बुधवार, २८ फेब्रुवारी, २०१८

मप्र में बनेंगे आक्सीजन पार्क...

मप्र में बनेंगे आक्सीजन पार्क


- सांस लेने में मददगार बनेगा बांस
- बांसों की विभिन्न किस्मों को रौपा जाएगा
- शुरूआती भोपाल के राष्ट्रीय मानव संग्रहालय से
Key word : Oxygen Park, Bhopal, Bamboo Mission, Madhya Pradesh, National Museum of Man, Baans 

डॉ. अनिल सिरवैयां, भोपाल
9424455625


अपनी अनेक खूबियों और अपने वानस्पतिक गुणों के कारण बड़े काम का वृक्ष ‘बांस’ अब देश में मध्यप्रदेश को नई पहचान देगा। देश में पहली बार में ‘आॅक्सीजन पार्क’ बनाने की शुरूआत मप्र से होने जा रही है। पायलट प्रोजेक्ट के तौर पर भोपाल के इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय में तीन दिन पहले विश्व पर्यावरण दिवस पर आॅक्सीजन पार्क बनाने के लिए बांस की विभिन्न किस्मों के पौधे रोपे गए हैं। इसके बाद पहले भोपाल, फिर इंदौर, ग्वालियर और जबलपुर में ऐसे आॅक्सीजन पार्क बनाए जाएंगे। इन चार शहरों के बाद धीरे-धीरे पूरे प्रदेश में ऐसे आॅक्सीजन पार्क बनाए जाने की कार्ययोजना है। इस पार्क की खूबियों को समझने को बाद राज्य सरकार ने पहले चरण में प्रदेश के सभी प्रमुख शहरों में आक्सीजन पार्क के लिए जमीन चिन्हित करने के निर्देश दिए हैं। आक्सीजन पार्क विकसित करने का काम मप्र राज्य बांस मिशन करेगा। 

इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय में आक्सीजन पार्क के लिए बांस के पौधे रोपे गए।
क्या है आॅक्सीजन पार्क
विभिन्न प्रजाति के बांसों का एक ही स्थान पर प्लांटेशन किया जाएगा। शहरी क्षेत्रों के लिए यह आॅक्सीजन पार्क का काम करेंगे। अनेक देशों में आॅक्सीजन पार्क का कॉन्सेप्ट काफी लोकप्रिय और प्रदूषण नियंत्रण में काफी मददगार तथा सार्थक है। आॅक्सीजन पार्क के लिए बांस सबसे उपयोगी है, क्योंकि बांस अन्य प्रजातियों की तुलना में 35 प्रतिशत अधिक कार्बनडाई आक्साईड अवशोषित करता है तथा 35 प्रतिशत से ज्यादा आक्सीजन वायुमंडल में उत्सर्जित करता है। भारत में अब तक इस कॉन्सेप्ट पर अमल नहीं हुआ। मप्र से इसकी शुरूआत होने जा रही है। 

बांस शिल्पियों को भी मिलेगी मदद
आक्सीजन पार्क में लगाए जाने वाले बांस के पौधे के वृक्ष बनने के बाद इनकी कटाई और फिर से नए पौधे रौपे जाएंगे। राज्य बांस मिशन के अनुसार इन बांस क्षेत्रों से प्राप्त बांस से शिल्पकारों और बांस का काम करने वाले परिवारों को जरूरत के मुताबिक बांस मिल पाएंगे। भोपाल में लगभग 600 परिवार बांस का काम करते हैं और यही इनकी आजीविका का साधन है। इन परिवारों की जितनी मांग है, उससे केवल 10 से 20 प्रतिशत बांस ही इन्हें मिल पाता है। चूंकि बांस के इन भिर्रों (रोपण क्षेत्र) से लगातार बांस प्राप्त होते रहेंगे, इसलिए इनके एक स्थाई बांस स्रोत संसाधन के रूप में यह आॅक्सीजन पार्क काम आएंगे। 
 इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय भोपाल


सीवेज वाटर में लगेंगे
आॅक्सीजन पार्क में बांस रोपण के लिए सीवेज वाटर का उपयोग किया जाएगा। भोपाल में सीवेज वाटर से सब्जियां उगाने पर एनजीटी ने प्रतिबंध लगा दिया है। राज्य बांस मिशन ने आक्सीजन पार्क के लिए ऐसे स्थानों को सबसे बेहतर विकल्प माना है। इसके अलावा ऐसे किसानों और भूमि स्वामियों को सब्जियों के स्थान पर बांस के लिए रोपण के लिए प्रोत्साहित किया जाएगा। 

बांस : प्राकृतिक गुण


    बांस पृथ्वी पर सबसे तेजी से बढ़ने वाली प्रजाति है। यह हर 24 घंटे में 2 से 3 इंच बढ़ जाता है। 
    बांस दूसरे किसी पौधे से 33 प्रतिशत अधिक कार्बन डाय आक्साइड अवशोषित करता है और 35 प्रतिशत से अधिक अवशोषित करता है।
    बांस सूर्य से आने वाली पराबैंगनी किरणों को रोकता है। सूर्य के ऊष्मा प्रभाव को कम करता है।
    बांस के पौधे की जड़ें भूमि एवं जल से धातुओं को अवशोषित कर प्रदूषण नियंत्रण करती हैं।
    बांस के पौधे को वृद्धि के लिए किसी रासायनिक कीटनाशक या उर्वरक की जरूरत नहीं है।
    विश्व में बांस की लगभग 1500 प्रजातियां हैं और इनके लगभग दो हजार उपयोग हैं।
    भारत में बांस की 137 प्रजातियां पार्इं जाती हैं।
    मप्र में बांस की दो प्रजातियां और 10 रोपित प्रजातियां उपलब्ध हैं। 

-----------------------------
हम मप्र में आक्सीजन पार्क बनाने जा रहे हैं। इनमें बांस की विभिन्न किस्मों को रोपा जाएगा। बांस ही एक ऐसा पौधा है जो अन्य प्रजातियों से अधिक कार्बन-डाई-आक्साइड अवशोषित करता है और इनसे अधिक आक्सीजन उत्सर्जित करता है। फिलहाल भोपाल के मानव संग्रहालय से आक्सीजन पार्क की शुरूआत की गई है। भोपाल में बहुत जल्द ही अनेक स्थानों पर आक्सीजन पार्क विकसित हो जाएंगे। इसके अन्य प्रमुख शहरों में यह काम किया जाएगा। इससे पर्यावरण संरक्षण तो होगा ही बांस की मांग और आपूर्ति का अंतर भी कम होगा। 
- डॉ. एके भट्टाचार्य, मिशन संचालक
मप्र राज्य बांस मिशन
- Dr. A.K. Bhattacharya, Mission Director
Madhya Pradesh State Bamboo 


मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

माझ गाव रामाचं पिंपळस...


