शुक्रवार, ८ जुलै, २०१६

कल्पक तरुणाचा प्रेरणादायी प्रवास, १२ हजारांच्या कॅमेऱ्यातून १० कोटींची कंपनी


कोणत्याही मध्यमवर्गातील कुटुंबातील तरुणाप्रमाणे संदीपचीही काही अस्पष्ट स्वप्ने उद्दिष्टे होती. या स्वप्नांना उराशी बाळगूनच संदीप माहेश्‍वरीने बी कॉमला प्रवेश घेतला. यादरम्यान त्याचा पिढीजात व्यवसाय ठप्प झाला होता. तेव्हा या कठीणसमयी घराला हातभार लावण्याची जबाबदारी संदीपवरच आली. शिकण्याबरोबरच संदीपने मल्टिलेव्हल मार्केटिंगपासून ते घरगुती उत्पादने तयार करणे सुरू केले आणि मार्केटिंगपर्यंत जे शक्य होईल ते सर्व केले.
१९ वर्षांच्या संदीपने शेवटी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान मॉडेलिंगच्या ग्लॅमरस जगाकडे तो आकर्षित झाला. त्याने मॉडेल बनण्याचाही विचार केला. पण काही काळातच या क्षेत्रातील होणारे शोषण पाहता हे क्षेत्र सोडून स्ट्रगलर मॉडेल्सची मदत करण्याचा मनाशी ठाम निर्णय घेतला आणि फोटोग्राफीच्या दोन आठवड्यांच्या कोर्सला प्रवेश घेतला. यानंतर त्यांनी छोट्या स्तरावर आपला स्टुडिओ सुरू केला. मॉडेल्सचे पोर्टफोलिओ बनवण्यास सुरुवात केली.

जागतिक विक्रम बनवला :

दिवसभरातते पोर्टफोलिओ मॅनेज करत असतानाच एके दिवशी संदीपने वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्याचा विचार केला. या कल्पनेसह त्यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डशी संपर्क साधला. त्यांनी संदीपला कमीत कमी १०० लोकांसह १२ तासांचे १०,००० शॉट घेण्याचे उद्दिष्ट (टार्गेट) ठेवले. संदीपने टार्गेट पूर्ण केले आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपली जागा बनवली. यानंतर संदीप रातोरात प्रसिद्ध झाला.

पोर्टफोलिओते स्टॉक फोटोग्राफी :

व्यवसायवाढू लागला आणि लवकरच संदीप दिल्लीचा मोठा पोर्टफोलिओ मेकर झाला. कामादरम्यान संदीपला जाणवले की भारतीय छायाचित्रांना इंटरनेटवर स्टॉक केलेच जात नाही. जेव्हा की स्टॉक फोटोग्राफी १.५ कोटी डॉलरचा उद्योग झाला आहे. २६ वर्षीय संदीपच्या डोक्यात स्टॉक फोटोग्राफीची कल्पना आली आणि त्याने २००६ मध्ये इमेजेस बाजार ही कंपनी लाँच केली. आज इमेजेस बाजार १०,४०० फोटोग्राफर्सचा १० लाखांहून अधिक फोटो, व्हिडिओ, इलस्ट्रेशन (चित्रे) आणि डी इमेजरीसह जगातील सर्वात मोठा इमेज संग्रह झाला आहे. हेच नाही तर ४५ हूनही अधिक देशांतील ८,००० हून अधिक ग्राहकांसह इमेजेस बाजारची वार्षिक उलाढाल १० कोटींचा आकडा पार करून गेली आहे. संदीप माहेश्वरी यांना त्यांच्या सर्जनशील आणि नवोन्मेषातील प्रयत्नासाठी देश-जगभरात ओळखले गौरवले जाऊ लागले. बिझनेस वर्ल्ड मॅगझिनचे इंडियाज मोस्ट प्रॉमिसिंग आंत्रप्रेन्योर, ग्लोबल यूथ मार्केटिंग फोरमचा यूथ अचीव्हर अवॉर्ड, ब्रिटिश कौन्सिलचा यंग क्रिएटिव्ह आंत्रप्रेन्योर अवॉर्ड त्यांच्या खात्यात जमा आहे.




by - divya marathi 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल