शुक्रवार, १६ जून, २०१७

सेंद्रिय खते जमिनीचा कस वाढवतात?

कोणत्याही जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक असे तीन गुणधर्म असतात. या तिन्ही घटकांचा समतोल जेथे असेल ती जमीन अधिक उत्पादनक्षम बनते. तिच्यात जसे रासायनिक , कार्बनिक पदार्थ असतात तसेच अनेक जीवांचे ते वसतिस्थान असते. अनेक बॅक्टेरिया, प्रोटोझोआ , शेवाळ, बुरशी, गांडुळे, आणि अन्य छोटे जीव जमिनीत राहून तिच्यातील कार्बनयुक्त पदार्थांचे खतात रुपांतर करत असतात. शिवाय जमिनीतील अकार्बनिक पदार्थांना विघटित करून वनस्पतींना उपयुक्त पदार्थ तयार करण्याचे काम ते करत असतात. जमिनीतील काही जीवाणू जमिनीमध्ये अमिनो अ‍ॅसिड्स व्हिटॅमिन्स बनवतात . तर काही जीवाणू मुळांना आवश्यक अशी हार्मोन्स तयार करतात. बुरशीसारखे जीवाणू अ‍ॅन्टिबायोटिक्सचे काम करून किटाणूंची वाढ रोखण्याचे काम करतात. जमिनीतील ओलावा टिकवण्याचे आणि खताचे प्रमाण वाढविण्याचे काम गांडुळे करतात. जमिनीतील सारेच जीवाणू जमीनीत ह्यूमसचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. ह्युमसमुळे जमीन हवेशीर ओलसर व भुसभुशीत रहाते. आणि अंततः जमिनीची सुपिकता टिकून रहाते.
परंतु अमाप उत्पादनाच्या हव्यासापोटी भारतात भरमसाठ रासायनिक खते, कीटकनाशके वापरली जाऊ लागली आणि त्यामुळे जमिनीतील जैवविविधता नष्ट होऊ लागली. त्यामुळे जमिनीत नैसर्गिकरित्या खत तयार होणे बंद झाले. जमिनीचा रासायनिक आणि जैविक समतोल बिघडल्याचा तो परिणाम आहे. हा बिघडलेला समतोल परत आणायचा तर सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. अगदी सोप्या पद्धतीने बनवण्यात आलेली ही सेंद्रिय खते जमिनीचा कस वाढवतात,जमिनीच्या सुपिकतेबरोबरच जमीन निरोगी बनवण्यासाठी ती उपयुक्त ठरतात.

१] शेण खत :--- एका गायीपासून दिवसाला सरासरी दहा ते बारा किलोगॅम ताजे शेण मिळते. ते रोजच्या रोज पिकांना घालता येते. शिवाय मुबलक प्रमाणात शेणखत तयार करता येते. त्यासाठी पाच फूट गोलाकार व्यासाची जागा तयार केली जाते. त्यामध्ये जवळ जवळ एक टन जुने शेण टाकून त्याचा ढीग केला जातो त्या ढीगामध्ये एक किलोग्रॅम कल्चर मिश्रणाची भुकटी मिसळली जाते. त्यात रोज थोडे थोडे पाणी घातले जाते. दर आठवड्याला ढीग उपसून वरखाली केला जातो. अशा प्रकारे चार आठवड्यात काळेभोर ४०० किलोग्रॅम इतके शेणखत तयार होते.

२] गांडुळखत :--- गांडुळ जेवढे खातात तेवढीच विष्टा टाकतात. ही गांडुळ विष्टा म्हणजेच गांडुळखत. गांडुळखत तयार करण्यासाठी ओलावा, दाट सावली आणि शेण किंवा अर्धवट कुजलेला कचरा यांची गरज असते. गांडुळखत तयार करण्यासाठी ३ फूट रुंद, २ फूट उंच आणि पाहिजे तेवढा लांब असा हौद तयार केला जातो. त्यात क्रमाने काडीकचरा, शेण टाकले जाते. आणि गांडुळे सोडली जातात. दररोज त्यात पाणी घालून ओलावा टिकवला जातो. काही दिवसानी गांडुळखत तयार होते. ते शेणखतापेक्षा तीन ते चार पट जास्त परिणामकारक असते.

३] समाधी खत :--- गायीचे आयुष्य सामान्यतः अठरा ते वीस वर्ष इतके असते. गाय मृत झाल्यावर तिचे चामडे काढले जाते. आणि तिला एका झाडाखाली खड्डा खणून पुरले जाते. साधारणतः वर्षभरात तिचे खतात रुपांतर होते. यालाच अणुखत किंवा समाधी खत असे म्हणतात.

४] शिंग खत :--- मृत गायींची पोकळ शिंग हे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. अशा शिंगांमध्ये शेण भरले जाते. नंतर जमिनीमध्ये तीस ते चाळीस से.मी. खोल खड्डा खणला जातो. त्यामध्ये शिंगाचा निमुळता भाग वरच्या बाजुला राहील अशारितीने शेण भरलेली शिंगे पुरली जातात. या खड्ड्यातील माती ओलसर रहावी यासाठी त्यावर पाणी शिंपडले जाते. सहा महिन्यानंतर जमिनीतून शिंग बाहेर काढली जातात आणि त्यातील खत काढून मातीच्या डेर्‍यात साठवले जाते.