  औरंगाबाद महामार्गालगतचे पिंपळस रामाचे हे गाव नाशिकपासून ३७ किलोमीटर अंतरावर आहे. महामार्गाच्या डाव्या हाताला के. के. वाघ कॉलेज लागले कीगावात जाणारा कॉलेजसमोर रस्त्याने पिंपळस गावात प्रवेश करता येतो. आत जाताना उजवीकडे छोटेखानी दगडी मंदिर अन् डावीकडे हनुमान मंदिर आपले स्वागत करते. हनुमान मंदिर नव्याने बांधलेले आहे. गावात प्रवेश केल्यावर गावाच्या मधोमध पिंपळपार लागतो. त्याशेजारी आणखी एक मोठे हनुमान मंदिर आहे. पिंपळपार हा पिंपळसचा केंद्रबिंदू आहे. गावात पूर्वी पिंपळाची खूप झाडे असल्याने गावाला पिंपळस असे नाव पडले असावेअसे मनोहर कुलकर्णीलक्ष्मण मत्सागररामभाऊ पूरकरसुखदेव सुरवाडेलहानु तामणे हे ज्येष्ठ नागरिक सांगतात. तसेच गावाला पिंपळस रामाचे असेही म्हटले जाते. या मागे एक अख्यायिकाही सांगितली जाते. श्रीराम नाशिकमध्ये वनवासासाठी असताना स‌ीतेला हव्या असलेल्या सोनेरी हरणाचा पाठलाग करीत ते नांदूरमध्यमेश्वरपर्यंत गेले होते. सोनेरी हरणाच्या रूपातील मारीच राक्षसाचा वध करून ते पुन्हा नाशिककडे परतत असताना पिंपळस येथील पिंपळाच्या झाडाखाली व‌िश्रांतीसाठी थांबले होते. म्हणून पिंपळस गावाला पिंपळस रामाचे असे नाव देण्यात आलेअशी अख्यायिकाही ग्रामस्थ सांगतात. पिंपळपारासमोरच श्रीरामाचे शंभरवर्षाहून अधिक जुने मंदिर आहे. लाकूड व मातीत बांधलेले दुमजली मंदिरात रामलक्ष्मण अन् सीतेच्या प्रतिमा आहेत. गावात दरवर्षी रामनवमीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जातो. या उत्सवात पूर्वी बोहाडे व्हायचेमात्र आता ही परंपरा मागे पडली आहे. ४० वर्षांपूर्वी बोहाड्यांची परंपरा गावात बंद झाली. मात्र गावातील छबू शिरसाट यांनी त्यांच्या वंशपरंपरेनुसार चालत आलेला नरसिंहाचा मुखवटा देव्हाऱ्यात भक्तीभावाने जपला आहे. गावातील बोहाड्यांची या मुखवट्याच्या परंपरा उरल्यासुरल्या पाऊलखुणेतूनच शिल्लक असल्याचे दिसते. मात्र बोहाड्याच्या अनेक आठवणी आजही ग्रामस्थांच्या आठवणींमध्ये ताज्या आहेत. अन् नवीन पिढी या सोहळ्यास मुकल्याचे दु:खही त्यांच्या चेह-यावर पहायला मिळते. गावात राममंदिरहनुमान मंदिराशिवाय विठ्ठल-रुख्मिणीखंडेरावदुर्गा देवीदत्तमोहटा देवीसावतागणपतीचाणखन बाबाशिवचे अशी अनेक मंदिरे व श्री जनार्दन स्वामी आश्रमही आहे.
 गोदेचा काठ अन् बाणगंगा नदीच्या सहवासात वसलेले पिंपळस हे मल्हारदादा बरवे यांच्या डुबेरेकोठूरेपांढूर्ली व पिंपळस या जहागिरीतील एक गाव आहे. मल्हारदादा बरवे यांना अनंतरामाजी व विठ्ठल ही तीन मुले. यातील अनंत बरवे यांचा मुलगा भिकाजी यांच्या वंशातील पुढील गोपाळराव मल्हार बरवे यांची पिढी पिंपळसला स्थिरावली. हे घराणे कोठुरे घराण्याची एक शाखा आहे. पिंपळस येथे गोपाळराव मल्हार (पिढी क्र.९) यांचे कुटुंब जिजीसाहेब त्यांच्या मुलांसह राहात असत. पुढे त्या नातवंडांसह नाशिक येथे दिल्ली दरवाज्याजवळील वडिलोपार्जित वाड्यात राहत होत्या. त्यांना सरकारकडून बाराशे रूपये दरसाल पोलिटिकल पेन्शन मिळत असे. त्यांनी पिंपळस येथे मोठा वाडा व देवालये बांधली,असा उल्लेख दिनकर बरवे यांच्या बरवे कुलवृत्तांतात आहे. पिंपळस येथील वाड्यात आजही बरवे कुटुंबीय राहतात. वाड्याशेजारी बरवे कुटुंबीयांचे गणपती मंदिर आहे. बरवे वाडा आता बराचसा पडला आहे. मात्र वाड्याची भव्यता आजही अनुभवता येते. उरलेले अवशेषनक्षीकामातील लाकडी खांबदरवाजे बरवे वाड्याचे वैभव अजूनही कायम असल्याचे दाखवून देतोअशी माहिती पिंपळस येथील बरवे कुटुंबीयांपैकी एक असलेले पुष्कर बरवे यांनी दिली. पूर्वी गावाला वेशीही होत्यामात्र कालांतराने त्या नष्ट झाल्या.
 गावातील पेशवेकालीन बांधणीची घरे अन् इतिहास दाखविणा-या अनेक पाऊलखुणा पाहताना पिंपळस अनेक उलाढालींचे केंद्रस्थान असेलअसे वाटायला लागते. गावाचा फेरफटका झाल्यावर पुन्हा के. के. वाघ कॉलेजसमोरील नाशिक-औरंगाबाद महामार्ग ओलांडून गोदा आणि बाणगंगेच्या संगमाकडे जाणाऱ्या रस्त्याला लागावे. गावापासून तीन किलोमीटर शेतातून नागमोडी रस्त्याने गेल्यावर आपण गोदावरी-बाणगंगेच्या संगमावर पोहचतो. तुडूंब भरलेले गोदावरी व बाणगंगेचे नदीपात्रनिसर्गरम्य परिसर अन् संगमावरील दगडी बांधणीचे महादेव मंदिर नयनरम्य आहे. म‌ंदिराबाहेर शंकराची दगडी मूर्ती आहे तर मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग आहे. हे मंदिर अहिल्याबाईंनी बांधल्याचे ग्रामस्थ सांगतात. येथून पुन्हा नाशिक-औरंगाबाद महामार्गावर यायचे व औरंगाबादकडे दोन किलोमीटर रसुलपूरकडे गेल्यावर उजव्या हाताला वीटभट्ट्या दिसायला लागल्या कीडाव्या हाताच्या दाट झाडींमध्ये दडलेली बारव पहायला मिळते. महामार्गापासून बारवेच्या दिशेने थोडे आत गेल्यावर व‌िटा व दगडी बांधणीची कटक बारव’ आजही जिंवत असल्याचे पाहून समाधान वाटते. पूर्वी गावाला पाणी पुरवठा करणारा कटक बारव हा मुख्य स्त्रोत होता. बारवेचे नाव कटक बारव का आहे हे मात्र उलगडत नाही. बारवेच्या तोडांवर साती आसरा देव मांडलेले आहेत. ही बारव कोठूर व रसूलपूरच्या सीमेवरच आहे. या बारवेकडून पुन्हा महामार्गावर आल्यावर उजव्या हाताला बैलगाड्यांसारखे पण गुडक्या इतक्या उंचीचे सात-आठ गाडे जोडलेल्या स्थितीत रसुलपूरच्या दिशेने महामार्गाच्या कडेला ठेवलेले होते. प्रत्येक बैलगाडीवर बांबूची टोकरी व खणनारळांचा नेवेद्य ठेवण्यात आला होता. याबाबत ग्रामस्थांनी दिलेली माहिती मनोरंजक आहे. हे गाडे लक्ष्मीबाईचा गाडा म्हणून दोनशे अडीचशे वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. कोकणातील कोणत्यातरी गावातून हे गाडे निघतात. ते गाव हे गाडे वाजत गाजत पुढील गावाच्या सीमेवर ठेवते. लक्ष्मीला नैवेद्य दाखविला जातो अन्‌ गाडे तेथेच ठेवून ग्रामस्थ घरी परतात. ज्या गावाच्या सीमेवर हे गाडे ठेवले आहेत. ते ग्रामस्थ ते गाडे वाजत गाजत गावात आणतात त्यांची पूजा अर्चा करून पुन्हा वाजत गाजते पुढील गावाच्या सीमेवर सोडले जातात. अशा पद्धतीने दरमजल करीत हजारो गावांचा प्रवास करीत हे गाडे पुढे पुढे जातात. मात्र हे गाडे कोणत्या गावावरून येतात अन्‌ पुढे कुठे स्थिरावतात हे मात्र कोणालाही माहिती नाही. मात्र वर्षातील विशिष्ट तारखेला हे गाडे गावाच्या सीमेवर आलेले असतात,अशी माहिती पुष्कर बरवे व छबू शिरसाट कुटुंबियांनी दिली. ही अनोखी परंपरा अज्ञात असली तरी पाऊस पडावाकोप होऊ नयेगावावरील इडापिडा टळावी म्हणून अनेक वर्षांपासून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. इतिहासाच्या पाऊलखुणाअनोखी परंपराबोहाड्याच्या आठवणी अन्‌ रामाच्या सहवासामुळे पावन झालेले पिंपळस रामाचे हे अनोख्या ग्रामसंस्कृतीमुळे रामाचे पिंपळस म्हणून ओळखले जाते.




















