शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

कसे तयार होतात परफ्युम्स...

बदलत्या जीवनशैलीने आपल्याला एक आग्रहीपण बहाल केलेलं आहे. हे आग्रहीपण आहे, मुळात प्रेझेंटेशनचं! आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पाडण्यासाठी आपण सदैव ‘अपटुडेट’ असतो.
बदलत्या जीवनशैलीने आपल्याला एक आग्रहीपण बहाल केलेलं आहे. हे आग्रहीपण आहे, मुळात प्रेझेंटेशनचं! आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप इतरांवर पाडण्यासाठी आपण सदैव ‘अपटुडेट’ असतो. या अपटुडेट असण्यामध्ये केवळ पोशाख हीच संकल्पना राहिलेली नाही, तर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी सुगंधी द्रव्ये वापरणं हीदेखील आहे. ही सुगंधी द्रव्ये वापरण्याचं प्रमाण अलीकडे भलतंच वाढलं आहे.
अंघोळीनंतर परफ्युम किंवा डिओडरण्ट वापरणं हे अंघोळी इतकंच ‘मस्ट’ झालंय. मनाला आनंद देणारी ही सुगंधी द्रव्ये नेमकी तयार कशी केली जातात. तर याची पहिली पायरी म्हणजे कच्चा माल मिळवणं. परफ्युम बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजे सुवासिक पाने, फुले, झाडांच्या साली, झाडाची सुवासिक खोडे, सुवासिक वनस्पती (हर्बस्) आणि प्राण्यांचे सुवासिक अवयव (कस्तुरी मृग) आदी. हा कच्चा माल गोळा करून त्याचा साठा केला जातो. या मालापासून सुवास वेगळा करण्याच्या विविध पद्धती आहेत. कच्च्या मालाच्या
प्रकारानुसार ती ती पद्धत वापरली जाते.
डिस्टिलेशन अर्थात उर्ध्वपातनाने अर्क काढणे
यात कच्चा माल एका भट्टीमध्ये (कंटेनर) टाकून त्याला उकळवलं जातं. उकळवण्यासाठी गरम वाफेचा उपयोग होतो. त्या उष्णतेने त्या कच्च्या मालातील सुगंधी द्रव्याचे बाष्प (तेल) तयार होते. मग एका नळीवाटे हे बाष्प एका बंद भांडय़ात साठवून त्याला थंड करून त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर केले जाते. हा द्रव म्हणजेच सुगंधी तेल अर्थात (कॉन्सन्ट्रेटेड ऑइल)
द्रावकात विरघळणे
पेट्रोलियमजन्य द्रावक किंवा बेंझिन असलेल्या मोठया फिरत्या भांडयात कच्चा माल टाकून तो घुसळला जातो. तो कच्चा माल त्या द्रावकात विरघळला की, एक मेणासारखा पदार्थ मागे उरतो. त्यात इथिल अल्कोहोल मिसळवले जाते व पुन्हा हे मिश्रण गरम केले जाते. त्या उष्णतेने मिश्रणातील अल्कोहोल उडून जाऊन मागे उरते सुगंधी तेल.
दाब देणं
या प्रकारात कच्च्या मालावर दाब देऊन त्यातून सुगंधी तेल काढलं जातं.  अशा विविध पद्धतीने मिळालेली सुगंधी तेलं ठरावीक मापात घेऊन, त्यांच्या सुगंधाची जातकुळी ओळखून, ती एकत्रित केली जातात. मग ही एकत्रित केलेली सुगंधी तेलं मुरवण्याची प्रक्रिया असते. त्यासाठी काही महिने वा वर्षे इतका कालावधी लागू शकतो. या सुगंधी तेलांमध्ये पुढे अल्कोहोल मिश्रित केला जातो. त्यामुळे त्याची घनता कमी होते. अल्कोहोल मिश्रित या परफ्युममधल्या सुगंधी तेलाच्या प्रमाणानुसार त्याचे खालील वेगवेगळे प्रकार पडतात. वापरासाठी तयार होणारं ‘फिनिश्ड गुड’ परफ्युम हे तीन थरांचं असतं.
त्या प्रत्येक थराला ‘नोट’ असं म्हणतात. टॉप नोट- परफ्युम फवारताच जो गंध दरवळतो, तो. सेंट्रल वा हार्ट नोट- परफ्युम फवारल्यानंतर काही काळाने जो गंध दरवळतो, तो.. बेस नोट- परफ्युम फवारल्यानंतर बराच काळ दरवळणारा गंध असतो, तो.. परफ्युम आणि डिओडरण्टमधला नेमका फरक परफ्युम हा फक्त सुगंध देणारा आहे. परफ्युममध्ये घामाचा स्त्राव रोखण्यासाठी आवश्यक असलेले काही गुणधर्म नसतात. शरीराला सुवास देणं इतकंच त्याचं कार्य. तर शरीरातील घामाचा स्त्राव रोखण्यासाठी डिओडरण्ट काम करते. घामामध्ये असलेल्या जीवाणूंमुळे घामाला एक दुर्गंधी येते. त्या घामाचा स्त्राव रोखून त्या दरुगधापासून मुक्ती मिळवून देण्याचं काम डिओडरण्ट करतात. त्यामुळे जिथे घाम येतो तिथे शरीरावर डिओडरण्ट फवारले जातात. बरेच डिओ हे सुगंधरहितसुद्धा असतात. त्यांचं काम घर्मस्रव रोखणं इतकंच असतं.
प्रकार सुगंधी तेलाचे प्रमाण कालावधी
परफ्युम ५ ते ३० टक्के ६-७ तास
इवॉ दि परफ्युम(एऊढ) ८ ते १५ टक्के ५-७ तास
इवॉ दि टॉयलेट(एऊळ) ४ ते ८ टक्के ४-६ तास
इवॉ दि कोलोग्न(एऊउ) ३ ते ५ टक्के ३ ते ५ टक्के २-३ तास