५] अमृतपाणी :--- शेण, गोमूत्र,गूळ यांचे सडवलेले पाणी म्हणजे अमृतपाणी. ते बनवण्यासाठी तीस किलो ताजे शेण, दहा लिटर गोमूत्र, दिड किलो गूळ, दिड किलो डळीचे पीठ, पाचशे ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि तीस लिटर पाणी लागते. हे सर्व मिश्रण चार ते पाच दिवस एका ड्रममध्ये भरून ठेवतात. रोज सकाळी ते मिश्रण ढवळले जाते. पाचव्या दिवशी त्यात आणखी पाणी मिसळून अमृतपाणी बनवले जाते. हे अमृतपाणी झाडांना घातल्यावर झाडाचा पोत सुधारतो. शिवाय किडींचे नियंत्रण होते.

६] व्हर्मिवॉश :--- गांडुळ आपल्या शरिरातून एक चिकट द्रव सोडत असतात. गांडुळखत तयार करताना त्यात जे पाणी असते त्यात तो द्राव मिसळलेला असतो त्यालाच व्हर्मिवॉश असे म्हणतात. त्यामध्ये किटकनाशक, बुरशीनाशक आणि अन्य संप्रेरके असतात.





















http://www.chanefutane.com/articles.php?articlesid=289

गांडूळा चे शेतीसाठी फायदे -...

गांडूळा चे शेतीसाठी फायदे -
१) गांडूळामुळे जमिनीचा पोत सुधारतो.
२) मातीच्या कणांच्या रचनेत उपयुक्त बदल घडविला जातो.
३) गांडूळाच्या विष्टे पासून वनस्पतींना आवश्यक नत्र, फॉस्फरस, --- व अनेक सूक्ष्म अन्नद्रव्य मिळत असून ताबडतोब पिकांना उपलब्ध होत असते.
४) मुळे अथवा झाडांना इजा न होता जमिनीची नैसर्गिक मशागत होऊन जमिनीत हवा खेळती राहते. व झाडांची चागली वाढ होते.
५) जमिनीची जलधारणा क्षमता वाढते
६) जमिनीत धूप कमी होते
७) पाण्याचे बाष्पीभवन फार कमी होते
८) जमिनीचा सामू योग्य राखला जातो
९) गांडूळ खालची माती वर आणतात व तिला उत्तम व सकस बनवितात
१०) जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्याची वाढ होते.
१ १) जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंच्या संख्येत वाढ होऊन इतर खते कमी द्यावी लागतात.
१२) झाड सशक्त होऊन झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते
१३) फळांत टिकाऊपणा येउन लवकर पक्वता येण्याचे प्रमाण वाढते व फळांना रंग, चव, प्रत सुधारते
१४) नापीक जमीन सुपीक करण्याचे सामर्थ्य गांडूळात असते

व्हर्मीवॉश म्हणजे काय ?

"व्हर्मीवॉश म्हणजे गांडूळाच्या सर्वांगावरून निथळून आलेले (आंघोळीचे) पाणी होय

व्हर्मीवॉशचे फायदे -
१) व्हर्मीवॉश हे जेंविक बुरशी नाशकाची भूमिका पार पाडते
२) सूक्ष्म अन्नद्रव्ये नत्र, स्फुरद, पालाश याद्वारे सेंद्रिय स्वरुपात पिकांना उपलब्ध होत असल्याने रासायनिक खतांची बचत करण्यास नकळत पणे मदत करणे.
३) व्हर्मीवॉश हे सेंद्रिय असल्याने पिके निरोगी सशक्त व सुरक्षित अन्न म्हणून वापरतात
४) यांच्या वापराने शेतमाल निर्यातक्षम प्रतीचा देखील बनू शकतो
५) बाजारातून व्हर्मीवॉशचा अंश असलेली ओषधे विकत आणण्यापेक्षा ती घरच्याघरी तयार करावी. त्यामुळे आपल्याला ९० % नी स्वस्त पडते.
६) व्हर्मीवॉशची आवश्यकतेनुसार १:५ अथवा १:१० या प्रमाणात फवारणी केल्यास उत्पादन वाढीला लागते. उदा. फुलशेतीत हे व्हर्मीवॉश मूळस्वरुपात १:१ या प्रमाणात मिसळून फवारले असता फुलझाडांच्या १५ % नी वाढ होते, तर उत्पन्नात ८०% नी वाढ झाल्याचे निदर्शनास दिसून आले आहे.
७) व्हर्मीवॉशच्या फवारणीमुळे कडधान्य वेलवर्गीय पिकांच्या उत्पादनात १० ते १९ % नी वाढ होते.
८) ग्रीन हाउस, पॉली हाउस अथवा नेटमध्ये लागवड केलेल्या एक्झीस्टीक व्हेजिटेबल मध्ये सुध्दा व्हर्मीवॉश फवारतात
९) व्हर्मीवॉश तयार करण्याचे तंत्र अल्पखर्चिक व सोपे असल्याने ते साध्या व गरीब शेतकऱ्याला सुध्दा आत्मसात करता येऊ शकते.
१०) व्हर्मीवॉश हे विषारी नसल्याने त्याची फवारणी करतांना मजुरांना कोणतेही दुष्परिणाम होत नाही. तसेच ते दीर्घकाळ साठवता येवू शकते.
११) व्हर्मीवॉशच्या कितीही फवारन्या केल्या तरी ते सेंद्रिय असल्याने त्याचा पिकांवर कोणताही अनिष्ठ परिणाम होत नाही. व याउलट आपल्याला रासायिक औषधांची बचत होते.
१२) गांडूळाना झालेल्या जखमा भरून काढण्यासाठी व्हर्मीवॉशचा वापर केला जातो.
१३) व्हर्मीवॉशचे युनिट / सयंत्र उभारणीसाठी फार मोठी जागा / भरपूर मोठी भांडवलाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे ते कमी जागेत व कमी खर्चात तयार होते.
१४) व्हर्मीवॉश विकून अर्थार्जन होतो. व एक व्यवसाय सुरु करण्यास फायदेशीर ठरते.
१५) व्हर्मीवॉश फळभाज्या पालेभाज्या, शेंगभाज्या आणि जमिनीतल्या पिकांना हे खूप फायदेशीर ठरू शकते. उदा. आले, बटाटा, कांदा, हळद इ. साठी वापर सध्या पश्चिम महाराष्ट्रात अनिवार्य ठरू लागल्या आहेत.