- http://duravlelyavata.blogspot.in/2017/04/blog-post.html

ओझर



ओझर..… मिग ओझर अशी नावे कालांतराने अंगवळणी करून घेणारे या गावाच्या नावात अनेक रहस्य दडलेली आहेत. ही रहस्ये अन् त्या गावचा इतिहास हा कायम त्याबरोबर आख्यायिका बनून राहतो. या आख्यायिका जाणून घेणे त्यावर सतत विचार मंथन होणे ही अभ्यासकांसाठी एक गरज होऊन जाते. ओझरकडे पाहताना बाणगंगेच्या तिरावर वसलेलं हे गाव ओझर का म्हटले गेले असेलहा प्रश्न सतावतोपण एक आख्यायिका त्याचा उलगडा करते अन् शक्य शक्यतांना पंख फुटतात. ओझर हे गाव तळ्यावर वसले आहेअसे म्हटले जाते. तळ्याभवती एखादे गाव वसू शकते पण,तळ्यावर कसे वसेलमात्र हाच या आख्यायिकेचा गाभा आहे. ओझरमध्ये पूर्वी प्रत्येक घरात आड होती. आता काही वाड्यामध्ये अशी आड आजही पहायला मिळते. ओझरमध्ये पाणी लगेच लागतेअसे म्हटले जाते. गावाच्या जमिनीखाली पाण्याचा मुबलक साठा असल्याने हे गाव तळ्यावर वसल्याची आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. म्हणजेच अनेक झऱ्यांचे गाव म्हणजे ओझर कामात्र याबाबत फक्त कयासच लावता येईल. ओझरचे तांबटांचे ओझर कसे झाले याबाबतही एक आख्यायिका आहे. तांबट गल्लीतील नरेंद्र तांबट सांगतात,‘तांब्याच्या वस्तू बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले ओझर या गावाजवळून एकदा झाशीच्या राणी लक्ष्मीबाई जात होत्या. त्यांनी तांब्याच्या वस्तू बनविताना होणारा ठकठक असा आवाज ऐकला. तो मोठ्या प्रमाणात असल्याने नेमका कसला आवाज आहे. हे पाहण्यासाठी त्या गावात आल्या. तेव्हा त्यांनी तांबटांचे ओझर’ असा नामोल्लेख केला. असे माझ्या वाडवडिलांपासून सांगितली जात आहे.’ या घटनेची कुठे नोंद नसली तरी तांबटांचा मोठा व्यवसाय येथे चालत असल्याने गावाला ‘तांबटांचे ओझर’ असे नाव पडले असावे. इंग्रजांच्या दफ्तरी ओझर तांबट’ अशी नोंद आहे. ही नोंद आजही प्रशासकीय कामकाजातही वापरली जाते. तर ओझरमध्ये एचएएल दाखल झाल्यानंतर मिग -२१ हे लढाऊ विमानाची निर्मिती होऊ लागल्यापासून आंतरराष्ट्रीय नकाशावर गेलेले ओझर ओझर मिग’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ओझरच्या नावाप्रमाणेच ओझरची सफर रोचक आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिकपासून २० किलोमीटरवर ओझर हे गाव रामशेजवर उगम पावणारी व जानोरी गावापासून पुढे वाहत येणाऱ्या बाणगंगा नदीच्या तिरावर वसले आहे. बाणगंगा पुढे कोठूरेजवळ गोदावरीला मिळते. सीतामातेला तहान लागल्याने रामप्रभूने जमिनीवर मारलेल्या बाणामुळे नदी अवतरली म्हणून तिला बाणगंगा म्हटले जाते,अशी आख्यायिका ग्रामस्थ सांगतात. मात्र बाणगंगा नेहमीच भरभरून वाहते असे नाही. अनेकदा ती कोरडीच असते. यामागेही एक आख्यायिका आहे. बाणगंगेच्या किनारी साधुंचा जथा रहायला आला. हे साधु सोमवती अमावास्येच्या प्रतीक्षेत तपाला बसले. मात्र सोमवती अमावास्या येईना. त्यामुळे त्यांनी बाणगंगेला शाप दिला की, ‘तू वर्षभरही कोरडीच राहशील.’ पुढे हे साधू नाशिकला गोदावरीच्या किनारी येऊन राहिले. सहा महिन्यांनी सोमवती अमावास्या आली अन् आनंदीत झालेल्या साधुंनी गोदेला येथे कुंभमेळा भरेलअसा आशीर्वाद दिला अन् तेव्हापासून नाशिकला गोदातिरी कुंभमेळा भरू लागलाअशी आख्यायिका नदी बाणगंगा कोरडी असण्यामागे सांगितली जाते. तर ओझर परिसरातून राम,सीता व लक्ष्मण गेल्याने दाखले पुराणात असल्याचे विठ्ठलराव चौधरीधनंजय पगारभरत कावळे सांगतात. गावात प्रवेश करताना महामार्गावरच डाव्या हाताला खंडोबाचे मंदिर व त्यासमोरील उंच दीपमाळ आपले स्वागत करते. हे मंदिर नव्याने बांधलेले आहे. खंडोबाचे जुने मंदिर मंदिरासमोरच महामार्गापलीकडे आहे. खंडेरायाचे नवीन मंदिर बांधले असले तरी ग्रामस्थांनी जुने मंदिरही तेवढ्याच भक्तीभावाने जपले आहे. येथील खंडेरायाची मूर्तीआदिमाया म्हाळसादेवीअश्वाच्या टापाखाली मल्लासुराला चेंगरल्याची मुद्रा असे प्रसन्न करणारे दर्शन येथे लाभते. मंदिराजवळच सहा पुराणपुरुषांच्या समाधी आहेततर पुढच्या बाजूला अश्वांच्या सहा समाधी आहेत. देवाला जे अश्व सोडण्यात येतात त्यांच्या या समाधी असल्याचे ग्रामस्थ सांगतात. खंडेरायाची ही दोन्ही मंदिरे पूर्वीच्या वेसकोट रचनेनुसार गावाबाहेर आहेत. मारूती वेशीसमोरच्या बाणगंगेवरील पूल ओलांडला कीजुने खंडेरायाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी या सहा दिवसांत शंकराने मार्तण्डभैरव अवतारात मल्लासूर अन् मणिसूर या राक्षसांशी युद्ध केले होते. यात मल्लासुराचा वध झाला व मणिसुराने शरणागती पत्करली. तो दिवस मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठीचा होता. यालाच स्कंधषष्ठी’ असेही म्हणतातअशीही आख्यायिका प्रचलित असल्याचे धनंजय पगार सांगतात. म्हणूनच ओझरचा रक्षणकर्ता अन् ‘सत्वाचा मल्हारी’ म्हणून ओझरच्या खंडेरायाची ओळख आहे. मात्र ओझरमध्ये खंडोबा मंदिर कसे निर्माण झाले यामागेही एक आख्यायिका आहे. असे म्हणतात कीखंडेराव व बानुबाई जेजुरीतून चंदनपुरी (ता. मालेगाव) येथे जाण्यासाठी निघाले. या प्रवासादरम्यान ते ओझर येथे मुक्कामी राहिले अन् नंतर चंदनपुरीत गेले. त्यामुळे येथे खंडोबाचे मंदिर अवतरले.
ग्रामदैवत असलेल्या खंडेरायाची चंपाषष्ठीला होणारी यात्रला वांगेसटीची यात्राही म्हणतात. बाराबलुतेदारी पद्धतीने वसलेल्या या गावात प्रत्येक समाजाच्या गाड्यांचा मानपान परंपरेनुसार ठरलेला आहे. यातून गावात एकोप्याचे दर्शनही घडते. द्वादश मल्हाररथ ओढण्याची २५० वर्षे जुनी परंपरा आजही यात्रेत रंग भरते. मल्लरथाच्या सोंटग्यावर कसरती करणारे मल्लसजविलेले गाडे डोळ्यांचे पारणे फेडतात. गावातील मारूती वेस चौक तालीम व राणाप्रताप चौक तालीम आता नाहीत. मात्र रथावरील फिरत्या चाकावरच्या शारीरिक कसरती करण्याची परंपरा आजही कायम आहे. कुस्त्यांची दंगल ही अनुभवण्यासारखी असते. चंपाषष्ठीला दुपारच्या सुमारास पगारवाड्यातून बारागाडा ओढणाऱ्या मानाच्या घोड्याला मारुती वेशीतून बाणगंगा नदीत स्नानासाठी आणले जाते. येथे खंडेराव महाराजांच्या पारंपरिक चांदीच्या प्रतिमा पालखीत ठेवण्यात येतात अन् गावातून मिरवणूक काढीत सर्व गाडे एकत्र व्हायला सुरूवात होते. मल्हाररथ आजही घोडा (अश्व) ओढतो. खंडेरायाचा अश्वाबाबतही एक आख्यायिका आहे. बारागाडे म्हणजेच द्वादश मल्हारमल्ल रथ ओढण्यासाठी यात्रेच्या आदल्या दिवशी हा घोडा आपोआप मंदिरासमोर यायचा. मात्र आता शहरीकरणामुळे या अश्वाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीकडे सोपवली जातेअसे ग्रामस्थ सांगतात. सध्याच्या अश्वाने जेजुरी गड एका दमात चढला म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याने पेशव्यांच्या अश्वाचा वारसदार असलेल्या अश्वाला हरविल्याचे ग्रामस्थ कौतुकाने सांगतात. यात्रेच्या दिवशी अश्व मिरवणूक काढली जाते. तेव्हा आख्खं गाव भंडाऱ्याने पिवळे होते. मंदिराजवळील नमाजपठणाची दिवाल पाहिली की गावात हिंदू-मुस्लिम एकोप्याचेही दर्शन घडते. कालांतराने गावाने आपला विस्तार वाढविला अन् वेशीकोटातून गाव बाहेरही वसले. त्यामुळे पूर्वी वेशीबाहेर असलेली ही मंदिरे आता गावातच मोडतात. खंडेरायाची दोन्ही मंदिरे पाहून जुन्या खंडेराय मंदिराकडून बाणगंगेवरील पूल ओलांडला कीबाणगंगेच्या तिरावर सजलेली मंदिरांची रांगोळी अनुभवायला मिळते. हाताला दगडी बांधणी व दगडी कोटामधील रंगरंगोटी केलेले सुंदर असे नागेश्वर महादेव मंदिर दिसते. तर उजव्या हाताला मारूती मंदिर आहे. या मंदिराला पाहुणा मारूती म्हटले जाते. यामागेही एक आख्यायिका आहे. बाणगंगेत वाहून आलेल्या हनुमानाच्या मूर्तीला ग्रामस्थांनी वेशीबाहेर वसविले. तेव्हापासून गावात बाहेरून पाहुणा म्हणून येणाऱ्या लोकांना हे गावा धार्जिण अन् भरभराटीचे ठरतेअसेही ग्रामस्थ सांगतात. या मारूती मंदिरावरून मंदिरासमोरील वेशीला मारूती वेस नाव पडले आहे. ही वेस आताआतापर्यंत होती मात्र ती पडल्याने आता वेशीची जागा लोखंडी कमानीने घेतली आहे. ओझर गावाला चार वेशी होत्या अन् भक्कम कोटात गाव वसले होते. मारूती वेसराजवाड्यातील वेसबाजार वेसअन् आणखी एक वेस गावाचे वैभव होते. यातील आता एकही वेस शिल्लक नाही मात्र त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. ओझर अहिल्याबाई होळकरांच्या संस्थानचा एक भाग होते. सरदार दाभाडे अन् देशपांडे यांनी गावाभवती भक्कम कोट उभारले असावेतअसे विठ्ठलराव चौधरी सांगतात. पूर्वी पेंढाऱ्यांच्या त्रासापासून वाचण्यासाठी वेसकोटाची गरज पडे. त्यांचे दोन मोठाले वाडे गावात होतेमात्र आता ते जमीनदोस्त होऊन तेथे नव्याने इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र या वाड्यांची साक्ष म्हणून परिसराला पडलेले सरकार वाडा हे नाव आजही तसेच आहे. म्हणून हा परिसर सरकारवाडा म्हणूनच ओळखला जातो. पेशवाईची साक्ष देणारे अनेक वाडे आजही गावात आहेत. तसेच माजी आमदार बापू उपाध्ये वाड्यातील काळाराम मंदिर देखणे आहे. तर गोराराम मंदिर लढ्ढा याच्या वाड्यात आहे. याशिवाय विठ्ठल मंदिरमुरलीधर मंदिरकणसरा देवी मंदिरकालिका मंदिरमारूती मंदिर आदी मंदिरे गावात आहेत. गावापासून दोन किलोमीटरवर असलेले महादेव मठ मंदिर व त्यासमोर गोसावी समाजाच्या अनेक समाधी पाहण्यासारख्या आहेत. दुष्काळ पडल्यास पावसासाठी या मंदिरातील गाभारा पाण्याने भरला जातो. पिंड पाण्यात बुडविल्यास पाऊस पडतोअशी आख्यायिका सांगितली जाते.
गावात चार बारव होत्या. त्यातील एक बारव पंचवड गणेश मंदिरात तर दुसरी दुर्गामाता मंदिरात आहे. दोन बारव बुजल्या आहेत. तर दोनचा वापर होतो आहे. बारवेतून चांदवड रंगमहालात भुयार जाते. तसेच भट्टडांच्या हवेलीबाहेर असलेल्या भुयारांच्या दरवाज्यातून दूर्गामाता मंदिरातील बारवेत जाता येतेअसे म्हणतात. ही भुयारे बंद करण्यात आली आहेत. अशी अनेक भुयारे गावात होतीअसे ग्रामस्थ सांगतात.
ओझरमध्ये तांबट गल्लीत तांबटांचा मोठा व्यवसाय चालत असे. मात्र कालांतराने हा व्यवसाय मागे पडला. आता गावात तांबट व्यवसाय करणारे नरेंद्र तांबट हे गावातील एकमेव कुटुंब उरले आहे. तांबट गल्ली आता शांत झाली आहे. मात्र आजही ती ठकठक मंद स्वरात ऐकू येते. ओझरमधील तांबट हे कंसारा तांबट असूनते २५० वर्षांपूर्वी गुजरातमधून स्थलांतरीत झाले होते. तेव्हापासून ते ओझरमध्येच आहेतअसे तांबट सांगतात. तर खंडित झालेली रावण दहनाची परंपरा ओझरकरांनी पुन्हा सुरू केली आहे. जव्हारच्या राजाचे दिवाण भाऊराव चिपळूणकरांची मोठी मुलगी स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्नी. तर त्यांची दुसरी मुलगी त्यांनी ओझरमध्ये दिली होती. तांबट गल्लीतील कालिका मंदिरात झालेल्या या लग्नाला स्वातंत्र्यवीर सावरकर व शीघ्र कवी बळवंत पारख उपस्थित होतेअसाही ओझरबाबतचा एक संदर्भ हाती येतो. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांच्या ‘माझा बाप अन् आम्ही’ या पुस्तकातही त्यांच्या वडिलांच्या ओझरच्या आठवणी वाचायला मिळतात. तसेच ओझर गायक रंगनाथ जाधवकवी हरेंद्र जाधवचळवळीत आंबेडकरांबरोबर सक्रीय असणारे के. बी. जाधव व एन. टी. जाधव याचे गाव म्हणूनही ओळखले जाते. इंग्रजांनी १९०७-८ मध्ये ओझर तांबटमध्ये ७,८३२ रूपये खर्च करून बाणगंगेवर कॅनल ब्रीज बांधल्याची नोंद नाशिक गॅझेटियरमध्ये मिळते.
ओझर गाव हद्दीत मिग विमानाचा कारखानाएअरफोर्स स्टेशन अशी नावाजलेली ठिकाणे गावचे महत्त्व वाढवितात. ओझर गाव अनेक आख्यायिकांनी अन् ऐतिहासिक संदर्भांने गजबजलेले गाव आहे. सरकारवाडाकाळाराम मंदिर,गोराराम मंदिरमंदिरांची नदीकाठची रांगोळीतांबट गल्लीवाडे संस्कृती अशा अनेक गोष्टी ओझर हे लहानसं नाशिक असल्यासारखचं दर्शन देतात. शहरीकरणांशी एकरूप होत असलेले ओझर वेगळे ठरते ते त्यांचे ऐतिहासिक अन् पारंपरिक ओळख असलेल्या खंडेरायाच्या यात्रेच्या माध्यमातून. त्यामुळे आजही ओझर मल्हारमय झाल्याचे पहायला मिळते.