 सौजन्य- December 4, 2012 04:55:22 AM | दै - प्रहार

डिओ-परफ्युम निवडताना...

व्यक्तिमत्त्वात आकर्षकता आणण्यासाठी नानाविध उपाय योजले जातात. उत्तम पेहराव, आकर्षक देहबोली, स्टायलिश अँक्सेसरीजचा वापर हा त्याचाच एक भाग आहे. पण हे सर्व असले तरी सुगंधाची कमतरता खुपत राहतेच. म्हणूनच परफ्युम, डिओ, अत्तर आदींचा वापर वाढतो आहे. सुगंधाचा दरवळ माणसाला प्रसन्न करतो. एखादा सुगंधी फवारा सगळे वातावरणच बदलवू शकतो. म्हणूनच आज डिओ मारल्याशिवाय बाहेर पडणारी तरुणाई अभावानेच पहायला मिळेल. प्रत्येकाचा ब्रँड ठरलेला, प्रत्येकाचा फ्रेगरन्स ठरलेला. डिओप्रमाणेच परफ्युमचे वेगळे विश्‍व आहे. परफ्युमइतक्याच त्याच्या आकर्षक बाटल्यांचीही चर्चा असते. पण या सगळय़ात अत्तराचे स्थान आहे ते आहेच. विशेषत: खास सणांसाठी तर अत्तर हवेच. भारतातील अस्सल गुलाब, हीना, वाळा यासारखी लोकप्रिय अत्तरे सोडली तर बहुतेक सुगंध कृत्रिम सुगंधाच्या वर्गात मोडतील. दर्जेदार अत्तर बनवण्यासाठी सुगंधी पुष्पातून बाष्प रूपातून सुगंधी घटक मिळवून चंदनाच्या तेलावर शोषून घेण्याची क्रिया केली जाते. म्हणूनच दर्जेदार अत्तराची किंमत सोन्याची बरोबरीत असू शकते. बकुळ, हीना, गुलाब, मोगरा, चाफा, निशिगंध, केवडा, पारिजातक, वाळा असे सुगंध वर्षानुवर्षे भारतीय मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
अत्तरासाठी काचेची कुपी वापरणे चांगले. अत्तर काढल्यावर कुपीचे झाकण त्वरित बंद करावे. अत्तरामध्ये कुठलाही अन्य द्रव मिसळू नये तसेच ही कुपी प्रखर उजेडात अथवा प्रकाशात ठेवू नये. हाताच्या उडणार्‍या नसेवर अत्तर लावावे. यामुळे उष्णता मिळून सुगंध दरवळायला मदत होते. सुगंध देणार्‍या डिओ, टाल्क, परफ्युम हे पर्यायही शरीराला सुगंधित करणारे आहेत. लवकरच कडक उन्हाळा सुरू होईल. या दिवसात सुती कपडे वापरण्याबरोबरच थंड गुणधर्म असणार्‍या अत्तराचा वापर सुखद ठरतो.