------------------------------
-----------------------------
दशपर्णी अर्क
१. सीताफळ २. करंज ३. गुडवेल / धोतरा ४. घानेणी ५. कन्हेर ६. रुई मंदार ७. कडुलिंब ८. पपई ९. निर्गुळी १०. वन एरंड

अशा विषारी अंश वनस्पतीच्या पाल्यापासून तयार केले जाते त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी कीड व्यवस्थापन करता येते
 
 
 
 
 
by - Internet

गोमुत्र व कडुलिंबापासून कीटकनाशक तयार करण्याची कृती...

गोमुत्र व कडुलिंबापासून कीटकनाशक तयार करण्याची कृती
घटक द्रव्य -
१. देशी गायीचे गोमुत्र - १० लिटर.
२. कडूलिंबाची ताजी पाने १० लिटर देशी गायीच्या गोमुत्रात मातीच्या मडक्यात पुरत घालावे. हा मडका जमिनीत खड्ड्यात २१ दिवस झाकून ठेवावा. २१ दिवसानंतर हे बाहेर काढावे नंतर त्यातील कडूनिंबाची पाने बाजूला काढावीत हे कडुलिंब युक्त गोमुत्र तांब्याच्या भांड्यात १/४ होई पर्यंत उकळावे. थंड करावे, थंड झाल्यावर गाळून घेवून योग्य प्रकारच्या बाटलीत भरून ठेवावे.

प्रमाण -
१ लिटर वरील किटक नियंत्रक १०० लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे प्रमाण कीटकांचा प्रादुर्भाव जास्त आलेला असल्यास जास्तीत जास्त ५ लिटर कीटकनाशक १०० लिटर पाण्यात मिसळावे त्यापेक्षा जास्त वापरण्याची गरज नाही.

गुणधर्म -
पिक संरक्षक, बुरशीनाशक, रोग प्रतिबंधक, शक्तिवर्धक, विषाणू नाशक, वनस्पती पोषक मनुष्य व प्राणी मात्रास हानिकारक नाही.

उपयोग -
हे किट नियंत्रक सर्व पिकांना द्राक्ष बागांना उपयोगी आहे. फळबाग, फुलशेती, भाजीपाला यांना सुध्दा उपयोगी आहे. हे पिकांच्या मुळांना दिल्यास पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते

नॅडेप कंपोस्ट पद्धत

नॅडेप कंपोस्ट -
शेतातील काडीकचऱ्यापासून शेणाच्या (शक्यतो गाईच्या) विरजना सारख्या उपयोग करून उत्कुष्ट पद्धतीने कंपोस्ट खात तयार करण्याचा पद्धतीला नॅडेप कंपोस्ट पद्धत असे म्हणतात.

नॅडेप कंपोस्ट तयार करण्याची पद्धत -
१) या पद्धतीत कंपोष्ट जमिनीखाली खड्ड्यात न करता जमिनीच्या वर तयार करतात. त्यामुळे कंपोष्ट मध्ये नत्र जास्त प्रमाणात उपलब्ध होते.
२) यासाठी ६ फुट रुंद व १० फुट लांब व ३ फुट उंच (मापे आपल्या सोयीनुसार कमी जास्त होऊ शकते) परंतु जास्त मोठा किंवा लहान आकार असू नये असा जाळीदार विटांचा चौक बांधून घ्यावा. याला आतून शेणाच्या पातळ थर सारवून अथवा शिपून घ्यावे.
३) जमिनीच्या तळावरती शेणाचे पाणी शिंपून द्यावे. त्यावरती काडी कचऱ्याचा, पालापाचोळ्याचा किंवा शेतातील वनस्पती जन्य अवशेषांचा थर द्यावा. पुन्हा त्यावर शेणाच्या पातळ द्रावणाचे शिंपण करावे व कडी कचऱ्याचा थर द्यावा. शक्य असल्यास थोडीसी शेतातील माती त्यावर टाकावी.
४) असे थरावर देत जाळीदार विटांच्या चौकोनात वर एक फुट ते दीड फुट उंच येईल अश्या पद्धतीने खड्डा भरावा.
५) खड्डा पूर्णपणे शेणाने सारवून घ्यावा। दोन तीन दिवसानंतर हा खड्डा निम्मा खाली बसतो. पुन्हा त्यावर याच पद्धतीने खड्डा भरावा. अश्या प्रकारे जास्तीत जास्त दोन इंच खड्डा भरावा. खड्यावर उगवणारे गवत हाताने उपटून काढावे. हवामानानुसार गरजेप्रमाणे पाणी शिंपडावे अश्या प्रकारच्या खड्यातून तीन महिन्यानंतर उत्कृष्ट प्रकारचे कंपोष्ट मिळते. ( ग्लीरीलीडीया (गिरीपुष्य), चवळी, सुबाभुळ अशा प्रकारच्या द्विदल धान्यांचा अवशेषांना उपयोग केल्यास त्यातून तयार होणाऱ्या कंपोस्ट गुणवत्ता आणखी वाढते.)