http://duravlelyavata.blogspot.in/2017/04/blog-post_53.html

चांदोरी





ऐतिहासिक महत्त्व असलेले चांदोरी गाव नाशिकपासून नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर २५ किलोमीटरवर आहे. गावात शिरताना गावचा बाजार आपले स्वागत करतो. मात्र, ही गजबज टर्ले-जगताप वाड्यापासून पुन्हा शांत होते. गावाने आपले गावपण अजूनही जपले आहे. नव्या इमारतीही दिसताहेत पण जुन्या घरांसमोर त्या खुज्याच वाटतात. गावाला लाभलेल्या जुन्या घरांचे कोंदण येथे जाणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करते. गावातून वाहणाऱ्या गोदावरीचे पात्र चंद्रकोरीसारखे असल्याने गावाला चंद्रावती असे नाव पडले अन्‌पुढे चांदोरी असे म्हटले जाऊ लागल्याचे सांगितले जाते. महादेव भट हिंगणे हे पेशव्यांचे नाशिक येथील क्षेत्रोपाध्ये होते. पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते. त्यांनी महादेव भट हिंगणे यांना १७१८ मध्ये दिल्लीस नेले. पेशवे दिल्लीहून परत आले तेव्हा दिल्लीच्या वकिलातीवर त्यांनी भरवशाचा माणूस म्हणून महादेव भट हिंगणेंची वकील म्हणून नेमणूक केली. तेव्हापासून नाशिकचे हिंगणे राजकारणात मान्यता पावले. दिल्ली व मराठी माणूस यांचे नाते अतूट आहे. या संबंधांचा ऐतिहासिक मागोवा घेतला तर मराठी वक‌िलातीचे महादेव भटांच्या रूपाने पहिले पाऊल पडले होते. त्यांना पेशव्यांचे पहिले कारभारीही म्हटले जाते. त्यानंतर महाराष्ट्रात अनेक घराणी भरभराटीला आली. महादेव भटांच्या एकनिष्ठ कारभारावर खूश होऊन पेशव्यांनी १७३० मध्ये त्यांना मौजे चांदोरी, खेरवाडी, नागपूर व धागूर ही गावे इनाम दिली होती. पेशवाईत सरदार महादेवभट हिंगणे, देवराम महादेव हिंगणे व बापूजी हिंगणे यांची कामगिरी वैशिष्टपूर्ण आहे. बापू हिंगणे हे पानिपतच्या लढाईत नानासाहेब पेशव्यांबरोबर होते. १७६२ मध्ये गणेश हिंगणे यांनी ५६ खोल्यांचा प्रशस्त वाडा चांदोरीत बांधला. हिंगणे यांचे काही वाडे झाशी व नाशिकमधील भद्रकालीतही आहेत. १९५३ पर्यंत हिंगणेंकडे दहा हजार एकर भूभागाची जहागिरी होती. ब्रिटिशांनी नाशिक जिल्ह्यात सरदार राजेबहादूर, सरदार विंचूरकर व सरदार हिंगणे यांचीच सरदारकी मंजूर केली होती. चांदोरी परिसरात जमीन व महसुलाची मालकी ही हिंगणेकडेच होती. त्यांच्या पराक्रमांची
साक्ष देणारा चांदोरीतील हिंगणे वाडा आजही हा इतिहास उलगडून सांगतो. हिंगणे वाड्यातील अनेक वस्तू रशिया ब्रिटनमधील वस्तूसंग्रहालयात आहेत. चांदोरीतील हिंगण्याचा वाडा, मठकरी वाडा, टर्ले-जगताप वाडा, हिंगमिरे वाडा पाहण्यासारखा आहे. यातील टर्ले वाडा जमीनदोस्त झाला आहे. टर्ले म्हणजे मूळचे जगताप. त्यांच्याबाबत अशी अख्यायिका सांगितली जाते की, जगतापांच्या घरी मूल जगत नसल्याने त्यांनी वंश जगावा म्हणून खेडभैरव (ता. इगतपुरी) येथे बकऱ्याच्या बळी देऊ असा नवस केला होता. तेव्हापासून टर्ले-जगतापांच्या सर्व पिढ्या आजही तो नवस फेडण्याची परंपरा पाळतात. गावातील बुद्धविहार लाकडात नक्षीकाम असलेली चावडी वैशिष्ट्यपूर्ण आहे. या इमारतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर येऊन गेल्याचे ग्रामस्थ सांगतात.
मठकरी वाड्यातील रामजन्मोत्सव व दक्षिणाभिमुख राममंदिर महाराष्ट्रात आगळेवेगळे आहे. राम, सीता, लक्ष्मण व हनुमानाच्या मूर्ती कायम अधांतरी (चौपाळ्यावर) असतात. वाड्यातील शंकराची पिंड स्वयंभू आहे. पूर्व-पश्‍चिम पिंडी हे या मंदिराचे विशेष आहे. या मंदिरातूनच रामाने मृगवेध घेतला. तसेच रामाचे पाऊल उमटल्याचा दाखला दिला जातो. रामनवमीला येथे मोठी मिरवणूक असते. या मंदिरात काचेवर रंगवलेली दशावताराची चित्रे आजही पहायला मिळतात. मठकरी वाड्यातील ऑस्ट्रियन बनावटीच्या तीनशे वर्षापूर्वींच्या काचेच्या हंड्या दुर्मिळ आहेत. चांदोरी चिरेबंदी वाड्यांसाठी जसे ओळखले जाते. तसेच ते महाराष्ट्रात फक्त त्र्यंबकेश्‍वर व चांदोरी येथेच इंद्राच्या एकमेव मंदिरासारख्या वैशिष्ट्यपूर्ण मं‌दिरांसाठीही ओळखले जाते. मठकरी वाड्यातील राममंदिराजवळच १८५२ मध्ये बांधलेले दत्तमंदिर आहे. तर वाड्यामागील उजव्या सोंडेच्या गणेशाचे मंदिरही जागरूक समजले जाते. सरदार हिंगणेच्या वाड्यातील देवी ही कोल्हापूरच्या देवीचे अधिष्ठान मानले जाते. तर गोदेच्या कुशीत बुडालेली मंदिरे हे चांदोरीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. पाण्यात राहूनही ही हेमाडपंती मंदिरे सुस्थितीत असून शंकराची ही १२ मंदिरे असल्याने त्याला बारा ज्योतिर्लिंगांची प्रतिकृती मानली जातात. पंचमुखी महादेवाचे दुर्मिळ मंदिर, हे विशेष होय. ही मंदिरे अहिल्याबाई होळकरांनी बांधल्याचे म्हटले जाते. नदीपात्रात अनेक मूर्ती बेवारसरित्या पडलेल्या पहायला मिळतात. या मूर्तींचे संकलन करून गावात वस्तुसंग्रहालय उभारल्यास हा ऐतिहासिक वारसा जपला जाऊ शकतो. यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. नदीकाठावरील खंडेरायाचे मंदिर प्रतिजेजुरी समजली जाते. जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतल्यानंतर येथील मंदिरात आल्यावरच नवस फेडला जात असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. खंडोबा, भैरवनाथ व सप्तशृंगी या देवतांच्या गावातून निघणाऱ्या रथयात्राही पाहण्यासारख्या असतात. गावात बोहाड्याची परंपरा होती मात्र ती कालांतराने बंद पडली. प्रसिद्ध नारायण महाराजांची संजीवनी समाधी नदीकिनारीच आहे. चांदोरीत अनेक संत महात्मे येऊन गेल्याचेही ग्रामस्थ सांगतात. गावातील एका वाड्यासारखे दिसणारे विठ्ठल मंदिरही वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथे विठ्ठल रूक्मिणी व राईबाईची मूर्ती पहायला मिळते. येथील भिंतीवर चित्र असून या मंदिराची देखभाल भन्नसाळी कुटुंब करते.
ऐतिहासिक पार्श्वभूमी अन् दिल्लीपर्यंत पराक्रम गाजविणाऱ्या माणसांची तेजस्वी चांदोरीची ओळख लोककलावंत माधवराव गायकवाड यांच्याशिवाय अपुरी ठरेल. तमाशा क्षेत्रात माधवराव गायकवाडांचे नाव अजूनही आदराने आणि गुरूस्थानी घेतले जाते. एकदा दादासाहेब फाळके आपल्या मॉरिस गाडीतून माधवराव गायकवाडांना आपल्या चित्रपटात काम करावे म्हणून चांदोरीत आले होते. मात्र तमाशाच आपली जान आणि शान असल्याचे सांगत माधवरावांनी फाळकेंना नकार दिला होता. लोककलावंत म्हणून त्यांनी केलेली कामगिरी अजरामर ठरली. त्यांचा १९८७ मध्ये मृत्यू झाला. त्यांचा मुलगा प्रताप गायकवाड वडिलांची परंपरा तमाशा कलावंत म्हणून पुढे नेत आहे. चांदोरी नावामागील एक वलय म्हणजे मल्हारराव होळकरांच्या चांदवड टांकसाळीत चांदीचा रुपया तयार व्हायचा त्याला ‘चांदोरी रुपया’ म्हटले जायचे. याचा चांदोरीशी थेट काही संबंध नसला तरी पराक्रम आणि कामगिरीने लखलखणाऱ्या चांदोरीची भुरळ अनेकांवर पडते हे मात्र नक्की!



