सौजन्य - m4  मराठी    14.10.2014

योग्य परफ्युम कसे निवडाल...



स्पोर्टी
आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी आपण भराबाहेर एखाद्या ठिकाणी प्रवासासाठी जाणार असेल, तर आपण स्पोर्टी वाटतात. घाम आणि घाण दुर्गंधीच्या विरोधात, एक ताजे सायट्रस आपल्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्याने तरतरी येते. सायट्रस मोसंबी आणि संत्र्यापुरते मर्यादित नाही, आपण हर्बल अत्तराचा देखील प्रयत्न करू शकता.

मोहक
आपल्या आठवड्याचे शेवटी ब्लॅक टाय डिनरपार्टी असेल, तर मोहक अशा सुवासाची निवड करा. याचा चांगलाच सुवास दरवळतो आणि अगदी पार्टीनंतरही बराच काळ याचा सुवास दरवळत राहतो. फुलांवर आधारित असे संत्रा फूल किंवा वृक्षांवर आधारित पचुली एक योग्य पर्याय आहे.

पुरुषांसाठी खास
पुरुषांसाठी बनवलेले परफ्युम नवीन फॅशन शैलीवर आधारित असतात आणि जाडसर जीन्सपेक्षा कुशलतेने बनवलेली आणि शरीराला व्यवस्थित बसणाऱ्या ट्राउजरला प्राधान्य द्यावे. क्लासिक परफ्युम आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. ताजे आणि उत्साही वाटण्यासाठी फुलांचा सुवास आदर्श पर्याय आहे.

आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार परफ्युम शोधण्यासाठी या टिपा मनात ठेवा.



सौजन्य - http://marathi.eenaduindia.com

परफ्युम वापरताना...

० परफ्युम निवडताना आपली जीवनशैली, व्यक्तिमत्त्व, छंद, व्यवसाय यांसाठी योग्य असणाऱ्या परफ्युमची निवड करावी.
० दिवसा वापरण्यासाठी मंद, मधुर सुगंध आणणारा परफ्युम वापरावा आणि संध्याकाळी, रात्रीच्या वेळी किंवा विशेष कार्यक्रमासाठी जरा उग्र वास असलेला परफ्युम वापरावा.
० परफ्युम खरेदी करताना एका वेळी आणि एकाच ठिकाणी जास्त स्प्रे ट्राय करू नका. निवड करणे कठीण होते.
० परफ्युमची निवड करताना मनगटाच्या मागे स्प्रे करावा व ५-१० मिनिटे थांबावे. तेवढय़ा वेळात सुगंध कमी झाला नाही तर तो परफ्युम योग्य समजावा.
० फक्त सुगंधावरून परफ्युमची निवड न करता त्यात असलेले घटक जाणून घ्या. कानामागे व मनगटावर स्प्रे करून रिअक्शनची टेस्ट करून पहा.
० जास्त उग्र वासाचा परफ्युम वापरल्यास सर्दी, डोकेदुखी, शिंका येणे, अलर्जी किंवा श्वासाचा त्रास होऊ शकतो. यासाठी शक्यतो नैसर्गिक सुगंध (फुलांचा सुगंध, फळांचा सुगंध किंवा चंदन) याचा वापर करावा.
० परफ्युम संपूर्ण शरीरावर स्प्रे न करता प्लस पॉइंटवर स्प्रे करावा. त्यामुळ सुगंध बराच काळ टिकून राहातो. (मनगटाची मागची बाजू, मानेच्या मागची बाजू, कानाच्या मागे, कोपराच्या आतील बाजू, अंडरआर्म इत्यादी.)
० बाहेर जाण्यापूर्वी १०-१२ मिनिटे आधी स्प्रे करावा म्हणजे सुगंध टिकून राहतो.
० परफ्युमचा वापर थेट शरीरावर करू नये. संवेदनशील त्वचा असल्यास खाज येणे, त्वचा लाल होणे, त्वचेची आग होणे अशा प्रकारचे त्रास होतात.
० उन्हाळ्यात घामामुळे केसांना घामट वास येतो अशा वेळी कंगवा किंवा हेअर ब्रशवर परफ्युमचा हलका फवारा मारून केसावर फिरवून घ्या. घामट वास निघून जाईल. स्प्रेमध्ये अल्कोहोल असल्याने केस कोरडे होतील. त्यामुळे बेतानेच.
० घराबाहेर जाताना झीप पाऊचमध्ये परफ्युम स्प्रे करून कापसाचे बोळे सोबत ठेवावे. अधे मधे टचअपसाठी वापरता येतील.
० थंडीच्या दिवसात स्वेटर, जाकीट, शाल, मफलर अशा जास्त कपडय़ांचा वापर केला जातो. यासाठी उग्र वासांच्या परफ्युमचा वापर करावा. जास्त कपडय़ांतूनही त्याचा सुगंध कायम राहील.
० उन्हाळ्यात अल्कोहोल बेस परफ्युम असेल तर त्याचा वास लवकर उडून जातो. त्यासाठी वॉटरबेस परफ्युम वापरावा.
० गर्भवती स्त्रीने परफ्युमचा वापर करु नये.