नॅडेप कंपोस्ट खताचे फायदे -
१) या नॅडेप कंपोस्ट खतामध्ये नत्र, स्फुरद, व ह्युमस शेणखता पेक्षा जास्त असते. त्यामुळे हे शेणखताहून सरस असते.
२) बरेचसे शेतकरी शेतातील केरकचरा अनावश्यक म्हणून जाळून टाकतात परंतु अशा पदार्थापासून उत्कृष्ट कंपोस्ट खत तयार करता येतो.
३) कंपोस्ट खतामध्ये केरकचरा उदा. उसाची पाचट, ज्वारी व बाजरीचे खुंट, प्राण्याचे मलमूत्र, निरुपयोगी भाजीपाला या वाया जाणारे घटकाचा वापर करता येतो.
४) या पद्धतीत वाया जाणारे घटक गोळा केल्याने घाणीचे निर्मुलन करून आपला परिसर स्वच्छ ठेवता येतो.
५) उत्कृष्ट खत असे तयार करता येते.
६) या खताची विक्री सुध्दा केल्यास आर्थिक फयदा होतो.
७) या पद्धती मध्ये कमीत - कमी दिवसात खत तयार करता येते.












http://agriktnc.com/project-09.html

छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता'...


छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !

छत्रपति शिवरायांचे जाहीरनामे - 'कानून जाबता' ... !
ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी, शके १५९६ या दिवशी 'महाराजांनी शिरी छत्र धरले. राजे चक्रवर्ती सम्राट झाले. मराठा राजा छत्रपती जाहला ही गोष्ट सामान्य नाही जाहली.' राजाभिषेकानंतर ३ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य प्रतिपदेस' श्री शिवछत्रपति महाराजांनी ३ जाहीरनामे प्रसिद्द केले. तर चौथा जाहिरनामा राजाभिषेकानंतर १५ दिवसात म्हणजे 'ज्येष्ठ वद्य त्रयोदशीस' घोषीत झाला. हे सर्व जाहीरनामे 'कानून जाबता' म्हणुन ओळखले जातात. थोडक्यात राजाभिषेकानंतर २ आठवडयामध्ये राज्यव्यवहार पद्धती कशी असेल ते छत्रपति शिवरायांनी पूर्णपणे स्पष्ट केले होते. अर्थात आधी सुद्धा हीच राज्यव्यवहार पद्धत अमलात असली पाहिजे; राजाभिषेक हे जाहीर करायला एक निमित्त ठरले असावे.
जाहीर झालेले ४ कानून जाबते खालीलप्रमाणे -
१) जाबता चिटणीसी लिहीण्याचा - एकूण कलमे १२
२) जाबता लष्कर सरनौबत - एकूण कलमे ८
३) जाबता कारखानीशी आणि सबनीशी लिहीण्याचा - एकूण कलमे २२ (कारखानीशी १४ आणि सबनीशी ८ कलमे)
४) प्रधानमंडळ - एकूण कलमे २०
आपण 'प्रधानमंडळ' ह्या जाबत्याबद्दल अधिक जाणून घेणार आहोत. छत्रपति शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व त्यांची कार्ये व जबाबदाऱ्या थोडक्यात खालीलप्रमाणे होते -
१) मोरोपंत पिंगळे (पंतप्रधान / पेशवा) : सर्व राजकार्य, राजपत्रावर शिक्का, ताब्यात असलेल्या प्रदेशचे रक्षण व व्यवस्था, युद्ध.
२) रामचंद्र निळकंठ (अमात्य / मुजुमदार) : जमाखर्च, दप्तरदार व फडणीस यांवर देखरेख, खात्याशी संबंधित असलेल्या कागदांवर शिक्का, युद्ध.
३) अण्णाजी दत्तो (सचिव / सुरनीस) : राजकार्यविषयक सर्व जबाबदारी, युद्ध.
४) रामचंद्र त्रिंबक (सुमंत / डबीर) : परराज्यविषयक कार्याचा विचार, युद्ध.
५) हंबीरराव मोहिते (सेनापती / सरनौबत) : सैन्यविषयक जबाबदारी, युद्ध.
६) दत्ताजी त्रिंबक (मंत्री / वाकनीस) : अंतर्गत राजकारणाचा विचार, हेर खाते, युद्ध.
७) रघुनाथराव (पंडितराव) : धर्मा-धर्म विचार.
८) रावजी निराजी (न्यायाधीश) : तंटे, न्याय-निवाडा.