http://duravlelyavata.blogspot.in/2017/04/blog-post_7.html

खेडलेझुंगे




खेडलेझुंगे
नाशिकहून सायखेडामार्गे म्हाळसाकोरे रस्त्याने खेडलेझुंगेला जाता येते. हे अंतर साधारण ५०-५५ किलोमीटर आहे. हा रस्ता चांगला असल्याने आजूबाजूची गावे पाहत हा प्रवास अधिक मनोरंजक होतो. नाशिक-निफाड-नांदूरमधमेश्वरहूनही खेडलेझुंगेला जाता येते. हे गाव निफाड तालुक्यात येते. त्यामुळे परिसरात मोठाले डोंगर नाहीत. म्हणून निफाडला पहाड नसलेले ‘नि पहाड म्हणजे निफाड’ म्हटले जाते. पण आजूबाजूचा परिसर शेतीमुळे हिरवागार आहे. या गावात पोहचण्यापूर्वी पाच किलोमीटर अंतरावरूनच हनुमानाची प्रसन्न मुद्रा दिसू लागली की समजायचे खेडलेझुंगे जवळ येऊ लागले आहे. मग फक्त उत्सुकता राहते ती ‘इतकी उंच हनुमानाची मूर्ती कशी?’ हे जाणून घेण्याची. म्हाळसाकोरे मार्गाने गेल्यास गोदावरीवरचा पूल ओलांडून गावात प्रवेश करतो येतो. सध्या नदीच पात्रे कोरडे पडले आहे. मात्र आजूबाजूची घनदाट हिरवाई तुमचे मन त्याच्याकडे खेचत राहते अन् तुम्ही हनुमानाची मूर्ती उभी असलेल्या ठिकाणी जाऊन पोहचता. पूल ओलांडला की, उजव्या हाताला गाव वस्ती ‌दिसते; मात्र तुम्ही डाव्या हाताला वळता. कारण हनुमानाची मूर्ती डाव्या हाताला असलेल्या नक्षत्रवनात स्वागतासाठी सज्ज असल्याची दिसते.
खेडलेझुंगे असे गावाचे नाव असण्यामागे एक इतिहा‌स आहे. हा इतिहास रामायणाशी जोडला गेला आहे. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की, त्रेतायुगामध्ये प्रभुरामचंद्र आपला वनवास दंडकारण्यात व्यतीत करत असताना त्याचेकडे सीतामातेने सुवर्ण कांतीमय हरणाचा हट्ट धरला होता. त्यासाठी प्रभु राम हरणाच्या मागे गोदावरी नदीच्या तटाने शिकारीसाठी धावत असताना ते हरीण ज्या ठिकाणी खटले (थांबले) त्या ठिकाणी जी वस्ती निर्माण झाली तिला खटले नाव पडले. खटले गाव पुढे गोदाकाठी उत्तर तीरावर स्थिरावले अन् पुढे काळाच्या ओघात शब्दाचा अपभ्रंश होऊन गावास'खेडले' म्हटले जाऊ लागले. सध्याच्या खेडलेझुंगे या नावातील 'झुंगे' या नावाचा इतिहास ही मनोरंजक आहे. गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावर एक बेट आहे. त्याठिकाणी संन्यासी पंथाच्या दशम आखाड्यापैकी 'गिरी' पंथिय साधुचे वास्तव्य होते. तेथे 'झुंगा' नावाचे महात्मा फार थोर व योगी अवालिया राहत होते. त्यांच्या साधनेचे आसन चमत्कारांनी भरलेले होते, अशी अख्यायिका ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे झुंगे महाराजांची गादी येथे आहे. त्याच्या दर्शनासाठी अजूनही लांबून लोक येथे येतात. गोदामातेला जर पूर असेल तर हा महात्मा पाण्यावरुन चालत ‘खेडले’ या गावी येत असे, अशी दंतकथा आहे. त्यातून दोन नावांचा संगम झाला अन् गावास 'खेडले झुंगे' हे नाव पडले, अशी अख्यायिकाही सांगितली जाते.
नाशिक जिल्ह्यातील हनुमानाची सर्वाधिक उंच मूर्ती म्हणून खेडलेझुंगेतील एकशे अकरा फूट उंच मूर्तीकडे पाहिले जाते. ही मूर्ती पर्यटकांना आकर्षित करण्यात मोठा वाटा उचलत आहे. गावाचे वैभव म्हणूनही या मूर्तीकडे पाहिले जाते. मात्र यामागे मोठी भक्तपरंपरा दडली आहे. याच परंपरेमुळे खेडलेझुंगेला श्रीक्षेत्र म्हणून दर्जाही मिळला आहे. खेडलेझुंगे या गावास धार्मिक वारसा म्हणजे हभप विंचुबाबा, पगडीबाबा अशा योगी पुरुषांचा गावाला सहवास लाभला. त्यांनी खेडलेझुंगे येथे वास्तव्य करून परिसरात कीर्तन प्रवचनादींनी धर्म प्रसारचे कार्य केले. दरम्यान, ही परंपरा तुकारामबाबा खेडलेकर यांनी पुढे नेली. खेडलेकर यांचा भक्तीयोग प्रदीप हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी गाव विकासाबरोबर माणुसकी अन् धर्मजागराची भावना गावात रूजवली. त्यांच्यानंतर माऊलीबाबा, गोविंदबाबा यांनी ही परंपरा पुढे नेली. काशिनाथबाबांनी पालखी सोहळा सुरू करून नवीन अध्याय सुरू केला. तर दिल्लीतील शांतीवनप्रमाणे खेडलेझुंगेत संतवन व नक्षत्रवन उभारण्यात
त्यांचा हातभार मोठा आहे. आता ही परंपरा रघुनाथबाबा पुढे नेत आहेत. संतवन व नक्षत्रवन हे पर्यटन व भक्तीधाम आहेत. येथे धार्मिक कार्यक्रमांबरोबर सामाजिक उपक्रमही राबविले जातात. नक्षत्रवनात राशीवृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. यामुळे हा परिसर निसर्गरम्य वाटतो. येथेच १११ फूट हनुमानाची मूर्ती आहे. ही मूर्ती २००५ मध्ये मध्य प्रदेशातील मूर्तीकार केशवराम साहू यांनी दोन वर्षात साकारली. भक्तीशक्तीच्या या प्रतिकाला पाहण्यासाठी जिल्हाभरातील पर्यटक येथे येत असतात. नक्षत्रवनात नऊग्रह देवतांच्या धातूच्या मूर्तीही येथे आहेत.
नक्षत्रवन आणि संतवन पाहून खेडलेझुंगे गावात यायचं. गोदाकाठी वसलेले गाव टूमदार आहे. गावात लहानमोठी अनेक मंदिरे आहेत. यात खंडोबा, विरोबामंदिर संतवनाच्या जवळच आहे. गावात तुकारामबाबांचे तप साधना स्थान तसेच शिवकुटी आहे. या शिवकुटीतील शांतता तुमच्या मनाला थंडा देते. शिवकुटीजवळच रामरथ आहे. या रामरथातून रामनवमी व इतर उत्सव काळात मिरवणूक काढली जाते. रामरथासमोरील राममंदिर पाहण्यासारखे आहे. पेशवाईतील बांधणीचे दुमजली राममंदिर मोठ्या वाड्यासारखे वाटते. मंदिरातील गाभाऱ्याबाहेरील लाकडी महिरप आकर्षक आहे. तर मंदिराच्या आतील बाजूला गावाला लाभलेल्या योगी पुरूषांचे फोटो लावले आहेत. राममंदिरासमोर एक ‌मोठा दगडीपाटावर एक दगडी मंदिर आहे. पूर्वी येथे मोठे मंदिर असावे, असे या पाऊलखुणांवरून वाटते. येथून पुन्हा गावाबाहेर पडताना खंडोबा व विरोबाचे रस्त्यापल्याड मंदिरे पाहून नांदूरमधमेश्वरकडे निघायचे. पुढे गोदाकाठी एका लहानशा टेकडावर वसलेले अगदी ३०-४० घरांचे सारोळेथडी हे छोटेखानी गाव तुम्हाला थांबायला लावते. गोदेच्या पुरामुळे हे गाव असे ‌टेकडीवर वसले असेल, असे गावाच्या रचनेवरून लगेच लक्षात येते. गावातून पुढे गेल्यावर डाव्या हाताला एका चौरस पाटावर पिवळ्या रंगाचा एक लाकडी घोडा नदीकडे टक लावून पाहताना दिसतो. हा घोडा म्हणजे जलाश्व होय. गोदातीरावरील गावांमध्ये तीरावरील एखाद्या मंदिराजवळ हा जलाश्व पहायला मिळतो. याबद्दल असे म्हंटले जाते की,नदीचे पाणी या घोड्याच्या तोंडाला लागले की हा घोडा किंचाळतो. त्यामुळे गावकऱ्यांना पुराच्या धोक्याचा संकेत मिळतो. म्हणजे ही पूराची निशाणी म्हणायला हरकत नाही. नेहमी पाण्याशी बिलगून असलेला सारोळेथडीतील हा जलाश्व मात्र पाण्यासाठी तळमळलेला दिसला. त्याच्या डोळ्यात पाणी पाहिल्यावर या जलाश्वालाही दुष्काळाची दाहकता सोसावी लागत असल्याचे दिसते. त्याचे नदीपात्राकडे एक टक नजर बरच काही सांगून जाते. खेडलेझुंगे अन् सारोळथडीचा हा प्रवास गावच्या वेगळेपण सांगत केव्हा संपतो हे लक्षातही येत नाही.




