* परफ्युम वापरताना..परफ्युमची निवड करताना... मनगटाच्या मागे स्प्रे करावा व ५-१० मिनिटे थांबावे.

संकलन- उषा वसंत -unangare@gmail.com - दै.- लोकसत्ता September 19, 2015 3:40 am

गुरुवार, २१ जानेवारी, २०१६

तुम्ही शरीराची चरबी कमी करु शकता.

वर्तमान काळात लठ्ठपणा एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येक तिसरा माणुस लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहे. यामुळे अनेक आजार जसे की, डायबिटीज, ब्लड प्रेशर हे झपाट्याने वाढत आहेत. परंतु लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे अदिवासी लोकांमध्ये ही समस्या खुप कमी असते. त्यांची जीवनशैली आणि वनऔषध्या या सर्व रोगांना त्यांच्या जवळ देखील येऊ देत नाही. आज आपण जाणुन घेऊ अदिवासींचे महत्त्वाचे हर्बल उपाय. जे अवलंबल्याने तुम्ही शरीराची चरबी कमी करु शकता.
1. कारल्याची अर्धकच्ची भाजी देखील वजन कमी करण्यात खुप मदत करते. मध्यप्रदेशाती उत्तरेतील अदिवासी शेवग्याच्या शेंगांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी उपयुक्त मानतात.
2. बाभळीचा डिंक पाण्यात मिसळा, ते पाणी कोमट करुन दिवसातून दोन वेळा सेवन केल्याने वजन कमी करण्यात मदत मिळते.
3. लठ्ठ लोकांनी गाजराचे सेवन मोठ्या प्रमाणात केले पाहिजे. खास करुन जेवण करण्याअगोदर गारज खावेत. आधुनिक विज्ञान देखील लठ्ठपणा कमी करण्यासाठी गारजाला उपयुक्त मानते.
4. मध एका कॉम्पलेक्स शर्करे प्रमाणे आहे, जे लठ्ठपणा कमी करण्यात भरपूर मदत करते. गरम पाण्यात एक चमचा मध टाकून नियमित सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने काही काळातच परिणाम दिसतात. काही ठिकाणी लोक या मिश्रणामध्ये एक चमचा लिंबूचा रस टाकतात, हे दोन्ही फॉर्मूले फायदेशीर असतात.
5. ताज्या पत्ता गोभीचा रस वजन कमी करण्यात खुप मदत करतो. अदिवासींप्रमाणे रोज सकाळी हिरवी पत्ता गोभी बारीक करुन त्याचा रस काढून प्या. हे शरीराची चरबी कमी करण्यात मदत करते. महत्त्वाची गोष्टी म्हणजे आधुनिक विज्ञान देखील ही गोष्ट सांगते की, कच्ची पत्ता गोभी साखर आणि अन्य कार्बोहायड्रेटला चरबीमध्ये रुपांतरीत होण्यापासुन वाचवते. यामुळे हे वजन कमी करण्यात सहाय्यक असते.
6. अर्धा चमचा बडी सोप घ्या आणि ती उकळत्या पाण्यात टाका. हे 10 मिनिटे झाकून ठेवा आणि गार झाल्यावर पिऊन घ्या. तीन महिने नियमित जर असे करत राहिलात तर वजन कमी होण्यात मदत होते.
7. पुदीन्याची ताजी हिरवी चटनी बनवली आणि चपाती सोबतच सेवन केली तर फायदा होतो. अदिवासी पुदीन्याची चहा पिण्याचा सल्ला देतात.
8. हरडा आणि बेहडाच्या फळांचा एक चमचा चुर्ण घ्या. हे 50 ग्राम पडवळच्या ज्यूसमध्ये टाकून नियमित सेवन करा. यामुळे वजन लवकर कमी व्हायला लागते आणि शरीरिक थकवा कमी होतो.
9. सुंट, दालचीनीची साल आणि काळ्या मि-यांची पावडर बनवा. या पावडरचे दोन भाग करुन एक भाग सकाळी उपाशापोटी आणि दुसरा रात्री झोपण्या अगोदर घेतला पाहिजे. हे पावडर पाण्यात मिसळून देखील पिता येऊ शकते.