कानून जाबता : प्रधान मंडळ
क्षत्रिय कुलावतंस राजा शिवछत्रपति
राजाभिषेक शके १, आनंदनाम संवत्सरे,
ज्येष्ठ वद्य त्रयोदशी, भोमवासर-
१. मुख्य प्रधान यांणी सर्व राजकार्य करावे; राजपत्रावरी शिक्का करावा; सेना घेउन युद्धप्रसंग स्वारी करावी, तालुका ताबिनात स्वाधीन होइल त्यास रक्षून बंदोबस्त करून आज्ञेत वर्तावें व सर्व सरदार, सेना यांजबरोबर जावें आणि सर्वसंमत चालावें.
येणेप्रमाणे कलम १.
२. अमात्य यांणी सर्व राज्यांतील जमाखर्च चौकशी करून दप्तरदार, फडणीस यांचे स्वाधीन असावें; लिहिनें चौकशीनें आकारावें; फडणीशी, चिटणीशी पत्रांवर चिन्ह संमत करावे; युद्धप्रसंग करावें. तालुका जतन करून आज्ञेतं चालावें.
येणेप्रमाणे कलम १.
३. सचिव यांणी राजपत्र शोध करून अधिक-उणे मजकूर शुद्ध करावी. युद्धप्रसंग करून तालुका स्वाधीन होइल तो रक्षून आज्ञेतं वर्तावें. राजपत्रावर चिन्ह संमत करावें.
येणेप्रमाणे कलम १.
४. मंत्री यांणी सर्व मंत्रविचार राजकारण यांतील सावधतेनें आमंत्रण, निमंत्रण, वाकनिशी यांचे स्वाधीन. तालुका जतन करून युद्धादि प्रसंग करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.
५. सेनापती यांणी सैन्य रक्षण करून युद्धप्रसंग स्वारी करावी. तालुका स्वाधीन होइल तो रक्षून हिशोब रुजू करून आज्ञेतं वर्तावें व फौजेचे लोकांचे बोलणे बोलावें. सर्व फौजेचे सरदार यांणी त्याजबरोबर चालावें.
येणेप्रमाणे कलम १.
६. पंडितराव यांणी सर्व धर्माधिकार, धर्म, अधर्म पाहून विचिक्षा करावीं. शिश्टांचे सत्कार करावे. आचार, व्यवहार, प्रायश्चितपत्र होतील त्यावर संमत चिन्ह करावें. दान-प्रसंग, शांती अनुष्ठान तत्काळी करावें.
येणेप्रमाणे कलम १.
७. न्यायाधीश यांणी सर्व राज्यातील न्याय-अन्याय मनास आणून बहुत धर्में करून न्याय करावें. न्यायाची निवडपत्रे यांजवर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.
८. सुमंत यांणी परराज्यातील विचार करावा. ज्यांचे वकील येतील त्यांचे सत्कार करावें. राजपत्रावर संमत चिन्ह करावें.
येणेप्रमाणे कलम १.
९. चिटणीस यांणी सर्व राज्यातील राजपत्रे ल्याहावीं. राजकारण-पत्रें, उत्तरें ल्याहावीं. सनदी , दान पत्रें वगैरे महालीं, हुकुमी यांचा जाबता, फडणीशी, चिटणीशी अलाहिदा त्याप्रमाणें ल्याहावें. हातरोखा, नाजुक पत्रें, यांजवर मोर्तब अथवा ख़ास दस्तक. मात्र वरकड़चा दाखला, चिन्ह नाहीं, चिटणीसांनीच करावें.
येणेप्रमाणे कलम १.
१०. फौजेचे सबनीस, बक्शी यांणी सर्व फौजेची हाजरी चौकसी करावी. यादी करून समजावावें. रोज्मरा वाटणें, सत्कार करावा. युद्धादि प्रसंग करावा.
येणेप्रमाणे कलम १.
११. सेनाधुरंधर यांणी बिनी करावी. आघाडीस जावें, उतरावें. फडफर्मास जमा करावीं. लुट करणें मना करणें. चोकसी-ताकीद यांजकडे, पुढे असोन सेना रक्षण करावी.
येणेप्रमाणे कलम १.
१२. किले-कोट, ठाणे जंजिरे येथील कायदे करून दिल्हे त्याप्रमाणे हवालदार, सुभेदार, कारखानीस, सरनौबत, सबनीस, तटसरनौबत लोक यांचे जाबते करून दिल्हे त्याप्रमाणे चालऊन सावधानतेनें स्थळे रक्षावी. तगिरी-वहाली हुजुरु न व्हावी, बजमी नेमणूक तालूकादार यांजकडे दरवाजा, किल्या, हवालदार,याचा हुकुम सिके त्याचे नावाचे. कारखानीसी जाबता अलाहिदा करणें.
येणेप्रमाणे कलम १.
१३. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिलें. त्यांणी सेवा व्यापार चालवावा. हुजुर रहावें.
येणेप्रमाणे कलम १.