http://duravlelyavata.blogspot.in/2017/04/blog-post_80.html



केवळ कृषी पर्यटन नव्हे. . . . .तर एक संस्कार !




लक्ष्मीपूजन आटोपलं की दुसऱ्या दिवसापासून भटकंतीला निघण्याचा शिरस्ता आम्ही कसोशीने पाळतो. कृषी क्षेत्रातील कामाच्या निमित्ताने मी सतत देशभर भटकत असलो तरी आम्हा तिघांना एकत्र भटकंती करण्याची ही एकमेव संधी आम्ही कधीही सोडत नाही. या वर्षीच्या भटकंतीचा प्रारंभ झाला ‘आमंत्रण’ या कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन. पुणे व मुंबईपासून केवळ ९५ किमी अंतरावर असलेलं व सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, जुन्नरपासून हाकेच्या अंतरावरील हे पर्यटन केंद्र ओझर व लेण्यान्द्री येथील गणपती व शिवनेरी किल्याच्या सानिध्यात शांतपणे पहुडलेलं आहे. मुंबई-पुण्याच्या प्रदूषित वातावरणापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात मोकळा व आरोग्यपूर्ण श्वास घ्यायचा असेल आणि आजच्या जगात अत्यंत दुर्मिळ झालेली निखळ शांतता अनुभवायची असेल तर निसर्गाचं हे ‘आमंत्रण’ अवश्य स्वीकारा! शहनाईच्या पार्श्वभूमीवर पाकळ्यांच्या वर्षावात व पंचारती ओवाळून होणारं पर्यटकांचं देवदुर्लभ स्वागत त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. नक्षत्रवन, सुगंधी व औषधी वनस्पती, अस्सल देशी बियाण्यांपासून लागवड केलेली विविध पिके, फुलझाडे व फळझाडांची ओळख करून देण्यासाठी अफाट उत्साहाचा धबधबा असलेले आमंत्रणचे संचालक श्री. शशिकांत जाधव आपल्यासोबत असतात. त्यांच्या सानिध्यात या परिसराची भटकंती हे केवळ पर्यटन नसून एक चालता-बोलता संस्कार वर्ग कसा आहे याचा प्रत्यक्ष अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. दमछाक झाल्यानंतर सौ. कविता जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या सुग्रास भोजनाचा आनंद घेऊन बांबूच्या बनातील गर्द सावलीत थंडगार वाऱ्याच्या लाटांवर स्वतःला झोकून देत एक झकास डुलकी घ्यावी आणि जाग आल्यानंतर मसालेदार चहाचे घोट घेत काव्य-शास्त्र-विनोदाची मैफल जमवावी. ज्यांना धांगडधिंगा, डी.जे., वॉटर स्पोर्ट्स या गोष्टींची आवड आहे त्यांनी ‘आमंत्रण’च्या वाटेला जाऊ नये. पण ज्यांना आयुष्यातील मोलाचे क्षण शुध्द प्राणवायूने भरलेल्या शांततेत व्यतीत करायचे असतील त्यांनी मात्र ‘आमंत्रण’ला विसरू नये !

पर्यटकांच्या माहितीसाठी :
आमंत्रण कृषि पर्यटन केंद्र, गोळेगाव, ता : जुन्नर, जि : पुणे.
संपर्क : श्री. शशिकांत जाधव : 99700 56412
ई.मेल : jadhavshashikant778@gmail.com
वेबसाईट : www.aamantranagritourism.com
यूट्यूबवर व्हिडिओ : Aamantran agri tourism































श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

महाराष्ट्रात चार-पाच नव्हे, तब्बल ८७ पक्ष




निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे देशभरातून नोंदणी झालेल्या पक्षांची यादी प्रसिध्द केली आहे. यात महाराष्ट्रातील ८७ पक्ष आहेत. 




मुंबई – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे आणि रिपाई हे महाराष्ट्राच्या राजकरणातले प्रमुख आणि तुम्हा-आम्हाला माहित असलेले राजकीय पक्ष आणि आता यात भर पडली आहे ती आम आदमी पक्षाची. पण या आठ पक्षांव्यतिरिक्त महाराष्ट्रात तब्बल ८७ राजकीय पक्ष आहेत.

निवडणूक आयोगाकडे या ८७ पक्षांची रीतसर नोंदणी झालेली आहे. तुम्हाला ही माहिती वाचून आश्चर्याचा धक्का बसला असेल. हे ८७ पक्ष कुठे आहेत, करतात काय असे अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले असतील. अहो हे, ८७ पक्ष सध्या फक्त नोंदणीपुरता मर्यादीत आहेत त्यांना अजून आपले कर्तुत्व सिध्द करायचे आहे. कारण निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार त्यांनी मते मिळवली तरच, त्यांना चिन्ह आणि अधिकृत मान्यता मिळणार आहे.

मतांची आवश्यक टक्केवारी मिळवण्यासाठी त्यांना मतदारांपुढे आपले कर्तुत्व सिध्द करावे लागेल. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या ठरवून दिलेल्या निकषानुसार मते मिळवावी लागतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे देशभरातून नोंदणी झालेल्या पक्षांची यादी प्रसिध्द केली आहे.

यात महाराष्ट्रातील ८७ पक्ष आहेत. निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष, राज्य पक्ष आणि नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्ष अशा तीन गटांमध्ये वर्गवारी केली आहे. आपल्या संविधानाने निवडणूक लढवण्याचा जसा प्रत्येक नागरिकाला अधिकार दिला आहे तसाच राजकीय पक्ष काढण्याचाही दिला असल्याने देशपातळीवर राजकीय पक्षांचे पेव फुटले आहे.