सौजन्य : - दिव्य मराठी वेब टीमJan 05, 2016, 11:10 AM IST

व्हॅसलिनचे 40 फायदे

हिवाळ्यात आपण ड्राय स्किनसाठी व्हॅसलिनचा वापर करतो. परंतु या एका व्हॅसलिनचा उपयोग अनेक प्रकारे करु शकतो. फक्त पध्दती बदलावी लागेल. याचे 40 फायदे होतात. चला तर मग पाहूया व्हॅसलिनचा उपयोग कशा प्रकारे करावा...
1. रात्री झोपण्या अगोदर पापण्यांवर व्हॅसलिन लावून झोपा. तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु तुमच्या पापण्या लांब आणि दाट होतील.
2. रात्री झोपताना पायाला व्हॅसलिन लावून झोपा आणि त्यावर सॉक्स घाला. सकाळ पर्यंत तुमचे पाय सॉफ्ट होतील. 
3. तुमच्या कोपरांवर रोज नियमित व्हॅसलिन लावा. तेथील स्किन सॉफ्ट राहिल.
4. दिवसातुन अनेक वेळा तुमच्या नखांवर व्हॅसलिन लावत राहा. काही दिवसातच तुमचे नखे सॉफ्ट आणि शायनी दिसू लागतील. 
5. ड्राय ओठांवर व्हॅसलिन लावल्याने ओठ सॉफ्ट होतात.
6. व्हॅसलिनचा उपयोग तुम्ही लिप ग्लॉसम्हणून सुध्दा करु शकता. 
7. थोडेसे व्हॅसलिन घेऊन तुम्ही आवडत्या कूल-एड पावडरमध्ये मिक्स करु शकता. तुमचा फेव्हरेट लिप ग्लॉस तयार होईल. 
8. मायक्राव्हेवमध्ये एक चॉकलेट बाइट आणि थोडेशी व्हॅसलिन मेल्ट करा. आता हे मिक्स करुन घ्या. तुमचा चॉकलेट लिप ग्लॉस तयार आहे.
9. परफ्यूमचा सुंगध दिर्घकाळ टिकवून ठेवायचा असल्यास सर्वात अगोदर व्हॅस्लीन लावून घ्या आणि त्यावर परफ्यूम स्प्रे करा. 
10. पिंपल्सची समस्या असेल तर व्हॅसलिनचा उपयोग करणे फायद्याचे असते. 
11. ड्राय स्किनची समस्या दूर करण्यासाठी मॉश्चरायजर म्हणून आपण व्हॅसलिनचा उपयोग करु शकतो.
12. आपल्या गुडघ्यांची आणि कोपरांची स्किन ड्राय झालेली असते. त्यावर व्हॅसलिनचा उपयोग करणे फायदेशीर असतो. 
13. आय शॅडोला शायनी इफेक्ट देण्यासाठी तुम्ही डोळ्यांवर व्हॅसलिन लावू शकता.
14. दात ओठांना चिटकण्यापासुन रोकण्यासाठी तुम्ही दातांना व्हॅसलिन लावू शकता. असे केल्याने तुम्ही एखाद्या सेलिब्रिटी प्रमाणे खुप स्माइल करु शकता.
15. लिपस्टिक लावण्या अगोदर दातांना व्हॅसलिन लावा असे केल्याने ओठांना लिपस्टिक लावताना ती दाताना चिटकणार नाही.
16. बेबी मसाज करण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता. 
17. हे गरम करुन तुम्ही नाइट क्रिम म्हणून याचा वापर करु शकता. 
18. मेकअप रिमूव्हरच्या रुपात तुम्ही व्हॅसलिनचा वापर करु शकता.