१४. सुभे, मामले, तालुकादार यांस ज्याच्याकडे जें नेमलें त्यांणी जाबतेप्रमाणें चालवावे. हुजुरचे दरखदार, चिटणीस, फडणीस, मुजुमदार यांचे इतल्याने चालून हिशोब गुजरावें.
येणेप्रमाणे कलम १.
१५. बारा महालांचे अधिकारी यांणी आपलाले काम दुरुस्त राखुनु हिसेब आकारून दप्तरांत गुजरावें.
येणेप्रमाणे कलम १.
१६. दरुणी महालांचे काम दिवाण नेमून दिल्हे यांणी सर्व पाहून करावें. चिटणीस, फडणीस यांणी आपलाले दरखाचे कागदपत्र ल्याहावें. त्यावर निशान, चिन्ह दिवाणानी करून वाडयास समजाउन मोर्तब साक्ष करावें.
येणेप्रमाणे कलम १.
१७. पोतनीस यांणी पोत जमाखर्च लिहिणे करावें. नजर पेश कशी जमा करावी. पोतदार यांनी पारख करावी.
येणेप्रमाणे कलम १.
१८. अष्टप्रधान यांजकडे देहे तालुके व स्वारीस जावयास दखरदार सर्व हुजुरचे जावे. त्याचे दाखल्यानी व्यवहार करावा. स्वारीस जाणें त्यास मुतालिक करून दिल्हे त्यांणी सेवा-व्यापार चालवावा. हुजुर रहावें.
येणेप्रमाणे कलम १.
१९. आबदारखाना चिटणीस याजकडे सराफखानासुधा अधिकार सांगितला. मजालसी, अत्तर-गुलाब, व हार-तुरे व फळफळावळ खुशवाई खरी जमाखर्च यांणी करून हिशेब दप्तरी गुजरावा.
येणेप्रमाणे कलम १.
२०. पागा जुमलेदार यांणी कैद करून दिल्ही त्याप्रमाणें चालून सेनापती व प्रधान यांच्या समागमें कामकाजें करावीं.
येणेप्रमाणे कलम १.
येकूण कलमें वीस मोर्तब.
आपण बघू शकतो की पहिली ८ कलमे अष्टप्रधान यांच्या कामाबद्दल निगडित आहेत. ८ पैकी ६ प्रधानांना युद्ध - युद्धादि प्रसंगाला गरजेनुसार जाणे हे त्याच्या पदाच्या जबाबदारीमध्ये समाविष्ट होते. त्यातून फ़क्त पंडितराव आणि न्यायाधीश यांना वगळण्यात आले होते. ९ वे कलम पूर्णपणे 'चिटणीशी'बद्दल आहे. चिटणीस म्हणजे आजचा 'कैबिनेट सेक्रेटरी'. हे महत्वाचे पद राजाभिषेकानंतर 'बाळाजी आवजी' यांच्याकडे सोपवले गेले होते. फौजेचे इतर अधिकारी आणि बारा महालाचे अधिकारी यांनी करावयाची कामे सुद्धा पूर्णपणे स्पष्ट केली गेली होती हे सुद्धा इतर कलमांवरुन समजते.
यात १२ वे कलम सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. 'हुजुरात' म्हणजे खुद्द छत्रपति शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत येणारया खात्याचे उल्लेख ह्यात केले गेले आहेत. किले-कोट, ठाणे आणि जंजिरे याबद्दल अगदी सक्तीचे सुक्ष्मनियम त्यांनी बनवले होते. ते नियम मोडण्यास तीळभर सुद्धा जागा नव्हती. इतके असून त्याचा ह्या बाबींचा खर्च फारच काटकसरीने बांधलेला होता.
त्यांची राज्यपद्धती अशी होती की संपूर्ण राज्यकारभार अष्टप्रधान मंडळावर सोपवून तो चोख चालेल याची पूर्ण काळजी घेतली गेली होती. राज्यकारभारात प्रत्यक्ष ढवळा-ढवळ न करता राज्यकारभाराविषयी दैनंदिन माहिती मिळत जावी यासाठी त्यांनी आपल्या विश्वासातील माणसे जागोजागी स्वतंत्रपणे नेमली होती. जेणेकरून प्रत्येक खात्यावर त्या खात्याच्या प्रमुखाबरोबरच त्यांचे सुद्धा अप्रत्यक्ष आणि पूर्ण नियंत्रण राहील.
पुढच्या काही भागांमध्ये आपण छत्रपति शिवरायांच्या इतर पैलूंवर नजर टाकणार आहोत. त्यांनी कोष उर्फ़ खजिना, दुर्ग-किल्ले, सैन्यछावण्या यांबद्दल कशी व्यवस्था लवली होती ते बघणार आहोत. रिसोर्स मॅनेजमेंट काय असते हे त्यांनीच ३५० वर्षांपूर्वी दाखवून दिले आहे. शिवचरित्र वाचावे... अनुभवावे... शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा ...
. 