मान्यताप्राप्त सहा राष्ट्रीय पक्ष 
काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाजवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,

महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना

देशभरातून १५९३ पक्षांची निवडणूक आयोगाकडे नोंदणी

राज्यातील ८७ नोंदणीकृत राजकीय पक्ष 
हिंदुस्तान प्रजा पक्ष (कामोठे, नवी मुंबई), जय जनसेवा पार्टी (इचलकरंजी), जन सुराज्य शक्ती (वारणानगर), जनादेश पार्टी (जरीमरी, मुंबई), खानदेश विकास काँग्रेस पार्टी (जळगाव), हमारी अपनी पार्टी (पुणे), हिंदू एकता आंदोलन पार्टी (सांगली), हिंदूजन जनता पार्टी (औरंगाबाद), लोकशासन पार्टी ऑफ इंडिया (पुणे), महाराष्ट्र परिवर्तन सेना (आय) (बीड), महाराष्ट्र प्रदेश क्रांतिकारी पार्टी (कोरेगाव, सातारा), महाराष्ट्र राजीव काँग्रेस (चेंबूर, मुंबई), महाराष्ट्र सेक्युलर फ्रंट (दहिसर-पू. मुंबई) आणि महाराष्ट्र विकास आघाडी (लातूर), हिंदुस्तान पार्टी (पुणे), हिंदुस्तान स्वराज्य काँग्रेस पार्टी (मुंबई),

किसान गरीब नागरिक पार्टी (जोगेश्‍वरी, मुंबई), क्रांतिकारी जयहिंद सेना (अंधेरी-पू. मुंबई), क्रांतिसेना महाराष्ट्र (माहीम, मुंबई), नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी (पुणे), नव महाराष्ट्र विकास पार्टी (मुलुंड पू. मुंबई), नेताजी काँग्रेस सेना (पुणे), ), आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडिया (नागपूर), बहुजन रिप. एकता मंच (कामटी, नागपूर), बहुजन विकास आघाडी (वसई), भारतीय आवाज पार्टी (जोगेश्‍वरी, मुंबई), भारतीय काँग्रेस पक्ष (बाश्री, सोलापूर),भारतीय मायनॉरिटिज सुरक्षा महासंघ (मुंबई), भारतीय परिवर्तन काँग्रेस (नागपूर)न्यूज काँग्रेस (ताडदेव, मुंबई), पॅन्थर्स रिप. पार्टी (औरंगाबाद), पिझन्टस अँण्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया (दादर, मुंबई)

लोकराज्य पार्टी (चारकोप, मुंबई), महाराष्ट्र विकास काँग्रेस (जळगाव), मानव एकता पार्टी (शिरपूर, धुळे),नारी शक्ती पार्टी (बोरीवली प. मुंबई), नाग विदर्भ आंदोलन समिती (नागपूर), नॅशनल रिप. पार्टी (चेंबूर, मुंबई), नेटिव्ह पीपल्स पार्टी (कल्याण-पू.), अखंड भारतीय आवाज (कांदिवली-प. मुंबई), अ.भा. भारतमाता पुत्र पक्ष (नंदुरबार), अ.भा. भ्रष्टाचार निर्मूलन सेना (हडपसर, पुणे), अ.भा. रेव्होल्युशनरी शोषित समाज दल (लातूर), 

अखिल भारतीय सेना (विक्रोळी, मुंबई), अ.भा. क्रांतिकारी काँग्रेस (गोरेगाव, मुंबई), आंबेडकरिस्ट रिप. पार्टी (वर्धा, भारतीय बहुजन महासंघ (दादर, मुंबई), भारतीय नवजीवन सेना (पक्ष) (पुणे),भारतीय संताजी पार्टी (नागपूर), बोल्शेविक पार्टी ऑफ इंडिया (नागपूर), डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (नागपूर), डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी (नागपूर), धर्मराज्य पक्ष (ठाणे) आणि फोरम फॉर प्रेसिडेन्शियल डेमॉक्रसी (मुंबई).
















शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०१८

पाणथळ जपू या....जागतिक पाणथळ दिन



दरवर्षी २ फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा केला जातो. जैविक वैविध्याला जिवंत ठेवण्यात आणि ते वाढविण्यात पाणथळांची भूमिका अत्यंत मोलाची असते. उत्तर महाराष्ट्रातही अनेक पाणथळ ठिकाणे आहेत. या ठिकाणांचे मूल्य जाणून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाचे काम करणे गरजेचे आहे.

पाणथळ जागांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या उद्देशाने २ फेब्रुवारी १९७१ रोजी इराण येथील 'रामसर' या ठिकाणी जगातील काही देश एकत्र आले आणि त्यांनी 'रामसर करार' केला. 'रामसर करार' अंतर्गत सध्या १६८ देश एकत्र येवून २१७७ पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत. यंदा साजऱ्या होणाऱ्या 'जागतिक पाणथळ' दिवसाची संकल्पना आहे 'पाणथळी प्रदेश आणि कृषी'. पाण्याच्या उपलब्धतेवर 'शेती' चे भविष्य अवलंबून असते. 'शेती आणि पाणथळी' यांचा संबंध पुरातन आहे. पुराच्या गाळाने समृद्ध झालेल्या नदी खोऱ्यांमध्येच 'कृषी संस्कृती' उदयास आली आणि फोफावली. अजूनही जागतिक स्तरावर' शेती आणि शेतीपूरक व्यवसायच अर्थार्जनाचा मुख्य स्रोत आहेत. बागायती असो अगर कोरडवाहू शेती तिला पाण्याची आवश्यकता असतेच.

'पाणथळ जागा' म्हणजे नदी, समुद्राची खाडी, मिठागरे, नैसर्गिक आणि मानवनिर्मित तलाव. या सर्व पाणथळींचा 'शेती' बरोबर अनन्यसाधारण संबंध आहे. पाणथळ जागांमुळे शेती आणि शेती पुरक व्यवसायातूनच मानवाने अन्नधान्याची उपलब्धता साधून घेतली आहे. पाणथळीमधूनच शेतीसाठी 'पाणी' उपलब्ध होत असते. त्याच पाण्यातून मत्स्यव्यवसाय होतो. पाणथळीच्या काठावरील दलदलीतील जैववैविध्य, पाणवनस्पती शेतीसाठी सेंद्रीय खत ही मिळवून देतात.


जागतिक स्तरावर बहुसंख्य कुटुंबे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेले जमीन, पाणी, वनस्पती आणि प्राणी हे मोठ्या प्रमाणावर पाणथळीवर अवलंबून आहेत. 'पाणथळ' जागांमुळेच शेती, पशुपालन, मत्स्यपालन व इतर शेतीपूरक व्यवसायांची भरभराट झाली आहे. पाणथळींमुळेच अन्न, पाणी, इंधन यांचा अव्याहतपणे पुरवठा शेतीच्या माध्यमातूनच होतो आहे. पाण्याचे नैसर्गिकरित्या शुध्दीकरण करणे, पाण्याची गुणवत्ता शुद्ध राखणे, पर्यावरणाचे संतुलन राखणे, मानवनिर्मित मलनिस्सारण करणे असे अप्रत्यक्ष - प्रत्यक्ष फायदे आपणास पाणथळ जागांपासून मिळतात. जमिनीची सुपीकता वाढविणे, नैसर्गिकरित्या शेतजमिनीतील सेंद्रीय घटकांचे संतुलन राखणे आदी महत्त्वाची अप्रत्यक्ष मदत पाणथळ जागा आपणास करत असतात. पाण्याच्या उपलब्धतेवरच किती तरी सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळे नदीच्या किंवा एखाद्या सरोवराच्या काठावर उदयास आली आहेत. नद्या, सरोवर, तळी, कुंड यांना धार्मिक स्थळी महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. शेतीच्या अविवेकी किंवा अतिवापरामुळे बहुसंख्य 'पाणथळ जागा' धोक्यात आल्या आहेत. शेतीसाठी पाण्याचा अनिर्बंध वापर, रासायनिक खते, किटकनाशके यामुळे बऱ्याच 'पाणथळ' जागा दूषित होत आहेत. काही ठिकाणी तर चक्क 'पाणथळ' जागा भराव टाकून निवासी वापर, शेतीसाठी जागा उपलब्ध करून घेण्यासाठी बुजवल्या जात आहेत.


आपला देशदेखील 'रामसर कराराचा' सभासद असल्यामुळे भारतातील २७ 'पाणथळ' जागांचा 'रामसर पाणथळ' जागांमध्ये समावेश झाला आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही पाणथळ जागा 'रामसर' दर्जा प्राप्त करू शकलेली नाही. मात्र महाराष्ट्र सरकार नांदूरमध्यमेश्वर (नाशिक), जायकवाडी धरण (औरंगाबाद), नवेगाव बांध (गोंदिया) या 'पाणथळ' जागांना 'रामसर' दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. उत्तर महाराष्ट्रातही कितीतरी पाणथळ जागा अस्तित्वात आहेत. गोदावरी, तापी, गिरणा, नर्मदा या मोठया नद्या उत्तर महाराष्ट्राला समृद्ध करतात. त्यांच्या काठी कृषी संस्कृती उत्तमरीत्या नांदत आहे. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, चणकापूर, गिरणा, नांदूरमध्यमेश्वर इ. मानवनिर्मित पाणथळी उल्लेखनीय आहेत. या मानवनिर्मित पाणथळीमुळे शेती समृद्ध होवून ग्रामीण भाग संपन्न झाला आहे. त्याचबरोबर या पाणथळ जागांमधील जैवविविधता देखिल उल्लेखनीय आहे.