19. प्रतिकुल हवामानत स्किनचे रक्षण करण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.
20. व्हॅसलिनमध्ये थोडेसे मिठ मिक्स करुन तुम्ही याचा स्क्रब म्हणून वापर करु शकता.
21. गालांना डेवी लूक देण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा वापर करु शकता.
22. व्हॅक्स केल्यानंतर स्मूथ स्किन मिळवण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.
23. मॅनीक्यूर करताना तुम्ही हे नखांखाली व्हॅसलिन लावू शकता.
24. ड्राय झालेल्या स्किनमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी व्हॅसलीनचा उपयोग करु शकता.
25. कानातचे छिद्रजर ड्राय झाले असतील आणि कानातले त्यामध्ये लवकर जात नसतील तर त्यावर थोडेसे व्हॅसलिन लावा. वेदना न होता कानातले घातला येतील.
26. नखांना लवचीक आणि संवेदनक्षम ठेवण्यात व्हॅसलिन उपयोगी आहे.
27. गालांसाठी क्रिम ब्लशर तयार करण्यासाठी तुम्ही याचा लिपस्टिकसोबत वापर करु शकता.
28. बोटात जर अंगठी फसली असेल तर ती सहजरीत्या काढण्यासाठी बोटावर व्हॅसलिन लावा. अंगठी सहज निघेल.
29. आयब्रोला थोडेसे व्हॅसलिन लावून आयब्रोला शायनी आणि ब्रॉड दाखवू शकता.
30. आयलॅशेशला वॉटर प्रुफ लुक देण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता.
31. केसांना शांम्पू करण्याअगोदर तुम्ही ते कौटीवर लावू शकता. 
32. नवीन नवीन काढलेल्या टॅटूला प्रोटेक्ट आणि हिल करण्यासाठी याचा उपयोग करता येतो. 
33. कपड्यांवर पडलेले मेकअपचे डाग काढण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग केला जाऊ शकतो. 
34. चामडाचे शूज आणि पर्स चमकवण्यासाठी व्हॅसलिनचा उपयोग करता येतो. 
35. कोंड्यामुळे येणारी डोक्यातील खाच आणि स्केलिंग दूर करण्यासाठी व्हॅसलिन फायदेशीर असते. 
36. स्प्लिट्स आणि ड्राय हेयर लपवण्यासाठी तुम्ही केसांच्या टोकांना थोडेसे व्हॅसलिन लावू शकता.
37. जेव्हा नेलपेंटच्या बॉटलचे झाकण लवकर निघत नाही तेव्हा त्याच्या झाकणाच्या खाली व्हॅसलिन लावा. झाकन सहज निघेल.
38. ओठांना स्मूथ करण्यासाठी तुम्ही ओठांना थोडेसे व्हॅसलिन लावा आणि त्यावर ब्रश करा. 5 मिनिटांमध्ये तुमचे ओठ खुप स्मूथ होतील.
39. खोट्या पापण्या डोळ्यांवरुन सहज काढण्यासाठी तुम्ही व्हॅसलिनचा उपयोग करु शकता. 
40. फ्लाइटमध्ये बसण्या अगोदर तुम्ही तुमच्या हातांना व्हॅसलीन लावू शकता असे केल्याने स्किन ड्राय होत नाही.