. 
संदर्भ - सभासद बखर, राजव्यवहारकोश, आज्ञापत्रे (लेखक- रामचंद्रपंत अमात्य) आणि शिवकालीन राजनिती आणि रणनिती
 (लेखक- श्री. रं. कुलकर्णी)

शहाजीराजांचा दूरदृष्टीकोण आणि उच्चकोटीचे राजकारण....


शहाजी राजे हे मुळातच स्वतंत्र आणि विजगिशु वृत्तीचे अत्यंत महत्वकांक्षी ,सत्ताकांक्षी ,युद्धकुशल ,मुत्सद्दी ,बुद्धीमान आणि धाड़शी होते .तसेच ते अत्यंत संयमी असून स्वातंत्र्यासाठी वाटेल ते कष्ट उपसन्याची जिद्द शहाजी राजांमधे होती ..
मुळात स्वराज्यसंकल्पनेची ही कल्पना शहाजी राजांची होती परंतु तीन वेळा प्रयत्न करुण त्यांना त्या कार्यात यश आले नाही .. अपयशातुन त्यांनी नाउमेद न होता आपल्या वीरपत्नीच्या संगनमताने आणि एक विचाराने दोन आघाड्याँचे राजकारण पुढे करुण स्वराज्य स्थापनेचा मार्ग शोधून काढला .पुण्याच्या आघाडीचे नेतृत्व त्यांनि जिजाऊ माँसाहेब बहाल करुण शिवरायांच्या माध्यमातुन स्वराज्य संकल्पेनाचा निर्धार केला .
शहाजी राजांनी स्वता आदिलशाहाचे फर्जंद म्हणून काम पाहिले .आणि स्वनेत्रुत्वात
बंगळुर येथे आदिलशाहिच्या अंतर्गत मांडलिकी स्वरुपाचे स्वतंत्र्य राज्य स्थापन केले. ही एक त्यांची तारेवरची कसरत म्हणावी लागेल.एकाच वेळी आदिलशाही ची नोकरी आणि स्वराज्यनिर्मीती करण ही सोप्पी गोष्ट नव्हती. यावरून शहाजीराजांचे राजकारण दूरदृष्टीचे आणि उच्चकोटीचे होते असे स्पष्ट होते ..
एकाच वेळी दोन आघाद्यांचे राजकारण करन्यासाठी शहाजी राजांनी सफल केलेले प्रयत्न
शिवाजी राजांना बालपणापासून यवनांच्या चाकरी पासून दूर ठेवले होते .इतकेच नव्हे तर 7 वर्षाच्या शिवबाला पुणे परगण्यातिल जहगिरित 40 गावांचा पोटमोकासदार नेमुन माँसाहेब जिजाऊं त्यांचे कुलमुखय्तीयार बनविले .मुसलमानी सत्तेत पाचार मरायला मावळाचा प्रदेश हां फार सोईचा आहे हे रणधुरंदर शहाजी राजांनी ओळखले होते म्हनुनच स्वराज्यनिर्मितीच्या उद्देशाने सर्वतयारीनिशी जिजाऊ आणि शिवरायांची नियुक्ती पुण्याच्या जहागिरीवर केली होती .. शहाजी राजांना पुण्याच्या जहागिरित जाण्याची बंदी होती कारण मुलात स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची इच्छा आणि महत्वकांक्षा तसेच त्याला लागणारे लष्करीआणि आर्थिक
सामर्थ्य आणि धाडस शहाजी राजांजवळ होते . ह्याची भीती घेवुन आदिलशाहाने शहाजी राजाना शिवाजी महाराजांना दिलेल्या सक्रिय पाठिंब्यामुळ
त्यांची जहागिरी जप्त करण्याचा व त्यांना शाही नोकरीतुन काढून टाकण्याचा आदेश आदिलशहाने इ.स 1643 मधे दिला होता .परंतु त्याला शहाजी राजांनी भिक घातली नाही. उलट आदिलशाह विरूद्ध बंडपुकारून त्याच्या लढण्याचे आव्हान दिले . त्यामुळ आदिलशहाने दिलेला आदेश त्याने मागे घेतला स्वराज्य स्थापनेत शहाजी राजांचा सक्रिय पाठिंबा होता .याचा उत्कृष्ट पुरावा म्हणजे जेव्हा अफजलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा शहाजी राजांनी उघड उघड आदिलशाहांवर आपली 17000 ची फ़ौज घेवुन विजापुरवर चालून गेले होते .पण वाटेत त्यांना समजल की अफजलखानाचा कोथळा शिवरायांनि काढला म्हणून ते माघारी फिरले .. शहाजी राजाना एकदा जहागिरीवरुण पदच्युत केले आणि दोन वेळा कैद झाली . त्यातूनही त्यांची त्यांच्या पुत्रानी सहीसलामत सुटका केली . शिवरायांना शहाजी राजांनी केवळ मार्गदर्शन नव्हे तर स्वतंत्र्य शिक्का ,सैन्याची मदत पैशाचा पुरवठा आणि स्वातंत्र्य भगवाध्वज ,आणि स्वराज्यनिर्मितीची संधी प्राप्त करुण दिली .. या शहाजीराजांच्या कार्यामागील सर्वात मोठी प्रेरणा होती ती सौदामिनी माँसाहेब जिजाऊ .
जिजाऊंनेच पुण्याच्या आघाडीचे अर्थात स्वतंत्र्य राज्य निर्मितीचे नेतृत्व केले . मार्गदर्शन ,युद्धकारण , राजकारण ,प्रशासन यात जातीने भाग घेतला . जिजाऊने आयुष्यभर सतत कष्ट उपसले स्वराज्याचा संसार केला . शहाजीराजांच्या निधनानंतर सती न जाता स्वराज्य निर्मितिच्या कार्यला वाहुन घेतले . स्वताच्या पुत्राचा राजाभिषेक सोहळा स्वताच्या डोळ्यानी पाहणारया जिजाऊ यांनी आपल्या पतीची सर्वात मोठी महत्वकांक्षी इच्छा पूर्ण केलि होती ..





http://itihasbynikhilaghade.blogspot.com

शिवकालातील १२ महाल व १८ कारखान्यांची यादी...