नांदूरमध्यमेश्वरसारख्या 'पाणथळी' जागेवर स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांचा मोठा वावर असतो. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरण, वाघूर धरण, मेहरुण तलाव इ. पाणथळ जागा महत्त्वपूर्ण आहेत. पाणलोट क्षेत्रातील जंगलाची मोठ्या प्रमाणावर तोड होत असल्याने हतनूरसारख्या धरणात गाळाचे प्रमाण देखील प्रचंड आहे. मात्र याच गाळाने तेथील जैवविविधतेला जपले आहे. त्यामुळेच हतनूर धरण हे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षांसाठी महत्त्वाच्या अधिवासाची भूमिका निभावत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कसदार जमिनीवरील शेती समृद्ध होण्याचे कारणच नर्मदा, तापी, पांझरा, बोरी या प्रमुख नद्या त्यावरील उकाई, सरदार सरोवर, प्रकाशा आणि सारंगखेडा येथिल बॅरेजेस आहेत. यामुळेच सातपुड्याच्या पायथ्याशी असणारी जैवविविधता जोपासली जात आहे. धुळ्यातील नकाणे, डेडरगाव, सोनवद, निमडाले यासारख्या 'पाणथळ' जागाच शेती, पिण्याचे पाणी यांची शाश्वती देतात आणि स्थानिक स्थालांतरित पक्षांना थारा देवून जैवविविधता जोपासत असतात. जायकवाडी प्रकल्प मराठवाड्यात असला तरी त्याचा पाणपसारा अहमदनगरच्या नेवासा, शेवगाव तालुक्यांपर्यंत पसरलेला आहे. नगर जिल्ह्यातील साखरेचे अर्थकारण बहुतांश याच पाणथळ प्रदेशावर अवलंबून आहे. त्याचबरोबरीन नगर जिल्ह्यातील भंडारदरा, सारखे जुने प्रकल्प पश्चिम घाटातील जैववैविध्य सांभाळण्यास मदत करतात. शेती आणि पाणथळ जागा हे दोन्ही घटक एकमेकांना पुरकच आहेत. शेतीचा शाश्वत विकास करावयाचा असल्यास, 'पाणथळ' जागेचे संरक्षण आणि संवर्धन करणे गरजेचे आहे.










by - Maharashtra Times
विनोद पाटील
(लेखक खान्देश निसर्ग संवर्धन संस्थेचे सचिव आहेत.)

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

खासदारांचे वेतन-भत्ते...



अग्रलेख 

भाजपचे तरुण खासदार व सुलतानपूरचे लोकसभा सदस्य वरुण गांधी यांनी सभापतींना एक पत्र लिहून सर्व खासदारांचे वेतन-भत्ते काही काळ गोठवण्याची मागणी केलेली आहे. अर्धशतकापूर्वी देशाची आर्थिक स्थिती ढासळलेली असताना पंतप्रधान पंडित नेहरूंनी तीन महिन्यांसाठी खासदारांचे वेतन-भत्ते गोठवले होते, असाही ऐतिहासिक संदर्भ वरुण यांनी आपल्या पत्रातून दिलेला होता. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे वेतन व भत्त्यांसह विविध लाभ हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. साहजिकच अशा विषयाला सत्ताधारी पक्षाच्या खासदाराने तोंड फोडले, तर त्यावर चर्चा स्वाभाविक आहे. पण, देशाची आर्थिक स्थिती आणि लोकप्रतिनिधींचे वेतन-भत्ते यावर खर्च होणारी रक्‍कम तुलना करण्यासारखी नाही. कारण ती रक्‍कम लोकप्रतिनिधीगृहे म्हणजे कायदामंडळांचा कारभार व कामकाज यावरील खर्चाच्या तुलनेत खूपच नगण्य म्हणता येईल. मागल्या दहा वर्षांत खासदारांचे वेतन-भत्ते चारशे टक्के इतक्या प्रमाणात वाढल्याचा योग्य संदर्भ वरुण यांनी दिला आहे. पण, त्याच कालखंडात देशातल्या बहुतांश कायदा मंडळांच्या कामकाजात व्यत्यय आणण्याची आकडेवारी त्याला जोडली असती, तर अधिक बरे झाले असते. कारण जितकी रक्‍कम लोकप्रतिनिधींच्या वेतनभत्त्यावर खर्च होते, त्यापेक्षा अनेक पटीने सभागृहाच्या कामकाजासाठी खर्च होत असून, हेच प्रतिनिधी तिथे गोंधळ घालून कामकाज ठप्प करीत असतात. म्हणजेच कामकाज कमी वा नगण्य होण्यासाठी वेतन-भत्ते वाढवून दिले जातात काय, असा प्रश्‍न आधी विचारला पाहिजे. तसे काही वरुण यांच्या पत्रात आलेले नाही. जे काही वेतन-भत्ते व त्याची रक्‍कम आहे ती कशासाठी दिली जाते, असा सवाल विचारणे अधिक संयुक्‍तिक ठरले असते. कारण मागल्या दहा वर्षांत अधिकाधिक काळ संसदेचे कामकाज ठप्प व कमीत कमी दिवस संसद अधिवेशन चालण्याचे नवनवे विक्रम प्रस्थापित झालेले आहेत. देशाचा कारभार चालवण्यासाठी व लोकजीवन अधिक सुसह्य करण्यासाठी मते मागून निवडून येणारे सदस्य, प्रत्यक्ष कामकाजात व्यत्यय आणतात, याची कोणीतरी चिंता केलीच पाहिजे ना? त्यावर काही उपाय वरुण गांधी यांनी मांडला असता, तर देशाच्या सामान्य जनतेने त्यांचे अधिक मोकळ्या मनाने स्वागतच केले असते. पण, त्यांचे उपरोक्‍त पत्र हे अनुभवी सदस्यापेक्षाही माहिती अधिकाराच्या कुणा कार्यकर्त्यासारखे वाटते. कारण नेहरूंच्या कालखंडात सरकारी व संसदीय खर्चाचा मोठा हिस्सा अशा वेतन-भत्ते यात जात होता, तुलनेने आज त्यापेक्षाही खूप कमी प्रमाणात अशा विषयावर खर्च होत असतो आणि त्यात बचत केल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर तसूभरही फरक पडण्याची शक्यता नाही. मग अशी पत्रे लिहून सत्ताधारी पक्षाच्या सदस्याला काय साधायचे आहे, असा प्रश्‍न पडतो.
भाजपचे अनेक सदस्य व नेते गेल्या काही काळामध्ये कायम नाराज व अस्वस्थ आहेत. त्यात वरुण गांधी यांच्यासारखे तरुण आहेत, तसेच यशवंत सिन्हा यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही आहेत. अधूनमधून शत्रुघ्न सिन्हाही स्वपक्षाला कानपिचक्या देत असतात. दोन ज्येष्ठ सिन्हा जितक्या सातत्याने स्वपक्षाला कानपिचक्या देतात, तितके सातत्य वरुण गांधी यांनी दाखवलेले नाही. ते वर्ष-सहा महिन्यांत कधीतरी वेगळा सूर लावत असतात. गतवर्षाच्या आरंभी उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागलेले होते, तेव्हा वरुण यांनी वेगळा सूर लावलेला होता. भाजपकडून त्यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार ठरवले जावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. पण, त्याला कुठूनही प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर वरुण शांत झालेले होते. आता वर्ष होत असताना त्यांना देशाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक वाटू लागलेली असेल, तर दोष देता येणार नाही. पण, जे मुद्दे आपण मांडतो, त्याचे सामान्य जनतेसाठी काहीसे स्पष्टीकरणही आवश्यक असते. लाखो-करोडो रुपयांच्या सरकारी खर्चामध्ये खासदारांचे वेतन-भत्ते ही मूठभर कोटी रक्‍कम, म्हणजे एक टक्‍काही होऊ शकत नाही. तितकी बचत करून कुठली काटकसर होणार आहे? त्यापेक्षा संसदीय कामकाजावर खर्च होणारी रक्‍कम व त्यातला एक एक पैसा उपयुक्‍त ठरावा, म्हणून प्रत्येक खासदाराने कामकाजात जबाबदारीने भाग घेऊन खर्च कारणी लावण्यासाठी काही करावे, असे पत्र अधिक उपकारक ठरले असते. कारण दोन-पाच हजार कोटी रुपयांचे वेतन-भत्ते बंद करून जनतेचे काडीमात्र भले होण्याची शक्यता नाही. पण, संसदीय कामकाज व्यवस्थित सुरळीत चालले, तर देशाचा कारभार उत्तम होण्यास मोठी चालना मिळू शकते. सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत, आपापल्या हेकेखोरीने संसदेला ठप्प करण्यातच कायम रमलेले असतात. त्यामुळे एका बाजूला अधिवेशनावर झालेला खर्च वाया जातो आणि तिथले कामकाज ठप्प झाल्याने धोरणात्मक व व्यवहारी मोठे महत्त्वाचे निर्णय अडकून पडलेले आहेत. ते विषय मार्गी लागू शकले, तर जनतेचे जीवन अधिक सुरळीत चालू शकते. लोकांना तेच हवे आहे. म्हणूनच लोकप्रतिनिधींनी कितीही पटीने वेतन-भत्ते वाढवले म्हणून सामान्य लोकांनी कधी तक्रारी केलेल्या नाहीत. पण, कायदेमंडळात कामकाजातल्या व्यत्ययावर लोक संतापलेले असतात. कोणीतरी त्यावर उपाय काढण्याची लोक अपेक्षेने प्रतीक्षा करीत आहेत. वरुण गांधी वा त्यांच्या पिढीतल्या तरुण लोकप्रतिनिधींनी त्या दिशेने काही हालचाली केल्यास जनतेकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसादही मिळू शकेल; अन्यथा असली पत्रे वरिष्ठ विचारात घेत नाहीत आणि दोन-चार दिवस चर्चा चालवून विस्मृतीत ढकलली जात असतात. त्यातून काहीही निष्पन्‍न होत 
नसते.


















by - Daily Pudhari 
 shankar.pawar | Publish Date: Jan 29 2018 1:00AM

माझ्याबद्दल