सौजन्य : - दिव्य मराठी बेव टीम Jan 21, 2016, 09:22 AM IST

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

तीन लाख मंगळसूत्रे पडली गहाण

शेतकरी अडचणीत - सोने तारणावर शेतीसाठी 2300 कोटींचे कर्ज
नाशिक - सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील बहुतांश भागातील शेतीला गेले वर्षभर सावरता आलेले नाही. या आपत्तीत सरकारी घोषणांच्या पलीकडे पदरात काहीच पडत नाही. शेतीही सोडता येत नाही अशा कात्रीत सापडलेल्या असंख्य शेतकऱ्यांनी स्वतःच खंबीर होत त्यातून मार्ग काढण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षभरात शेती सावरण्यासाठी तीन लाख शेतकऱ्यांनी आपल्या कारभारणींच्या मंगळसूत्रांसह किडूकमिडूक गहाण ठेवून 2300 कोटींचे सोने तारण कर्ज घेतले आहे. ही फक्त एका बॅंकेची स्थिती असून अन्य बॅंका, सावकार व सहकारी पतसंस्थांचा विचार केल्यास सहा लाखांच्या वर शेतकऱ्यांच्या घरातली मंगळसूत्रे गहाण पडली आहेत.

केंद्र व राज्य सरकारच्या व्याजसवलतीची योजना स्टेट बॅंक ऑफ इंडियाने देशभर राबविली आहे. त्यात शेती सुधारणेसाठी शेतकऱ्यांना सोने तारणावर चार टक्के दराने कर्ज दिले जाते. त्यामुळे ज्या ज्या शाखांत ही सुविधा आहे तिथे शेतकऱ्यांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या दिसतात. नाशिक जिल्ह्यात ही स्थिती अतिशय भयावह असून बाराशे क्विंटल सोने गहाण ठेवण्यात येऊन 216 कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले आहे. राज्यात या बॅंकेचे तीस प्रादेशिक विभाग असून या सर्व विभागांत सोने तारण घेऊन दोन हजार तीनशे कोटींचे कर्ज देण्यात आले आहे. सोन्याच्या सध्याच्या दर सव्वीस हजार तोळा असला, तरी कर्ज देताना सुवर्णकार "व्हॅल्युअर‘ त्याचा भाव सतरा हजार नऊशे रुपये प्रतितोळा ग्राह्य धरतो. एका वर्षात त्याची परतफेड बंधनकारक असून तसे केल्यावरच चार टक्के व्याज आकारले जाते. प्रत्येक शेतकरी किमान आयुष्यभराच्या बचतीतून जमा झालेले दहा ते बारा तोळे सोने गहाण ठेवून सरासरी एक लाखाचे कर्ज घेतो. त्यात दिवसभर शेतात राबून शेती व संसाराचा गाडा हाकणाऱ्या कारभारणीचे मंगळसूत्र हमखास असते. दागिने गहाण ठेवल्यावर बेन्टेक्‍सचे नकली मंगळसूत्र घालून संकट विसरून हसतमुखाने त्या पुन्हा शेतात घाम गाळायला बांधावर उभ्या असतात. हे सार्वत्रिक चित्र असून नाशिक, मराठवाडा, विदर्भात घरोघर ही स्थिती आहे.

पीककर्ज वाटप
2954 कोटी नाशिक
2355 कोटी जळगाव
2774 कोटी नगर
2537 कोटी पुणे
1807 कोटी सातारा
1014 कोटी औरंगाबाद
1849 कोल्हापूर

पतपुरवठा व वाढते कर्ज
39, 429 कोटी शेतकऱ्यांना केलेला 35 जिल्ह्यांतील पतपुरवठा
1.54 लाख शेती क्षेत्रातील दरडोई कर्ज


* बातमी - दै . सकाळ : -
मंगळवार, 24 मार्च 2015 - 03:00 AM IST 

* लिंक -  http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5109856091156083744&SectionId=28&SectionName=%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE&fb_comment_id=665021010293792_665147670281126#f159160da1d57

माझ्याबद्दल