनेस किती फायदेशीर आहे तो,
समजा विकासने चहाचे दुकान चालू केले आणि त्याचे दुकान हे सरकारी कार्यालयाच्या जवळच आहे. तो स-काळी लवकर ७ वा.दुकान चालू करतो आणि ११ वा. बंद करून सायंकाळी परत ४ वा. चालू करून परत ९ वा.बंद करतो, तर त्याचे सकाळी ५०० कप आणि संध्याकाळी ५०० कप असा चहा करून तो विकतो, म्हणजे तो दिवसाला १००० कपचहा विकतो. आता आपण व्यवसायच गणित पाहूया !
रोज १००० कप आणि एक कपची किंमत १०रुपये होय.
तर
१,०००*१०=१०,००० (रोजचा व्यवसाय १०,००० रुपये)
१०,०००-३००० =७,००० (यामधून खर्च वजा ३,००० रुपये)
७,००० निव्वळ नफा (तर डेलीचा ७,००० नफा रुपये)
म्हणजे
दिवसाला निव्वळ नफा ७,००० रुपये,
७,०००*३०=२,१,०००० (एक महिना २,१,०००० रुपये)
२,१,००००*१२=२,५२,०००० (वर्षच २,५२,०००० रुपये दोन कोटी बावन लाख रुपये फक्त)
''बघा वाटतय का एक चहावाला येवडे कमवीत असेल''.





लेखक - विकास जगताप. Vikas Jagtap
(Inspiring Things & Stories - Page Editor)

माझ्याबद्दल