शिवकालातील १२ महाल व १८ कारखान्यांची यादी
१२ महाल
महाल या शब्दाचा अर्थ या क्षेत्रात जागा, ठिकाण किंवा व्यवस्थापन इमारत असा अभिप्रेत आहे.
१. दारुणी महाल – अंतर्भाग / खाजगीतील जागा, छत्रपती, सरंजामी सरदार व पेशवे आदी प्रस्थांची खाजगी इमारत
२. खजिना महाल – द्रव्य भांडार, तिजोरी असणारी इमारत
३. अंबार महाल – धान्यागार
४. पागा – घोडे बांधण्याचे तबेले व अश्वशालेचे व्यवस्थापन पाहणारे इमारत वजा बांधकाम
५. गौशाला – गाई म्हशींचे गोठे , दुध दुभत्याची साठवण व निगराणी राखण्याकरिता असलेली इमारत
६. बाग महाल – सरकारी बागांची देखभाल करणारे बागमाळी यांची कार्यालयीन इमारत
७. टांकसाळ – चलनी नाणी करण्याचा कारखाना असलेली इमारत
८. शिबंदी – फौज व वसुली कामाकरिता ठेवलेल्या शिपायांची बडदास्त ठेवण्याकरिता असलेली इमारत
९. इमारत महाल – सरकारी इमारतींचे बांधकाम व्यवस्था पाहणाऱ्या खात्याची इमारत
१०. सौदागिरी महाल – व्यापार वृद्धी व आयात निर्यात हेतू प्रीत्यर्थ उभारलेली इमारत
११. चौबिक महाल – लाकडाचा साठा व सांभाळ करण्यासाठी उभारलेली इमारत
१२. जामदार महाल – वस्त्रालंकार ठेवण्यास खास इमारत
१८ कारखाने
कारखाना हा शब्द फारसी असून याचा अर्थ विविधांगी उद्योगशाला असा आहे.
राज्यव्यवहारकोशाद्वारे शिवाजी महाराजांनी फारसी नावास पर्यायी संस्कृत प्रतिशब्द देवून नवी नावे देण्याची खटपट केली खरी परंतु पुढे पुन्हा जुनीच नावे वापरत असलेली अधिक आढळतात.
१. पीलखाना – गजशाला
२. अंदारखाना / आब्दारखाना – जलशाला / पानीयशाला
३. उष्ट्रखाना – उंटशाला
४. जवाहीरखाना – रत्नशाला
५. गाडीखाना – रथशाला
६. फरासखाना – शिबीरशाला
७. तालीमखाना – मल्लशाला
८. जिन्नसखाना – वस्तुशाला
९. अंबारखाना – धान्यशाला
१०. तोफखाना – यंत्रशाला
११. शिकारखाना – खाटकशाला
१२. दप्तरखाना – लेखनशाला
१३. मुद्पाकखाना / मुद्बखखाना – पाकशाला
१४. नटखाना – नाटकशाला
१५. नगारखाना – दुंदुभीशाला
१६. सराफखाना – अलंकारशाला
१७. सरबतखाना – वैद्यशाला
१८. लकडखाना / गन्जीखाना  – काष्ठशाला / बर्धकीशाला















संदर्भ –शिवकालीन महाराष्ट्र – अ रा कुलकर्णीराज्यव्यवहारकोश – अ द मराठेस्वराज्याचे छत्रपती आणि अष्टप्रधान – अविनाश सोवनी

स्वराज्यातील पहिले धरण...

*** स्वराज्यातील पहिले धरण ***
छत्रपती शिवरायांनी इसवी सन १६५६ साली खेडशिवापूर येथून वाहणाऱ्या आंबील ओढ्यावर स्वराज्यातील पहिले धरण बांधून प्रजेच्या पिण्याचे व शेतीच्या पाण्याची सोय केली.. या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे धरणाच्या दोन्ही बाजूनी पाणी गावात खेळते राहण्यासाठी २ पाट काढले त्यातील उजव्या बाजूचे पाणी खोलेश्वर मंदिरा जवळून खेड शिवापूर येथील शिवाजी महाराजांच्या वाड्याजवळून तसेच पुढे भाऊ नागोजी वाड्याच्या पाठीमागुन जाते व तसेच पुढे केतकाई येथे आंबील ओढ्यास जाउन मिळते.. व डाव्या बाजूच्या पाटाचे पाणी शेतीसाठी पटी या विभागातून पुढे जाऊन खेड शिवापूर चे श्रद्धास्थान असलेल्या आई भवानी मातेच्या हेमाडपंती मंदीरा जवळून जाउन पुन्हा आंबील ओढ्यास मिळते. येथे असलेल्या साळोबा मंदिरा मुळे या धरणास साळोबा चे धरण म्हणतात..
२००५ - २००७ च्या दरम्यान शिवापूर गावावर असलेल्या दुष्काळाच्या दरम्यान गावकऱ्यांना या साळोबाच्या धरणानेच पाणी पुरवले, पाण्याची वानवा संपल्यावर त्यातील एक पाट बंद करण्यात आला, पण आजही शिवापूर गावच्या शेतीसाठी लागणारे हे पाणी साळोबाचे धरण पुरवते......
आम्ही कितीही प्रगत झालो, कंबरेचे काढून डोक्याला गुंडाळून मिरवले तरी आम्हाला शिवकाळाशिवाय आजही पर्याय नाहीच......
३५० वर्षांपूर्वी उभारलेल्या जालप्रणालीने २१ व्या शतकातील शिवार पिकतात अन नरडी गार देखील व्हतात
राजा................... जाणता राजा...................................













by - Internet

माझ्याबद्दल